Sunday, 2 June 2013

ठाकरेच पोर....महाहरामखोर......

शिवश्री प्रदीप इंगोले

महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायास्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वताच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली....असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनानं माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाच विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असत.गिरगाव चौपाटी वर झालेल्या कार्यक्रमात हि राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत.राज ठाकरे ने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिल च्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे ती इंदू मिल ची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि कोहिनूर वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनेनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणार्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉमबेतील दंगली आणि देशातील बोंब स्फोट हे परप्रांतीय मुळेच झाले असा जावई शोध लावला उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच पर प्रांतीयांचा हात आहे एवढी लागण यांना पर प्रांतीय द्वेषाची झाली आहे.

काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामा द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा.असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुताल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबाचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वतान्त्र्याखाली त्याचे समर्थन करतो मग म.फ.हुसेन ह्या ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते?कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे?आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा. 

असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाहीह्यांच्यात सृजनशीलता नाही ह्यांना आमचीच खास शैली लागते अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबयीच्याच रस्त्यावरून नागडा करून मारला असता पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको.तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिम्रायाना दुखावण्याच महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो.........

जय जिजाऊ.  जय शिवराय...........


Friday, 10 May 2013

ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्वीकारला

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


९० च्या दशकात आपल्या बोल्ड अंगप्रदर्शन करून हंगामा करणारी ममता कुलकर्णी हिने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. टाईम्स ऑफ इंडियातर्फे मुंबईत प्रसिद्ध होणा-या  +मुंबई मिरर+ या टॅबलॉईडने यासंबंधीची बातमी दिली आहे.

+मुंबई मिररने+ दिलेल्या बातमीचा सारांश पुढील प्रमाणे आहे :

ममता कुलकर्णी ९० दशकात बॉलिवूडमधून अचानक गायब झाली. ती कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी याच्या प्रेमात पडली होती. १९९७ साली विकी गोस्वामीला आखातात अटक झाली. तो दुबईच्या तुरुंगात होता. तुरुंगात असताना विकी गोस्वामीने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याच्यासाठी ममता कुलकर्णी हिनेही इस्लाम धर्म स्वीकारला. १५ नोव्हेंबर २०१२ रोजी विकी गोस्वामी तुरुंगातून सुटला. सुटका झाली तेव्हा तो ५२ वर्षांचा होता. सुटका होताच तो भारतात आला. थोडे दिवस राहून तो केनियाला रवाना झाला. ममता कुलकर्णी त्याच्यासोबत होती. हे दोघे सध्या नैरोबीत राहतात. ते धार्मिक मुसलमान बनले आहेत. विकी आणि इस्लामसाठी ममता कुलकर्णी हिने स्टेज शो सोडले. मुंबईत तिच्या बहिणी राहतात. त्यांच्याशी तिचा संपर्क आहे. बाकी कोणाच्याही ती संपर्कात नाही. 


मुंबई मिररने दिलेले मूळ वृत्त पुढील प्रमाणे आहे  (मूळ बातमी येथे पाहा):


Mamta Kulkarni weds jailed lover, sets him free


Mamta Kulkarni weds jailed lover, sets him free
Mamta Kulkarni
Mamta Kulkarni, who walked the fine line between sleazy and sexy in the 90s, had disappeared from the city more than a decade ago. It is said that the actress, who shot to notoriety with a topless cover shot for a film magazine, embraced a life of anonymity after her fortunes dipped and she found love with international drug kingpin Vicky Goswami. In 1997 Vicky was arrested for trafficking 11.5 tonnes of mandrax valued at $ 6 million and incarcerated in Dubai. 

TOI has learnt that Vicky, now 52 years old, was released from the Dubai prison on November 15, 2012, after his life sentence was reduced on account of his model conduct. While in prison he had converted to Islam, and married Mamta, who had been managing his real estate business that includes a prominent hotel in Dubai, in his absence. Sources close to the couple say, Vicky is now in Nairobi, with his faithful wife by his side.

Vicky's hush-hush release from prison has been reported in several news channels in South Africa, from where he managed his network. "A life sentence in Dubai is in effect 25 years, but prisoners can apply for early release on various grounds. Apart from good conduct, these include learning to recite passages from the Qu'ran or converting to Islam. To strengthen his clemency appeal, Goswami converted to Islam and was married according to Islamic rites while incarcerated," says the article that appeared in the Mail & Guardian, which has been following the sensational case.

