Monday 26 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-१
आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. ओजस्वी वक्ता, महान मुत्सद्दी, अजात शत्रू अशी बिरुदे वाजपेयी यांना मीडिया लावत असतो. पण खरोखरच तशी स्थिती आहे का? वाजपेयींनी तीन वेळा या देशाचे पंतप्रधानपद भूषविले. या तिन्ही कार्यकाळांचा हिशेब काढल्यानंतर हाती काय येते? अटलबिहारी वाजपेयी आगामी इतिहासात कशासाठी ओळखले जातील? पंतप्रधान म्हणून त्यांचे सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे योगदान कोणते? असे प्रश्न वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्ताने उभे राहतात. त्यांच्या कारकिर्दीचा शोध घेतल्यानंतर काही ठळक घटना हाती आल्या.

१. पोखरण-२.
२. कंदहार विमान अपहरण.
३. संसदेवरील अतिरेकी हल्ला.
४. कारगिल युद्ध.
५. शवपेटी घोटाळा
६. लाहोर बसयात्रा
७. आग्रा समीट इ. इ.

सत्तेचे लालची वाजपेयी !
लोकसभेतील एका चर्चेत वाजपेयी म्हणाले होते, +लोकतंत्र संख्या का खेल है.+ त्यांचे हे भाषण आज मीडियावाले दिवसभर वाजवित होते. वाजपेयी मे १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना आपल्या या वक्तव्याचा विसर पडला. ९६ च्या निवडणुकीत कोणताही पक्ष qकवा आघाडीला मतदारांनी बहुमत दिले नव्हते. वाजपेयींना सत्तेचा मोह आवरला नाही. स्वत:कडे बहुमताची संख्या नसताना वाजपेयींनी पंतप्रधानपदासाठी दावा दाखल केला. पंतप्रधानपदाची शपथही घेतली. पंतप्रधानपदाची शपथ घेतली की, बहुमतासाठी खासदार खरेदी करता येतील, असा भाजपाचा अंदाज होता. पण तो खोटा ठरला. एकही खासदार भाजपाच्या पैशांना हुंगायला तयार झाला नाही. त्यामुळे वाजपेयींची पंतप्रधानपदाची ही कारकीर्द १३ दिवसांत आटोपली. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या लोकसभा अधिवेशनात वाजपेयींनी कोलांटउडी मारली. बहुमतावरील चर्चेला उत्तर देत असतानाच वाजपेयींनी घोषणा केली : +अध्यक्ष महोदय मै इस्तिफा देने जा रहा हू.+ लोकशाहीचा एवढा तमाशा यापूर्वी कधीही झाला नव्हता. बहुमत नसताना लोकसभेला सामोरे जाणारा आणि ठराव अर्धवट सोडून राजीनामा देणारा पहिला पंतप्रधान होण्याचा अनोखा मान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाला.
मीडियाने तरीही केले कौतुक !
बहुमत नव्हते, तर सरकार स्थापन करण्याचा दावा केलाच कसा? हा प्रश्न तेव्हाच्या मीडियाने वाजपेयी आणि भाजपाला विचारायला हवा होता. परंतु ब्राह्मणांचे हीत जोपासणाèया मीडियाने उलट वाजपेयींचे कौतुकच केले. पहिला जुगार हरल्यानंतर वाजपेयी हे १९९८ ते ९९ आणि १९९९ ते २००४ असे दोन वेळा पंतप्रधान झाले. १९९८ मध्ये भाजपाने अनेक पक्षांना एकत्र करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची स्थापना केली होती. या आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनले. परंतु हे कडबोळे फार काळ टिकले नाही. ९८ हे वर्ष संपत असताना अद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सरकारचा पाqठबा काढला. लोकसभेत केवळ एका मताने सरकारचा पराभव झाला. वाजपेयींची ही कारकीर्द १३ महिन्यांत खतम झाली.
तीनदा संधी देऊन मतदारांनी नाकारले
१९१९ साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी भाजपाने लोकांच्या भावनेला हात घातला. वाजपेयी सरकार केवळ एका मताने पडले. या एका मतासाठी भाजपाला मतदान करा, असे भावनिक आवाहन भाजपाने केले. ही निवडणूक मुद्यांच्या आधारे झालीच नाही. भावनेच्या लाटेवर स्वार झालेल्या वाजपेयींच्या नावे लोकांनी एनडीएला बहुमत दिले. लोकसभेच्या ५४३ पैकी ३०३ जागा एनडीएने qजकल्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी एनडीएचे पूर्ण बहुमत घेऊन वाजपेयी तिसèयांदा पंतप्रधान झाले.  तिसèया टर्ममध्ये वाजपेयी सरकारने पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी सरकार ठरले. तथापि, या काळात वाजपेयी यांनी देशाची इतकी हानी करून ठेवली होती की, २००४ च्या निवडणुकीत मतदारांनी एनडीए सरकारला साफ नाकारले आणि पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली.

अनिता पाटील, औरंगाबाद. 

1 comment:

  1. वर्तमान कॉंग्रेस सरकारबद्दल आपले मत काय...?

    ReplyDelete