Thursday, 3 May 2012

पेशवे ब्राह्मण होते की क्षत्रिय?



महाभारतातील परशुरामाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्याचप्रमाणे रणांगणावर लढणारे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजेच पेशवेसुद्धा सर्वांनाच माहिती आहेत. परशुराम आणि पेशवे यांना ताडून पाहण्याचा प्रयत्न आजवर कोणी केल्याचे दिसत नाही. तोच प्रयत्न या लेखात मी करणार आहे............................




आधी परशुरामाबद्दल पाहू या. या कथेशी कर्णाचा संदर्भ आहे, म्हणून सुरूवात त्याच्यापासूनच करू या. कर्ण हा कुंतीचा लग्नाआधीचा टाकून दिलेला मुलगा. सारथ्याने सांभाळे म्हणून सूतपूत्र म्हणवला गेला. आयुष्यभर हिणवला गेला. त्याला युद्धशास्त्रात निपून व्हायचे होते. तो द्रोणाचार्यांकडे जातो. ते त्याला शिक्षण देण्यास नकार देतात. कारण कर्ण सूतपूत्र असतो. मग तो परशुरामाकडे जातो. परशुरामाचे क्षत्रियांशी वैर असते. म्हणून तो क्षत्रियांना विद्या शिकवत नाही. केवळ ब्राह्मणांना विद्या शिकवतो. म्हणून कर्ण ब्राह्मण वेष धारण करतो. परशुरामाकडून तो सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकतो. त्याकाळातील सर्वाधिक विध्वंसकारी अस्त्र मानले जाणारे ब्रह्मास्त्र विद्याही मिळवतो. एके दिवशी परशुराम हा कर्णाच्या मांडीवर डोके टेकवून झापलेला असतो. तेव्हा एक भुंगा कर्णाच्या मांडीला डसतो. गुरूची झोप मोडेल म्हणून कर्ण जराही विचलित न होता, सर्व वेदना सहन करतो. शेवटी हा भुंगा परशुरामाच्या कानाला डसतो. परशुराम जागा होतो. पाहतो तर काय कर्णाची मांडी रक्तबंबाळ झालेली. तेव्हा परशुराम ओळखतो की, कर्ण हा ब्राह्मण नव्हे! परशुराम म्हणतो, ‘‘कोणीही ब्राह्मण एवढी वेदना सहन करू शकत नाही. खरे सांग तू कोण आहेस?ङ्कङ्क कर्णाला सत्य सांगणे भागच पडते. मग परशुराम त्याला शाप देतो की, तू विद्या शिकला असलास तरी गरजेच्या वेळी ती तुला उपयोगी पडणार नाही. परशुरामाचा शाप पुढे भारती युद्धात खरा ठरतो. कर्ण अर्जुनाच्या हातून मारला जातो. अशी थोडक्यातली कथा. यात माझ्या पदरचे काही नाही. जसे महाभारतात लिहिलेय तसेच येथे दिलेय. 

आता पेशव्यांची कहाणी पाहू या. बाळाजी बाजीराव भट हा पेशव्यांचा मूळ पुरुष होय. बाळाजी हा स्मार्तांच्या चित्पावन शाखेचा ब्राह्मण होता. त्याचा जन्म कोकणातील श्रीवर्धन येथे झाला. तो मराठ्यांचा सरसेनापती धनाजी जाधव यांचा आश्रित होता. धनाजीनेच बाळाजीला छत्रपतींच्या सेवेत आणले. बाळाजीची पत्नी राधाबाई ही बर्वे घराण्याची होती. या दाम्पत्याला दोन मुले झाली. १. पहिला बाजीराव २. चिमाजी अप्पा. वंशपरंपरागत पेशवाईची सुरूवात बाळाजी विश्वनाथापासून  होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्याची पेशवेपदी नेमणूक केली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा बाजीराव हा पेशवेपदी बसला. हातात समशेर घेऊन लढणारे पेशवे हे पहिले ज्ञात ब्राह्मण होय. मौर्यांची सत्ता उलथवून टाकणारा पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण राजा समजला जातो. तथापि, त्याच्या ब्राह्मण असण्याबद्दल अलिकडे संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. नव्या पिढीतील सव्यसाची इतिहासकार संजय सोनवणी यांनी असे दाखवून दिले आहे की, पुष्यमित्र हा ब्राह्मण नव्हताच. सावरकरांसारख्या काही लोकांनी उठविलेली ती आवई होती. असो. सांगायचा मुद्दा असा की, ब्राह्मण पुरुष वेदना सहन करू शकत नाही, म्हणजेच युद्धही करू शकत नाहीत, असे परशुरामाने महाभारतात सांगून ठेवले आहे. तर मग पेशव्यांच्या हाती तलवार आली कशी? ब्राह्मण पेशवे लढाया कशा काय मारू शकले? 

आजच्या ब्राह्मण समाजाने परशुराम आणि पेशवे यांना आपले प्रतिकचिन्ह म्हणून निवडले आहे. त्यामुळे मोठीच ऐतिहासिक कोंडी झालेली आहे. मुळात ही दोन्ही प्रतिकेच परस्पर विरोधी आहेत. परशुरामाच्या मते ब्राह्मण हे क्षत्रियांप्रमाणे लढवय्ये असू शकत नाहीत. पेशवे तर लढवय्ये होते. परशुरामाचे म्हणणे खरे मानले तर पेशवे हे ब्राह्मण नव्हते, असे मानाण्याचे संकट ओढवते. अर्थात हे आजच्या ब्राह्मणांना स्वीकारणे जड जाईल. पेशवे हे ब्राह्मणच होते, असे मानायचे असेल, तर मग परशुरामाचे म्हणणे खोटे होते, असे मानावे लागते. दुसèया शब्दांत सांगायचे तर, परशुराम कर्णाला खोटे बोलला किन्वा त्याला वंशशास्त्राविषयी काहीही माहिती नव्हती, असे मानणे भाग पडते. खोटे बोलणाèयाला किन्वा अज्ञानी व्यक्तीला विष्णूचा अवतार मानणे मग धोक्याचे होऊन बसते. अवतारी म्हटल्यानंतर त्याच्या शब्द न शब्द खरा असलाच पाहिजे. अशा प्रकारे परशुराम आणि पेशवे ही दोन प्रतिके एकत्र केल्यानंतर आपण विचित्र खिन्डीत येऊन अडकतो. या दोघांपैकी आपला कोण याचा निर्णय ब्राह्मण समाजाला करावा लागणार आहे,.

एक मात्र खरे की, ब्राह्मणांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या भगवान परशुरामाच्या पवित्र वाणीवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ‘‘पेशवे हे ब्राह्मण वंशाचे नव्हे, तर क्षत्रिय किन्वा अन्य लढवय्या जमातीचे होते" असे मानणे भाग आहे. पेशवे ब्राह्मण नव्हते, असे मानायचे असेल, तर मग ते कोणत्या वंशाचे होते, याचा शोध घ्यायला हवा. हे काम अर्थातच इतिहास तज्ज्ञांनी करायला हवे.


अनिता पाटील

1 comment:

  1. marathyanche pratapradhan peshwe tar mag bhima koregav madhe kon haral.he pan sanga.

    ReplyDelete