Though the opposition lawyers strongly opposed his clemency saying that he was an international criminal, the court pardoned him on grounds that he was a reformed criminal and a devout Muslim. The court also ordered that he be deported to his native country in India. Sources claim Vicky arrived in India during December 2012 and left for Kenya soon after. Since he did not have any specific criminal cases pending against him in India, it was easier for him to fly to Kenya.

Rashid Saeed, one of the most well-known event organisers in Dubai, said: "It was extremely difficult to get in touch with Mamta. She was very reticent and turned down all offers to perform at our shows. Late last year, we were told by common friends that she was married and she would never perform on stage again."

Even though Mamta had disappeared, she kept in touch with her sisters, one of whom stays in Mumbai and has been appointed caretaker of her house in Mumbai. TOI had reported how despite being away from the city, she had ensured that the maintenance and taxes reached the society on time.
............................................


Saturday, 27 April 2013

लोकसत्तेचे यंटम संपादक

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


लोकसत्तेचे संपादक यंटम झाले आहेत का? उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख वाचल्यानंतर आमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता. या अग्रलेखावरून ओरड झाल्यानंतर लोकसत्तेच्या वेबसाईटवर तो ब्लॉक करण्यात आला. हे ब्लॉकिन्ग प्रकरण पाहून आमच्या मनातील प्रश्न खात्रीत परावर्तीत झाला. लोकसत्तेचे संपादक खरोखरच यंटम झाले असावेत, असे दिसते. हा अग्रलेख ब्लॉक करून आपली चुकच लोकसत्तेने कबूल केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा चुका लोकसत्ताकार करीत आहेत. टीका करण्याचा अधिकार वृत्तपत्रांना आहे. मात्र, टीकेतून वैयक्तिक आकस दिसता कामा नये. तसेच आपले वैयक्तिक हितसंबंधही डोकावता कामा नये, अशी अपेक्षा असते. माने यांच्या प्रकरणात लोकसत्तेने नेमके याच्या विरुद्ध वर्तन केले आहे. माने यांच्यावरील आरोपांचे भांडवल करून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करणारा तसेच जातीयवादी ब्राह्मणवाद्यांची तळी उचलणारा अग्रलेख लोकसत्तेच्या संपादकांनी खरडला.

१ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या अग्रलेखाचा +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा!+ हा मथळा लोकसत्ताकारांचा ब्राह्मणी अजेंडा स्पष्ट करतो. म्हणूनच तो आक्षेपार्ह आहे. या अग्रलेखातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य बहुजन समाजावर विष ओकते आणि जातीय ब्राह्मणवाद्यांची तळी उचलते. लोकसत्ता हे दैनिक जातीयवादी ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे, हे अलिकडील लोकसत्तेमधील लिखाणातून वारंवार सिद्ध होत आहे. उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाप्रकरणी लोकसत्तेने घेतलेल्या भूमिकेतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसत्तेच्या ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया फार पूर्वीच सुरू झाली होती. गिरीष कुबेर यांनी व्यवस्थापकीय संपादक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ती पूर्णत्वास गेली, असे म्हणावे लागते.


माने हे काही आमचे मामा नव्हेत. त्यांनी पाप केले असेल, तर त्यांना कायदा शिक्षा करील. पण मानेंच्या आडून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करण्याचे पाप लोकसत्तेने करू नये.  
लोकसत्तेच्या वेबसाईटवर +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख ब्लॉक केल्यामुळे उघडत नाही. उघडण्याचा प्रयत्न केल्यास असा संदेश संगणकावर उमटतो. या अग्रलेखाच्या वरचा आणि खालचा असे दोन्ही अग्रलेख मात्र उघडतात.
..................................................................................
बहुजन समाजातील नेत्यांची आणि महापुरुषांची बदनामी करायची. बहुजनांच्या श्रद्धास्थानांची विटंबणा करायची, असे उद्योग हे वृत्तपत्र गेली काही वर्षे करीत आहे. अनिता पाटील विचार मंचाविषयी विषारी प्रचार करणारा एक लेख +वाचावे नेटके+ या सदरातून लोकसत्तेने गेल्यावर्षी लिहिला होता. त्यानंतर महात्मा फुले यांची बदनामी करणारा एक लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला. अनिता पाटील विचार मंचाचे मुख्य संपादक प्रा. रविन्द्र तहकीक यांनी त्याचा परखड समाचार ब्लॉगवर घेतला होता. सगळीकडून बोंबाबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते.

