Tuesday, 8 May 2012

शेफारलेले बाळे आणि बाळ्या

सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा महाराष्ट्रद्रोह

महाराष्ट्रात काही शेफारलेली बाळे आणि बाळ्या आहेत. सचिन तेंडुलकर, माधुरी दिक्षित, आणि मंगेशकर कुटुंबातील स्त्री-पुरुष यांचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यांना शेफारून ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी केले आहे. हे लोक महाराष्ट्राची शान आहेत, असा प्रचार माध्यमे गेली अनेक दशके करीत आहेत. एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार सतत करीत राहिले की, ती शेवटी लोकांना खरी वाटू लागते, असे हिटलरचा माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स म्हणत असे. ही बाळे आणि बाळ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. अत्यंत स्वार्थी आणि आपल्याच कोशात जगणाèया या बाळे-बाळ्यांवर मीडियातून सातत्याने हितसंबंधी प्रशंसेचा वर्षाव होत राहिला. त्यामुळे या बाळे-बाळ्यांना असे वाटायला लागले की आपल्यामुळेच महाराष्ट्राला किम्मत आहे. अतएव आपण सर्व कायदे आणि नियमांच्या वर आहोत. नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत. आपल्यासाठी नाहीतच. ही बाळे आणि बाळ्या आता सरकारलाही जुमानीशी झाली आहेत. 

या सर्वांत एक समान दुवा आहे. तो म्हणजे हे लोक पैशांच्या बाबतीत अत्यंत हावरट आहेत. 

१.

मंगेशकरं

मंगेशकरं हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेफारलेले लोक आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची इतर भावंड मुंबईतील पेडर रोडवर राहतात. कृष्णकुंज असे त्यांच्या घराचे नाव. मंगेशकर राहत असल्यामुळे कृष्णकुंजला सर्व नियमांतून बाजूला काढण्यात यावे, असे त्यांना वाटते. पेडर रोड हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सर्वसामान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने येथे उड्डाण पूल बांधण्याचे ठरवले. कृष्णकुंज समोर उड्डाण पूल? किती घोर पाप? स्वत: लताबाई आणि मंत्रालयात गेल्या. संपूर्ण दशकभर त्यांनी हा पूल रोखून धरला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लताबाई कधी अशा बाहेर पडल्या नाहीत. उड्डाण पूल झाला तर आम्ही दुबईला जाऊन राहू, अशी धमकी खुद्द लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी दिली होती. याचाच अर्थ असा की, यांना देशाबद्दल अजिबात प्रेम नाही. मला तर वाटते, हे दुबईला कधी जातात याची वाट सरकारने पाहूच नये. एका बोटीत बसवून त्यांना दुबईच्या दिशेने तोंड करून अरबी समुद्रात सोडून द्यायला हवे. दुबईत जाऊन नवे प्रभूकुंज बांधा म्हणा.  हा उड्डाण पूल करायचाच असा निर्णय आता सरकारने घेतला आहे. ही चांगली गोष्ट झाली.

 सर्व मंगेशकरांनी मिळून महाकपटी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला' वगैरे रडगाणी गायिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असे एखादे गाणे मंगेशकरांनी गायलेय का? किन्वा छत्रपती शाहू महाराज, महात्मा  फुले यांच्यासाठी एखादे गाणे गायलेय का? येथे प्रश्न असा पडतो की, मंगेशकरांनी सावरकरांसाठीच का बरे एकत्र येऊ गळे काढले? हृदयनाथ मंगेशकरांनी तर अलिडके अत्यंत जात्यंध उपक्रम हाती घेतला आहे. वारकरी संतांमधून ज्ञानेश्वरांना वेगळे काढून केवळ त्यांचेच अभंग मंगेशकर गात फिरत फिरत आहे. इतक्या जात्यंध लोकांना मीडिया कित्येक दशके महाराष्ट्राची शान म्हणत आहे. 


२.

