Sunday, 4 September 2011

काँग्रेस पक्ष भाजपाच्या खेळीत अडकला का?



अण्णांच्या आंदोलनामागील राजकीय रंग-२

सरकारने टीम अण्णाशीही राजकीय खेळ्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक खेळीत टीम अण्णा सरकारच्या एक पाऊल पुढे होती. सरकार संध्याकाळी वचने द्यायचे आणि दिवस उजाडताच मोडायचे. सोनिया गांधी नसल्यामुळे काँग्रेस अंतर्गत राजकारणाला उधान आले होते. सुरूवातीला सरकारची बाजू कपिल सिबल, प्रणव मुखर्जी, अभिषेक मनु qसघवी, मनीष तिवारी ही मंडळी हाताळीत होती. तोडगा काढण्याऐवजी आंदोलन चिरडण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे लोक आणखी खवळले. समाजातील एकही घटक या आंदोलनापासून दूर राहिला नाही. मुंबईतल्या डबेवाल्यांनी आपल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा संप केला. सिबल गटाच्या खेळ्या अंगाशी आल्यानंतर प्रणव मुखर्जी आणि सलमान खुर्शिद यांना मैदानात उतरविण्यात आले. खा. दीक्षितही पडद्यामागून काम करीत होते. अण्णा टीम आणि मुखर्जी-खुर्शिद यांच्यात उपोषणाच्या आठव्या रात्री समझोता झाला होता. मात्र चिदंबरम-सिबल गटाच्या दबावामुळे हा फॉम्र्युला बारगळला. नवव्या दिवशी तर उपोषण मूळपदावर आले. सरकारने सर्व मागण्या फेटाळून लावल्या. ५ एप्रिलला अण्णांनी उपोषण सुरू केले होते, त्या पातळीवर हा विषय गेला. अण्णाचे उपोषण हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही पाहून घ्या, असे उद्गार मुखर्जींसारख्या संयमी नेत्याने काढले.
राजकीय गणितज्ज्ञ फसले!
असे का घडले? अण्णांची एकही मागणी मान्य न करता उपोषण वाèयावर सोडायला सरकार का तयार झाले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपणास या लेखाच्या प्रारंभी विचारलेल्या प्रश्नाकडे जावे लागेल. सरकार कोणासाठी काम करते? सरकार कोणताही निर्णय घेताना राजकीय फायद्या तोट्याचा विचार करते. राजकीय फायद्यासाठी सरकार जनहितविरोधी निर्णय घ्यायला कमी करीत नाही. या उलट राजकीय गैरसोय होणार असेल, तर जनहिताचे निर्णय घ्यायलाही सरकार नाखूष असते. याचाच अर्थ सरकार लोकांसाठी नव्हे; तर  स्वत:साठी काम करीत असते. अण्णांच्या आंदोलनाच्या काळात सरकारमधील गणिती भास्कराचार्य हीच फायद्या तोट्याची त्रैराशिके मांडित होते. विरोधी पक्षांच्या काय हालचाली आहेत, यावर सरकारचे बारीक लक्ष होते. छोट्या-मोठ्या ९ पक्षांनी अण्णांच्या आंदोलनाला पाqठबा दिला होता. मात्र भाजपाप्रणित रालोआची भूमिका गोलमाल होती. अण्णांच्या मागण्यांना भाजपाचा पाqठबा नव्हता. भाजपाचा पाqठबा नसल्यामुळे मनमोहनqसग सरकार तसे निर्धास्त होते. कारण सरकारने अण्णांना झिडकारले तरी भाजपाला काहीच लाभ होणार नव्हता. भाजपाला लाभ नाही म्हणजे काँग्रेसला तोटा नाही. दरम्यानच्या काळात सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन चाचपणी केलेली होती. या बैठकीतही भाजपा सरकारसोबत होती!
टर्निंग पॉर्इंट ठरलेला फोन
आंदोलन लांबणे वा चिघळणे हे सरकारच्या हिताचे नव्हते; मात्र भाजपाच्या हिताचे होते!  सरकारविरुद्ध जेवढा जनक्षोभ वाढेल, तेवढा भाजपाच्या फायद्याचाच होता. काँग्रेसला अडकविण्यासाठी भाजपाने मुद्दामच अण्णांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेता आंदोलन लांबण्याची व्यवस्था केली होती का? ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. शेवटी प्रश्न उतरतो की, भाजपाची ही खेळी काँग्रेसच्या लक्षात आली नाही का? अण्णांच्या उपोषणाचे काय करायचे ते तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे जेव्हा मुखर्जी आणि खुर्शिद यांनी टीम अण्णाला सुनावले. तेव्हा टीम अण्णाने आपली खेळी बदलली. बैठकीतून बाहेर पडताच कीरण बेदी, अरqवद केजरीवाल आणि शांती भूषण यांनी पहिले काम केले, ते मंत्र्यांचे बोल मीडियाला जशास तसे ऐकवण्याचे! येथे सरकारमधील ढुड्ढाचार्यांना पहिला झटका बसला. त्यानंतर कीरण बेदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना थेट फोन केला. भाजपा योग्य संधीची वाट पाहत होता. आता देशभरातील वातावरण टोकाचे तापलेले होते. लाभ उठविण्यासाठी योग्य वेळ आलेली होती. ‘लोहा गरम है, मार दो हथौडाङ्क या न्यायाने भाजपाने अण्णांना संपूर्ण पाqठबा देण्याचा निर्णय घेतला. अडवाणी यांनी तसे आश्वासनच कीरण बेदींना दिले. ‘बेटी दो दिन रूको हम सब ठीक कर देंगेङ्क असे अडवाणी बेदींना म्हणाले. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालतङ्कमध्ये स्वत: बेदी यांनीच अडवाणींचे हे वाक्य परवा ऐकवले. दोघांत आणखी काय बोलणे झाले हे दोघांनाच माहीत. पण हा फोन टर्निंग पॉर्इंट ठरला.
सरकार जशी टीम अण्णाच्या मागावर होती, तशीच विरोधी पक्षांच्याही मागावर होती. भाजपा अण्णांना संपूर्ण पाqठबा देणार असल्याची कुणकुण लागली, तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आधीच खूप बदनामी झालेली होती. जनतेत टोकाचा रोष होता. अशात भाजपाने अण्णांना सक्रिय पाqठबा दिला तर... या नुसत्या विचारानेच सरकारला कापरे भरले. आणि अण्णांच्या उपोषण समाप्तीचा मार्ग मोकळा झाला. अंतिम उपाय म्हणून अण्णांशी सख्य असलेल्या विलासराव देशमुखांना सक्रिय करण्यात आले. आधीपासूनच कार्यरत असलेले भैय्यू महाराज आणि श्री श्री रविशंकर यांचीही सेवा घेण्यात आली. आणि शेवटी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. अण्णांच्या उपोषणाची सांगता झाली.
आधी जीत हुअी है, पुरी जीत अभी बाकी है, अशी घोषणा करून अण्णांनी पुढच्या आंदोलनाचा बिगूल वाजवून हे आंदोलन तूर्त स्थगित केले.

-अनिता पाटील, औरंगाबाद.

1 comment: