Saturday, 12 May 2012

आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण !

 डॉ. सुहास पळशीकर


एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राह्मणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राह्मण हीच एक विकृती आहे. ब्राह्मणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राह्मणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.

डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.

केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या + इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅट वर्क+ या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदोरोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागाप असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही.

व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकत्र्याशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यासाठी अकरावीच्या
पुस्तकात घुसडण्यात आलेले हेच ते कार्टून. राज्य घटनेच्या
निर्मितीचे काम गोगलगायीच्या पावलांनी सुरू असल्याचा
संदेश या काटूनमधून देण्यात आला आहे. डॉ. सुहास पळशीकर हे
या कार्टूनचे अजूनही निर्लज्जपणे समर्थन करीत आहेत.
.......................................................................................................

डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टार्गटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : + हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून , त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी , डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.+

या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला  हवी.

अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.

No comments:

Post a Comment