Tuesday 11 September 2012

abhivachan

प्रिय वाचक बंधू आणि भगिनीनो



रवींद्र तहकिक ( दादाहरी ) चा आपणा सर्वाना सप्रेम नमस्कार अनिता पाटील यांनी त्यांच्या कार्यबाहुल्या मुळे आणि अमेरिकेतील  अपरिहार्य व अनिवार्य वास्तव्या मुळे त्यांच्या ब्लोगच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. खुद्द अनिता यांनीच त्यांच्या ब्लोग वर या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तत्पूर्वी त्यांनी या बाबतीत माझी स्वीकृती देखील घेतलेली आहे. अनिता पाटील यांच्या ब्लोग चे मी संपादन करावे की करू नये या बाबतीत मत -मतांतरे असू शकतात. कुणाला मी या साठी योग्य आहे आणि अनिताने सुरु केलेल्या अभियानाला पुढे नेण्यास समर्थ आहे या बाबत विश्वास वाटत असेल; काही असेही असू शकतात कि जे या बाबतीत साशंक असतील. माझ्या बाबतीत साशंक असणाऱ्याची पहिली शंका माझ्या लेखन शैली बद्दल असणार याची मला जाणीव आहे. मी जरा अधिक उपरोधिक आणि भाषेचा विधिनिषेध न बाळगता लिखाण करतो. परंतु येथे मी हे स्पष्ट करतो की या पूर्वीचे माझे लिखाण हे माझे लिखाण होते त्याला मी स्वतः जबाबदार होतो. आता मात्र मी अनिता पाटील यांच्या ब्लोग चा संपादक या नात्याने लिखाण करणार किंवा त्याचे सूत्र चालवणार असल्याने माझी भूमिका धोरण आणि जबाबदारी बदलली आहे ; अनिता पाटील आणि त्यांच्या ब्लोगची लोकप्रियता आणि विश्वासाह्र्यता वाढवणे बहुजन विचारला समृध्द करणे ही संपादक म्हणून माझे कर्तव्य असेल. आणि या कर्तव्यात कुठेही कसर वा कसूर होणार नाही असे वचनच नाही तर शपथपूर्वक सांगतो . बंधू आणि भगिनीनो माझ्या आजवरच्या लिखाणाचा आणि संपादक म्हणून माझ्या कामाचा कृपया संबंध जोडू नका ; या दोन्ही भूमिका आणि त्यांचे उत्तरदायित्व परस्परा पासून सर्वस्वी भिन्न आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. 


ब्लॉगची संपूर्ण जबाबदारी संपादक नात्याने माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुषंगाने या ब्लॉगची संपूर्ण फेरमांडणी करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून ब्लॉगचे नाव ‘अनिता पाटील विचार मंच' असे करण्यात आले आहे. नाव बदलले तरी ब्लॉगच्या विचारांत कोणताही बदल झालेला नाही. हा ब्लॉग समतावादी विचारांचे नेतृत्व या पुढेही करीतच राहील. हा बदल स्वीकारून आपण ब्लॉगवरील वाचकांचे प्रेम असेच कायम राहील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.

आज एवढे निवेदन पुरेसे आहे 
पुन्हा भेटूच ! धन्यवाद !!

प्रा. - रविन्द्र तहकीक उपाख्य दादाहरी 
संपादक, अनिता पाटील विचार मंच


No comments:

Post a Comment