Wednesday, 17 April 2013

पांडुरंग आठवले यांनी चोर-लुटारू कोणाला म्हटले?

म्हणे, एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही!

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

समताधिष्ठित वारकरी सांप्रदायाला संपवून ब्राह्मण वर्चस्ववादी धर्माची स्थापना करण्यासाठी स्वाध्याय परिवाराचा जन्म झाला आहे, याचे सुतोवाच आम्ही मागच्या लेखात केले होते. त्याबाबत आज जरा विस्ताराने पाहू या.  पांडुरंग बुवा आठवले यांच्या प्रवचनांतील उतारेच्या उतारे वैष्णवधर्मीय वारक-यांच्या श्रद्धांची टिंगल-टवाळी करतात. वारक-यांवर थेट हल्ला करण्याचे मात्र आठवले टाळतात. थेट हल्ला केल्याने वारक-यांकडून आक्रमक प्रतिहल्ला होईल, हे न ओळखण्याएवढे आठवले अडाणी नव्हते. त्यामुळे वारक-यांविरुद्ध छुपी विष पेरणी करण्याचे तंत्र आठवल्यांनी वापरले. वारक-यांचा उल्लेख टाळून त्यांच्या श्रद्धांना ते टार्गेट करतात. 

१५ दिवसांनी येणा-या एकादशीला दिवसभर उपवास करणे आणि रात्री संतांच्या भजनाचा जागर करणे, हा वारकरी धर्म आणि अन्य वैष्णव पंथीयांच्या धर्मश्रद्धेचा पाया आहे. पायावर घाव घातला की इमारत आपोआप कोसळेल, असा अंदाज बांधून पांडुरंग बुवा आठवले यांनी एकादशीच्या उपवासाला आणि संतांच्या भजनाला थोतांड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकादशीच्या दिवशी सर्वांनी मिळून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही' असे आठवले म्हणतात. येथे वारकरी हा शब्द वापरण्याचे आठवले टाळतात. हे कपटनाट्य आहे. याला नथीतून तीर मारणे म्हणतात. पण आठवले यांच्या विवेचनात एकादशी आणि भजनाचा (ज्याला आठवले आक्रोश म्हणतात) उल्लेख असल्यामुळे हा हल्ला वैष्णव आणि वारक-यांवरच आहे, हे स्पष्टच आहे. या पुढे जाऊन आठवलेबुवा एकादशीला संतांची भजने म्हणणा-यांना (म्हणजेच वारक-यांना) आळशी, निष्क्रिय अशी विशेषणे लावतात. इतकेच नव्हे तर या भोळ्या भक्तांची चोर-लुटारू अशी संभावना करण्याचा नतद्रष्टपणाही करतात. वारक-यांची अशी  अवहेलना आठवले अनेक ठिकाणी करतात. 

'दशावतार' या पुस्तकातील पान क्र. ११ वरील हा उतारा पाहा : 

‘...दर एकादशीच्या दिवशी आळशी आणि निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात : ‘प्रभो! ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक.' पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही, हा शास्त्रीय सिद्धांत आहे.... गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधूनाम' असेल, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी भगवान येतो. चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही...'१

वारक-यांची अशी मानहाणी करण्यासाठी पांडुरंगबुवा आठवले वेदांची साक्ष काढतात. ‘दशावतार' या पुस्तकात पान क्र. १४ वर आठवले काय म्हणतात ते पाहा : 

‘...कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...'२

एकादशीचा नेम करणा-या वैष्णवांचे संतभजन पांडुरंगबुवांच्या दृष्टीने आक्रोश असून वैष्णवांचा देव दगड आहे. या बडबडीला आठवले वैदिक सिद्धांत म्हणतात. बहुजन समाजाची थट्टा करणारे हे विवेचन वैदिक सिद्धांत असूच शकत नाही. हा असुरी सिद्धांत आहे. मानवतेची हेटाळणी करणा-या पांडुरंगबुवांच्या या सिद्धांताला ‘दादासुराचा सिद्धांत' म्हणणेच अधिक योग्य ठरेल.

संदर्भ 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ११ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.

२. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. १४ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.


