Sunday, 3 June 2012

होय, वंदेमातरमने इस्लामची पायमल्ली होते!

वंदेमातरमचा बागुलबुवा उभा करून संपूर्ण मुस्लिम समाजाविरुद्ध विष पेरणी करणाèया ब्राह्मण इतिहासकारांचा पर्दाफाश मी ‘वंदेमातरम'  या लेखात केला आहे. त्यावर ब्राह्मणांचा तिळपापळ झाला. हा लेख लिहून कित्येक महिने झाले आहेत, तरीही त्याला विरोध करणाèया प्रतिक्रिया जातीयवादी ब्राह्मणवादी टाकीतच असतात. ‘वंदेमातरमने इस्लामचा अनादर होतोच कसा?' असे तुणतुणे जातीयवादी मंडळी सातत्याने वाजवित असते. ब्लॉगचे एक वाचक सादिक हुसैन यांनी जातीयवादी ब्राह्मणांना सडेतोड उत्तर देणारी प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. माझ्या मूळ लेखाखाली ही प्रतिक्रिया आपणास वाचायला मिळेलच. तथापि, ती महत्वाची असल्याने ती स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात येथे टाकीत आहे. 


अनिता पाटील


.........................................................

वंदे मातरम नारा दिल्याने इस्लामची
पायमल्ली कशी होते याचे हे उत्तर
गेस्ट रायटर : सादिक हुसैन
 
इस्लाम चा पाया 'ईश्वर एक अल्लाह आहे' यावर स्थित आहे. इतर व्यक्तीस/ भगवन्तास ईश्वर मानणे व नमन करणे म्हणजे इस्लाम बाहेर पडणे. त्यामुळेच आई वडील, गुरु, धर्मगुरू, व खुद्द प्रेषितास नमन करणे 'हराम' मानले जाते. इस्लाम मध्ये सूर्य, नदी, पशु, पक्षी, निसर्ग धन व निसर्गाचे स्त्रोत यांची पूजा करण्यास सक्त मनी आहे कारण यांना सर्वाना निर्माण करणारा ईश्वर म्हणजे 'एकमेव अल्लाहच' म्हणून 'वंदे मातरम': म्हणजे भारत माते/भूमी मी तुला वंदन करतो हा नारा इस्लाम च्या बेसिक्स च्या विपरीत आहे म्हणून नार्याला विरोध. पण इस्लाम विरोधीना मला सांगावेसे वाटते कि इस्लाम मध्ये 'आपल्या भूमी साठी लढणे न त्या साठी प्राण अर्पण करणाऱ्यास शहीद चा दर्जा प्राप्त होतो व असे करणे सर्वश्रेष्ठ कर्म आहे' असे कुरानात नमूद आहे. वंदे मातरम इस्श्यू पुढे करून मुस्लीमांची देशविरोधी प्रतिमा उभारण्याचा नेहमी प्रयत्न केला गेला आहे. 

ब्राहमण इतिहासकारांनी मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न व दिलेली आहुती नेहमीच लपवून ठेवली आहे. खान अब्दुल गफ्फार खान (या बहाद्दराने वयाच्या ९५ पैकी ४५ वर्षे तुरुंगाची हवा खाल्ली)शफी दावूदि,शमसुद्दीन- बद्रुद्दीन तय्यबजी, मोहम्मद अश्फ़क़ उल्लाह , खान बर्कातुल्लः, सय्यद रहमत शह, अली अहमद सिद्दिकी सय्यद माज्ताबा हुसैन, उमर सुभानी, मुहम्मद बशीर, खुदा बक्षी, झफर हसन, अल्लाह नवाझ अब्दुल अझीझ, टिपू सुलतान ज्यांच्या पैकी बहुतानी इंग्रजाशी लढताना आपले प्राण गमावले. अशी शेकडो नावे जाणीवपूर्वक समोर आणली जातच माहित. परदा करणाऱ्या मुस्लीम स्त्रियाहि मागे नव्हत्या. 

आबादी बेगम, मौलाना मोहमद आली , निशात उन्न्निसा, बेगम हजरत मोहनी, सदात बानो खित् लवी ,बेगम खुर्शीद ख्वाजा , जुलेखा बानो, खदीजा बेगम, खुर्शीद साहिबा, मेहर ताज,जुबेदा बेगम या सर्व व्यक्ती शाही खानदानातील व सर्व ऐश आराम प्राप्त मंडळी होत. 

इतिहास माहित नसणाऱ्या लहानग्यांना समोर रेडी मेड इतिहास मांडून पाहिजेय तशी सोय करून घेणारी आमचे इतिहासकार आणि पुस्तक मंडलाचे षडयंत्र फार दिवस चालणार नाही. 

फक्त 'वंदे मातरम ' नारा नाही दिला म्हणजे मुस्लीम देशद्रोही होत नाहीत.

कळावे.

जय हिंद, जय भारत

2 comments:

 1. Aaple aaivadil he kontyahi dharmapeksha shresht ahet. Aapli bharatbhumi apli aaich ahe mag aaila vandan kelyane dharm bhrasht hot asel tar to ky kamacha?

  ReplyDelete
 2. किशोर,
  भूमी ही तुझी आई आहे, हे वाचून खरोखरच आश्चर्य वाटले. तू खरोखरच जमिनीतून पैदा झाला असशील तर तू सीतेचा भाऊ आहे, असे म्हणायला पाहिजे.
  अरे, पण मग तुझा बाप तरी कोण? आणि त्याने जमिनीसोबत संसार कसा केला आणि तुला जन्माला कसे घातले?

  तुमच्या सारख्या मातृभूमीवाल्यांचे सारेच अजब असते बुवा.

  ReplyDelete