श्यामची आई शेवटी ब्राह्मणच निघाली!
साने गुरुजींची ‘श्यामची आई' म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली चित्रपट बनविला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून ‘श्यामची आई' चा उदो उदो गेली पाऊणशे वर्षे केला जात आहे. मराठीतील १० लोकप्रिय पुस्तकांची यादी काढायचे ठरले, तर ‘श्यामची आई' शिवाय ती पूर्ण होऊ शकणार नाही. पुस्तकाचे लेखक असलेल्या साने गुरुजींकडे महाराष्ट्र एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरूजींनी आमरण उपोषण केले होते. १ मे १९४७ रोजी ते उपोषणाला बसले आणि १० मे १९४७ रोजी विठ्ठल मंदिराची कवाडे दलितांसाठी खुली झाली. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले तेव्हा ‘एका पांडुरंगाने दुसरया पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले' अशी प्र्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. पांडुरंगाला जातीभेदाच्या जोखडातून मुक्त करणारे साने गुरुजी स्वत: मात्र ब्राह्मण्याच्या, भेदाभावाच्या जोखडातून मुक्त होऊ शकले नाही. माझे हे विधान अनेकांने धाडसाचे वाटेल; परंतु दुर्दैवाने ते खरे आहे.
देवाला सारी प्रिय
या कादंबरीचा नायक श्याम वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत आहे, अशी या कादंबरीची संकल्पना आहे. ४६ रात्रींत ही कहाणी संपते. एका रात्री श्याम आपल्या सवंगड्यांना आपली आई जातीभेदाला कसा थारा देत नव्हती, याची कहाणी सांगतो. या प्रकरणाचे नाव आहे ‘देवाला सारी प्रिय'. गावकुसाबाहेरील एक म्हातारी महारीण रानातून सरपणाची मोळी आणते. मोळीला कादंबरीत गोयला असे म्हटले आहे. ओझे झाल्यामुळे ती गावकुसाजवळ मोळी टेकते. मोळीची रचना अशी असते की, कोणी तरी मदत केल्याशिवाय ती डोक्यावर उचलून घेता येत नाही. संध्याकाळ झालेली असते आणि म्हातारया महारणीला मोळी उचलून द्यायला कोणीही तयार नसते. महारणीला कोण शिवणार? याचवेळी श्यामची आई देवदर्शन करून घरी परतत असते. तेव्हा ही म्हातारी तिच्या नजरेस पडते. घरी आल्यानंतर आई श्यामला मोळी उचलून देण्यासाठी पिटाळते. श्याम मोळी उचलून देतो.
श्याम घरी परततो तेव्हा आई म्हणते - ‘‘ श्याम ! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात... देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या देहात आहे, महाराच्याही आहे... श्याम देवाला सारी प्रिय आहेत... कारण सारी त्याचीच. देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात...'' ही कहाणी सांगितल्यानंतर श्याम आपल्या मित्रांना म्हणतो, ‘‘ मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भाव पुरून टाकू या''
श्याम घरी परततो तेव्हा आई म्हणते - ‘‘ श्याम ! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात... देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या देहात आहे, महाराच्याही आहे... श्याम देवाला सारी प्रिय आहेत... कारण सारी त्याचीच. देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात...'' ही कहाणी सांगितल्यानंतर श्याम आपल्या मित्रांना म्हणतो, ‘‘ मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भाव पुरून टाकू या''
‘देवाला सारी प्रिय' या धड्यातील हा सारांश वाचल्यानंतर कोणाच्याही मुखातून सहजोद्गार निघतील- धन्य तो श्याम आणि धन्य त्याची आई. पण वस्तुस्थिती तशी नाही. या धड्यातील काळा भाग मी या सारांशातून मुद्दाम वगळला आहे. श्यामच्या आईच्या संस्कारांचे स्तोम माजविताना हितसंबंधी लोक हा भाग असाच मुद्दाम वगळत असतात. त्यांची चलाखी कळावी यासाठी मी हे केले.
मनुवादी श्यामची आई!
आता पाहा या धड्याची काळी बाजू. याच धड्यातील काही उतारे पुढे देत आहे. ते काळजीपूर्वक वाचा. मग आपण त्याचे विश्लेषण करू या!