या विषयावरील इतर लेख

म्हणे, ब्राह्मणांसाठीच ईश्वर अवतार घेतो

पांडुरंगबुवा आठवले यांचा आणखी एक बोगस सिद्धांत

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगबुवा आठवले हे आपल्या नावापुढे शास्त्री ही पदवी लावतात. शास्त्र शिकवतो तो शास्त्री! पांडुरंगबुवा आठवले कोणते शास्त्र शिकवितात? पांडुरंगबुवा हे ब्राह्मणी वर्चस्वाचे शास्त्र शिकवितात. पण,  जातीभेद करणे हे शास्त्र कसे काय असू शकते? पांडुरंगबुवांची शिकवण हे शास्त्र नसून बहुजन समाजाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी वापरले गेलेले शस्त्र आहे.

एकादशीला उपवास करून संतांची भजने म्हणणा-या वारकरी व अन्य वैष्णवांसाठी ईश्वर अवतार घेत नाही, असा दावा पांडुरंग बुवा आठवले यांनी केल्यानंतर लोकांच्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की, मग ईश्वर पृथ्वीवर अवतार कोणासाठी घेतो. यावर आठवलेबुवा अत्यंत खुबी उत्तर देतात : ईश्वर हा केवळ ब्राह्मणांसाठीच अवतार घेतो!

'दशावतार' या पुस्तकात आलेले या विषयावरील विवेचन भयंकर विषारी आहे. भारतीय समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले पाहिजे. इतर सर्व जातींनी ब्राह्मणांच्या आज्ञेत राहिले पाहिजे अशाच आशयाची शिकवण पांडुरंगबुवांनी या विवेचनात दिली आहे. या पुस्तकात छापलेले परशुरामाच्या अवतारावरील पांडुरंगबुवांचे प्रवचन इतके जातीयवादी आहे की, त्याची तुलना कोणाशीच करता येऊ शकत नाही. या प्रवचनात ‘विदुषक ब्राह्मण' या विषयी काही विवेचन आले आहे. ते पाहिले की याची प्रचीती येते.

आठवले म्हणतात : ‘..तुम्ही जुनी नाटके वाचा. त्यात एक ब्राह्मण असतो. त्याला विदुषक म्हणून दाखविले जाते. आजही अधिकांश ब्राह्मण विदुषकाप्रमाणेच बनत चालले आहेत. कित्येक वेळा ब्राह्मणांची अशी अवस्था झाली आहे. आणि वारंवार भगवंताला अवतार घ्यावा लागला आहे...ज्यांच्यावर वैदिक संस्कृती, भारतीय गौरव, भारतीय सभ्यता व मानव सभ्यता ह्यांची फार मोठी जबाबदारी आहे अशा ब्राह्मणांना ज्यावेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते. त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही...'१

आठवलेबुवांचे प्रवचन खरे मानले तर ज्या काळी वर उल्लेखिलेली नाटके आली, तेव्हाच देवाने अवतार घ्यायला हवा होता. पण अजून तरी तो अवतरलेला नाही. ब्राह्मणांना विदुषक बनवूनही देव आलेला नाही, याचाच अर्थ आठवल्यांचा कथित वैदिक सिद्धांत खोटा ठरला आहे. 

बहुजन समाजाचा विदुषक झाल्यावर देव काय करतो?
भारतीय समाज-संस्कृतीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवी सभ्यतेची जबाबदारी केवळ आणि केवळ ब्राह्मणांवर आहे, असा भ्रम येथे आठवलेबुवा निर्माण करतात. पण, संस्कृतीचा हा मक्ता ब्राह्मणांना कोणी दिला? ब्राह्मणांचा विदुषक झाल्यावर देव अवतार घेत असेल तर बहुजन समाजाची अवस्था विदुषकासारखी झाल्यावर देव काय करतो. सर्कशीतील विदुषकाची लोक जशी गंमत पाहतात, तशी देव बहुजनांची गंमत पाहतो का? बहुजन समाज देवाच्या पोटाखाली आलेला आहे, असे आठवल्यांना वाटत होते की काय कोण जाणे? ब्राह्मणांना देवाने निर्माण केले आणि बहुजनांना  सैतानाने निर्माण केले, असे काही आहे का? 

