Saturday 29 September 2012

असे धाडस फक्त पवारच दाखवू शकतात

                                                                                             

प्रा. रवींद्र तहकिक
हा लेख म्हणजे राष्ट्रवादी कोन्ग्रेस किंवा पवार फैमिलीचे समर्थन अथवा शरणता नव्हे !
अनिता पाटील विचारमंच स्वतःच्या तत्वांशी आणि परिवर्तनशील पुरोगामी बहुजन प्रबोधनाशी
बांधील आहे; या बाबतीत आम्ही कशीही ,कधीही, केव्हाही ,कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही
कारणांनी तडजोड करणार नाही. उद्या एखाद्या बहुजनातील व्यक्तीने आमच्या विचार भूमिकेला
आव्हान दिले तर उदिष्टा आड येणारे आप्त स्वकीयच नव्हे तर पोटची पोरेही कापून काढावी
लागतात या न्यायाने वेळ पडल्यास आम्ही कुणाचीही गय करणार नाही हे निश्चित !!
             परंतु हा ब्लोग फक्त दोषारोपण करतो किंवा टीकेचाच सूर लावतो असे नाही तर
समाजात काही चागले घडत असेल, काही नवे चागले पायंडे पडत असतील तर त्या बद्दल
संबधितांना त्याचे श्रेय देण्याचे औदार्य दाखवणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.
           महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सिंचन घोटाळ्यासंदर्भात
झालेले आरोप आणि श्वेतपत्रिका या मुद्यावरून आपल्या मंत्रीपदाचा थेट राजीनामा दिल्या  नंतर
राजकीय वर्तुळात आणि मीडियात एकच खळबळ उडाली. या घटनेचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ
काढले. कुणी राजकीय भूकंपाचे भाकीत केले. तर कुणी पवार x पवार बिटवीन प्रफुल्ल पटेल
व्हाया सुप्रिया सुळे अशी थेअरी मांडली.
          परंतु शिंके तुटण्याची वाट पाहणाऱ्या कुणाही बोक्याचे फावणार नाही एवढी समज -उमज आणि
राजकीय कुशलता पवार कुटुंबियांना नक्कीच आहे .मुळात अजित पवार यांनी त्यांचे काका खुद्द शरद पवार
यांना कधी जे धाडस दाखवता आले नाही ते धाडस दाखवून काका पेक्षा एक पाउल पुढे टाकले
आहे .राजकारणातील लोक अगदी न्यायालयाने तुरुंगात  रवानगी करे पर्यंत खुर्चीला चिटकून
बसतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, स्वतः शरद पवार यांच्या
वर अनेकदा अनेक प्रकारचे आरोप झाले परंतु त्यांनी हि कधी सत्तापद सोडण्याचे धाडस दाखवले
नव्हते. उलट काही वर्तमान पत्रावर आणि खैरनार सारख्या अधिकार्यावर त्याने अब्रूनुकसानीचे
खटले दाखल केले होते. यथावकाश शरद पवार सर्व आरोपातून निष्कलंक ( किंवा लीलया म्हणा
हवे तर ) सुटले ; परंतु अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडून आता वाटेल तशी निष्पक्ष चौकशी करा
असे खुले आव्हान देऊन जो नवा पायंडा पाडला आहे तो सर्वच राजकारण्यासाठी आदर्श आणि
अनुकरणीय आहे .
        हे स्पष्ट आहे कि अजित पवार जनतेत जाऊन आपले सत्तास्थान आणखी बळकट करणार .
त्यांच्या एका निर्णयाने आज राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज नेत्यांना त्यांनी चार कोस पिछाडीवर
टाकले आहे . सहकारी कोन्ग्रेस पक्षावरही त्यांची जरब वाढली आहे. एवढेच नव्हे  तर स्वतःचे
काका शरद पवार यानाही त्यांनी या निम्मित्ताने योग्य तो मेसेज दिला आहे.
       राष्ट्रवादीतील होऊ घातलेली गटबाजी आता थांबेल. आणि कार्यकर्ता वर्ग अजित पवार यांच्या
मागे एकवटेल हि यातील अजित पवार यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू      

No comments:

Post a Comment