Tuesday 6 August 2013

नरेंद्र मोदी सरकारकडून कच्छमधील शीख शेतक-यांचा छळ

गुजरात दंगलीत ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल केली गेली. ही कत्तल होत होती, तेव्हा मुस्लिमेतर समाज गुजरातेत बघ्याची भूमिका घेत होता. मुस्लिमांना दहशतीखाली आणल्यानंतर आता बारी शिखांची आहे. गुजरातच्या कच्छ भागात स्थायिक झालेल्या १००० पेक्षाही जास्त शीख शेतक-यांना तेथून हाकलून लावण्यासाठी गुजरात सरकार धमकावित आहेत.

शिखांच्या मालकीच्या २० हजार एकर जमिनीवर डोळा
कच्छमधील शीख शेतक-यांचे नेते सुरेंदर सिंग भुल्लर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, १९७३ सालच्या ‘बॉम्बे टेनन्सी अँड अ‍ॅग्रीकल्चरल लँड्स अ‍ॅक्ट' जुनाट या कायद्याचा आधार घेऊन २०१० सालापासून नरेंद्र मोदी सरकार शीख शेतक-यांचा छळ करीत आहेत. सुमारे १ हजार शीख शेतक-यांचा जमीन मालकीवरील हक्क काढून घेण्यात आला आहे. "तुम्ही गुजराती नाही आहात, त्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये जमीन मालक होण्याचा अधिकारच नाही", असे मोदी सरकारने शीख शेतक-यांना सुनावले आहे. गुजरातच्या कच्छ भागात २० हजार एकर शीख शेतक-यांच्या मालकीची आहे.  या जमिनीवर मोदी सरकार मधील माफियांचा डोळा आहे.

लाल बहादूर शास्त्री यांनी शिखांना कच्छ मध्ये आणले 
 १९६५ सालच्या भारत-पाक युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री शीखांना कच्छमध्ये येण्याचे आवाहन केले होते. या भागात वसाहती निर्माण झाल्यास येथे विकास तर होईलच, पण पाकिस्तानच्या कारवायांनाही आळा बसेल, अशी मागील शास्त्रींची भूमिका होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर शीख शेतक-यांनी कच्छच्या वाळवंटात नंदनवन फुलविले. त्याच शीखांना आता मोदी सरकार तेथून निघून जाण्यासाठी छळित आहे.

जंतर मंतरवर शीख समुदायाची  निदर्शने 
 गुजरातमधील या सरकार समर्थित दहशतवादाच्या विरोधात सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी शीख समुदायाच्या वतीने राजधानी दिल्लीत जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने केली. मोदी यांचा पुतळाही शिखांनी जाळला. मोदींच्या विरोधातील शीख समुदायाच्या आंदोलनाची ही काही छायाचित्रे खाली दिली आहेत.

ही पहा शीख समुदायाच्या आंदोलनाची छायाचित्रे : 







संबधित लेख





No comments:

Post a Comment