आठवलेबुवांच्या या विवेचनात एक मोठी मेख आहे. ‘ब्राह्मणांना ज्या वेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते', असे जेव्हा आठवलेबुवा म्हणता, तेव्हा त्यांना बहुजनांना धाक घालायचा असतो. खबरदार, ब्राह्मणांच्या विरोधात काही बोलाल तर देव तुमचा बंदोबस्त करील, अशी ताकीद आठवले देऊ इच्छितात. धर्माची भीती घालून ब्राह्मणांनी हजारो वर्षे पोटे भरली. तोच उद्योग येथे आठवलेही करून जातात.

ब्राह्मणांना देवाने जन्मत:च जानवे घालून का पाठवले नाही?
आम्ही सांगतो, ब्राह्मणांचीच काय कोणाचीच अवस्था विदुषकासारखी होता कामा नये. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. तरच हा समाज टिकेल. ब्राह्मण हे देवाचे आवडते आहेत आणि बहुजन नावडते आहेत, असे जर आठवले आणि त्यांच्या स्वाध्याय परिवाराला वाटत असेल, ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत असे म्हणावे लागते. फक्त ब्राह्मणच देवाचे लाडके असते, तर देवाने ब्राह्मणांना मातेच्या पोटात असतानाच जानवे घातले असते आणि ब्राह्मणाचे मूल हे जानवे गुंडाळूनच जन्माला आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. बहुजनांची मुले जशी नाळ गुंडाळून जन्माला येतात तशीच ब्राह्मणांची मुलेही नाळ गुंडाळूनच जन्माला येतात. हाच खरा सिद्धांत आहे. या सिद्धांताला तुम्ही वैदिक म्हणा नाही तर अवैदिक, पण तोच सत्य आहे.

संदर्भ
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ८४,८५ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई. 


वरील विवेचनाचा पुरावा म्हणून पांडुरंग आठवले यांच्या दशावतार या पुस्तकातील एका पानाची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासू वाचकांनी ती अवश्य पाहावी. 


Saturday, 13 April 2013

या लोकसत्ताच्या तर मायला ….

 - प्रा. रवींद्र तहकिक


राहुल गांधीला ह भ प ही उपाधी लाऊन लोकसत्तातील संघोट्यानि महाराष्ट्रातील वारकरी
संप्रदायाचा अवमान केला आहे , मुळात राहुल गांधी हरीभक्त नाहीत, त्यात पारायण असण्याचाही
काही संबंध नाही, बरे त्यांनी काही बाष्कळ किंवा अर्थहीन बडबड केली असेल तर त्यावरून ते कोणत्या अर्थाने ह भ प ठरतात हे तरी लोकसत्तात बसलेल्या बेअक्कल अग्रलेखकांनी आम्हाला 
सांगावे, आम्हाला जी माहिती आहे त्या प्रमाणे महाराष्ट्रातील कोणीही ह भ प उपाधी असणारे
कीर्तनकार कोणतीही बाष्कळ व अर्थहिन बडबड करीत नाहीत, करतात ते बहुजनांच्या भाषेत
बहुजनांचे प्रबोधनच,     बाष्कळ अर्थहिन आणि फालतू बकबक करत असतील तर ते ब्राम्हणी पद्धतीने पोथ्या  पुराणांचे प्रवचन करणारे पोटभरू पुराणिक आणि स्वतःला पंडित म्हणवणारे शास्री, सात्यानारायानाच्या पोथ्या सांगताना नाकात चिंच खुपसल्या सारखा किन्नरा आवाज काढत
आणि ढुंगण हलवत पादत राव तूप साखर तेल डाळी चा किराणा भरणारे भट भिक्षुक आणि
सर्व सामान्य बहुजानाचे प्रबोधन करणाऱ्या ह भ प मध्ये काही फरक आहे याची लोकसत्तातल्या
संघोट्याना माहिती नाही असे नाही, हे सत्य त्यांना चांगले माहिती आहे. परंतु एखादी रंडी आपल्या
उठवळ वागण्याचे समर्थन करण्या साठी पतिव्रता तरी आमच्या पेक्षा वेगळे काय करतात ?
आम्ही फक्त पुरुष बदलतो असे म्हणू लागल्या तर त्यावर शहाण्याने काय बोलावे ?

