Thursday, 1 September 2011

परशुराम भाकडकथा भाग-२ :

अर्धा क्षत्रिय, अर्धा ब्राह्मण परशुराम


भावांनो आणि बहिणींनो,

आज मी तुम्हाला परशुरामाने स्वत:च्या मातेची हत्या कशी केली,  तसेच तो कसा अर्धा क्षत्रिय आहे. याची कहाणी सांगणार आहे.
...................................................................

परशुरामपूर्ण ब्राह्मण नाही. तो अर्धाच ब्राह्मण आहे. त्याची आई रेणुका ही क्षत्रिय होती. रेणुक राजाची ती कन्या. रेणुक राजाने एक यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून त्याला कन्या रत्नाची प्राप्ती झाली. तीच रेणुका. पित्याच्या नावावरून तिला रेणुका हे नाव मिळाले. आपल्या माहूरची रेणुका ती हीच. 

अगस्त्य ब्राह्मणाने फसविले
ब्राह्मण हे क्षत्रियांना प्राचीन काळापासून फसवित आले आहेत. रेणुकाचीही अशीच फसवणूक झाली. राजा रेणुकाचा गुरु अगस्त्य याने राजा आणि कन्या दोघांनाही फूस लावली. रेणुकाचा विवाह ब्राह्मण जमदग्नीशी लावण्यास त्याने भाग पाडले. जमदग्नी हा भृगू ॠषीचा 39  वा वंशज होता. भृगूची पत्नी ख्याती ही सुद्धा क्षत्रियच होती. ती दक्ष प्रजापतीची मुलगी होती. महादेवाची पहिली पत्नी सती हिचा पिता म्हणून प्रसिद्ध असलेला दक्ष तो हाच. म्हणजेच सती आणि ख्याती या सख्या बहिणी होत. अशा प्रकारे परशुराम हा आईकडून क्षत्रिय होता. भारतातील सर्वच वर्ण आणि जातींमध्ये अशी सरमिसळ आढळून येते. त्यामुळे आजच्या घडीला कोणतीही जात शुद्ध वंशाचा दावा करू शकत नाही. ब्राह्मणही त्यात आले. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसलामध्ये हा विषय छान आला आहे. एक भाऊ फॉरेनर  शोभावा असा गोरा असतो, तर दुसरा निग्रोंसारखा काळाकुट्ट निघतो. वांशिक मिश्रणामुळे हे घडून आले.

आईचा हत्यारा परशुराम
रेणुका ही सत्य पतिव्रता होती. एकदा नदीवर पाणी आणायला जात असताना आकाशमार्गे जाणाèया एका देखण्या गंधर्वाकडे ती पाहते. केवळ या पाहण्याने जमदग्नी संतप्त होतो. रेणुकाचे मुंडके उडविण्याची आज्ञा तो आपल्या मुलांना देतो. पण त्याची मोठी मुले त्याचे ऐकत नाहीत. सर्वांत धाकटा परशुराम आज्ञेचे पालन करून कुèहाडीचा घाव घालून आपल्या आईच शीर धडा वेगळे करतो. असा हा मातृघातकी परशुराम ब्राह्मणांनी आपले प्रतिक म्हणून स्वीकारावे का?

जमदग्नीला शिक्षा
रेणुका क्षत्रिय असते. तिच्या हत्येमुळे क्षत्रिय खवळतात. त्या काळातील सर्वांत बलशाली राजा कार्तवीर्य उर्फ सहस्त्रार्जुन हा जमदग्नीचे शीर उडवून त्याला ठार मारतो. हैहय कुलोत्पन्न कार्तवीर्य नर्मदेच्या तीरावरील महिष्मतीचा (आताचे माहेश्वर) राजा असतो. पित्याची हत्या केली म्हणून परशुराम २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा करतो. परंतु ती पूर्ण करण्यात अपयशी ठरतो. 

अशा प्रकारे अर्धाच ब्राह्मण असलेला, मातृघातकी, केलेली प्रतिज्ञाही पूर्ण न करू शकलेला अपयशी असा हां परशुराम.  

असा हा परशुराम कोणत्याही समाजाने आपले प्रतिक म्हणून वापरणे योग्य आहे का? आपण मुलांना काय संस्कार देणार आहोत? बापाने आज्ञा केली तर खुशाल आईचे मुंडके उडवा, हा आदर्श देणार आहोत का? बाईला कवडीची किम्मत  न देणारया या संस्कृतीचा उदो उदो करायचा की ही संस्कृती त्याज्य ठरवायची याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. 

वरील सर्व कथा महाभारत, हरीवंश, रामायण आणि अन्य इतर पुराणांतील आहेत. जिज्ञासूंनी ही पुराणे अवश्य वाचावीत. 

अनिता पाटील, औरंगाबाद.
...........................................................

1 comment:

  1. जय हरी !
    अवतार म्हणजे " अव- म्हणजे खाली येणे आणि तृ -तरती म्हणजे तरणे किंवा तारणे पण या परशुरामाने कोणालाच तारले नाही उलट त्याने मारले आहे त्यामुळे त्याला अवतार म्हणजे योग्य नाही. शिवाय २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे म्हणतात ते अत्यंत खोटे आहे दशरथाचे आणि जनकाचे राज्य होते त्यांना तो काहीच करू शकला नाही. उलट शिवधनुष्य भंग करून श्रीरामाने त्याला एकप्रकारे दाखून दिले कि क्षत्रिय निश्चितच बलवान आहेत. वेदामध्ये "मातृदेव भाव " महटले आहे आणि इथे तर हा प्रत्यक्ष आईलाच मारतो "कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती |" हे खरे आहे कुपुत्र असू शकतो पण कुमाता कधीच नसते .रेणुका कधीच कुमाता नव्हती तिच्यावर अन्याय झाला आणि त्याचे प्रतिक म्हणून कि काय आजही रेणुकेचे फक्त " शिरच " मंदिरात असते " धड " नाहीच.....पण आपण कधीच विचार करीत नाही कारण देवभक्ती नसून " भेव भक्ती " आहे.

    ReplyDelete