Wednesday, 12 September 2012

ह. मो. मराठे याचे विषारी निवेदन जसेच्या तसे


ह. मो. मराठे यांनी काढलेल्या निवदेनाबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता आहे. या महाभागाने नेमकी कोणते विषारी फुत्कार सोडले, हे आम्हला कळू द्या, अशी मागणी वाचकांकडून होत होती. त्या पाश्र्वभूमीवर मराठे यांनी जारी केलेले निवेदन पुढे देत आहे.
प्रा. रविन्द्र तहकीक,
संपादक, अनिता पाटील ब्लॉग

........................................................
ह. मो. मराठे लिहितो :  

माझी भूमिका अगदी थोडक्यात अशी-

‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?' हा माझा प्रदीर्घ लेख ‘किस्त्रीम'च्या २००४च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांविषयीच्या अपप्रचाराला नवे उधाण येत असल्याचे मला जाणवत होतेच. पण, ५ जानेवारी २००४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड'ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले. 

जेम्स लेन नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, ‘‘दादोजी कोंडदेव हा महाराजांचा जन्मदाता पिता होता असा ज्योक महाराष्टड्ढात सांगण्यात येतो. भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरील प्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांनी वरील हल्ला केला होता. दुस-या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वतः यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुस-या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २००४ सालच्या महाराराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा  राष्ट्र वादी कॉंग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वा-यावर सोडण्यात आले. 

ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे. 

हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे खून ब्राह्मणांनीच केले असे सांगितले जाऊ लागले आहे. या द्वेषमूलक अपप्रचाराला साधार आणि तर्कशुद्ध उत्तरे देणे आवश्यकच झाले आहे. ब्राह्मणांनी भारतीय समाजाची जडणघडण, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा इत्यादी क्षेत्रात केलेले कार्यही बहुजन समाजातील नवशिक्षित तरुण पिढीसमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्र्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातीत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे.

ह. मो. मराठे
..................................................................

हे लेख अवश्य वाचा :

ब्लॉगच्या संपादकांचा खणखणीत लेख वाचा : मराठ्याचे ब्राम्हणकांड 

2 comments:

  1. या मधे विषारी काय आहे? असल्यास जे काही विषारी वाटत असेल ते मला कळवावे.

    आपला,
    प्रणय

    ReplyDelete
    Replies
    1. आपला पत्ता द्या. कळवून टाकू.

      Delete