         लोकसत्तातील संघोट्याचा कांगावा अगदी याच प्रकारातला आहे. पोटभरू किराणा भरू
गाव जोशी भट भिक्षुक आणि ह भ प यांच्यात काही फरक नाही हे दर्शवण्या साठी त्या महामूर्ख
संपादकाने राहुल गांधीना ह भ प असे मुद्दाम म्हटले आहे , आश्या अभक्त अभद्र बोलणार्या
ब्राम्हणाला नक्कीच एखाद्या रांडेने प्रसवले असले पाहिजे.     

हा अग्रलेख वाचून आम्हाला शाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली. दादा कोंडके यांनी हा अग्रलेख वाचला असता तर ते नक्कीच म्हणाले असते : या लोकसत्ताच्या तर मायला ….

Thursday, 11 April 2013

लोकसत्तेचा पुन्हा खोडसाळपणा : वारकरी उपाधीचा मुद्दाम केला अवमान!

ब्राह्मणवादी लोकसत्तेचा त्रिवार निषेध 

दैनिक "लोकसत्ता"कडून बहुजन समाजाच्या श्रद्धा स्थानांवर सातत्याने हल्ले होत अहेत. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा एक लेख लोकसत्तेत छाचापून आला होता. या लेखावर सर्वप्रथम याच ब्लॉगवरून आवाज उठविण्यात आला होता. सगळी कडून बोबबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते. आता लोकसत्तेने वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजीच्या अग्रलेखात लोकसत्तेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना "ह.भ.प." ही उपाधी लावली आहे. अग्रलेखाचा मथळाच "ह.भ.प. राहुलबाबा" असा आहे. राहुल गांधी यांचे भाषण हे निरर्थक प्रवचन आहे, अशी टीका करण्यासाठी लोकसत्तेने या उपाधीचा आधार घेतला आहे. 

वारकरी परंपरेवर ब्राह्मणांचा राग

"ह.भ.प." ही वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांना लावली जाणारी पवित्र उपाधी आहे. तसेच वारकरी कीर्तन-प्रवचनांत निरर्थक बडबड नसते. समतेची शिकवण कीर्तन-प्रवचनकार देत असतात. ब्राह्मणी व्यवस्थेला धक्के देण्याचे काम वारकरी परंपरेने केले आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा वारकरी परंपरेवर विशेष राग आहे. लोकसत्ता हे वृत्तपत्र अलीकडे ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे. त्यातून बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर असे हिणकस हल्ले हे वृत्तपत्र करीत आहे. 

दिवाळखोर संपादक 

राहुल गांधी यांना ह.भ.प. संबोधण्यामागे लोकसत्तेची हीच ब्राह्मणी हिणकस वृत्ती दिसून येते. लोकसत्तेचे संपादक राहुल गांधींना "शास्त्रीबुवा" अशी पदवी का देअत नहित. "शास्त्रीबुवा" ही पदवी ब्राह्मण लवतात. मग तिचा अवमान लोकसत्तेचे ब्राह्मण कसे करतील? वारकरी शिकवण ज्यांना निरर्थक बडबड वाटते त्या संपादकाच्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे, असे म्हणावे लगते. 

वारकरी उपाधीचा अवमान केल्याबद्दल आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तेचा मूळ अग्रलेख असा :

ह.भ.प. राहुलबाबा

मुंबई
Published: Friday, April 5, 2013

माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे आहे..
एखाद्या विषयात आपण कच्चे आहोत याचे प्रांजळ भान आले म्हणजे त्या विषयात प्रगती होते असे नाही. राहुल गांधी यांच्या उद्योग महासंघाच्या मेळाव्यात गुरुवारी केलेल्या भाषणाकडे या नजरेने पाहावयास हवे. राहुल गांधी पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या उद्योजकांच्या मेळाव्यास सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. केवळ चांगले 

भाषण इतक्याच अर्थाने पाहिल्यास त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे म्हणावयास हवे. परंतु ज्याच्या हाती सत्तेची दोरी आहे त्याचे मूल्यमापन केवळ चांगल्या भाषणावर करून चालत नाही. त्या भाषणातील विचारास साजेशी त्याची कृती आहे का, हेही पाहावे लागते. तो विचार केल्यास राहुल गांधी यांचे मूल्यमापन भाषणाच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सत्ता हे विष आहे असे चमकदार विधान करू न सर्वानाच धक्का दिला होता. पुढे जाऊन त्या विषाचे सेवन आपण वा आपला पक्ष करणार की नाही, याबाबत त्यांनी अर्थातच मौन पाळले. खेरीज, या विषापासून वाचण्यासाठी काय करायला हवे याचेही मार्गदर्शन त्यांनी स्वपक्षीयांना केले नाही. ज्या घराण्याने स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सत्ता दोनतृतीयांशपेक्षा अधिक वर्षे भोगली आहे त्या घराण्याच्या वारशाने सत्तेस विष ठरवल्यास त्यातून बातमीसाठी चांगला मथळा मिळतो. अधिक काही होत नाही. राहुल गांधी यांच्या कालच्या उद्योगपतींसमोरच्या भाषणाबाबतही अशीच प्रतिक्रिया निर्माण झाल्यास नवल म्हणता येणार नाही. 

