Saturday 21 July 2012

लोकसत्तेचे खोटे आरोप

अभिनवगुप्त साहेब, वाईटाचा तिरस्कारच 
करायचा असतो; पुरस्कार नव्हे..............!


लोकसत्तेतून प्रसिद्ध होणा-या अभिनवगुप्तकृत ‘वाचावे नेटके' या सदरात माझ्या ब्लॉगविषयी जे काही छापून आले त्याचा गोषवारा काढणयाचा प्रयत्न मी केला. तेव्हा प्रमुख तीन मुद्दे हाती आले. ते असे :

१. ते आणि आपण : अनिता पाटील यांची शैली ‘आपण आणि ते' असा भेदभाव निर्माण करणारी आहे.
२. तिरस्कार : अनिता पाटील यांच्या लेखनातून तिरस्काराचा भाव पसरविला जातो.
३. ब्राह्मणांचे गोमांस भक्षण : ब्राह्मण हे गोमांस खात होते, असे प्रतिपादन करणारे काही लेख अनिता पाटील यांनी लिहिले. तथापि, हा विषय ‘द होली काऊ' या ग्रंथात आधीच आलेला आहे.

हे तिन्ही आक्षेप कसे खोटे आहेत, हे आता आपण पाहू या. 

ते आणि  आपण  : अभिनवगुप्त यांच्या म्हणण्यानुसार येथे ते म्हणजे ब्राह्मण आणि आपण म्हणजे अनिता पाटील यांच्या जातीचे लोक. माझ्या ब्लॉगरवर आजघडीला सव्वाशे लेख आहेत. त्यापैकी एकाही पोस्टवर मी माझी जात दिलेली नाही. अशा परिस्थितीत आपले आणि परके असा प्रश्न येतोच कुठे?

तिरस्कार : होय मी तिरस्कार पसरविण्याचे काम करते! धर्मग्रंथ, साहित्यग्रंथ आणि चालीरिती यांचा आधार घेऊन ब्राह्मणांनी समाजात भेदभाव आणि द्वेषभाव निर्माण केला आहे. या भेदभावाचा आणि द्वेषभावाचा मी तिरस्कार करते. या वाईट भावनांचा ब्राह्मणांसह सर्वांनीच तिरस्कार करावा, असा माझा आग्रह आहे. त्यासाठी प्रचार आणि प्रचाराचे काम मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून करते. ब्राह्मणांनी निर्माण केलेला भेदभाव आणि द्वेषभाव यांच्याविषयी अभिवनगुप्त यांना प्रेम वाटत असेल, तर त्यांनी ते खुशाल व्यक्त करावे. मी तसे करू शकत नाही. 

ब्राह्मणांचे गोमांस भक्षण : येथे अभिनवगुप्त ‘द होली काऊ' या ग्रंथाचा हवाला देतात. ‘द होली काऊ'मध्ये आलेल्या विषयावर अन्य कोणी लिहूच नये, असा कायदा भारत सरकारने बनविला आहे काय? अभिनवगुप्त यांचा हा मुद्दाच बालिश आहे. लोकसत्तेचेच भावंड असलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस'मध्ये ज्या बातम्या येतात, त्या लोकसत्तेत तुम्ही छापताच ना. मग आम्ही असे म्हणायचे का की, इंडीयन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या बातम्या लोकसत्तेत पुन्हा छापण्याचे काय कारण?
गोमांस भक्षणाच्या मुद्यावर अभिनवगुप्त यांचे अगाध अज्ञान प्रकट होते. लोकसत्तेचे माजी संपादक कुमार केतकर यांनी जालन्यात ब्राह्मण महासंघाच्या अधिवेशनात व्यासपीठावर ‘ब्राह्मण गोमांस खात होते' असे विधान केले होते. हे बहुधा अभिनवगुप्त यांना माहिती नसावे. 
महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक लोकहितवादी यांनी ब्राह्मण कसे गोमांस भक्षण करीत होते, हे सांगण्यासाठी एक अख्खा ग्रंथ लिहिलेला आहे. ‘द होली काऊ'चा संदर्भ देणा-या अभिनवगुत्त यांना लोकहितवादी यांचा हा ग्रंथही माहिती नाही, असे दिसते. अन्यथा लोकहितवादी यांनी शे-दिडशे वर्षांपूर्वीच हा विषय मांडला होता, असे लिहायला ते विसरले नसते. लोकसत्तेच्या संपादकांनी आपल्या कर्मचा-यांना मराठी ग्रंथ वाचायचा आदेश (सल्ला नव्हे) द्यावा, अशी नम्र सूचना यानिमित्ताने मला करावीशी वाटते.
(लोकसत्तेने जे काही खोटे नाटे छापले तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये, म्हणून या लेखाचा प्रपंच केला आहे. हे कृपया वाचकांनी ध्यानी घ्यावे.) 

असो. तूर्त एवढेच.

थोडेसे जास्त महत्त्वाचे : माझ्या ब्लॉगची बदनामी करणा-या लोकसत्तेतील लेखाचा खुलासा लोकसत्तेला पाठवा, असा सल्ला माझ्या असंख्य वाचकांनी मला गेल्या पाच-सहा दिवसांत दिला. तथापि, लोकसत्ताच नव्हे, तर बहुतांश मराठी दैनिके खुलासे नीट छापित नाहीत, हे अलीकडे दिसून येत आहे. टीकात्मक लेखन भडकपणे छापायचे आणि त्याला उत्तर देणारे लेख कुठे तरी कोप-यात, नजरेत येणार नाही, असे छापायचे, हा खाक्या माध्यमे वापरतात. (असे करून वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता गमावीत आहेत. पण विश्वासार्हतेचे पडलेय कोणाला?) अशा परिस्थितीत खुलासा पाठवून काहीही साध्य होणार नाही. विश्वासार्हता गमावलेल्या वृत्तपत्रांत टीकात्मक लेख छापून आला म्हणून आपली विश्वासार्हता अजिबात कमी होत नाही! 

अनिता पाटील

No comments:

Post a Comment