Wednesday, 22 January 2014

संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हतेच! पतितसावित्रिक होते!!

पतितसावित्रिक म्हणजे वेदाचा अधिकार गमावलेली व्यक्ती म्हणजेच शुद्र

कामाच्या व्यापातून थोडीशी फुरसत झाली आहे. फुरसतीचा हा वेळ राहून गेलेल्या विषयांवरील लेखन पूर्ण करण्यासाठी खर्ची घालण्याचे मी ठरविले आहे. त्यातील पहिला लेख आज ब्लॉगच्या वाचकांना भेट देत आहे.  - अनिता पाटील 

वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञानेश्वर हे आमचेच असे म्हणून आजचा ब्राह्मण समाज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, ब्राह्मणी शास्त्रानुसार ज्ञानेश्वर हे ब्राह्मण नाहीत. केवळ ब्राह्मण स्त्री आणि पुरूषापासून जन्म झाला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते. ज्ञानेश्वरच नव्हे तर त्यांची इतर भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यापैकी कोणाचीही मुंज झालेली नव्हती. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले. त्यांना वाळीत टाकले. त्यामुळे ते ब्राह्मण नाहीत, हे सिद्ध होते. 

ज्ञानेश्वरादी भावंडे ब्राह्मण नसतील तर ते कोण आहेत? ब्राह्मणी शास्त्रानुसार ते पतितसावित्रिक आहेत. पतितसावित्रिक म्हणजे अशी व्यक्ती जिने वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार गमावला आहे. ब्राह्मणी शास्त्रानुसार, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांना वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार आहे. शुद्रांना असा अधिकार नाही. याचाच दुसरा अर्थ पतितसावित्रिकाचा दर्जा हा शुद्राएवढाच आहे. 

पतितसावित्रिक कोणाला म्हणायचे याविषयीचे नियम अनेक स्मृती ग्रंथात आले आहेत. ॠगवेदी ब्राह्मणांच्या ऐहिक जीवनाचे सर्व नीतनियम सांगणाèया आश्वलायन गृह्य सूत्रात ते अधिक स्पष्टपणे आले आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर त्याकाळच्या ब्राह्मण समाजाने बहिष्काराची जी कारवाई केली होती, तिचा आधारही हाच ग्रंथ होता. आश्वलायन गृह्य सूत्रात म्हटले आहे की, ब्राह्मणाची आठव्या वर्षी मुंज करायला हवी. ब्राह्मणाची मुंज जास्तीत जास्त १६ व्या वर्षांपर्यंत करता येते. कोणत्याही कारणांनी १६ व्या वर्षांपर्यंत मुंज न झाल्यास ब्राह्मण पतितसावित्रिक होतो. म्हणजेच तो ब्राह्मण राहत नाही, तो शुद्र होतो. 

आश्वलायन गृह्य सूत्रातील या नियमानुसार ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे शुद्र ठरतात. त्या काळातील ब्राह्मण समाजाने त्यांना शुद्राचीच वागणूक दिली होती. त्यामुळे आता ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना ब्राह्मण ठरविण्याचा खटाटोप करू नये. 

ब्राह्मणी शास्त्रातील पतिसावित्रिकाविषयीचे नियम केवळ ब्राह्मणांनाच लागू आहेत असे नव्हे, वेदाधिकार असलेल्या तिन्ही वर्णांना ते लागू आहेत. आश्वलायन गृह्य सूत्राच्या १९ व्या खंडात सुरूवातीलाच हे सारे नियम आहेत. आमच्या वाचकांसाठी हे नियम खाली देत आहे. 

अष्टमे वर्षे ब्राह्मणमउपनयेत ।।१।।
गर्भाऽष्टमे वा ।।२।।
एकादशे क्षत्रियम ।।३।।
द्वादशे वैश्यम ।।४।।

अर्थ : जन्मझाल्यापासून अथवा गर्भधारणेपासून आठव्या वर्षी ब्राह्मणाची मुंज करावी. अकराव्या वर्षी क्षत्रियाची आणि बाराव्या वर्षी वैश्याची मुंज करावी.

आषोडशात ब्राह्मणस्यानतीत: काल: ।।५।।
आद्वाविंशात् क्षत्रियस्य आचतुर्विंशात वैश्यस्य ।
अत ऊध्र्वं पतितसावित्रिका भवन्ति ।।६।।

अर्थ : सोळा वर्षांपर्यंत ब्राह्मणाची २२ व्या वर्षापर्यंत क्षत्रियाची व २४ व्या वर्षापर्यंत वैश्याची मुंज करण्याचा काल आहे. हा काल संपल्यानंतर (मुंज न झालेली मुले) पतितसावित्रिक होतात. (पतित सावित्रिक म्हणजे वेद म्हणण्याचा अधिकार नसलेले.)

नैनानुपनयेन्नाध्यापयेन्न याजयेन्नैभिव्र्यवहरेयु: ।।७।।

पतित सावित्रिकाची मुंज करू नये. त्यांना पढवू नये वेद आणि शास्त्रांचे म्हणजे शिक्षण देऊ नये. त्यांचे उपाद्धिक करू नये. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. (व्यवहार करू नये याचा अर्थ त्यांना वाळीत टाकावे. त्यांना जातीबाहेर टाकावे.)

- अनिता पाटील 


या लेखमालेतील इतर लेख लवकरच वाचा

1 comment:

  1. अनिता पाटील विचार मंच मधील सर्वच लेख खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून मी कवितासागर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक चालवतो, कवितासागर च्या अंकाला जगभरातून वाचकवर्ग असून कवितासागर ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. पहिले व एकमेव आंतरराष्ट्रीय कविताविषयक नियतकालिक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकोर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकोर्ड कडून कवितासागरचा नुकताच सन्मान करण्यात आला असून, माझ्या नियतकालिकात जोशी - देशपांडे - कुलकर्णी दाखवा आणि १० रुपये बक्षीस मिळावा असे माझे आवाहन आहे, थोडक्यात माझ्या नियतकालिकात बडव्याना प्रवेश नाही. कदाचित बडव्यांच्या सहभागा शिवाय चालविण्यात येणारे हे एकमेव नियतकालिक असेल. तात्पर्य असे की अनिता पाटील विचार मंच वरील काही किंवा सर्वच लेख आम्ही संबंधित लेखकाच्या नावासह व अनिता पाटील विचार मंच वरून साभार असा स्पष्ट उल्लेख करून पुनर्प्रकाशित करू इच्छितो तरी कृपया आपण आमची विनंती मान्य करून आम्हांस तशी परवानगी द्यावी. या विषयाला अनुसरून आपणास जर काही सुचवायचे असल्यास आपले स्वागत आहे. आपल्या सहकार्य व प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

    डॉ सुनील पाटील,
    प्रकाशक,
    कविता सागर प्रकाशन,
    सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,
    जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
    मोबाईल - ९९७५८७३५६९, ०२३२२ २२५५००
    sunildadapatil@gmail.com

    ReplyDelete