१. आई म्हणाली, ‘‘श्याम बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरील गोयला खाली पडला आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला अंघोळ घालीन जा.''
‘‘आई! लोकांनी बघितले तर लोक मला हसतील. मला मारायला येतील. खरेच जाऊ?'' असे मी विचारले.
‘‘लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे....'' , असे आई म्हणाली.
२. या संवादानंतर श्याम बाळदादाच्या घरापुढे जातो. महारणीला मोळी उचलून देतो. तेव्हा शेजार-पाजारचे ब्राह्मण त्याच्या अंगावर धावून येतात. त्याविषयी कादंबरीतील हा संवाद पाहा -
दुसरे ग्रहस्थही बाहेर आले आणि ‘‘श्याम ! अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी !'' असे ते बोलू लागले.
मी त्यांना म्हटले, ‘‘मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही... मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी आहे हे मला माहीत आहे.''
3. म्हातारीला मोळी उचलून देऊन श्याम घरी येतो. मग आई त्याला म्हणते- ‘‘त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन. पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही (फाटी म्हणजे सरपण) सरली आहेत.''
‘‘ए गोयलेवाली! अग इकडे ये'' , मी तिला हाक मारली.
... आईने तिला विचारले, म्हातारये, आजारी का ग आहेस?... दुपारचा भात उरलेला आहे. देऊ का तुला?'' , आईने विचारले.
‘‘द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे आई दुनियेत कोणी नाही बघा'' , दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.
‘‘वांयच पाणी घाला दादा'' , ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले....
4. म्हातारी निघून गेल्यावर काय होते. ते आता पाहू-
‘‘ चल श्याम, तू अंघोळ कर'' आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसरया दगडावर बसलो. मग स्वत:च्या हाताने पाणी घेऊन मी अंघोळ केली. अंघोळ करून मी घरात गेलो...
विश्लेषण
देवाला सारी प्रिय या धड्यातील असे हे 4 प्रसंग मी वर दिले आहेत. त्यातून काय दिसते?
१. पहिल्या प्रसंगात आई श्यामला म्हणते की, महारणीला मोळी उचलून दिल्यानंतर लोक काही म्हणाले तर त्यांना सांग की मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. आईच्या वाक्यावरून आपला असा समज होतो की, आई लोकांची समजूत काढण्यासाठी अंघोळ करणार असल्याचे सांगायला सांगत आहे. पण ते खरे नसते.
२. दुसरया प्रसंगात श्याम म्हणतो, स्नानात शुद्धी आहे. ‘स्नानात शुद्धी आहे'' हे आईने त्याला सांगितलेले नसते. याचाच अर्थ. महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध होतो, असे त्याला आधीच माहिती असते. शिवल्यानंतर अंघोळ न करता घरात गेल्यास घर बाटते, हे संस्कार त्याच्यावर आईनेच केलेले असतात. हे तिसरया प्रसंगातून स्पष्ट होते.
३. तिसरया प्रसंगात आई श्यामला अंगणाच्या शेवटच्या कोपरयात केळीजवळ अंघोळ घालते. त्याला न शिवता त्याच्या अंगावर ‘दुरून' पाणी घालते. अंघोळ केल्यानंतरच श्याम घरात येतो.
४. आई मंदिरातून परत येत असताना ताटकळलेली म्हातारी तिला दिसते. ती स्वत:च का मोळी उचलून देत नाही? घरी येऊन श्यामला का पाठवते?
५. श्यामला मोळी उचलून देण्यासाठी आई पाठवते त्यामागे नुसती म्हातारीला मदत करणे हा हेतू नसतो. घरातले सरपण सरले आहे, अनायासे म्हातारी आलीच आहे तर तिच्याकडून ते घ्यावे, असा धोरणी कावेबाजपणा आई दाखवते.
६. श्याम म्हातारीला घरी बोलावतो तेव्हा तो म्हणतो ‘‘ए गोयलेवाली, अग इकडे ये'' . अहो आजी आमच्या घरी या, असेही तो म्हणू शकला असता. पण तो तिचा उल्लेख एकेरी करतो. महारा-मांगांना काय अहो जाहो म्हणायचे? हा संस्कार त्याच्यावर आधीच झालेला आहे. तो आईनेच केला असणार. गोयलेवालीच्या जागी एखादी ब्राह्मण म्हातारी असती, तर श्याम असेच एकेरी बोलला असता का?
