Friday, 9 August 2013

आरएसएसवाल्यांचा मुस्लिम टोपीशी दोस्ताना!


सत्ता मिळविण्यासाठी हिन्दू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करणारे आरएसएस आणि भाजपाचे नेते प्रत्यक्षात कसे ढोंगी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मध्यप्रदेशात मुस्लिम मदरशांत गीतेचा अभ्यास सक्तीचा करणारे तेथील मुख्यमंत्री शिवराजसिन्ग चौहान यांनी इद-उल फित्रच्या दिवशी चक्क मुस्लिमांची स्कल कॅप घालून स्वत:ला मुस्लिमांमध्ये मिरवून घेतले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०१३ रोजी हे छायाचित्र टिपले आहे. चौहान ज्या भाजपाचे नेते आहेत, त्याच भाजपाने १९९३ साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडून देशात धार्मिक दंगली घडवून आणल्या होत्या. याच पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ३ हजारपेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल घडविण्यात आली होती. तुम्ही आपसात लढा आम्ही मस्त सत्ता भोगतो, असेच आरएसएस आणि भाजपाचे धोरण आहे, हेच यावरून सिद्ध होते.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.