Thursday 3 November 2011

हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

+हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे+ असे विधान मी काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही 
हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे  नंतर हिंदुकरण झाले आहे.   
ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
समस्त भारतवर्षात  स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. +कृण्वंतो विश्वम आर्यम+ अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी +अष्टपूत्र सौभाग्यवती भव+ असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. +आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि  जायताम् + असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत. 
शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव  आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक  अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली. 
अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी 
पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?  
अकबराची ब्राह्मण नवरत्ने
कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली. 
इंग्रजी राजवटीतही तेच
ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी  ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला. 
हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव.  मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद  महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे. 
हिंदू हा शब्द इस्लामची देण
 लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला.  त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो. 
इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला. 
हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना  मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, +मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे.+ आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे. 
गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता! 
ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा  मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा  मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा  मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे.   



17 comments:

  1. भगवद्गीता हा हिंदूंचा धर्म ग्रन्थ नाहिये। तो सम्पूर्ण मानवतेचा ग्रंथ आहे। गीतेमधे कुठेच "हिन्दू" शब्द नाहिये।
    वरील लेख चांगला जरी असला तरी त्यात काही गोष्टी असत्य आहेत।

    ReplyDelete
  2. हे जे काही वाचनात येतेय ते अचाट आणि आधी कधीही न वाचलेलं आहे; एक एक लेख डोळे खाडकन उघडतात, अतिशय परखड आणि निडर लिखाण आहे. नाही तर हल्ली लेखकांना लिहताना खूप लोकांच्या भावना सांभाळून लिहाव लागत. माझा मुद्दा हा आहे कि पुढील येणाऱ्या पिढीने कोणता इतिहास खरा मानायचा ??

    ReplyDelete
  3. श्री कृष्णाने लिहिलेल्या भगवद्गीतेत माणसाला बंधनात टाकलेलं आहे. परंतु चार्वाकांनी लिहिलेल्या 'लोकायत' ग्रंथात माणसाचे खरे गुणधर्म दिलेले आहे. आणि जगाचे खरे दर्शन मिळते.

    ReplyDelete
  4. श्री कृष्णाने लिहिलेल्या भगवद्गीतेत माणसाला बंधनात टाकलेलं आहे. परंतु चार्वाकांनी लिहिलेल्या 'लोकायत' ग्रंथात माणसाचे खरे गुणधर्म दिलेले आहे. आणि जगाचे खरे दर्शन मिळते.

    ReplyDelete
  5. Varil sagalya gosti Satya nahit....kahi jari asalya tari bakicha gosti varati nakkich vichar karayala hava....

    ReplyDelete
  6. Gita Nathuraamane pan vachali ani Mahatmajini pan, jo to aaplya buddhine arth lavato. Islam che kuran same aahe pan kahi lok te vachun lokana manavatecha sandesh detat ani kahi lok te vachun bhaltach arth kadhun lokanche jiv ghet sutataat.

    ReplyDelete
  7. अनिता ताई ..... खूपच सुंदर ....

    ReplyDelete
  8. गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या.yala kahihi purava nahi..

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती दिली धन्यवाद

    ReplyDelete
  10. 'मुद्राराक्षस' या टोपण नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाने 'धर्मग्रन्थों का पुनर्रपाठ' या ग्रंथात सर्वांचे डोळे उघडले आहेत!
    "इतिहासकारोंने कहा कि चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया। यह विचित्र तर्क था। ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं। विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं। मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया। हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था। उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा। फारसी में हिंदू का अर्थ होता हैं काला, चोर, लुटेरा, माशूक के चेहरे का तिल या गुलाम। ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं। पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो। भारत में यह हो गया।"

    ReplyDelete
  11. गीता दोघांच्या हातात असून फायदा नाही तर त्यातलं तत्वज्ञान काय सांगतं याला महत्व आहे... गीता ही हिंदूंची नसून ती अखिल विश्वाची आहे हे आपणाला मान्यच करावे लागेल ब्राम्हणांनीजरी आपल्या फायद्यासाठी काही गोष्टी केल्या असतील असं जरी आपण म्हटल जे शास्वत सत्य आहे ते लपत नाही किंवा ते आपण नाकारू शकत नाही

    ReplyDelete
  12. गीता दोघांच्या हातात असून फायदा नाही तर त्यातलं तत्वज्ञान काय सांगतं याला महत्व आहे... गीता ही हिंदूंची नसून ती अखिल विश्वाची आहे हे आपणाला मान्यच करावे लागेल ब्राम्हणांनीजरी आपल्या फायद्यासाठी काही गोष्टी केल्या असतील असं जरी आपण म्हटल जे शास्वत सत्य आहे ते लपत नाही किंवा ते आपण नाकारू शकत नाही

    ReplyDelete
  13. पुरावा क्र. १) *सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या घटना पीठाने १४/०१/१९६६ रोजी 'हिंदू धर्म' या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, "हिंदू हा धर्म नाही".

    पुरावा क्र. २) Meaning of Hindu word: [Persian dictionary titled Lughet-e-Kishwari, published in Lucknow, gives the meaning of Hindu as ‘chore (thief), dakoo (dacoit), raahzan (waylayer), and ghulam (slave)’. Yet according to an other dictionary named Urdu-Feroze-ul-Laghat – part 1 (Page No. 615)]

    ReplyDelete