Sunday 9 September 2012

धनाजी जाधव यांना बाजीरावाचा पिता म्हणण्याचे पाप करू नका


चिपळूण येथे होणा-या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ब्राह्मण समाजातील एका मोठ्या वर्गाची विकृती पुन्हा एकदा समोर आली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार ह.मो. मराठे यांनी जेम्स लेन याच्या विकृतीचे जाहीर समर्थन केले आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी प्रसारमाध्यमे हा विषय चवीने चघळत आहेत. (नाही म्हणायला चॅनलांचा एक फायदा आहे. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोप-यात असला तरी मातृभूमीशी तुम्ही जोडलेले राहता.) मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब, आणि छत्रपती शहाजी राजे यांची बदनामी करताना ब्राह्मणांना विकृत आनंद मिळतो, हे सिद्ध करण्यासाठी वेगळा पुरावा देण्याची आता गरज नाही. हे थांबणार कधी?

विकृतीला विकृतीने उत्तर देणे चुकीचे 
या विकृतीला उत्तर म्हणून दुस-या बाजूनेही नवी विकृती जन्माला येत आहे. पहिल्या बाजीराव पेशव्याच्या पित्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे काम ही विकृती करीत आहे. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग यांचा वापर करून ही विकृती पसरत आहे. हे लोक करीत असलेला दावा असा : ‘पहिला बाजीराव पेशवा याचे बॉयलॉजिकल फादर बाळाजी विश्वनाथ नाही. मराठ्यांचे तेव्हाचे सरसेनापती धनाजी जाधव हे बाजीरावाचे बायलॉजिकल फादर आहेत. बाळाजी विश्वनाथ हा धनाजी जाधवांचा आश्रित होता. आपल्या दुस-या एका आश्रिताच्या मुलीशी बाळाजीचे लग्न धनाजींनी लावून दिले. बाळाजीची ही वधू लग्नाच्या आधीपासूनच धनाजींच्या सोबत राहत असे...' शिवरायांचा अवमान करणारी प्रवृत्ती जितकी घातक तितकीच बाजीरावाचा अवमान करणारी विकृतीसुद्धा घातक आहे. दोन्ही विकृतींचा निषेधच व्हायला हवा. विकृतीला विकृतीने उत्तर देणे सर्वथा चूक आहे.

हा धनाजींचाही अवमान आहे
अशा विकृत भाकडकथांपासून किमान बहुजनांनी तरी दूरच राहिले पाहिजे, असा सल्ला मी देईन. (ब्राह्मण हे कोणाचे ऐकत नाहीत, म्हणून मी बहुजनांना हा सल्ला देत आहे.) कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये, असे म्हटले जाते. ब्राह्मणांना काय करायचे ते करू द्या. बहुजनांनी असले धंदे करू नये. नाही तर बहुजनांत आणि ब्राह्मणांत काय फरक राहील. धनाजी जाधव हे बाजीराव पेशव्याचे बायलॉकिल पिता होते, असे म्हटल्याने नुसता बाजीरावाचा नव्हे, तर धनाजी जाधवांचाही अवमान होतो, हे लक्षात घ्यायला हवे. इतिहास पुरुषांच्या पित्याबद्दल वाद निर्माण करून इतिहासातील महिलांना आम्ही कलंकीत करीत आहोत. धनाजी जाधव हे बाजीराव पेशव्यांचे जैविक वडील होते, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा बाजीरावाच्या आईच्या चारित्र्याला अकारण कलंक लागतो. असे प्रकार निषेधार्ह आहेत. 

शिवरायांच्या शिकवणुकीचा अपमान करू नका
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदारांना स्वच्छ चारित्र्याची शिकवण दिली. महाराजांनी सैनिकांसाठी कडक नियम केले होते. त्यात पहिला नियम हा ‘महिलांचा सन्मान कराङ्क असा होता. हा नियम मोडणाèयांना महाराज कडक शिक्षा देत. त्यामुळेच परमुलखात मोहिमा राबवितानाही मराठा सैनिकांकडून महिलांच्या पदरालाही कधी हात लागला नाही.  महाराजांच्या महाराष्ट्रात आज इतिहासातील स्त्रियांच्या पदराला हात घातला जात आहे, ही गोष्ट खरोखरच वेदना देणारी आहे. हे पापाचरण आहे, यापासून दूर राहा. दूर राहा. 

अनिता पाटील

1 comment:

  1. aiicha xxxxxxx hay batukadyanchya hyanla mara rao tashi thambaychi nahit hi krutagnha jamat

    ReplyDelete