७. म्हातारी घरी आल्यानंतर आई तिला शिळा भात देऊन पुण्य कमावते. येथेही आईचा धोरणी कावेबाजपणा दिसून येतो. नाही तरी संध्याकाळी हा भात कपिला गायीला नाही तर वाघ्या कुत्र्यालाच द्यावा लागला असता.
८. शिळा भात खाऊन झाल्यानंतर म्हातारी श्यामला पाणी मागते. तेव्हा श्याम ‘दुरून' तिच्या ओंजळीवर पाणी ओततो.
९. महारणीला स्पर्श होणार नाही याची काळजी आई घेते. तसाच श्यामही घेतो. तिला स्पर्श करू नकोस, असे आई श्यामला या संपूर्ण प्रकरणात कोठेही सांगत नाही. 'या' लोकांना ब्राह्मणांनी स्पर्श करायचा नसतो, हे त्याला आधीच माहीती असते. अस्पृश्यतेचा हा संस्कारही त्याच्यावर आईकडून झाला असणार हे उघड आहे.
१०. घरात विनासायास सरपण आले. श्यामची अंघोळ झाली. कोणत्याही प्रकारची शिवाशिव न होता, हे सगळे पार पडले. त्यामुळे आई खुष होते. शेवटी ती श्यामला ‘‘देवाला कशी सारी प्रिय आहेत'' या विषयावर छान प्रवचन देते. पण अस्पृश्यता हे पाप आहे, असे आई कोठेही म्हणत नाही.
अस्पृश्यतेचे संस्कार मुलांना देणार का?
अस्पृश्यतेचे संस्कार मुलांना देणार का?
हे आहे साने गुरूजींचे संस्काराचे आणि मातृत्वाचे महन्मंगल स्तोत्र! हे प्रकरण ‘देवाला सारी प्रिय' याच शीर्षकाखाली शालेय अभ्यासक्रमात गेली कित्येक दशके राहत आले आहे. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन अंघोळ करावी, हा संस्कार मुलांना देण्यासाठी हा धडा नित्यनेमाने अभ्यासक्रमात घालण्यात येत आहे का? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण करणारा श्याम हाच का? असे काही प्रश्न येथे अनुत्तरीत राहतात.
-अनिता पाटील, औरंगाबाद.
............................................................................................................................................................
श्यामची आई या पुस्तकातील अस्पृश्यतेची ब्राह्मणी चलाखीने छुपी पाठराखण करणारया पृष्ठांची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावीत.
..............................................................................................................................................................
-अनिता पाटील, औरंगाबाद.
u r doing great work.
ReplyDeletekeep doing
That's really great !!You made it perfect.We are waiting for more like this...
ReplyDeleteekadum marmik vishleshan kele ahi tumhi madam
ReplyDeleteyes!!
ReplyDeletethis Brahmins made hell to bahujan.
we don't want their hollow mercy.
Madam, I think "Shyamachi Aai" is the greatest novel ever created in Marathi literature. Even Bhalchandra Nemade is agree with this statement. He compares this novel to the works of Dostoevasky. The thing is, it is nowhere mentioned that Shyam's mother is a great revolutionary. She is a simple housewife, raised in the culture of dogmatism. Now, one cannot expect her to be a fierce one. The greatness of the character lies in the her simplicity, good nature and not the one having knowledge of social stratification. Respect the character. She has inherited the legacy to Shyam to her best extent. The novel is undoubtly a masterpiece. If you are assuming Sane Guruji to be nonsecular, I strongly disagree with you. He was a person with great tenderness and sensitivity comparable only to romantic poets like Keats. Parashuram and Tilak etc are fine to be criticized, but if you are giving same treatment to Dnyaneshwar and Sane Guruji for being brahman, I guess something is wrong.
