Saturday, 15 October 2011

पुढील ५० वर्षे केवळ बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!


ब्राह्मण लेखकांना ५० वर्षे मिळाले अघोषित आरक्षण

ज्ञानपीठ पुरस्कार केवळ ब्राह्मणांनाच का मिळतात? असा प्रश्न करणारा माझा लेख ब्लॉगवर आहे. गीता असे नाव लावणारया कुण्या व्यक्तीने त्यावर मखलाशी करताना म्हटले की, ''अनिताबाई, मग हा पुरस्कार बहुजनांसाठी आरक्षित करून टाका.'' पितळ उघडे पडल्यामुळे निर्माण झालेला जळफळाट या व्यक्तीच्या वाक्यातून दिसून येतो. मात्र, या व्यक्तीचे म्हणणे वेगळ्या अर्थाने विचारात घेण्यासारखे आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांमध्ये ब्राह्मणांना गेली ४०-५० वर्षे अघोषित आरक्षण होते. १९६५ साली ज्ञानपीठ पुरस्कारांना सुरूवात झाली. आजपर्र्यत ४८ लेखकांना हा पुरस्कार दिला गेला. उर्दू साहित्यातील काही मोजके मुस्लिम लेखक वगळता उरलेले सर्व नसले तरी बहुतांश  लेखक ब्राह्मण आहेत. ज्ञानपीठाच्या वेबसाईटवर कोणीही ही यादी पाहू शकतो. वाचकांच्या सोयीसाठी मी ही यादी लेखाच्या शेवटी देत आहे. कृपया पाहावी. कोणाला त्यात बहुजन लेखकाचे नाव सापडल्यास मला अवश्य कळवावे. मी माझ्या लेखात दुरुस्ती करून घेईन.
आरक्षण नको पुरस्कार द्या
भावांनो-बहिणींनो, गेल्या ५० वर्षांत केवळ ब्राह्मण लेखकांचीच या पुरस्कारांसाठी निवड केली गेली, हा अन्याय नव्हे का? गीता नावाच्या व्यक्तीने बहुजनांना आरक्षण देण्याचे वक्तव्य उपरोधाने केले आहे. परंतु त्याचा खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांत बहुजनांना आरक्षण नाही दिले तरी चालेल. परंतु पुढची ५० वर्षे आता एकाही ब्राह्मण लेखकाला हा पुरस्कार मिळू नये, अशी मागणी करणे अयोग्य ठरणार नाही. कारण गेली ५० वर्षे ब्राह्मणी लॉबीने हे पुरस्कार लाटले आहेत. आता पुढची ५० वर्षे बहुजन समाजातील लेखकांना ते मिळू द्या. किमान मराठीत तरी या पुढे किमान तीन बहुजन लेखकांना ज्ञानपीठ मिळायला हवे. बहुजन लेखकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण लेखकांचा विचार व्हायला हरकत नाही.

.....................................................................................
ज्ञानपीठ पुरस्कारप्रात्त लेखकांची यादी. मराठीतील ज्या तीन ब्राह्मणांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांची नावे ठळक टाईपात दिली आहेत. 


Laureates Awarded, so far,by the Jnanpith Award

1. G. Sankara Kurup (1965) Malayalam
2. T.S. Bandyopadhyaya (1966) Bangla
3. Uma Shankar Joshi (1967) Gujarati
4. K.V. Puttappa (1967) Kannada
5. Sumitranandan Pant (1968) Hindi
6. Firaq Gorakhpuri (1969) Urdu
7. V. Satyanarayana (1970) Telugu
8. Bishnu Dey (1971) Bangla
9. Ramdhari Singh `Dinkar' (1972) Hindi
10. D.R. Bendre (1973) Kannada,
11. Gopinath Mohanty (1973) Oriya
12. V.S. Khandekar (1974) Marathi 
13. P.V. Akilandam (1975) Tamil
14. Ashapurna Devi (1976) Bangla
15. K.S. Karanth (1977) Kannada
16. S.H.V. Ajneya (1978) Hindi
17. B.K. Bhattacharya (1979) Assamese
18. S.K. Pottekkatt (1980) Malayalam,
19. Amrita Pritam (1981) Punjabi
20. Mahadevi Varma (1982) Hindi
21. Masti V. Iyengar (1983) Kannada
22. Thakazhi S. Pillai (1984) Malayalam
23. Pannalal Patel (1985) Gujarati
24. Satchidanand Rautroy (1986) Oriya
25. V.V.S. 'Kusumagraj' (1987) Marathi 
26. C. Narayana Reddy (1988) Telugu
27. Qurratulain Hyder (1989) Urdu
28. V.K. Gokak (1990) Kannada
29. Subhash Mukhopadhyaya (1991) Bangla
30. Naresh Mehta (1992) Hindi
31. Sitakant Mahapatra (1993) Oriya
32. U.R. Anantha Murthy (1994) Kannada
33. M.T. Vasudevan Nair (1995) Malayalam
34. Mahasveta Devi (1996) Bangla
35. Ali Sardar Jafri (1997) Urdu
36. Girish Karnad (1998) Kannada
37. Nirmal Verma (1999) Hindi
38. Gurdial Singh (1999) Punjabi
39. Indira Goswami (2000) Assamese
40. Rajendra Shah (2001) Gujarati
41. D. Jayakanthan (2002) Tamil
42. Vinda Karandikar (2003) Marathi
43. Rahman Rahi (2004) Kashmiri
44. Kunwar Narain (2005) Hindi
45. Satyavrat Shastri (2006) Sanskrit
46. Ravindra Kelekar (2006) Konkani
47. O. N. V. Kurup (2007) Malayalam
48. Akhlaq Khan Shahryar (2008) Urdu




1 comment:

  1. गीता याचं सांगण बरोबर आहे का..??

    हे काय झाल अहो पुरस्कार काय राखीव ठेवता येणार आहे का

    लिखाण करा
    चांगल लिखाण करा त्यानेच पुरस्कार मिळतील

    आता तर अनीता पाटिल याना ज्ञानपीठ दिल पाहिजे कारण त्या पुरस्काराच्या लायकी च लिखाण अनीता पाटिल करतायत

    ReplyDelete