Saturday 24 March 2012

सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर


सावरकर शाळेत असतानाची ही गोष्ट आहे म्हणे. शाळेचे शिक्षक विद्याथ्र्यांना संत एकनाथांची गोष्ट सांगतात. एक मुसलमान एकनाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकतो. तरीही शांतीब्रह्म संत एकनाथांचा तोल अजिबात ढळत नाही. ते गोदावरीत १०८ वेळा अंघोळ करतात. ही गोष्ट सांगितल्यानंतर शिक्षक मुलांना आपण काय शिकलो हे विचारतात. मुले सांगतात- कितीही संकटे आली तरी आपण शांती कायम ठेवावी. एक मुलगा उठून उभा राहतो. तो बाणेदारपणे म्हणतो - एकनाथ हे संत होते. त्यांनी शांती कायम ठेवली. ते योग्यच झाले. पण त्यावेळचा आपला समाज तर संत नव्हता. समाजाने जागे व्हायला हवे होते. त्या मुसलमानाचा जागेवरच शिरच्छेद करायला हवा होता!

या मुलाचे हे बाणेदार उत्तर ऐकून शिक्षक अचंबित होतात. त्याला विचारतात- बाळ तुझे नाव काय?
मुलगा म्हणतो - विनायक दामोदर सावरकर!

एकनाथांच्या चरित्रातील इतर घटनाही पहा 

आता नाथांच्या आणखी दोन गोष्टी पहा :
१. तळपत्या उन्हात गोदेच्या वाळवंटात हरवलेल्या एका  दलिताच्या मुलास नाथांनी कडेवर उचलून घेतले. तसेच त्याला महारवाड्यात नेऊन पोहचवले.
२. एकांथांनी  नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. पितरांना जेवण घालण्यासाठी नाथांच्या घरी छान स्वयंपाक करण्यात आला. ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यात आली. एकनाथांच्या घरी जेवण आहे हे पैठणमधील दलितांना कळले. नाथांचा दयाळू स्वभाव त्यांना माहीत होता. त्यामुळे काही लोक जेवण मिळेल या आशेने नाथांच्या वाड्यावर आले. नाथांनी त्यांना वाड्यात घेतले आणि आधी त्यांना भरपेट जेऊ घातले.

या घटना नंतर पैठणमध्ये काय घडले.  या घटना मुळे पैठणमधील ब्राह्मण चवताळून उठले. dalitanna घरी बोलावले म्हणून ब्राह्मणांनी एकनाथांच्या घरचे  पितराचे जेवण नाकारले. इतकेच नव्हे, तर धर्मसभा बोलावून नाथांना धर्मभ्रष्ट ठरविले. जाती बाहेर टाकले. नाथ शांत राहिले. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ते आयुष्यभर ब्राह्मण जातीच्या बाहेरच राहिले. बहुजन समाजाच्या हितासाठी ते झटत राहिले.

जो न्याय मुसलमानाला, तोच ब्राह्मणांना 
लावा, अन उडवा मुंडकी !

सावरकरांच्या विनायकाला जो प्रश्न पडला तोच मला येथे पडला. पैठणमधील जातीयवादी ब्राह्मणांनी नाथांना जातीबाहेर टाकले तेव्हा एकनाथ शांतच राहिले कारण ते संत होते. पण त्या काळचा समाज तर संत नव्हता. समाजाने जातीयवादी ब्राह्मणांना शासन का केले नाही? एक दोन ब्राह्मणांचा शिरच्छेद केला असता, तर पुन्हा अशी जातीयवादी भूमिका घेण्याचे धाडस ब्राह्मणांना झाले नसते. पुढच्या काळातील वारकरी संतांचा जो छळ झाला तो झाला नसता.


संतांचा गैरवापर करू नका 

नाथांचा ब्राह्मणांनी केलेला छळ विनायकाचा मास्तर शाळेत सांगत नाही. त्याऐवजी तो मुसमान थुंकल्याची कहाणी सांगतो. यावरून हा शिक्षक ब्राह्मण असावा, हे स्पष्टच आहे. जातीयवादाने बरबटलेले ब्राह्मणवादी प्राणी हे किती धोकेबाज आणि धूर्त असतात याचे  हे एक  उदाहरण झाले. नाथांचे संपूर्ण आयुष्य पैठणच्या ब्राह्मणांशी लढण्यात गेले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग जातीयवादी ब्राह्मणांविरोधात लढण्याने भरलेला आहे. या लढ्याच्या गोष्टी सांगितल्या तर मुसलमानांऐवजी ब्राह्मण जातच खलनायक ठरते. त्यामुळे सावरकरवादी या गोष्टींचे नावही काढीत नाहीत. या ऐवजी ते मुसलमान नाथांच्या अंगावर थुंकल्याची गोष्ट उच्चरवाने सांगतात. आहे कि नाही गम्मत. संत चरित्राचा असा गैरवापर ब्रामान्वादीच  करू शकतात. 

अनिता पाटील, औरंगाबाद.


2 comments:

  1. स्वतःच्या माणसांच्या तोंडात शेण घातलं नाही ह्या लोकांनी चालली दुसर्‍याची तोंड रंगवायला.

    ReplyDelete
  2. स्वतःच्या माणसांच्या तोंडात शेण घातलं नाही ह्या लोकांनी चालली दुसर्‍याची तोंड रंगवायला.

    ReplyDelete