ReplyDelete-Eshwar Govindrao Pawar
Dear eshwar,
ReplyDeleteI did not expect mother of shyam as a revolutionary. It is ur assumption. I expecting only humanity from her, which she can not show to that old lady of Mahar community. It is very simple case. She forced shyam to bath after that particular episode. It is inhuman and unnatural. U quoted Nemade, but i didn't read such kind of statement in his literature. If it is really there pls give name of book, chapter and pg no. i will see. I read his TEEKA SWAMVAR. As per my information Nemade said, Sane Guruji is Great Author in Marathi (comparatively other writers those considered as Great writers.)
I agree with ur statement- "She is a simple housewife, raised in the culture of dogmatism..." Yes, Mother of sham is really a simple and ordinary lady like other brahmin ladies of her time. Do not try to find greatness in her character.
Your Sister
Anita Patil, Aurangabad.
👍
DeleteIts Impressive Madam,
ReplyDeleteThe peoples like you only be able demolish the worst castism system in India.
Unless which we can't say Indian culture is great.
Thanx Nayan.
ReplyDeleteश्यामची आई म्हणायची केसं वाढवू नयेत ती कापावीत. हिंदू धर्मात केस वाढवणे हे पाप आहे. मग साधू-संतांना तीने असे सल्ले का नाही दिले.
ReplyDeleteखूप छान अनिता ताई..
ReplyDeleteGr8 Anita Mam simply love your articles...
ReplyDeleteअनिताबाई तुमच्या विश्लेषणातील मुद्दे खोडून काढण्यासाठी त्याच कथेतील काही ओळींचा इथे उल्लेख करत आहे.यावर तुमच्याकडे काही उत्तर नसेल तर कृपया हि पोस्ट delete करा.जमल्यास पूज्य सानेगुरुजी आणि त्यांच्या देवतुल्य आई यशोदाबाई साने यांचीही जाहीर माफी मागा.
ReplyDeleteमुद्दा क्र.१- पहिल्या प्रसंगात आई श्यामला म्हणते की, महारणीला मोळी उचलून दिल्यानंतर लोक काही म्हणाले तर त्यांना सांग की मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. आईच्या वाक्यावरून आपला असा समज होतो की, आई लोकांची समजूत काढण्यासाठी अंघोळ करणार असल्याचे सांगायला सांगत आहे. पण ते खरे नसते.
मुद्दा क्र. २. दुसरया प्रसंगात श्याम म्हणतो, स्नानात शुद्धी आहे. ‘स्नानात शुद्धी आहे'' हे आईने त्याला सांगितलेले नसते. याचाच अर्थ. महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध होतो, असे त्याला आधीच माहिती असते. शिवल्यानंतर अंघोळ न करता घरात गेल्यास घर बाटते, हे संस्कार त्याच्यावर आईनेच केलेले असतात. हे तिसरया प्रसंगातून स्पष्ट होते.
मुद्दा क्र ३. तिसरया प्रसंगात आई श्यामला अंगणाच्या शेवटच्या कोपरयात केळीजवळ अंघोळ घालते. त्याला न शिवता त्याच्या अंगावर ‘दुरून' पाणी घालते. अंघोळ केल्यानंतरच श्याम घरात येतो.
मुद्दा क्र ८. शिळा भात खाऊन झाल्यानंतर म्हातारी श्यामला पाणी मागते. तेव्हा श्याम ‘दुरून' तिच्या ओंजळीवर पाणी ओततो.
मुद्दा क्र ९. महारणीला स्पर्श होणार नाही याची काळजी आई घेते. तसाच श्यामही घेतो. तिला स्पर्श करू नकोस, असे आई श्यामला या संपूर्ण प्रकरणात कोठेही सांगत नाही. 'या' लोकांना ब्राह्मणांनी स्पर्श करायचा नसतो, हे त्याला आधीच माहीती असते. अस्पृश्यतेचा हा संस्कारही त्याच्यावर आईकडून झाला असणार हे उघड आहे.
