Sunday, 10 June 2012

महावीर भाई, घेतला वसा टाकू नका!


नव्या पिढीतील चार दोन विचारवंतांची यादी काढायचे ठरल्यास महावीर सांगलीकर यांचे नाव सर्वांत वर राहील. सांगलीकरांच्या लिखानाला मोठा वाचकवर्ग लाभला आहे. त्यांच्या महाविचार या ब्लॉगची लोकप्रियता पाहिली की हे लक्षात येते. बहुजन समाजात जनजागृती करण्याचा वसा घेऊन लेखनी हाती घेणा-या मोजक्या लेखकांत त्यांचा समावेश होतो. आपला विचार मांडताना ते कोणाचाही मुलाहिजा बाळगित नाहीत. त्यांनी स्वत:ला कोणत्याही विचार सरणीशी बांधून घेतलेले नाही. या कारणांमुळे मला त्यांच्या लेखनाबद्दल आस्था वाटते. 

महाराष्ट्रातील सध्याची पुरोगामी चळवळ (त्यात आंबेडकरी चळवळही आली) महात्मा गांधी यांच्याविषयी द्वेषभाव बाळगून आहे. सांगलीकरांना मात्र महात्मा गांधींबद्दल विशेष आस्था आहे. संधी मिळेल, तेव्हा ते गांधींचे मोठेपण मांडत असतात. त्याबद्दल ते टीकेचे धनीही झाले आहेत. तथापि, त्यांनी ही टीका झेलली. ज्यांच्यासाठी आपण लिहितो त्यांच्याकडूनही त्यांना टीका सहन करावी लागली. त्यामुळे ते मध्यंतरी उद्विग्न झाल्याचे दिसून आले. ‘या पुढे बहुजनांना सुधारण्याचे कार्य मी बंद करणार आहे. केवळ इतिहास संशोधनाशी संबंधित लेखनच मी करीन', अशी घोषणाच त्यांनी करून टाकली. 

मी लेखन सुरू करण्याच्या फार आधीपासून ते लिहित आहेत. समाज जागृतीचे कार्य त्यांनी सोडू नये, असे मला वाटते. महाराष्ट्रातील तमाम सुधारणावाद्यांचेही हेच मत आहे. ‘महावीर भाई, घेतला वसा टाकू नका', अशी विनंती मी त्यांना माझ्या सर्व वाचकांच्या वतीने करीत आहे. 

महावीर सांगलीकर यांचा ब्लॉग 

अनिता पाटील

No comments:

Post a Comment