Tuesday 25 September 2012

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान

निदान घाणीवर माती तरी टाका रे !!

-प्रा. रविन्द्र तहकीक

 दै . लोकसत्ता पूर्वी एक तरतमभाव जपणारे जबाबदार दैनिक होते. मराठी पत्रकारितेत आदराने घेतली जाणारी जी नावे आहेत त्यात दै . लोकसत्ताच्या माजी संपादकांची नावे मोठ्या संखेने आहेत. परंतु गेल्या काही वर्षात लोकसत्ताने ताळ आणि तंत्र दोन्हीशी फारकत घेतली आहे; ( पुण्यातल्या  बुधवार पेठेत (चिवडा गल्लीत)  मुख्य कार्यालय असल्यावर आणखी काय होणार ?) .

लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारीय (दि.२३ सप्टें.) पुरवणीत प्रशांत  असलेकर नावाच्या ऐका भाषा संशोधकाचा (?)'' भाषा कूस बदलते आहे '' हा लेख वाचनात आला . या लेखात भाषेचे नवीन वाक्प्रचार सांगण्याच्या भरात ( हले डुले महात्मा फुले याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. ) आता हा '' हले डुले महात्मा फुले'' हा वाक्प्रचार म्हणा किंवा म्हण म्हणा या असलेकरने कुठे एकला किंवा कुठे वाचला कुणास ठाऊक ? परंतु या निम्मिताने त्याने आपली फुले द्वेषाची कूस( की खाज )  उजवून घेतली हें निश्चित !
. सगळ्याच महापुरुष बद्दल कट्ट्यावरच्या टुकार कंपूत अश्या प्रकारची शेरेबाजी चालते. ही पोरे ( आता जातीचा उल्लेख करतो ) ब्राम्हणाची असतील तर ते शिवाजी / महात्मा फुले /आंबेडकर / बुद्ध यांच्या बद्दल आणि संघोटे ( आर एस एस चे )असतील तर  पंडित नेहरू / गांधीजी / इंदिरा गांधी बद्दल अचकट विचकट शेरेबाजी करतात म्हणून ती समाजभाषा होत नाही याचे तारतम्य असलेकरला नसले तरी तो लेख छापणाऱ्या लोकसत्ताने ठेवायला हवे होते .

      असलेकरला माराठीभाषा आणि त्यात नवीन शब्दांची पडणारी भर या बद्दल लिहायचे असावे. परंतु  लेखाचा मथळाच त्याला भाषाशास्राबद्दल किती अक्कल आहे ते ढळढळीतपणे सांगतो. कूस बदलून प्रत्येकवेळी वेगळ्या पुरुषाच्या बाहुपाशात घुसायला भाषा म्हणजे कुणी भटीण किंवा बाजारबसवी नाही !! भाषा  अखंड अविरत प्रवाही नदी सारखी असते जी उगमापासून जशी जशी पुढे जाईल तशी अधिक अधिक समृद्ध संपन्न आणि उदार होत जाते तिचा प्रवाह समकालीन समाजभूमीला सुपीक करतो आणि त्या भूमीचे अवशेष -अंशही आपल्या सोबत घेऊन पुढे जात राहतो  ( परंतु भाषा कधी कूस बदलत नाही/ अपवाद संस्कृत  )  मराठी भाषेतही असे अनेक बदल झाले. अगदी ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकारामांची मराठी यातही फरक आहे. त्याच काळात शिवाजी महाराजांची दरबारी मराठी आणखी वेगळी होती. भाषेची ढब बरा कोसावर बदलते आणि प्रत्येक पिढीत तर त्यात अमुलाग्र परिवर्तन होते. हा भाषाशास्राचा सर्वसाधारण नियम आहे. भाषेत नवेशब्द सतत तयार होणे हा भाषा जिवंत असल्याचे लक्षण आहे. म्हणून नव्या शब्दांची निर्मिती म्हणजे कूस बदलणे ठरत नाही. असो !