सत्य-वरील सारे निष्कर्ष अपुऱ्या माहितीच्या आधारे काढले गेले आहेत.'पण ते खरे नसते'. हा तुमचा निष्कर्ष कसा काढलात हे कळायला काही मार्ग नाही.नसो.या पंचविसाव्या रात्रीच्या प्रकरणात शेवटच्या परिच्छेदात यशोदाबाई म्हणतात "श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून, ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत.'यातून यशोदाबाई भेदभाव मानू नये,देवाच्या दारी सारेच सारखे आहेत.हाच मुलावर संस्कार करते हे दिसून येते.दुसरे ‘स्नानात शुद्धी आहे'' हे श्यामने प्रसंगावधान राखून निव्वळ श्रीधरपंतांची समजूत घालण्यासाठी म्हटलेले दिसते.याचा यशोदाबाईंनी श्यामला महारांच्या स्पर्शाने ब्राम्हण दूषित होतो अशी शिकवण दिली म्हणून श्याम तसे म्हणाला असा अर्थ होत नाही.कारण याच कथेत पुढे श्याम ब्राम्हण महाराना कसे तुच्छ लेखतात, त्यांचा कसा विटाळ करतात याचा स्वतःला आलेला लग्नावळीतील अनुभव आईला सांगतो.तेव्हा जेव्हा श्याम स्नानात शुद्धी असे म्हणतो तेव्हा या घटनांचा संदर्भ असण्याची शक्यता आहे.मुद्दा क्र ८ आणि ९ सुद्धा अशाच प्रकारे चुकीचे आहेत.मग यशोदाबाईंना अस्पृश्यता पाळण्याचे संस्कार केल्याबद्दल दोषी तुम्ही कोणत्या आधारावर ठरवता?
मुद्दा क्र ४. आई मंदिरातून परत येत असताना ताटकळलेली म्हातारी तिला दिसते. ती स्वत:च का मोळी उचलून देत नाही? घरी येऊन श्यामला का पाठवते?
ReplyDeleteमुद्दा क्र ५. श्यामला मोळी उचलून देण्यासाठी आई पाठवते त्यामागे नुसती म्हातारीला मदत करणे हा हेतू नसतो. घरातले सरपण सरले आहे, अनायासे म्हातारी आलीच आहे तर तिच्याकडून ते घ्यावे, असा धोरणी कावेबाजपणा आई दाखवते.
मुद्दा क्र ७. म्हातारी घरी आल्यानंतर आई तिला शिळा भात देऊन पुण्य कमावते. येथेही आईचा धोरणी कावेबाजपणा दिसून येतो. नाही तरी संध्याकाळी हा भात कपिला गायीला नाही तर वाघ्या कुत्र्यालाच द्यावा लागला असता.
मुद्दा क्र १०. घरात विनासायास सरपण आले. श्यामची अंघोळ झाली. कोणत्याही प्रकारची शिवाशिव न होता, हे सगळे पार पडले. त्यामुळे आई खुष होते. शेवटी ती श्यामला ‘‘देवाला कशी सारी प्रिय आहेत'' या विषयावर छान प्रवचन देते. पण अस्पृश्यता हे पाप आहे, असे आई कोठेही म्हणत नाही.
सत्य- आता वरील मुद्दे क्र ४,५,७, आणि १० कसे चुकीचे आणि पूर्वग्रहदूषित मतांवर आधारित आहेत ते सांगतो.याच पंचविसाव्या प्रकरणातील एक उतारा खालीलप्रमाणे :
' आई म्हणाली, 'त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला.'
'ए गोयलेवाली! अग, इकडे ये.' मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, 'म्हाता-ये, आजारी का गं आहेस?'
'व्हय, माय. ताप लई येतो. काय करातांव, पोटाला हवं ना!' असे ती म्हणाली.
'दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?' आईने विचारले.'
