Friday, 23 August 2013

अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मूळ कायद्यातील महत्त्वाची कलमे रद्द करण्यात आल्यामुळे हा कायदा अंधश्रद्धेच्या विरोधातील कायदा ठरण्याऐवजी ब्राह्मणशाही माजविणारा कायदा ठरणार आहे. देवॠषी, वैदू, छु-छावाले यांची भोंदूगिरी या कायद्याने बंद होईल. ब्राह्मणांकडून होणारी भोंदूगिरी मात्र  निर्वेधपणे सुरू राहील. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांकडून होणा-या भोंदूगिरीला कायदेशीर संरक्षणही मिळेल.

'‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा'' असे या या कायद्याचे मूळ नाव आहे. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हापासून तो पडून होता. 
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मूळ विधेयक आणि २०११ साली सरकारने विधिमंडळात सादर केलेले सुधारित विधेयक यात फरक आहे. मूळ विधेयक १३ कलमांचे होते. सुधारित विधेयकात ११ कलमे आहेत. कलम ५ आणि कलम १३ काढून टाकण्यात आले आहे. कलम ५ मध्ये धार्मिक ट्रस्टसंबंधी काही जाचक तरतुदी होत्या. तर कलम १३ मध्ये ब्राह्मणांच्या भोंदुगिरीवर थेट पाय पडेल, अशी तरतूद होती. या दोन्ही तरतुदी काढल्यानंतर हे विधेयक आता एकांगी आणि एकतर्फी झाले आहे. कनिष्ठ जातीतील प्रथा आणि परंपरा या विधेयकामुळे बेकायदेशीर ठरल्या आहेत. त्याच वेळी ब्राह्मणांच्या हस्ते पार पाडल्या प्रथा आणि परंपरा मात्र श्रद्धेच्या कक्षेत आल्या आहेत. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्राह्मणी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे फळ त्यांना मिळाले आहे. 

काय होते कलम १३?
या कायद्यात अंधश्रद्धा म्हणजे काय याचा खुलासा करणारे एक स्वतंत्र कलम आहे. तसेच या अंधश्रद्धांसाठी शिक्षा सांगितल्या आहेत. ही कलमे कोणाला लागू आहेत आणि कोणाला लागू नाहीत, याचा खुलासा कलम १३ मध्ये करण्यात आला होता. कलम १३ मध्ये एक तरतूद खालील प्रमाणे होती : 
‘‘ शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरिक व आर्थिक बाधा पोहचत नाही, असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.''
ज्या विधिने नागरिकास शारिरिक किंवा आर्थिक झळ पोहोचविणारे विधि करणे या कायद्यानुसार बेकायदेशीर होते, असा वरील तरतुदीचा स्पष्ट अर्थ आहे.  ब्राह्मणांमार्फत केले जाणारे कोणतेही विधि हे दक्षिणा घेतल्याशिवाय होत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, ब्राह्मणांना दक्षिणा घेण्यावर या कायद्याने बंदी येणार होती. तथापि, आता १३ वे कलमच या कायद्यातून काढून टाकले गेले असल्यामुळे ब्राह्मणांना दक्षिणा घेण्याचा तसेच धर्माची, ग्रहता-यांची भिती घालून नागरिकांची लुट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्राह्मणांकडून करण्यात येणा-या लुबाडणुकीला आळा घालणारी एकमेव तरतूद या कायद्यातून वगळण्यात आल्यामुळे हा कायदा आता ब्राह्मणांसाठी फायद्याचा ठरणार आहे. 

ब्राह्मणांची ती श्रद्धा बहुजनांची मात्र अंधश्रद्धा
कनिष्ठ जातीत पाळल्या जाणाèया प्रथा अंधश्रद्धा तर ब्राह्मणांच्या मार्फत पाळल्या जाणा-या प्रथा श्रद्धा असा सरळ भेद नव्या कायद्याने केला गेला आहे. हा मुद्दा आपण उदाहरणाने समजून घेऊ या. ''.. मरिआईचा प्रसाद खाल्ला नाही, तर तुझे तळपट होईल. तुझा सर्व धंदा बसेल!'' अशी भीती कोणी घातलीच तर या कायद्याने ती अंधश्रद्धा ठरून भीती घालणारास शिक्षा होईल. मात्र, ''... सत्य नारायणाचा प्रसाद खाल्ला नाही, म्हणून साधू वाण्याची नौका बुडाली. त्याचे तळपट झाले...'' हे सांगणे या कायद्यानुसार अंधश्रद्धा ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागाची पुजा केली जाते. नागाचा कोप झाला म्हणून देवॠषांमार्फत विधी केले जातात. हे प्रकार नव्या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतील. मात्र, नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्राह्मणांच्या हस्ते नारायण नागबळी केल्यास बेकायदेशीर ठरणार नाही. देवॠषाकडे विधी केल्यास येणारा खर्च शे-दोनशे रुपयांचा असतो. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करण्याचा खर्च साधारण २५ हजार असतो. नारायण नागबळी  हा विधि फक्त ब्राह्मणांच्याच हस्ते केला जातो. 

अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा बहुजन समाजातील भोंदुगिरीला बंदी घालून ब्राह्मणांच्या भोंदूगिरीला प्रोत्साहन देणार आहे, एवढाच या चर्चेचा निष्कर्ष आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या धांदलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राह्मणांशाही माजविणारा कायदा राज्यात निर्माण होत आहे. त्यामुळे जरा सावधान.

संबंधित लेख
परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता..!

1 comment:

  1. Rashtrapita Kranti Jyoti Phule has spent his life fighting against Brahminical strategies and saved the Bahujan samaj from shackles of Brahminism. He started Sattashodhak Samaj" His contribution to open the secret through his many books, like Shetkaryacha Asud, Brhahmnache Kasab. etc. Until and unless such wide publicity and brain wash was not made in the Bahujan Samaj people would fall pray to Brahminical false faith. This faith has to be changed. Mr KC Thakare made attack on such system, "Devalancha Dharma ani Dharmachi Devale" is an excellent work done by latr KC Thakare after Kranti Jyoti Phule. These lessons must be tought in Schools and colleges. If thisproject is taken up in curriculum within no time India would be a super power. But even today's IT engineer stands in ques for hours infront of Vinayak temple as a begger. This is the cause and effect of Brahminism. Brahman never call himself as Hindu, because word hindu is a sarcastic meaning given by the Eurasian, Persian Muslims when they destroyed the Sindhu Civilization.There no such word found in any Hindu literature like Mahabhara, Ramayana, or Vedas. You will know the real meaning of Hindu in Wikipedia. All must see and understanad what is Hindu..

    ReplyDelete