Wednesday 11 December 2013

शिवाजी राजे हिंदू धर्माचे की शिव धर्माचे?

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


शिवजीराजांनी अथक परिश्रमाने स्वराज्य निर्माण केले. जगातील कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला
किंवा राजाला त्याच्या धर्माचे विधी करण्यास विरोध केला जात नाही. समता हे धर्माचे महत्त्वाचे मूल्य
आहे. एकाच धर्मातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ व्यक्तीला धर्माचे आचार, विचार, अध्ययन करण्याची
परवानगी असते. शिवरायांनी तर आपले कर्तृत्व अविरत कष्टाने, चारित्र्याने, निष्कलंक वृत्तीने सिद्ध
केलेले होते. तरी देखील त्याच धर्मातील ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?
यावरुन एक बाब सिद्ध होते की शिवरायांचा व ब्राह्मणांचा धर्म एक नाही. धर्म एक असता तर
ब्राह्मणांनी आनंदाने आणि फुकट राज्याभिषेक केला असता. याऊलट त्यांनी राजांना खूप छळले. तेच
हिंदूत्ववादी (ब्राह्मण) आज शिवरायांचे भांडवल करुन जगतात.
शिवाजीराजे महान पराक्रमी, बुद्धीमान, चारित्र्यसंपन्न, प्रजाहितदक्ष आणि न्यायी असताना
देखील कोणत्या धर्माने राजांना शूद्र ठरविले? त्यांना शूद्र ठरवून त्यांचे कर्तृत्व नाकारणारा व परदेशातून
आलेल्या आर्यब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविणारा हिंदू धर्म राजांचा धर्म असू शकतो का?
हिंदू  धर्माने भारतीयांच्या सृजनशिलतेवर कडक निर्बंध घातले. समुद्र ओलांडणे, शस्त्र धारण
करणे, स्त्रियांना स्वातंत्र्य देणे, शिक्षण देणे, समता पाळणे यावर हिंदूनी (ब्राह्मणांनी) कडक बंधने
घातली. शिवरायांनी ही बंधन तोडली. शिवरायांनी समुद्र ओलांडला, आरमारदल उभारले,
बहुजनांच्या हातात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे दिली, स्त्रियांना स्वातंत्र्य दिले, स्वत: आईकडून
शिक्षण घेतले, संभाजीराजांना शिक्षण दिले. हिंदुंचे ग्रंथ प्रामाण्य नाकारले व समतेवर आधारलेले
स्वराज्य निर्माण केले. मग सांगा शिवाजीराजे कसे हिंदू  ठरतात?

हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्त्व आहे हे ओळखणारे जैन, बौद्ध, शिख ही आपली भावंड आहेत.
त्यांनी वैदिकांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कु्ररपणा ओळखला व जैन, बौद्ध आणि शीख हे ब्राह्मणी
धर्मापासून स्वतंत्र झाले. जैन, बौद्ध, शीख धर्मात ब्राह्मणांना नाक खुपसण्याची संधी नाही. म्हणूनच
या देशात जैन, बौद्ध आणि शिखांची प्रगती झाली. शिवाजीराजांनी देखील स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न
सुरु केले होते. राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. शिवशक सुरु केला, स्वतंत्र शिवराई होन ही चलन
पद्धती सुरु केली. स्वतंत्र राज्यकारभार, न्यायपालिका सुरु केली, शिवपूत्र संभाजीराजांनी धर्मचिकित्सा
सुरु केली. भटांची सर्व कटकारस्थाने लक्षात आल्याबरोबर राजांनी स्वतंत्र व्यवस्थानिर्मिती सुरु केली.
शिवाजीराजे जगले असते तर त्याचवेळी शिवरायांनी शिवधर्माची स्थापना केली असती. त्यामुळेच ३
एप्रिल १६८० रोजी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांनी राजांचा खून केला.


संत तुकाराम महाराज यांचा ब्राह्मणांनी खून केला
शिवाजीराजांना राज्याभिषेक करणे अत्यावश्यक होते. पण स्वत:ची धर्मसंहिता नसल्यामुळे
राजांना ब्राह्मणांच्या म्हणजेच हिंदू धर्मावर अवलंबून रहावे लागले. शिवरायांना स्वत:चा धर्म असता
तर ब्राह्मणांनी राज्याभिषेक प्रसंगी छळ केला नसता. राजांच्या कारभारात नाक खुपसले नसते.
शिवरायांची धार्मिक बाजू सांभाळणारे संत तुकाराम महाराज यांचाच ब्राह्मणांनी शिवरायांच्या बालपणी
खून केला. अन्यथा संत तुकुकारामांनी राज्याभिषेकेकापर्यंत स्वतत्रंत्रधर्म स्थापणे केलेला असता. आणि
ब्राह्मणांनी म्हणजेच हिंदू  धर्माने शिवरायांचा केलेला छळ, केलेला विरोध, शूद्र म्हणून केलेली अवहेलना
याचा बदला घेतला असता ही गरज ओळखून देशातील अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी,
विचारवंतांनी, देशभक्त समाज सुधारकांनी शिवरायांच्या विचार प्रेरणेचा शिवधर्म स्थापन केलेला आहे.
शिवधर्म हा शिवरायांचा धर्म आहे. शिव म्हणजे शिवाजी! शिव म्हणजे सत्य, मंगलमय आणि
उदात्त! शिवधर्मात असत्य काहीही नाही. संत तुकाराम महाराज, शहाजीराजे, संभाजीराजे, ताराराणी
यांच्या कर्तृत्वाचा व विचारांचा अमूल्य ठेवा म्हणजे शिवधर्म! स्वातंत्र्याची आद्यजनक राजमाता
जिजाऊमाँसाहेब यांना प्रेरणा स्त्रोत मानून एकमेव आणि पहिलाचा धर्म आहे. ज्यांनी आपल्यासाठी
संपुर्ण आयुष्य घालविले. तेच शिवधर्माचे देव आहेत. ब्राह्मणनिर्मित खोटे, काल्पनिक देव आणि गं्रथ
याला शिवधर्मात अजिबात स्थान नाही. शिवरायांना छळणा-या ब्राह्मणांना शिवधर्मात अजिबात प्रवेश
नाही.

ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पहातो?
आता वाचकांनी ठरवावे ही शिवरायांना शूद्र ठरविणारा, राज्याभिषेक नाकारणारा, अमाप पैसा
घेऊन राज्याभिषेक प्रसंगी छळणारा हिंदू धर्म शिवरायांचा का शिवरायांच्या विचार प्रेरणेतून निर्माण
झालेला शिवधर्म शिवरायांचा?
शिवाजीराजे धर्मनिष्ठ हिंदू  असते तर राजांनी राज्याभिषेक केला नसता, कारण ब्राह्मणेत्तरांना
राज्याभिषेक करण्यास बंदी होती. राजे धर्मनिष्ठ हिंदू म्हणजेच ब्राह्मणनिष्ठ असते तर राजांनी समुद्र
ओलांडला नसता, कृष्णा कुलकर्णीला ठार मारले नसते, शूद्रातिशूद्रांना अधिकार पदावर नेमले नसते,
राजे धर्मनिष्ठ हिंदू असते तर सत्यनारायण, यज्ञ, अभिषेक केला असता. मुहूर्त पाहिला असता, रोज भट
निर्मित ग्रंथांची पारायणे केली असती. या उलट राजांनी भटनिर्मित सर्व हिंदू ग्रंथांना लाथ मारली. राजे
धर्मनिष्ठ हिंदू  असते तर त्यांनी रोज ब्राह्मणांचा सल्ला घेतला असता, याउलट राजांनी अनेक ब्राह्मण
कापले व म्हणाले "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पहातो?" यावरुन सिद्ध होते की शिवाजीराजे
शिवधर्माचे आहेत.

हिंदू धर्माच्या छळामुळे जिजाऊ माँसाहेबांचे दु:खद निधन

शिवाजीराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला. धर्म-संस्कृतीच्या नावाखाली गागाभट्टाने
विरोध केला. या अपमानामुळेच जिजाऊ माँसाहेबांसारखा स्वराज्याचा आधारवड १७ जून १६७४
रोजी कोसळला. राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच १० दिवसांनी जिजाऊंचे नैसर्गिक निधन होणे शक्य
नाही. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेने माँसाहेबांचा देखील बळी घेतला. पराक्रमी, विव्दान, प्रजावत्सल
असणा-या माँसाहेबांचा बळी घेणारा धर्म माँसाहेबांचा धर्म होऊच शकत नाही. यासाठीच मराठ्यांना
शिवधर्माची गरज आहे.

शिवरायांचा दुसरा राज्याभिषेकेक-शिवधर्माचची पायाभरणी
शिवरायांचा ६ जून १६७४चा राज्याभिषेक म्हणजे या देशातील ब्राह्मणांनी पैसा मिळवून
राजांचा व बहुजनांचा केलेला फार मोठा छळ होता. पण आपला धर्म नसल्यामुळे ब्राह्मणांच्या
हिंदू धर्मावर शिवरायांना अवलंबून रहावे लागले. हे शल्य राजांना होतेच. म्हणूनच शिवरायांनी २४
सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने केला. यासाठी निश्चलपुरी गोसावी यांनी
पौरोहित्य केले. यासाठी अधिक प्रसिद्धी किंवा खर्च आला नाही. या राज्याभिषेकप्रसंगी एकही
अपमानास्पद घटना घडली नाही.

२४ सप्टेंबर हा शिवधर्मदिन 
शिवरायांनी केलेला दुसरा राज्याभिषेक म्हणजे त्यांनी ब्राह्मणीधर्म (हिंदू धर्म) नाकारल्याचे
सिद्ध होते. हिंदू धर्मातील ग्रंथ ब्राह्मणांच्या हिताचे व बहुजनांच्या घाताचे आहेत हे राजांनी हेरले.
हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्व आहे हे राजांनी ओळखले. म्हणूनच राजांनी दुसरा राज्याभिषेक केला.
शिवरायांच्या जीवनात दुस-या राज्याभिषेकाला फार मोठे महत्व आहे. दुसरा राज्याभिषेक आपल्याला
खरा धर्म सांगतो. म्हणून ब्राह्मण दुसरा राज्याभिषेक सांगत नाहीत. दुसरा राज्याभिषेक म्हणजे
शिवधर्माची पायाभरणी आहे. दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर हा शिवधर्मदिन (बहुजनमुक्तीदिन) आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

2 comments:

  1. संभाजी राजांनी गोवा जिंकला आणि सप्तकोटीश्वराच्या मंदिराबाहेर एक शिलालेख कोरुन घेतला, त्यावर लिहिलं आहे, "हे आता हिंदुंचे राज्य झाले"

    ReplyDelete
  2. Very nice information
    जय शिवराय

    ReplyDelete