Thursday, 1 September 2011

प्रा. हरी नरके यांना पत्र


मी प्रा. हरी नरके यांना लिहिलेले पत्र अवश्य वाचा. प्रतिक्रिया द्या. नरके सरांनी काही उत्तर दिलेच तर सर्वांना अवश्य कळवीन.
......................................................................................................
आदरणीय सर,
तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे. १९९४-९५ या काळात केव्हा तरी तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्याख्यान द्यायला आला होतात. तेव्हा मी विद्यापीठात शिकत होते. मी तुमचे भाषण ऐकून प्रभावित झाले होते. त्या भाषणात तुम्ही ब्राह्मणवाद्यांवर टीकेचे कठोर आसूड ओढले होते. टिळकांवर तुम्ही केलेली जाहीर टीका ऐकल्यानंतर मी ब्राह्मणी जातीयवादाचा अभ्यास करण्यास उद्युक्त झाले. आज तुम्ही ब्राह्मणी विचारांचे पाईक झाला आहात. हे बघून माझ्या मनाला वेदना होतात.
असो. मुख्य मुद्दा हा नाही. मुद्दा आहे, तुम्ही मराठा आरक्षणाला घेतलेल्या आक्षेपांचा. यावर मी फेसबुकवर माझ्या वॉलवर यापूर्वीच लिहिले आहे. त्यावर तुफानी चर्चाही झाली आहे. तुमचे आक्षेप कसे पोकळ आहेत, हे तुम्हालाही कळावे, म्हणून ते येथे देत आहे. आपण अवश्य वाचाल. पटले qकवा न पटले तरी कळवाल, अशी अपेक्षा आहे.
आपलीच
अनिता पाटील औरंगाबाद.
.................................
तुमचे आक्षेप आणि त्याची उत्तरे
१. आरक्षण हा मुळात गरिबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे मराठा गरिब आहेत, म्हणुन आरक्षण द्या, हे सुत्रच घटनात्मक नाही.
उत्तर : आरक्षणाच्या मूळ धोरणात गरीबी हा एक निकष गृहीत धरलेलाच आहे. नुसता जातीय मागासलेपणा हा एकमेव निकष नाही. आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, असे जे लोक सांगतात ते दिशाभूल करीत असतात.

२.आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे.सिंविधान,कलम१६-र्४े ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, त्यांनाच ते देता येते. मराठा समाज स्वताला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत फिोरवर्र्डे मानले आहे. बापट आयोगाने त्यांना ओबीसीत घालायला नकार दिलेला आहे.
उत्तर : मंडल आयोग qकवा बापट आयोग यांचे अहवाल म्हणजे धर्मग्रंथ आहेत का? लोकशाहीत काहीच अंतिम नसते. कोणताही निर्णय फिरविता येतो. आयोगांची गरजच काय? मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्यासाठी थेट कायदा करा.

३.देशातील सर्व राज्यात आरक्षण आहे, पण तिथे ते प्याकेज आहे. त्यात तीन बाबी एकत्रीत आहेत, त्या अशा:
१- नोक-या २- शिक्षण ३- राजकीय सत्ता. त्यामुळे फक्त नोकरी व शिक्षण एवढेच आरक्षण आज संपुर्ण देशात कोणत्याही राज्यात तोडुन दिलेले नाही. महाराष्ट्रात ते कसे देणार?
उत्तर : का देता येत नाही? लोकप्र्रतिनिधीगृहाने निर्णय घेतला तर कोणताही निर्णय लोकशाहीत होऊ शकतो. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही संसदेने फिरविला होता. मराठा आरक्षणासाठी असे का होऊ शकत नाही?

४. मराठा समाजाला राजकीय सत्तेमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व आधीच मिळालेले असल्यामुळे राजकीय आरक्षण देता येणार नाही. तुकड्या-तुकड्यात आरक्षण देण्याची घटनेत तरतुद नाही आणि प्रत्यक्षात आज कोठे तसे पुर्व-उदाहरणही नाही.
उत्तर : मराठ्यांना राजकीय आरक्षण नकोच आहे. शिक्षण आणि नोकèयांतच हवे आहे. पूर्व उदाहरण नसेल, तर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने नवे उदाहरण घालून द्या.

5. मराठा समाजातील दारिद््रय-रेषेखालील सर्व नागरिकांना कायद्याप्रमाणे आजही ज्या सवलती देय आहेत त्या त्यांना मिळतातच.
उत्तर : या सवलती सगळ्यांनाच मिळतात. सध्या ज्यांना आरक्षण आहे. त्यांनाही मिळतात.

६. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण क्षेत्रामध्ये फी माफी (नादारी) मिळतेच.
उत्तर : प्रश्न फीमाफीचा नाही. आरक्षणाचा आहे.

७. याशिवाय घटनेच्या कलम ३८,३९,४६ नुसार शासन त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी करु शकते. उदा. शेतक-यांना वीजबील माफी, कर्जमाफी, पाणी-पट्टी बिल माफी, सिंचन सुविधा ई. याचे देशात कोट्यावधी लाभार्थी आहेत.
उत्तर : हे लाभ केवळ मराठा समाजालाच मिळतात का? ते सर्व जातींना मिळतात.

८. आरक्षन म्हनजे प्रगती असे जे समीकरण बनले आहे त्यात मह्त्वाची गोष्ट आहे शिक्षण, प्रबोधन, आणि प्रेरणा. आज आरक्षित गटाचा विकास झाल्याचे दिसते त्याचे कारण आरक्षन असण्यापेक्षा त्यांनी फुले-आंबेडकरांचा विचार स्वीकारला आणि शिक्षण व प्रबोधनाच्या मोहिमेत सक्रीय सहभाग दिला हे आहे. यापासुन मराठा समाजाला कोणी वंचित केले आहे? आज एकीकडे आरक्षण मागायचे आणि दुसरीकडे आरक्षणाला विरोधही करायचा अशी दांभिकता काही लोक करीत आहेत, त्यात नेमके कोण लोक आहेत?
उत्तर : हा मुद्दा अतार्किक आहे. त्याला उत्तर देण्याची खरे तर गरज नाही. प्रबोधनाच्या चळवळीत मराठा समाज गेल्या सातशे-आठशे वर्षांपासून सक्रिय आहे. काही दांभिकांमुळे सर्व समाजाला वेठीला धरता येणार नाही.

९. आज राज्यात सर्वाधिक शिक्षणसंस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्व-जातीयांना आपल्या संस्थांमद्ध्ये मोफत/सवलतीत शिक्षण का देत नाहीत?
उत्तर : घटनेमुळेच असे करता येत नाही. इतरांना डावलून स्वजातीचे हीत पाहा असे सांगताना तुम्ही चक्क भेदभाव करायला सांगत आहात. हे पाप मराठा संस्था चालकांनी केले नाही, हा दोष नव्हे त्यांचा सदगुण म्हटला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या जातीपुरता विचार न करता सर्व समाजाचा विचार केला.

१०. सर्वाधिक साखर कारखाने/सुतगिरण्या/दुध संघ/पत संस्था/ सहकारी बँका आदी ताब्यात असुनही तिथे समाजातील गरजुंना का सामावुन घेतले जात नाही? काय आडवे येते?
उत्तर : याचे उत्तर वरील प्रमाणेच आहे. मराठ्यांना भेदभाव करायला का सांगता? मराठ्यांनी आपल्याच लोकांना नोकèया दिल्या, तर तुम्ही लोक पुन्हा त्यांच्याच नावाने बोंबलाल. साखर कारखाने सरकारला फुकटात १० टक्के लेव्हीची साखर देतात. त्यातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्तात साखर मिळते.

११. राजकीय सत्ता ही मास्टर की हातात असतांना जर आजही समाजातील गरजू/होतकरू/गरीब मराठा मुला-मुलींना गेल्या ५० वर्षांत विकासाचा लाभ मिळाला नसेल तर त्याला जबाबदार कोण?
विचार करा.....
उत्तर : याचे उत्तरही वरील प्रमाणेच आहे. मराठा सत्ताधीशांना केवळ आपल्या समाजाचा विकास न करता सर्व समाजाला सोबत घेऊन राजकारण केले, हा दुर्गुण नसून सद्गुण आहे.
कळावे. लोभ असावा.

आपली बहिण 
अनिता पाटील औरंगाबाद.

No comments:

Post a Comment