Monday, 5 September 2011

परशुरामाची भाकडकथा भाग -३


 रेणुका, यल्लमा आणि मातंगी


पुराणांमध्ये जशी रेणुकाची कथा आली आहे. तशीच ती लोककथांतही आहे. सीतेनंतर सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक स्त्री म्हणून रेणुकाकडे पाहावे लागेल. दक्षिण भारतात रेणुका ही यल्लमा म्हणून ओळखली जाते. एका कथेनुसार, परशुरामाने माता रेणुकाला ठार मारण्यासाठी कुèहाड काढताच रेणुका पळू लागली. पळपळत ती कनिष्ठ मातंग वस्तीत शिरली. तिला वाचविण्यासाठी एक मातंग स्त्री पुढे आली. निर्दयी परशुरामाने दोघींची डोकी उडविली. काम फत्ते केल्याबद्दल जमदग्नी परशुरामावर खुश झाला. त्याने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने आईला जिवंत करण्याची मागणी केली. ती जमदग्नीने मान्य केली. मात्र घटनास्थळी दोन महिला मृत्युमुखी पडलेल्या होत्या. त्यातली रेणुका कोणती हे दोघांनाही ओळखता येईना. मग त्यांनी दोघींनाही जिवंत करायचे ठरविले. हे करीत असताना रेणुकाचे डोके मातंग स्त्री देहावर तर, मातंग स्त्रीचे डोके रेणुकाच्या देहावर लागले. दोघी जिवंत झाल्या. पण मोठ घोळ झाला.  म्हणून ब्राह्मण स्त्रिया डोक्यावरून पदर घेत नाहीत. असे मानले जाते. ही लोककथा प्रसिद्ध आहे. 

पूर्वीपर्यंत ब्राह्मण स्त्रिया वगळता भारतातील सर्व जातींच्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेत असत. पदर घेण्याची पद्धती मात्र वेगवेगळी होती. गुजरातेत तसेच उत्तर भारतातील काही जातींत उलटा पदर घेण्याची पद्धती आहे. चित्रपटांतही या परंपरेचे प्रतिबींब पाहायला मिळते. सोनाक्षी सिन्हाची एक छबी त्या साठीच वर दिली आहे.  आता डोक्यावर पदर न घेण्याची फॅशनच आली आहे. त्यामुळे सगळ्याच जातीतील शिकलेल्या स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाहीत. खेड्यांत अजूनही डोक्यावर पदर घेण्याची प्रथा कायम आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या डोक्यावरचा पदर कधीही ढळत नाही. 

या विषयी अधिक माहिती हवी असल्यास जिज्ञासूंनी विकिपिडियाच्या खालील लींकवर भेट द्यावी : http://en.wikipedia.org/wiki/Renuka


निर्णय घेण्याचा अधिकार स्त्रियांचा!

ता. क. :  डोक्यावर पदर न घेतल्याने स्त्रिया पुढारलेल्या वाटतात असे नाही. तसेच डोक्यावर पदर घेतला म्हणूनच शालिनता येते असेही नव्हे. माझा व्यक्तीश: दोन्ही गोष्टींना विरोध qकवा समर्थन नाही. पदर घ्यायचा की नाही, हे ठरविण्याचा व्यक्तिगत अधिकार प्रत्येक स्त्रीला असला पाहिजे. असे माझे मत आहे. 

-अनिता पाटील, औरंगाबाद.

 ·  · Share · Delete

1 comment:

  1. http://en.wikipedia.org/wiki/Renuka

    ही लींक कॉपी करून अ‍ॅड्रेसबारमध्ये टाकल्यास विकिडियाची रेणुका आणि यल्लमा विषयीचे पान ओपन होईल. त्यात शेवटून तिसरा पॅरा "Renuka vs. Yellamma" या नावाने आहे. तो वर दिला आहे.

    ReplyDelete