Thursday, 14 February 2013

ब्राह्मण तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत काय?

‘आपण सगळे ब्राह्मण'वर ‘गर्द'भरी कहाणी!

--राजा मइंद

आदरणीय अनिता ताई यांनी फेसबुकवरील +आपण सगळे ब्राह्मण+ या गोपनीय ग्रुपमध्ये काय कारवाया चालतात याचा पर्दाफाश केला होता. त्याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या ग्रुपवाल्यांनी अनिता तार्इंच्या नावाचा एवढा धसका घेतलेला आहे की, +अनिता पाटील+ यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकू नये, अशी लेखी सूचना ग्रुपच्या नियमावलीत टाकण्यात आलेली आहे. तार्इंनी ग्रुपचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर काही काळ ही सूचना गायब झाली होती. ती आता पुन्हा अवतरली आहे. अनिता तार्इंच्या लेखांनंतर या ग्रुपच्या अ‍ॅडमीनची नावे गायब झाली होती. तीही आता अवतरली आहेत. 

पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता
गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत

अनिता ताई करीत असलेल्या समाज प्रबोधनावर लेखी बंदी घालणा-या या ग्रुपवर काय चर्चा चालते, हे पाहण्यासाठी आम्ही येथे एक गुप्त फेरफटका मारला. त्यातून हाती आलेली माहिती विस्मयकारी आहे. या ग्रुपवर सध्या एका ड्रग अ‍ॅडिक्टची लेखमाला सुरू आहे. आपण कसे ड्रग घेत होतो. त्यासाठी कशा चो-या-चपाट्या करीत होतो, याचा कहाण्या रंगवून सांगत आहे. अरेबियन नाईट्समधील सुरस आणि चमत्कारिक कहाण्याही या गर्दुल्याच्या कहाण्यांपुढे फिक्या पडतील. गेल्या अनेक महिन्यांपासून या  ‘गर्द'भ-या कहाण्यांचा रतिब येथे सुरू आहे. +आपण सगळे+वाले या कहाण्या चवीन वाचित आहेत. या इसमाचे वडील आजारी असतानाही तो ड्रगचे व्यसन सोडत नव्हता, इतकी ही कहाणी गर्दभरी आहे. पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत. घोर कलियुग म्हणतात ते हेच.

'गर्द'भरी कहाणी प्रसिद्ध करण्यामागील हेतू काय?
ब्राह्मणांनी काय वाचावे अथवा काय वाचू नये, हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला प्रश्न एवढाच पडला आहे की, गर्दुल्याची ही गर्दभरी कहाणी +आपण सगळे ब्राह्मण+वर का प्रसिद्ध होत आहे? ब्राह्मण तरुण गर्दच्या आहारी गेले आहेत आणि त्यांना त्यातून सोडविण्यासाठी अशा कहाण्या देणे आवश्यक आहे, असे ग्रुपच्या अ‍ॅडमीनला वाटते की काय? की गर्द ओढण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात, किती निलाजरेपणा करावा लागतो, याचे प्रशिक्षण ब्राह्मण तरुणांना मिळावे, असा अ‍ॅडमीनचा हेतू आहे? 

अनिता पाटील विचार मंचाच्या वाचकांसाठी या 'गर्द'भ-या 
कहाण्यामधील काही अंश आम्ही येथे घेऊन आलो आहोत :


नोकरी ..व्यवसाय ..व्यसन !
( भाग ९४ वा )

आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये वडील सुमारे २ महिने होते ..मात्र फारसा फरक पडला नाही त्यांच्या तब्येतीत ..दरम्यान आईची फार दगदग होई ..माझ्या पुतण्या लहान असल्याने वहिनीना घरकामात जास्त वेळ देणे कठीण होते . शिवाय त्यांनी गाण्याचे क्लास घेण्यास सुरवात केलेली होती .रोज सायंकाळी चार ते आठ त्या गाण्याचे क्लास घेत असत ..काही दिवस मी देखील कौतुकाने वाहिनीकडे पेटी शिकलो ..फक्त ' सावन आया आज सुहावन ..सखिया मंगल गावत गाना ' इतकीच प्रगती केली ...आईला घरातली कामे आटोपून दिवसा दवाखान्यात काही वेळ बसावे लागे ..भाऊ वेळ मिळेल तसा दिवसा किवा रात्री दवाखान्यात येतच होता .. मी रिकामा होतो मात्र ..व्यसने पुन्हा सुरु आल्याने सगळ्यात जास्त ' बिझी ' झालो होतो ...म्हणजे दिवसभर पैसे कोठून मिळतील ? ..काय लोचा करायचा ? ..कसे जमवायचे ?या विचारात व्यस्त राहू लागलो होतो ...रात्री काही नाही तर निदान गांजा पिण्याची सोय करतच होतो .हॉस्पिटल मध्ये माझा ट्रान्झीस्टर नेला होता .. मग रात्री झोप येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली विरहगीते ऐकत बसे ..शेवटी वडिलांना घरी आणण्याचे ठरले ..घरीच औषधे घेऊन ..फिजीयोथेरपी करत रहावी असे ठरले .

