Sunday, 4 September 2011

बायकांचे कपडे आणि तुरुंगाचा हट्ट!


अण्णांच्या आंदोलनामागील राजकीय रंग-१

सरकार कोणासाठी काम करते? या प्रश्नाचे उत्तर आहे : सरकारसाठीच! जगातील कोणत्याही सरकारची हीच एकमेव पॉलिसी असते. ही बाब आपण एकदा स्पष्टपणे समजून घेतली की, अण्णा हजारे यांचे जनलोकपालसाठीचे उपोषण इतके दिवस का लांबले, याचे उत्तर शोधणे सोपे जाते.
अण्णांचे उपोषण एका दिवसात ठरलेले नव्हते. ५ ते ९ एप्रिल २०११ या दरम्यान अण्णांनी राजधीत पहिले उपोषण केले. जनलोकपाल पारीत झाले नाही, तर १६ ऑगस्टपासून आपण रामलीला मैदानावर उपोषण करू, अशी घोषणा अण्णांनी पहिले उपोषण सोडतानाच केली होती. अण्णांचे पहिले उपोषण ४ दिवस चालले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याला घाबरून सरकारने लगेच शरणागताची भूमिका घेऊन अण्णांच्या मागण्या मान्य करून टाकल्या. अण्णांच्या उपोषणासमोर सरकार झुकल्याचे पाहून राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले बाबा रामदेव यांनी मध्येच रिंगणात उडी घेतली. अण्णांच्या नियोजित उपोषणाच्या आधीच बाबांनी रामलीला मैदानावर उपोषणाचा बाज मांडला. मात्र यावेळी सरकारने राजकीय खेळ्या केल्या. त्यात बाबा अडकले. पोलिसांच्या भीतीने बाबांना बायकांचे कपडे घालून पळून जावे लागले. बाबा पळून गेले. हरीद्वारला जाऊन जाहीरपणे रडले. या सर्व नाट्याचा कोणताही परीणाम जनमानसावर झाला नाही. एक प्रकारे जनमानसाने बाबांकडे पाठच फिरविली.
नैतिकता नियमांपेक्षा श्रेष्ठ
आंदोलन चिरडण्याचा हा यशस्वी अनुभव गाठीशी असल्यामुळे मनमोहनqसग सरकारचे मनोबल उंचावले होते. अण्णांच्या आंदोलनाच्याा सुरूवातीच्या काळात मनुष्यबळ विकासमंत्री ज्या पद्धतीने कुत्सितपणे हसत होते, त्यावरून सरकारच्या निर्धास्ततेची कल्पना येत होती. अण्णांच्या उपोषणाला कायदे आणि नियमांच्या फासात आवळण्याचा प्रयत्न केला आणि येथेच सरकारचे चुकले. नैतिकता  ही नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते. हे सरकार विसरले. अण्णांकडे निष्कलंक चारित्र्याचे ब्रह्मास्त्र आहे, हे मी मागच्या लेखात म्हटले होते. हे ब्रह्मास्त्र सरकारला जाळू लागले, सरकारची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी टिव्हीवर पाहिलेच आहे. बाबांसारखे अण्णांचे आंदोलन सहज चिरडून टाकता येईल, या आत्मविश्वासाने सरकारने अण्णांना १६ ऑगस्ट २०११ रोजी च्या सकाळीच अटक केली; मात्र झाले भलतेच. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी अण्णांना पोलिस लाईन कँटीनमार्गे अनेक ठिकाणी फिरवून संध्याकाळी ४ वा. तिहार तुरुंगात नेले. लोक हजारोंच्या संख्येने पोलिसांच्या मागे होते. संध्याकाळपर्यंत तिहार तुरुंगाबाहेर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमला. आता सरकार हादरले. संध्याकाळी अण्णांच्या सुटकेचा आदेश काढला. 
कमरेत वाकलेले सरकार!
आता कंट्रोल अण्णांच्या हातात होता. अण्णांनी बाहेर पडण्यास नकार दिला. पोलिसांच्या भीतीने रामदेव बाबा बायकांचे कपडे घालून पळून गेले, तर अण्णा तुरुंगात राहण्यासाठी अडून बसले. हा दोन्ही आंदोलनातील फरक आहे. अण्णांच्या आंदोलनाला देशभरातून पाqठबा का मिळाला. याचे उत्तर येथे मिळते. सरकारने सुटका केल्यानंतरही अण्णा १६ ते २० ऑगस्ट या काळात बेकायदेशीररित्या तिहारमध्येच राहिले. त्यांना बाहेर काढण्याची qहमत सरकारमध्ये झाली नाही. या संपूर्ण ५ दिवसांच्या काळात तिहारबाहेर किमान ५ हजारांचा जनसमुदाय ठिय्या देऊन होता. स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या नेत्यासाठी तुरुंगाबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच लोक थांबले. १६ ऑगस्टच्या संध्याकाळी अण्णांच्या सुटकेचा आदेश काढला तेव्हा सरकार पहिल्यांदा झुकले. नंतर संपूर्ण आंदोलनाच्या काळात ते झुकतच राहिले. 

-अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment