Saturday 1 October 2011

खरे अस्पृश्य ब्राह्मणच!

भगवान बुद्ध म्हणाले -
न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।
अर्थ - जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
.........................................................................................................................


वैदिक धर्म हा  हिंसा आणि अमानुषतेवर आधारित होता. वैदिक धर्मात कनिष्ठ जातीचे लोक तसेच स्त्रिया यांना माणूसपणाचेही हक्क नव्हते. त्यामुळे व्यथित झालेल्या भगवान बुद्धांनी आपला नवा मार्ग प्रतिपादन केला. वैदिक धर्माने ब्राह्मणांना दिलेले सर्व विशेषाधिकार भगवान बुद्धांनी नाकारले. त्यामुळे त्याकाळातील समस्त ब्राह्मणवर्ग भगवान बुद्धाच्या विरुद्ध उभा राहिला होता. त्याचे पुरावे बौद्ध वाङ्मयात जागोजागी सापडतात. त्यातील काही मोजक्या कहाण्या ‘भगवान बुद्ध आणि ब्राह्मण'  या मालिकेतून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 
अस्पृश्य कोणाला म्हणावे?
भगवान बुद्ध श्रावस्तीजवळील जेतवनात राहत होते. एकेदिवशी ते भिक्षाटनासाठी श्रावस्तीनगरीत आले. श्रावस्तीत यज्ञाची तयारी सुरू होती. नुकताच यज्ञाग्नी पेटविण्यात आला होता. भगवान बुद्ध भिक्षापात्र घेऊन येत आहेत, हे पाहताच एक याज्ञिक ब्राह्मण संतप्त झाला. तो दुरूनच ओरडला-
‘‘मुंडक (मुंडण केलेल्या गृहस्था) तिथेच थांब. दरिद्री श्रमणा तिथेच थांब. अरे, वृषल तिथेच थांब"
वृषल म्हणजे अस्पृश्य.
ब्राह्मणाचे ओरडणे ऐकून भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले- ‘‘हे ब्राह्मण ! अस्पृश्य कोणाला म्हणायचे? काय केल्याने माणूस अस्पृश्य होतो? या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत आहेत का?"
भगवान बुद्धांचे वचन ऐकून दांभिक ब्राह्मण सटपटला. तो म्हणाला - ‘‘नाही यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही."
भगवान बुद्ध म्हणाले तर मग ऐक -
१. जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे, चुगलखोर आहे, अपिवत्र दृष्टीचा आहे. त्याला वृषल समजावे.
२. जो प्राण्यांना त्रास देतो. ज्याच्या मनात प्राण्यांबद्दल दयाभाव नाही, तो वृषल समाजावा.
३. जो दुसरयाची वस्तू कोणताही मोबदला न देता घेतो, तो वृषल समाजावा.
४. जो कर्ज घेतो, परंतु ते फेडित नाही, तो वृषल समजावा.
५. जो कोणत्याही वस्तूच्या इच्छेपोटी वाटमारी करतो, लुटतो, कोणाला ठार करतो, त्याला वृषल समजावे.
६. जो खोटी साक्ष देतो, तो वृषल समाजावा.
७. जो आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या पत्नीसोबत व्याभिचार करतो (व्याभिचार जबरदस्तीचा असो की सहमतीने) त्याला वृषल समजावे.
८. आपल्याकडे पैसा असतानाही आपल्या मातापित्यांना जो सांभाळित नाही, तो वृषल समजावा.
९. जो अकल्याणकारी, खोट्या धर्माचे शिक्षण देतो आणि धर्माला रहस्य बनवू ठेवतो त्याला वृषल समजावे. (येथे रहस्य या शब्दातून भगवान बुद्धांना ‘हातचे राखून ठेवून धर्मशिक्षण देणे, विशिष्ट लोकांना धर्मशिक्षण देऊन विशिष्टांना शिक्षणापासून वंचित ठेवणे' , असा अर्थ अभिप्रेत आहे.)
१०. जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
मथितार्थ
भगवान बुद्धांनी केलेल्या शेवटच्या दोन व्याख्या महत्वाच्या आहेत. ब्राह्मणी धर्माने अर्थात वैदिक धर्माने वर्णाश्रमाची मांडणी करून कनिष्ठ जातींना धर्मशिक्षण नाकारले. ही व्यवस्था निर्माण करणारे ब्राह्मण होते. त्यामुळे या व्याख्येनुसार, ब्राह्मण सर्वप्रथम अस्पृश्य ठरतात! १० व्या व्याख्येचे मूळ पाली शब्द असे आहेत : न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।  (वृषलचे पालीत बसल होते. त्याला प्रत्यय लागून बसलो असे रूप झाले आहे. जच्चा म्हणजे माता.)


या मालेतील इतर लेख 
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा? 

12 comments:

  1. खूप मस्त... तथागत गौतम बुद्धाच्या दहाही व्याख्या...पूर्णपणे मानव्याधारित आहेत!

    ReplyDelete
  2. मनोज भैय्या फार फार धन्यवाद.

    ReplyDelete
  3. खुपच छान महितिपुर्ण लेख

    ReplyDelete
  4. nice khupach Chan...jagala yuddh nahi buddh hawa

    ReplyDelete
  5. खरोखर लेखन अभ्यास उत्कृष्ठ आहे

    ReplyDelete
    Replies
    1. समाजसुधारणेचे नाटक बंद करा !

      Delete
  6. खुप सुंदर लिखाण केले आहे !

    ReplyDelete
  7. खूपच अभ्यासपूर्ण लेखन आहे !

    ReplyDelete
  8. विचार पूर्वक लेखन आहे तसेच विचार करायला लावणारे सुद्धा आहे.

    ReplyDelete
  9. आर्य येण्यापूर्वी भारतात कोणता धर्म होता किंवा आर्यांचा कोणता धर्म होता हे कोणी सांगू शकेल का ? भारतातील
    सनातन धर्म कोणता ? यावर कोणीतरी कृपया प्रकाश टाकावा ही विनंती.

    ReplyDelete
  10. खूप छान माहिती आहे💐💐

    ReplyDelete