Friday 2 September 2011

वंदेमातरम- 1


मुस्लिमांना वंदेमातरम म्हणण्याची सक्ती कशासाठी?

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात वंदे मातरमचा नारा दिला जात आहे, त्यामुळे त्यात मुस्लिमांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमानांनी केले आहे. माझी सूचना अशी आहे की, मुस्लिमांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. हवे तर, त्यांनी वंदेमातरम म्हणू नये. अण्णा भावुक आहेत, हा नारा देण्यामागे त्यांची भावना शुद्ध आहे. पण मनुवादी, ब्राह्मण्यवादी आरएसएसवाल्यांची भावना तशी शुद्ध नाही. त्यांना वंदेमातरमचे राजकारण करायचे आहे.
कादंबरीतले गीत कादंबरीत राहू द्या
वंदे मातरम हा राष्ट्रीय नारा नाही. ते भारताचे राष्ट्रगीतही नाही. भारताचे राष्ट्रगीत 'जनगण मन..' आहे. 'जनगण मन..' म्हणण्यास भारतातील कोणत्याही मुस्लिमाने आजपर्यंत कधीही विरोध केलेला नाही. वंदे मातरम हे बंकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील एक गीत आहे. त्याला कादंबरीतच राहू द्या. त्याला राष्ट्रीय नाèयाचा दर्जा देण्याची गरज नाही.
संघाच्या शाखांत वंदेमातरम म्हणा
या देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेषभाव पसरविण्यासाठी आरएसएसचे लोक वंदेमातरमचा आग्रह धरतात. तमाम Hindu ना विनंती आहे की, मूठभर माथेफिरू ब्राह्मण्यवाद्यांचा कळप असलेल्या आरएसएसच्या नादाला कोणीही लागू नये. आरएसएसवाल्यांना वंदेमातरम म्हणायचेच असेल, तर संघाच्या शाखांत खुशाल म्हणा. वंदेमातरमचा आधार घेऊन तुम्हाला या देशात मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा काहीही अधिकार नाही.
बाबासाहेबांनीच दिलाय धर्मपालनाचा अधिकार
कुराणाने अल्लाशिवाय कोणालाही नमन न करण्याचा आदेश मुस्लिमांना दिला आहे. त्यात ढवळढवळ करण्याचा अधिकार आरएसएस वाल्यांना कोणी दिला. आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेने या देशातील प्रत्येक नागरिकांना दिलेला आहे. मुस्लिमांनाही तो आहे. हा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न जातीयवाद्यांनी करू नये. या माथेफिरुंना माझा असा सवाल आहे की, ब्राह्मणांना आज गोमांस भक्षण निसिद्ध आहे (भलेही ते पूर्वी खात होते). मुस्लिम देशात राहणाèया ब्राह्मणना तेथील सरकारांनी गोमांस खाण्याची सक्ती केली तर तुम्हाला चालेल का? हा जसा तुमच्या धर्मात हस्तक्षेप होईल, तसाच वंदे मातरमचा आग्रह धरणे हा मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप होईल.

.............. अत्यंत महत्त्वाची टीप.................

भावांनो आणि बहिणींनो,
आरएसएस आणि इतर ज्या काही संस्था, संघटना, पक्ष Hinduत्ववादाचा पुरस्कार करतात, त्यांच्यापासून सावध राहा. हिंदूत्ववाद नावाची कोणतीही गोष्ट या देशात अस्तित्वात नाही. Hinduत्ववादाच्या भगव्या कफनीआड लपून या लोकांना भारतात मनुवाद, ब्राह्मण्यवाद आणि जातीयवाद पसरवायचा आहे. सावध राहा. त्यांच्यापासून चार हात दूर राहा. भगवी कफनी घालून रावणाने सीतेचे हरण केले. त्याच प्रमाणे Hinduत्ववादी भगव्या कफनीआडून सत्तेचे हरण करण्यासाठी टपून बसले आहेत.
सावध राहा, सावध राहा, सावध राहा.


                                                                                                  -अनिता पाटील, औरंगाबाद. 

    • या ब्लॉगवर फेसबुकवर चर्चा झाली तेव्हा हिंदूत्ववादी उर्फ ब्राह्मण्यवाद्यांनी कसे तारे तोडले, हे वाचकांना कळावे यासाठी ही संपूर्ण स्वतंत्र पोस्ट करून टाकीत आहे. ती वाचकांनी अवश्य पाहावी. ब्राह्मण्यवाद्यांचा माथेफिरूपणा त्यातून आपल्या लक्षात येईल.

1 comment: