Tuesday, 13 August 2013

वेदातील लैंगिक अंधश्रद्धा

हा धर्म आहे की अधर्म!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


प्राचीन काळी यज्ञ केले जात. त्यात विविध प्राण्यांचा बळी दिला जाई. अश्वमेध यज्ञात घोड्याचा बळी दिला जात असे. हा यज्ञ केल्याने वीर्यवान संतती निर्माण होते, अशी आर्याची समजूत होती. अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी केल्या जाणा-या विधीवरून असे लक्षात येते की, आर्यांमध्ये अनेक लैंगिक अंधश्रद्धा होत्या. मृत घोड्याच्या लिन्गाला वेगळे काढूनही काही विधी अश्वमेध यज्ञात केले जात. हा साराच प्रकार बीभत्स वाटेल, अशा पातळीवरचा आहे. वि. का. राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या पुस्तकात अश्वमेध यज्ञातील घोड्याच्या लिन्गाच्या विधीचे वर्णन आले आहे. या पुस्तकातील चौथ्या प्रकरणात हे वर्णन आहे. ‘अग्नी व यज्ञ' असे या प्रकरणाचे शीर्षक आहे. यजुर्वेदातील मंत्रांच्या आधारे राजवाडे यांनी आपले संपूर्ण विवेचन केले आहे.

यजुर्वेदाच्या दोन संहिता आहेत. १. कृष्ण यजुर्वेद २. शुक्ल यजुर्वेद. या दोन्ही संहितात अश्वमेध यज्ञविधी प्रसंगी करावयाच्या नाटकाचे वर्णन आहे. या पैकी कृष्ण यजुर्वेदातील पाठ आपण येथे पाहू या. वि. का. राजवाडे लिहितात (कंसात अपरिचित संस्कृत शब्दांचे अर्थ आम्ही दिले आहेत.) :
".... साम्राज्य, राष्ट्र, संपत्ती व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी एतदर्थ अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रघात असे. यज्ञात स्त्रीपुरूष असा सर्व प्रकारचा समाज जमे. अध्वर्यु, उद्गातृ, होता असे ॠत्विज पुरूष असत. व महिषी, यजमान-पत्नी इत्यादि स्त्रिया असत. पैकी वीर्यशाली प्रजा उत्पन्न व्हावी या कामनेच्या सिद्धयर्थ खालील नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडल्यावर तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. राजपत्न्यांपैकी मुख्य जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सपत्न्यांना (सवतींना) उद्देशून म्हणे की, बायांनो, हा मेला घोडाच माझ्याशी निजेल; कारण, मला अभिगमनार्थ (संभोगाकरिता) दुसरा कोणीच की गे नेत नाही. 
पट्टराणीची ही तक्रार ऐकून, घोडा खडखडून जागा होतो व पट्टराणीला म्हणतो, ये येथे हे क्षौमवस्त्र म्हणजे सोवळ्याचे वस्त्र अंगावर घेऊन आपण निजू. त्याला रूकार (होकार) देऊन पट्टराणी म्हणते, मी तुजपाशी गर्भधारणार्थ आले, तूही मजकडे गर्भ पेरण्यास ये, आपण पाय पसरून निजू. 
घोडा आणि पट्टराणी ही एकमेकांशेजारी पडल्यावर प्रतिप्रस्थाता म्हणतो की, हा घोडा रेत:सिंचन करो व तुझी योनी रेतोधारण करो. असा मंत्र म्हणून, ॠत्विज घोड्याचे qलग राणीच्या योनीजवळ आणी, आणि म्हणे की, मांडीवर मांडी ठेव, आणि qलग योनीत घाल. स्त्रियांना qलग जीव की प्राण आहे. लिंग  भोकाला झवते, ते स्त्रियांना प्रिय असते; कारण ते योनी कुटते, आणि स्त्रियांच्या काळ्या भोकातील दाण्याला हाणते. 
हे नाटक झाल्यावर राणी म्हणते, बायांनो, मला कोणीच झवत नाही, सबब हा घोडा मजपाशी निजतो. त्यावर इतर स्त्रिया म्हणतात, रानात फाट्यांचा भारा उचलताना ढुंगण जसे पुढे करतात तशी तू आपली योनी पुढे उचल व तिचा मधला भाग वाढव.
हे सर्व पट्टराणीने केले, तेव्हा घोडा निजला. मग राणी इतर बायांना पुन्हा म्हणाली, बायांनो, मला कोणीच झवत नाही. सबब मी घोड्याजवळ निजत्ये. त्यावर एका बाईने खालील टीका केली : हरणी रोजचे रानातले गवत टाकून शेतातले चोरून जव खाते, परंतु त्याने तिचे पोट भरलेले तिला वाटत नाही. शूद्र स्त्री वैश्याशी रमते, परंतु त्या रमण्याने तिचे समाधान होत नाही.
 ह्या टीकेला राणी उत्तर देते की, घोडा माझ्याशी संग करतो, त्याचे कारण एवढे की, दुसरे कोणीच मला झवत नाही. त्यावर दुसरी एक स्त्री टीका करते की, तुझी ही योनी एखाद्या पाखरिणीसारखी हुळहुळून हलते आहे. तिच्यात रेत पडले आहे व ती गुलगुल वाजत आहे. मग तक्रारीला जागा कोठे राहिली? 
ह्याही टीकेला राणी उत्तर करते की, तक्रार करू नको तर काय करू? मला कोणीच पुरूष झवत नाही. सबब मी घोड्यापाशी जात्ये. 
यावर तिसरी एक म्हणते, तुला घोडा सापडला हे नशीबच समज. तुझ्या आईला तोही लाभला नाही. तुझी आई व तुझा बाप झाडावर चढत आणि नंतर तुझा बाप, योनी सोलून काढितो म्हणून, तुझ्या आईच्या योनीत आपल्या हाताची मूठच ठाशी. त्याहून घोडा बरा नव्हे?
तैत्तिरीय संहितेतील मंत्राचा तपशील हा असा आहे......." 
वि. का. राजवाडे यांनी वर जे काही लिहिले आहे, ते वाचल्यानंतर वेद काळात धर्माच्या नावाखाली काय सुरू होते याची स्पष्ट कल्पना येते. आज काही लोक वेदांकडे चला अशी हाक देताना दिसतात. वेदांमधील मूळ धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याची भाषा केली जाते. हा धर्म पुन्हा स्थापन झाल्यास काय होऊ शकते, याची नुसती कल्पनाच करून पाहा.

वि. का. राजवाडे यांच्या पुस्तकातील  वरील उता-याची फोटो कॉपी खाली देत आहे :



वि. का. राजवाडे यांच्या या पुस्तकात इतरही अनेक भयंकर गोष्टींचे वर्णन आहे. जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. हे पुस्तक नेटवर उपलब्ध आहे.

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तक येथे क्लिक केल्यास वाचता येईल.


संबंधित इतर लेख



  • वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?
  • वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव
  • गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
  • मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप
  • अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !


  • श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
  • ब्रह्मदेवाची फटफजिती
  • गीतेतला वेदविरोध
  • वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान


  • 2 comments:

    1. ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
      HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

      ReplyDelete