वडील घरी आल्यावर ..एका परिचितांच्या ओळखीने मला ' नवदुर्गा इंडस्ट्रीज ' , अंबड येथे पर्चेस विभागात नोकरी मिळाली ..कंपनी ला लागणारे साहित्य नाशिक मधूनच खरेदी करायचे काम माझ्याकडे होते ..कंपनीने ऐक स्कुटर देखील दिली होती मला फिरायला ..सुरतीला काही दिवस मी नोकरी नीट केली .. व्यसने अगदी रोज नाही तरी संधी मिळेल तेव्हा सुरूच होती ..एकदा मी कंपनीचे महत्वाचे काम असतांना स्कुटर घेऊन दिवसभर गायब राहिलो ..आणि मालकाचे डोके फिरले ..त्याने मला नोकरी वरून काढून टाकले ..घरी मात्र मी खरी परिस्थिती न सांगता ..काहीतरी समर्थने देऊन वेळ निभावून नेली ..मग आमच्या वाहिनीच्या वडिलांचे स्नेही श्री . वसंतराव नातू यांच्या ' मायबोली ' या वाचनालयात मला वाहिनीच्या वडिलांनी शब्द टाकला म्हणून नोकरी मिळाली ..अशोक स्तंभ येथून रविवार कारंजा कडे येणाऱ्या रस्त्यावर वाहिनीच्या वडिलांच्या मालकीचे ऐक छोटेसे दुकान होते ..ते वसंतराव नातू यांनी भाड्याने घेतले होते ..व तेथे त्यांनी त्यांच्या ' लायब्ररी ' ची ऐक शाखा सुरु केली होती ..मला ही छोटीशी लायब्ररी सांभाळण्याचे काम मिळाले .. .. सकाळी ९ ते रात्री साधारण साडेआठ पर्यंत मी तेथे थांबत असे ..नवीन सभासद करून घेणे ..त्यांना पुस्तके बदलून देणे ..अश्या स्वरूपाचे काम होते .. वसंतराव नातू हे परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हा वाचनालयाचा व्यवसाय सुरु केला होता ..त्यानाही वाचनाची खूप आवड होती व पाहता पाहता त्यांनी हा खाजगी वाचनालयाचा व्यवसाय खूप वाढवला होता ..त्या वेळी त्यांच्याकडे अंदाजे सुमारे दोन हजार सभासद असावेत..वसंतरावाना तीन मुली होत्या तिघींचे लग्न झालेले होते .. नाशिक शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या शेजारी असलेले ' सार्वजनिक वाचनालय 'आणि हे दुसरे खाजगी ' मायबोली ' वाचनालय प्रसिद्ध होते . खरेतर मला देखील वाचनाची आवड असल्याने ही नोकरी अगदी चांगलीच होती पण .. माझ्या मनातील व्यसनाचे आकर्षण काही कमी होत नव्हते ..!

