Friday 5 May 2023

प्रबोधनकारांच्या ‘खरा ब्राह्मण’ नाटकाची कथा

प्रबोधनकार ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरेंचे वडील यांनी खरा ब्राम्हण हे नाटक लिहिलं होतं. हे नाटक संत एकनाथ महाराज यांच्यावर आधारित होतं. इतकंच नाहीतर तर ते अस्पृश्योध्दारावर आधारित होतं. एरवी ब्राम्हण इंग्रजांनी आपल्या धार्मिक बाबींमध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप नको या भूमिकेचे होते. धार्मिक बाबी सोडल्या तर इतर बाबींमध्ये ते इंग्रजांच्या नोकऱ्या हसत हसत पत्करायचे. पण इतरवेळी इंग्रजांचा हस्तक्षेप नको असायचा. मात्र महात्मा फुलेंनी ज्यावेळी ब्राम्हण नको म्हणून ब्राह्मणांव्यतिरिक्त लग्न लावण्यास सुरू केले तसे ते न्यायालयात गेले आणि इंग्रजांनी धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करावा अशी भूमिका घेतली. तीच बाब प्रबोधनकारांच्या बाबतीत झाली. संत एकनाथांचे मोठेपण दाखवणाऱ्या नाटकात ब्राह्मणांची बदनामी होते असे अर्ज देऊन नाटक बंद पाडण्याचे प्रयत्न झाले. मुंबईच्या पोलीस कमिशनर यांना नाटक बंद पाडण्याचे अर्ज गेले. त्यावेळी मुंबईचे मुख्याधिकारी मोहनलाल हे अधिकऱ्यांसमवेत स्वतः नाटकाला येऊन बसले. त्यांना नाटक इतके आवडले की त्यांनी त्यांनी या नाटकाला विरोध करणारे लफंगे किंवा आंधळे असावेत असा शेरा दिला. पुढे वालचंद हिराशेठ हेही सहकुटुंब नाकट बघून गेले. ते त्याकाळचे मोठे उद्योजक होते. त्यांनी "अस्पृश्योध्दावर इतके प्रभावी नाटक पहिल्यांदा पाहिले, अस्पृश्यतेची किळस न येणारा माणूस हा माणूस नाही असा शेरा दिला." पण याने ब्राम्हणांचा जळफळाट झाला. एकट्या पुण्यातून साताआठशे बांमनांचा सह्यांचा अर्ज नाटक बंद करण्यासाठी गेला. कारण काय? तर भावना दुखावल्या! मात्र मॅजिस्ट्रेटने स्वतः नाटक पाहिले असल्याने त्याने नाटकावर बंदी घालण्यास नकार दिला. 


तरी बामनांचा विरोध असल्याने बामनांच्या प्रतिनिधींना नाटक दाखवावे असा हट्ट करण्यात आला. त्याला डेप्युटी कमिशनर एहसान, बरेच पोलीस अधिकारी, सिटी मॅजिस्ट्रेट अशा अनेकांनी हजेरी लावली. मात्र झाले उलट हे नाटक पाहून अनेकांनी नर्तकीच्या नाचाला वन्समोअरची मागणी केली. त्यांनी या नाटकाच्या विरोधाला काहीही अर्थ नाही असा शेरा दिला. पुढे या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभरात झाले. महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात हे नाटक गेले त्या त्या शहरात ब्राम्हणांनी या नाटकाच्या विरोधात अडथळे आणले. कुठे थिएटर न भेटू देणे, तर कुठे नाटकाच्या विरोधात लोकांना उभे करणे असे अनेक प्रकार झाले.

धुळ्यात हे नाटक आले. त्याकाळी धुळ्यात थेटर नावाचे ठिकाण होते. त्याचा मालक मारवाडी होता. ब्राम्हणांनी त्याला दम भरला व थेटर न देण्याची तंबी दिली. नाटकाला थेटर नाही आणि नाटकासाठी आणलेल्या लोकांचा खर्च सुरू यात प्रबोधनकारांची कोंडी सुरू झाली. त्यांना अंमळनेरचे थेटर मिळाले. त्यांनी धुळ्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नाटकाचे प्रयोग सुरू केले. यावेळी एका बस प्रवासात एका गृहस्थांची आणि प्रबोधनकारांची भेट झाली. त्यांना धुळ्यातील मारवाड्याने थेटर नाकारल्याची माहिती मिळाली. त्या गृहस्थांचे पुत्र धुळ्यात वकील होते. त्यांनी त्या मारवाड्याला बोलावले आणि शिव्यांची लाखोली वाहिली. थेटर दे नाहीतर तुझी भानगड बाहेर काढले असा दम भरला आणि थेटर भेटले. पण अशाने बामन बिथरले. त्यांनी संत एकनाथांवरचे नाटक लोकांनी बघू नये यासाठी चंग बांधला. त्यांनी काही लोकांच्या टोळ्या बनवल्या., या टोळ्या नाटकाला येणाऱ्या लोकांना अडवून नाटक बघू नये असा हट्ट ते करू लागले. ब्राम्हणांनी तर या नाटकावर बहिष्कारच घातला होता. प्रबोधनकारांना आणि त्या थेटर मालक मारवाड्याला ब्राम्हणांनी इतका त्रास दिला की त्या थेटर मालकाने काही दिवसातच प्रबोधनकार ठाकरेंना थेटर रिकामे करण्यास सांगितले. 

ब्राम्हणांचा आणि मारवाडी थेटर मालकांचा त्रास प्रबोधनकारांना महाराष्ट्रभर झाला. प्रबोधनकार याबद्द्ल म्हणतात की, 'भटांना कावीळ झाली की मारवाड्यांचे डोळे पिवळे का होतात, हे कोडे मला अजून उलगडलेले नाही.' जळगावला प्रबोधनकार गेले मात्र तिथेही थेटर रिकामे असूनही मारवाडी मालकाने त्यांना थेटर दिले नाही.

तर असा हा ब्राह्मणांच्या कच्छपी लागलेल्या मारवाडी लोकांसोबतचा ब्राम्हणेतरांचा संघर्ष आहे.

- राहुल बोरसे

No comments:

Post a Comment