सचिन रमेश तेंडुलकर

क्रिकेटचा देव वगैरे अत्यंत फालतू विशेषणांनी मराठी मीडियाने सचिनला शेफारून ठेवले आहे. याला भारतरत्न द्या, अशी मागणी करण्यात राजकीय पक्षांत मध्यंतरी शर्यतच लागली होती. मुळात प्रश्न असा आहे की, खेळाच्या क्षेत्रात शिखरावर असलेला हा एकच माणूस भारतात आहे का? महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न द्यायचे झाले, तर सर्वांत प्रथम महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना द्यावे लागेल. कुठल्याही सरकारी सुविधा न घेता, केवळ स्वत:च्या सामथ्र्यावर त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधले पहिले पदक मिळवून दिले आहे. पण मीडिया खाशाबांचे नाव घेत नाही. मंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पेरीक्रॉस रोडवर सचिनने आलिशान चार मजली बंगला बांधला आहे. त्याची किंमत शंभर कोटी आहे की, दोनशे कोटी यात आपल्याला जाण्याचे कारण नाही. तो त्याचा खाजगी प्रश्न आहे. परंतु या घरात प्रवेश करण्याआधी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) घेणे कायद्यानुसार आवश्यक होते. ते न घेताच सचिन नव्या घरात गेला. मीडियातून ओरड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला ४ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. हा दंड माफ करण्यात यावा यासाठी राजकारण्यांनी महापालिकेकडे नुसता तगादा लावला होता. वर्षाला अडीचशे तीनशे कोटी रुपये कमावणाèया सचिनला ४.३५ लाखांचा दंड का माफ केला जावा? माफ करायचा असेल, तर सर्वांनाच माफ करून टाका. सचिनने हा दंड भरला की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. ही माहिती देऊ नये, असा पवित्रा सचिनने घेतला. त्यामुळे आता पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? यात नक्कीच काही तरी काळे बेरे असणार म्हणून तर सचिनने ही माहिती रोखली आहे. फावड्याने पैसे ओढणारा सचिनला चार-सव्वाचार लाखांच्या सरकारी कराची नादारी हवी आहे. यातून त्याची कंजुषी तर समोर येतेच, पण त्याचा स्वार्थही दिसून येतो. 


३.

माधुरी दीक्षित 

माधुरीला +धक धक गर्ल+ हा मानाचा किताब दिला गेला आहे. तीसुद्धा हा किताब मिरवत असते. अनिल कपूरसोबतच्या चित्रपटात तिने आपली वक्षस्थळे आणि पाश्र्वभाग (पाश्र्वभाग हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला qटगर असे म्हणतात.) गाण्याच्या तालावर हलविली म्हणून तिला हा किताब मिळाला आहे. तिच्या गाण्याला qकवा गाण्यातील शारिरिक हालचालींना आमचा अजिबात विरोध नाही. तिला पैसे कमावण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. पण पैसे कमावण्याच्या उद्योगाला कोणी महाराष्ट्राची शान म्हणू नये. घोळ नेमका इथेच आहे. पैशांसाठी काहीही हलवायला तयार असलेल्या दीक्षितांच्या या माधुरी मीडियाने महाराष्ट्राची शान असा किताब स्वत:च्या अखत्यारित देऊन टाकलेला आहे. माधुरीने श्रीराम नेणे नावाच्या एका अनिवासी भारतीय डॉक्टरशी विवाह केला, तेव्हा मीडियाचा उर भरून आला होता. स्वत:चीच मुलगी अमेरिकेत चालली असा आनंद मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना झाला होता. हिला वृत्तपत्रांनी इतके डोक्यावर बसवून घेतले की, ही बया आता महाराष्ट्राचाच अपमान करीत आहे. महाराष्ट्र सरकारने तिला नुकताच एक पुरस्कार देऊ केला होता. तो घ्यायला ती फिरकलीही नाही. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर हो, अशी गळ राज्य सरकारने तिला घातली. तेव्हा तिने इतके पैसे मागितले की, सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माधुरीच्या ठुमक्यांचे आंबट शौकिन असलेले लोक आता असे म्हणू लागले आहे की, मेहनतीने पैसे कमावणाèया माधुरीने सरकारसाठी फुकट काम का करावे? हा कृतघ्नपणा आहे. महाराष्ट्र सरकारकडून फुकट सवलती उकळताना लाज वाटली नाही. महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांनी प्रेम दिले म्हणून तुम्ही सुपर स्टार झालात. पैसे कमावले. लोकांनी पैसे मोजून तुमचे चित्रपट पाहिले. या ॠणातून थोडेसे उतराई होण्याची वेळ आली, तर तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठविणारी अवलादच असे बोलू शकते. केंद्र सरकारची  अतुल्य भारत ही जाहिरात मालिका आमिर खानने एक पैसाही न घेता केली. अमिताभ बच्चन यांनी एक पैसा न घेता उत्तर प्रेदशचे ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम केले. हे खरे महान कलाकार आहेत. 

अनिता पाटील


संबधित लेख 
मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?

1 comment:

  1. जयप्रभा स्टुडियोची जागा लताबाईंनी पडतळीत विकत घेतली. ती त्यांच्या मालकीची आहे. लोकांच्या भावना काहीही असल्या तरी त्या तिथे टॉवर उभे करून विकू शकतात. पण मग पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी मोक्याची साडेसहा एकर जागा सरकारकडे याचना करून मिळवली. तिथे टोलेजंग रुग्णालय उभारले आणि नफेखोरी सुरू केली. कुठे याचना करायची आणि कुठे माजोरडेपणा करायचा हे या मंडळींना अचूक माहिती आहे.

    ReplyDelete