अकोल्याला अनघाला पत्र पाठविताना मी सलील च्या नावावर पाकिटात पत्र पाठवीत होतो ..मलाही ती सलीलच्याच नावाने पत्र पाठवीत असे ..त्या काळी मोबाईल ही भानगड अस्तित्वातच नव्हती तसेच सर्वत्र टेलिफोन पण नव्हते त्यामूळे आमचा संपर्क महिन्यातून फार तर दोन वेळा आणि तो देखील पत्राद्वारे होऊ लागला .. ' लायब्ररी ' चे काम अजून वाढावे म्हणून नातू काकांनी मला नवीन कल्पना सुचविली ..त्यांनी पेपर मध्ये घरपोच लायब्ररी च जाहिरात दिली आणि जे लोक संपर्क करतील त्यांच्या कडून महिना थोडे जास्त पैसे वर्गणी म्हणून आकारून त्यांना घरपोच पुस्तक बदलून देण्याचे काम मला सोपवले ..तसेच मी देखील वेगवेगळ्या वसाहतीत सायकलने फिरून घरोघरी जाऊन घरपोच वाचनालयाची माहिती देवून सभासद बनविणे सुरु केले .सोबत मी दोन मोठ्या पिशव्यात दिवाळी अंक , कादंबऱ्या ..धार्मिक ..आत्मचरित्रे अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळून चाळीस ऐक पुस्तके नेत होतो ..अनेकदा मी पावती न बनवता सभासद बनवून त्यांचे वर्गणीचे पैसे हडप करू लागलो ..तुलनेत हे पैसे हडपण्याचे प्रमाण कमी असल्याने नातुकाकांच्या लक्षात येत नव्हते . काही दिवसांनी रविवार कारंजावरचे भाड्याचे दुकान बंद करून ' मायबोली ' वाचनालय एम .जी रोडवर नव्याने झालेल्या ' अभ्यंकर प्लाझा ' या ठिकाणी मालकीच्या जागेत गेले तेथे सकाळी व संध्याकाळी पुस्तक वगैरे बदलून देण्यासाठी दोन मुली होत्या ..त्या वेळात मी घरपोच लायब्ररी चे काम करत असे व दुपारच्या वेळात वाचनालयात थांबत असे ..नातू काका खूप उत्साही होते ..त्यांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती असूनही माझ्यावर विश्वास ठेवत होते ..ते मला व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना सांगत असत ..दुपारच्या वेळी वाचनालयात जास्त गर्दी नसते म्हणून त्यांनी मला दुपारी पार्ट टाईम तेथे वाचनालयाच्या बाजूलाच असलेल्या ' साहिल ' वॉच क. या घडयाळे व त्यांचे स्पेअर पार्टस असलेल्या दुकानात श्री . खरे यांच्या कडे काम करण्यास सुचविले ..त्यानुसार मी ' साहिल ' वॉच मध्ये देखील काम करू लागलो .. माझी लवकरात लवकर भरभराट करावी ही नातुकाकांची इच्छा होतील ..परंतु स्वतच्या भल्याची मला समज यायची असल्याने ..मिळणारे सर्व पैसे मी व्यसनात उडवत होतो ..कष्टदेखील भरपूर करत होतो पण शेवटी ' देणाऱ्याचे हात हजारो ..दुबळी माझी झोळी ' असे झाले होते .. साहिल वॉच कंपनी चे मालक खरे देखील खूप कल्पक होते ..रक्षाबंधनाच्या वेळी त्यांनी मुंबईहून घाऊक भावाने राख्या मागवल्या होत्या त्या विकण्यासाठी देखील मी रक्षा बंधनाच्या चार दिवस आधीपासून समोरच्या फुटपाथ वर स्टुल घेऊन बसलो ..रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी बऱ्याच राख्या उरल्या .. सगळ्या खपाव्यात म्हणून मेनरोड ला देखील हातगाडी वर राख्या मांडून विकल्या .. या विक्रीत माझे वेगळे कमिशन असे ..सगळे पैसे शेवटी गांजाच्या ..दारूच्या ..ब्राऊन शुगरच्या वर खर्च होत .

राखीचा सिझन संपल्यावर नातुकाकानी नवीन कल्पना मांडली ' तुषार उद्योग ' नावाने व्यवसाय सुरु करण्याची ..माझ्या नावाने हा व्यवसाय असणार होता ..काही खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू ' मायबोली ' वाचनालयाच्या जागेतच विक्रीला ठेवायचे आणि ते काम मी सांभाळायचे अशी त्यांची कल्पना होती ..जर मी नीट लक्ष घालून व्यवसाय वाढविला असता तर मग वेगळी जागा व जास्तीचे भांडवल देण्यासाठी देखील ते मदत करणार होते . मी देखील उत्साहाने एके दिवशी स्वतच्या हाताने ऐक पत्र्याचा बोर्ड बनवून त्यावर पेंट ने ' तुषार उद्योग ' हे नाव रंगविले ..अर्थात त्या दिवशी मस्त डोस झाला होता ब्राऊन शुगरचा म्हणून हा अतिरिक्त उत्साह होता .. तो बोर्ड वाचनालयाच्या बाहेर लावला ..काकांनी सांगली , कोल्हापूर वगैरे ठिकाणी प्रसिध्द असलेले ' भडंग ' मागवले होते ते विक्रीस ठेवले ..तसेच बिस्किटाचे पुडे .. वेफर्स असे पदार्थ विक्रीस ठेवले ..नंतर दोन दिवसात त्यांनी पाठ वगैरे शेकण्यासाठी मिळणारी इलेक्ट्रिकची पिशवी देखील मला विक्रीसाठी आणून दिली .. या निमित्ताने माझ्या खिश्यात जसे जास्त पैसे येऊ लागले तसे व्यसन वाढू लागले ..इतके सगळे पैसे व्यसनात उडवून देखील कधी कधी घरी देखील पैसे मागत होतो ..वडील पूर्वी माझ्या बाबतीत ऐक वाक्य नेहमी म्हणायचे की हा ' कुबेराला देखील भीक मागायला लावेल ' ते खरेच होते ... शेवटी तब्येतीवर सगळ्याचा परिणाम दिसू लागला मी पुन्हा खंगत चाललो होतो ..भावाच्या लक्षात सगळे आलेले होते फक्त जो पर्यंत घरी जास्त त्रास देत नाही तो पर्यंत तो कटकटी नकोत म्हणून बोलला नव्हता ..अधून मधून आमचे खटके उडत असत पण आई पटकन मध्यस्ती करत होती .. तब्येतीवर परिणाम होत असल्याने मग मी कामावर दांड्या मारू लागलो ..हळू हळू नातुकाका माझ्याबाबत निराश होऊ लागले !



No comments:

Post a Comment