Saturday 31 March 2012

रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश



वैदिक धर्म विषमतेवर आधारित आहे हे आता जगातील इतर देशांनाही कळू लागले आहे. रशियातील एका न्यायालाने तेथील वैदिक धर्म पुरस्कृत मंदिर पडण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या देशातील बहुजन समाजाने या निर्णयातून काही तरी बोध घ्यायला हवा.  


महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी खाली देत आहे. 
.......................................................

रशियामधील मंदिर तोडण्याचा आदेश
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को



श्रीमद्भगवद्गीता या हिंदूच्या पवित्र धर्मग्रंथाला दहशतवादी साहित्य ठरवण्याचा रशियातील काही कडव्या कॅथलिक ख्रिश्चन पंथीयांचा डाव फसल्यानंतर आता एक नवे संकट हिंदू मंदिरासमोर उभे राहिले आहे. रशियातील सर्वात मोठे वैदिक, सांस्कृतिक केंद्राला हटवण्याचे आणि त्यामध्ये असलेले मंदिर तोडण्याचे आदेश रशियातील एका कोर्टाने दिले आहे. 

नुकतेच राष्ट्रपतीपदावर निवडून आलेल्या ब्लादिमीर पुतिन यांचे घर असलेल्या सेंट पीटर्सबर्ग या शहरात हे वैदिक सांस्कृतिक केंद्र आहे. ज्यामध्ये एक हिंदू धर्मियांचे मंदिर आहे. हे केंद्र १९९२पासून ४९ वर्षाच्या करारानुसार हिंदू धर्मियांना वैदिक परंपरा जतन करण्यासाठी देण्यात आले आहे. त्या कराराला अचनाक रद्द करण्यात आले असून कोर्टाने हिंदूंना हा परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

रशियातील काही कडव्या कॅथलिक पंथीयांच्या हिंदू विरोधी मोहिमेचा हा एक भाग असल्याची शंका येते, असे वैदिक केंद्राचे अध्यक्ष सुरेन कारापेटियन यांनी सांगितले. आर्बिट्रेशन कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता येथील मंदिर तोडण्यात येईल, असेही ते म्हणाले. हे मंदिर आणि वैदिक अभ्यास केंद्र वाचवण्यासाठी त्यांनी भारत आणि रशियाचे राष्ट्रपती यांना विनंती केली आहे. भारत सरकार या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन भारतीय सांस्कृतिक परंपरांचे रक्षण आणि संवर्धानासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

आम्हला येथे न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही भारत सरकारला विनंती करतो आहोत. आम्हाला अनधिकृतरित्या हटवण्याचे काम सुरू आहे. ४९ वर्षांचा हा करार १९९२मध्ये संघीय शोध संस्थानसोबत करण्यात आला होता. आता जॉइंट स्टॉक कंपनी गॉसनिखिमनालितमध्ये बदलण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सेंट पीटर्सबर्गच्या संघीय आर्बिट्रेशन कोर्टाने स्थानीय हिंदू धार्मिक संगटना वैदिक सोसाइटी ऑफ स्पिरिचुअल डिवेलपमेंट आणि गॉसनिखिमनालित यांच्यातील लीज करार रद्द करण्याच्या आदेशाला कायम ठेवले आहे. कोर्टाने त्यात असलेले मंदिर वाचवण्यालाही विरोध दर्शवला आहे. आठ मलजले असलेल्या या इमारतीत मंदिराशिवाय वैदिक परंपरांचा अभ्यास करण्याची जागा, पुस्तकं आहेत. तसेच तिथे संस्कृत आणि योग यांचेही शिक्षण देण्यात येते.


या बातमीची लिंक :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12477894.cms

No comments:

Post a Comment