आईने घरी येऊन श्यामला मदत करायला सांगण्यामागे खरे कारण म्हणजे अर्थातच त्याकाळी असणारी स्त्रीशोषक आणि अस्पृश्यतापूरक समाजव्यवस्था पाहता एखाद्या ब्राम्हण स्त्रीने एखाद्या अस्पृश्य स्त्रीला स्पर्श करून मदत करणे हे नक्कीच त्याकाळच्या ब्राह्मणी समाजाने इतके सहजतेने स्वीकारले नसते जितके कि एका ब्राम्हण लहान मुलाने अपृश्य स्त्रीला मदत करणे स्वीकारले असते आणि हि बाब तत्कालीन कोणत्याही ब्राम्हण स्त्रीला समजणे सहज शक्य आहे.त्याला यशोदाबाईहि नक्कीच अपवाद नव्हत्या.दुसरे असे कि एक जबाबदार आई म्हणून मुलावर अस्पृश्यता न पाळण्याचे संस्कार करण्याची हि चांगली संधी आहे असाही यशोदाबाईंनी विचार केला असण्याची त्यांची एकंदर मनोवृत्ती पाहता नक्कीच शक्यता आहे.मुलावर चांगले संस्कार होतील,म्हाताऱ्या महार आजीला मदत करता येईल हा यशोदाबाईंचा आई आणि एक व्यक्ती म्हणून थोरपणा होता आणि सोबत सरपण मिळेल हा व्यावहारिक विचार होता,कावेबाजपणा नाही. राहता राहिला शिळ्या भाताचा प्रश्न तर म्हाताऱ्या महार आजीला दूर महारवाड्यात जायचे असल्याने ताजा भात करून घालण्याइतका वेळ यशोदाबाईंकडे काय तर कोणत्याच स्त्रीकडे नसता.साने कुटुंबाची या काळात हलाखीची परिस्थिती असल्याने दुसरे काही देता येईल अशी शक्यताही कमीच दिसते.म्हाताऱ्या महार आजीच्या तब्ब्येतीची चौकशी करताना यशोदाबाईंमधील माणुसकी दिसून येते.दुसरी गोष्ट एकंदर पुस्तकाचा आणि कथेचा एकंदर रोख पाहता एकही प्रसंग किंवा ओळ हे दर्शवत नाही कि यशोदाबाई हेतुपुरस्सर अस्पृश्यता पाळण्याचे संस्कार श्यामवर करतात.उलटपक्षी श्यामवर त्यांनी मानवतेचे आणि समतेचे संस्कार केले आहेत हेच या कथेतून दिसून येते.
पूज्य सानेगुरुजी आणि त्यांच्या आई यांची थोरवी सांगताना भल्याभल्या लेखांची प्रतिभा तोकडी पडलेली आहे.जीवन माणुसकीचे व्हावे,समाजात समता यावी यासाठी ज्या थोर पुरुषाने आपला देह झिजविला त्या व्यक्तीबद्दल असा लेख लिहिणे हे तुमच्याकडून अज्ञानापोटी झालेले असावे किंवा तुमचा यशोदाबाईंना दोषी ठरवण्याचा हा प्रयत्न निव्वळ ब्राह्मणी आकसापोटी केलेला असावा.मजेची गोष्ट म्हणजे मी दिलेले कथेतील संदर्भ तुम्ही ब्लॉग वर अपलोड केलेल्या कथेच्या छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसून येतात.तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे कृपया हि पोस्ट delete करावी आणि जमल्यास याच ब्लॉग वर पूज्य सानेगुरुजी आणि त्यांच्या आई यशोदाबाई यांची माफी मागावी.
श्यामची आई जातीयवादी नव्हती, हे तुम्हाला खोडून काढता आलेले नाही. खोटे कितीही रेटले तरी खरे होत नसते. ब्राह्मणी जातीयवादी मानसिकतेतून बाहेर या. तुम्हाला सत्य दिसू लागेल. आणि हो खोट्या प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल तुम्हीच ब्लॉगची माफी मागा इथे.
Deleteअसा भास झाला जणू नवीन मुद्दे मांडले परंतु धुसका फटाकडा ! 😁😁
Deleteश्यामची आई ही क्रांतिकारक किंवा समाजसुधारक नाहीच.. तर एक सर्वसामान्य स्त्री आहे.तिने तत्कालीन चौकटीत राहून शामला मानवता प्रेम करुणा ( compassion ) त्याग इत्यादि गुण शिकवण्याचा प्रयत्न केला..
ReplyDeleteशामने लहान असताना अस्पृश्यता पाळली म्हणून मोठेपणी शाम विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले कसे करेल ? हे तर निव्वळ तर्कटच आहे.. लहानपणी केलेल्या सर्वच भल्याबुर्यागोष्टी मोठेपणी आपण चालूच ठेवतो का? लहानपणी देवाची पूजा करणारे मोठेपणी नास्तिक होतच नाही का?
Right mam....
ReplyDelete