Thursday, 24 January 2013

संघातील ब्राह्मणांना भाजपातील ब्राह्मणेतरांचा झटका!


-राजा मइंद

ब्राह्मणी अजेंड राबविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपामधील ब्राह्मणेतर पुढा-यांनी अखेर घरी पाठविले. भाजपाच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग यांनी निवड करण्यात आली आहे. राजनाथ सिंग हे राजपूत आहेत. राजनाथ सिंग यांची निवड म्हणजे भाजपातील ब्राह्मणेतर पुढा-यांनी संघाच्या ब्राह्मणी नेतृत्वावर मिळविलेला निर्णायक विजय आहे. गडकरींना घालविण्याच्या मुद्यावर भाजपात उजेडात आणि अंधारात असा दुहेरी संघर्ष झडला. हा संघर्ष म्हणजे भाजपातील ब्राह्मण विरुद्ध बहुजन या वादाचा क्लायमॅक्स होता. भाजपातील संघर्ष आजचा नाही. भाजपाच्या जन्मापासून तो अस्तित्वात आहे. पण आजच्या सारखा तो कधी उघडपणे समोर आला नव्हता. ‘हिंदुत्वा'च्या झुलीआडून हा संघर्ष पूर्वी चालायचा. संघाने नितीन गडकरी यांना भाजपाचे अध्यक्ष केल्यानंतर हा संघर्ष ‘‘हिंदुत्वा'ची झूल फाडून बाहेर डोकावला. संघाला या देशात ब्राह्मणांचे राज्य आणायचे आहे. आपल्या या ब्राह्मणवादी अजेंड्याला संघाने 'हिंदुत्व' असे गोंडस नाव दिले आहे. हिंदू म्हटले की, बहुजन समाज फशी पडतो आणि मतदान करतो. बहुजनांचे मतदान घ्यायचे, पण नेतृत्व देण्याची वेळ आली की, ब्राह्मणांना पुढे कराचे, अशा आट्यापाट्या भाजपात खेळल्या जात होत्या. या खेळासाठी संघाने ‘बहुजनांच्या मतांवर ब्राह्मणांची सत्ताङ्क असे खास सूत्र विकसित केले आहे. भाजपातील बहुजन पुढा-यांनी संघाच्या या ब्राह्मणी सूत्राचे तीन तेरा आणि नऊ अठरा केले. त्यातून राजनाथ सिंग यांची भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करणे संघाला भाग पडले.

गडकरींना घालविण्याच्या मोहिमेत लालकृष्ण अडवाणी, जेठमलानी पिता-पुत्र, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, अरुण जेटली ही मंडळी सहभागी झालेली होती. जेठमलानी आणि सिन्हा यांच्या सारखे काही फटकळ नेते उघडपणे मैदानात होते. इतर त्यांना रसद पुरवीत होते. यातील बहुतांश गडकरी विरोधक ब्राह्मणेतर आहेत, तसेच निवडण्यात आलेला नवा अध्यक्षही ब्राह्मणतेरच आहे. हा निव्वळ योगायोग नाही. भाजपातील ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांनी दिलेला हा मोठा झटका आहे. 

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांकडून ब्राह्मण हितासाठी चालविली जाणारी संघटना आहे', असे आदरणीय अनिता ताई यांनी या ब्लॉगवर अनेक वेळा सिद्ध करून दाखविलेले आहे. संघाला भाजपावर संपूर्ण पकड हवी आहे. त्यासाठी नितीन गडकरी यांची भाजपाध्यक्षपदी नेमणूक केली गेली होती. २०१४ साली एनडीएची सत्ता आलीच तर गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याची भाजपाची योजना होती. या योजनेच्या फूलप्रुफ यशस्वीतेसाठी गडकरी भाजपाध्यक्षपदी राहणे संघाच्या दृष्टीने अति आवश्यक होते. त्यामुळे संघाचा सारा आटापिटा चालला होता. गडकरींना सलग दुस-या टर्मचे अध्यक्ष होता यावे, यासाठी भाजपाची घटनाही बदलली गेली होती. पण शेवटी सारेच मुसळ केरात गेले. 

गडकरींना भाजपाचे अध्यक्षपद सोडावे लागले, म्हणजे संघाने आपला अजेंडा बदलला असे मात्र नव्हे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात एनडीएची सत्ता आलीच तर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरी यांचेच नाव पुढे रेटले जाणार यात शंका नाही. ब्राह्मणेतर पुढा-यांची खरी कसोटी तेव्हाच लागणार आहे. अर्थात हे सारे ‘सत्ता आली तर' या गृहितकावर आधारित आहे. राजकारणात अशा गृहितकांना काहीही अर्थ नसतो.


संबंधित लेख 

No comments:

Post a Comment