       आमचा मुख्य आक्षेप असलेकर या महामुर्खाने नवीन म्हण म्हणून  '' हले डुले महात्मा फुले " अशी म्हण सांगितल्या बद्दल आणि त्याचा अर्थ खीळखीळीत हलती अस्थिर वस्तू असा दिल्याबद्दल आहे. मुळात अशी म्हण कुठे अस्तित्वातच नाही !! ती असलेकारच्या सडक्या मेंदूतून आलेली आहे. बरे म्हण म्हणून एखाद्या संकल्पनेचा केलेला वापर आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असावी लागते. देवदेवता किंवा महापुरुषाबद्दल भाषेत म्हणी किंवा वाक्प्रचार निर्माण होत नाहीत असे नाही; परंतु वापरलेला वाक्प्रचार-म्हण आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असते उदा. गुळाचा गणपती ( अतिस्थूल पिचपिचीत व्यक्ती ) , लंकेची पार्वती ( अंगावर सोने नसणारी स्त्री ) , भोळा सांब ( व्यवहार न कळणारा मनुष्य ) , भाऊगर्दी ( बघ्यांची गर्दी ) स्वतःला फार 'शाहू' समजतोस काय ? ( स्वतःला फारच नेकीने वागणारा समजतोस काय ) ई ई ई 
   
 या सर्व उदाहरणात प्रत्येक वाक्य आणि म्हण वाक्प्रचाराला काहीतरी संदर्भ साम्य आणि सुसंगती आहे. असलेकर ने जे उदाहरण सांगितले त्यात अशीकाही सुसंगती असती तर तो शब्द त्यांनी स्वतःचा म्हणून सांगितला असता तरी आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता , महात्मा फुले यांचे विचार -भूमिका परखड पुरोगामी आणि ठाम होत्या आणि स्वतःच्या विचार भूमिका बाबद त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही त्या साठी प्रसंगी त्यांनी वाटेल ती किंमत चुकवली , घर सोडले , समाजाने वाळीत टाकले , पुण्यातल्या भटांनी त्यांच्या आणि सावित्रीबाईच्या अंगावर चिखल-शेण -दगड फेकले , त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले परंतु तरीही ते कधीही आपल्या कार्य भूमिका पासून तुसुभारही ढळले नाहीत कचरले नाहीत डगमगले नाहीत. असे असताना 'खीळखिळीत हलती अस्थिर वस्तू ' याअर्थाची ' हले डुले महात्मा फुले '' ही म्हण कोणत्या अर्थाने सुसंगत आहे हें असलेकर तर सांगूच शकणार नाही परंतु ज्या लोकसत्ताने हा लेख छापला त्याच्या संपादकाने तरी त्यातील सुसंगती किंवा समर्पकता आम्हाला सांगावी आणि सांगता येत नसेल तर जाहीर माफी मागावी !!!

       आम्हाला मान्य आहे वर्तमानपत्राचा वापर दुसऱ्या दिवशी पोरांना संडासास बसविण्यासाठी होतो; परंतु लोकसत्ता तर आपले वर्तमानपत्र वाचकांच्या हातात देतानाच  संघाच्या शिबिरात पोटाला तडस लागोस्तवर   खिचडी-सार खाऊन बसता उठता पादनाऱ्या आणि जागा मिळेल तिथे हग्णाऱ्या असलेकर सारख्या संघोट्याला वापरायला देत आहे. पूर्वी अभिनव गुप्त नावाच्या ऐका संघोट्याने असाच प्रताप केला होता. आता असलेकरने तर महाप्रताप केला. लोकसत्ताला गाडगेबाबांच्या भाषेत एकच विनंती आहे '''' निदान घाणीवर माती तरी टाका रे !!"

लोकसत्तामधील मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिन्केवर क्लिक करा :
भाषा कूस बदलते आहे..

3 comments:

  1. चांगले शालजोडीतले मारले...



    ReplyDelete
  2. चांगले शालजोडीतले मारले...

    ReplyDelete
  3. उठ-सुट याचे त्याचे धर...‘आसलेकर’

    ReplyDelete