Wednesday, 9 May 2012

वे.शा.सं.? छे, दि.शा.सं.


२१ व्या शतकातील थोर विचारवंत संजय सोनवणी यांनी मला आशीर्वाद दिला. सोनवणी साहेबांचे आशीर्वचन मी या ब्लॉगवर टाकले होते. तथापि, एका ब्राह्मणाने याबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्याचे म्हणणे असे की, थोड्या दिवसांपूर्वी सोनवणी यांनी अनिताची खरडपट्टी काढली होती. तेव्हा ते अनिताला प्रशस्ती देतीलच कशी? दुसरे असे की, अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर तो प्रशस्तीचा लेख आता सापडत नाही

दिशाभूल करणे हा ब्राह्मणवाद्यांचा फार प्राचीन धंदा आहे. त्यात ते इतके पारंगत आहेत की, त्यांना वे.शा.सं. (वेद शास्त्र संपन्न) या पदवीऐवजी दि.शा.सं. (दिशाभूल शास्त्र संपन्न) अशी नवी पदवी द्यायला हवी. अपप्रचार करणे, अर्धी माहिती देणे, संदर्भ तोडून माहिती देणे अशा क्लृप्त्या हे लोक अपप्रचारासाठी वापरतात. याने काम भागले नाही, तर थेट खोटे ठोकून देतात. सोनवणी साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल हा ब्राह्मण अशा सर्व क्लृप्त्या वापरीत आहे. 

रवींद्र तहकिक यांनी लिहिलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या विषयीच्या लेखावर टीका करणारा एक लेख श्री. सोनवणी साहेबांनी लिहिला होता. ७ एप्रिल २०१२ रोजी लिहिला होता. त्याच लेखाच्या प्रतिक्रियांत १८ एप्रिल २०१२ रोजी श्री. सोनवणी साहेबांनी माझ्यासाठी आशीर्वचन लिहिले आहे. मूळ लेखाची लिन्क अशी आहे :
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html


माझ्या ब्लॉगवर या ब्राह्मणाला श्री. सोनवणी साहेबांचे आशीर्वचन सापडत नसेल, तर त्याला मी काय करणार? ब्लॉग कसा वाचावा एवढे साधे ज्ञानही या गृहस्थाला नाही. या अडाण्यासाठी माझ्या ब्लॉगवरील या लेखाची लिन्क इथे देत आहे :
 संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद

श्री. संजय सोनवणी साहेब यांच्या अनेक लेखांबद्दल माझे मतभेद आहेत. तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या ज्या भूमिका मला अजिबातच पटल्या नाहीत, त्याबद्दल मी वेळो वेळी लिहिलेही आहे. तथापि, हे लेखन करताना श्री. सोनवणी साहेबांचा उपमर्द होईल, असे एकही वाक्य माझ्या लेखणीतून बाहेर पडलेले नाही. पडणार नाही. जगातील कोणतीही एक विचारधारा प्रमाण मानणाèया दोन व्यक्ती अगदी समान विचार करीत नसतात. कारण व्यक्ती या काही कार्बन कॉपी नसतात. मतभेद हे होतच असतात. मतभेद हे निरोगी लोकशाहीचे लक्षणही असतात. सर्व लोक एक सारखा विचार करणे हे केवळ हुकूमशाहीतच शक्य असते. कारण विरोधी विचारांना हुकूमशाहीत अजिबातच स्थान नसते. असो. येथे मी एवढेच सांगू इच्छिते की, मतभेद असले तरी श्री. सोनवणी साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत, आणि आदरणीयच राहतील. 

श्री. सोनवणी साहेबांनी माझ्यासाठी लिहिलेले आशीर्वचन त्यांच्या ब्लॉगवरून मूळ स्वरूपात येथे देत आहे : 
................................................................................................................
  1. अनिताजी, मी सर्वप्रथम आपले मन:पुर्वक अभिनंदन करतो. आपल्या ब्लोगवर प्रतिक्रिया देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपण जो अत्यंत संतुलित आणि ध्येयवादाला मुळीच तिलांजली न देता जो मार्ग आता पकडला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. आपला लढा समतेसाठी आहे. बंधुत्वासाठीच आहे. आपले भांडण नाही. खरे तर आपले कोणाशीच भांडण नाही. आपण महान बळीराजाचे वारस आहोत. बळीराजाने आपल्या प्रजेत कसलाही भेद केला नव्हता. आपण भेदातीत जाण्यासाठी कटीबद्ध आहोत यात शंका नाही. भेद माजवु पाहणा-यांना अंधांना जागे मात्र नक्कीच करायला हवे, पण ते बळीराजाच्या व्यापक मानवतावादी द्रुष्टीकोनातुन. माणसे बदलत नाहीत असे आजिबात नाही. माणसे बदलतात कारण बदलणे हाच मानवी स्वभाव आहे. फक्त सांगण्याची पद्धत संयत/सम्यक आणि मुलभुत तत्वद्न्यानावर आधारित अशी हवी. आता तुम्ही नेमके तसेच करत आहात. पानिपतबाबत आपल्या लेखात काही ऐतिहासिक त्रुटी असल्या तरी त्या मुळात हेतुत: नसल्याने त्याकडे दुर्लक्षच करायला हवे. आरएसेस, गडकरी, मोदी, भागवत, हिमानी सावरकर, सनातन प्रभात ईईई हा साराच कंपु देशाच्या समतेच्या वाटचालीकडे जाणा-या मार्गातील अडसर आहेत याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. हे अडसर कसे दुर करायचे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. या संघटना व त्यामागील प्रव्रुत्तींवर आपण सतत प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे व त्याच वेळीस बहुजनांना द्न्यानसत्ता, अर्थसत्ता याविषयी जागे करण्याचीही गरज आहे. या संघटनांत दुर्दैवाने बहुजनांची संख्या वाढत आहे. संघटना या प्रव्रुत्ती असतात. या प्रव्रुत्तींना सर्वच समाज (मग ते कोणीही व कोणत्याही जातीचे असोत) अजुन तरी शरण गेलेला नाही. तो जावू नये हीच आपली इच्छा असायला हवी. तुम्हीच तुमच्या ब्लोगवर म्हणता..."कोणाही जीवाचा न घडो मत्सर..." येथे मत्सर हा शब्द तुकोबारायांनी अत्यंत जाणीवपुर्वक वापरला आहे. मत्सरग्रस्त कधीही स्वत:ची वा इतरांची प्रगती साधु शकत नाहीत. अधिक लिहित नाही. कोणाला उपदेश करण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्ही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत जो सकारात्मक बदल घडवला ते मात्र अद्भुत आहे एवढे येथे मी आवर्जुन नमुद करतो. मी तुमचा थोरला भाउ आहे आणि हा मान तुम्ही मला दिलात हे तुमच्या परिवर्तनातुन ठळक होते. मी तुम्हाला या परिवर्तनवादी विचारसरणीला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद देतो.
    Reply

.................................................................................................................

अनिता पाटील

No comments:

Post a Comment