देशातील राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे आणि ती सामान्यांची दखल घेत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते खरेच आहे. पण या वास्तवाच्या कबुलीमुळे एक प्रश्न निर्माण होतो. तो असा की जे कुटुंब राजकीय सत्ताधिकाराच्या केंद्रस्थानी आहे त्या घराण्याने ही तुंबलेली राजकीय व्यवस्था साफ करण्यासाठी काय केले? सध्या हे घराणे थेट सत्तास्थानी नसेल. पण सत्तेच्या दोऱ्या आणि चाव्या याच घराण्याच्या हाती आहेत. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून वा ज्या राज्यात आपली सरकारे आहेत तेथील मुख्यमंत्र्यांना सांगून हा सत्तेचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल यासाठी राहुल गांधी यांनी कोणते उपाय योजले. ही व्यवस्था सुधारण्याची मागणी राहुल गांधी यांनी पहिल्यांदा केली, त्यालाही बराच काळ लोटला. भावी पक्षनेतृत्वाच्या मताची दखल घेऊन याबाबत काँग्रेसने काही केले असेही झालेले नाही. आणि दुसरे असे की राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे, हे सत्य जनसामान्यांना माहीत नव्हते असेही नाही. तेव्हा यात बदल करण्याचा कोणताही मार्ग न दाखवता वा उपाय न सुचवता पुन्हा तोच मुद्दा मांडण्यात काय हशील? कोणताही राजकीय निरीक्षक असो वा कार्यकर्ता वा सामान्य नागरिक. त्याचेही हेच मत आहे. तेव्हा ते मांडण्यासाठी राहुल गांधी असण्याची गरजच काय?
सत्ता व्यक्तिकेंद्रित राहून काही होणार नाही, देशभरातील नागरिकांना सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे हे टाळ्याखाऊ वाक्य राहुल गांधी यांनी गुरुवारीही उच्चारले. परंतु म्हणजे काय करायचे? प्रत्येक प्रश्नावर, प्रशासकीय निर्णयावर तो निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने जनमत घ्यावयाचे काय? हाच जर समजा मार्ग असेल तर तो भारताचा आकार लक्षात घेता एकदम केंद्रीय पातळीवर राबवणे शक्य नाही, हे समजण्यासारखे आहे. परंतु मग राहुल गांधी यांनी ज्या राज्यांत आपली सत्ता आहे त्या राज्यात अशा प्रकारची सुरुवात करून उदाहरण का नाही घालून दिले? त्यासाठी त्यांना कोणी मनाई केली होती काय? याबाबतही ढळढळीत विरोधाभास असा की जी मते राहुल गांधी मांडतात त्याच्या बरोबर उलट सरकारचे वागणे आहे. तेव्हा जनतेने काय समजावयाचे? सामान्यांस सक्षम केले पाहिजे असे राहुल गांधी सांगतात. परंतु सरकार मात्र वेगवेगळय़ा अनुदान योजना आखून जनतेस खिरापत वाटण्यात धन्यता मानते, हे कसे? काल जे उपदेशामृत राहुल गांधी यांनी उद्योग जगताला पाजले ते आपल्याच पक्षाच्या सरकारला पाजणे अधिक सोपे असे त्यांना वाटत नाही काय? याच उद्योग जगतासमोर बुधवारी बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धोरणलकव्याने त्रस्त झालेल्या उद्योजकांना सल्ला दिला, माझ्यावर विश्वास ठेवा. गुरुवारी राहुल गांधी यांनी बरोबर त्याच्या उलट विधान केले. मनमोहन सिंग यांच्या एकटय़ाकडे अधिकार देऊनही ते काही करू शकणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी काल ठणकावून सांगितले. त्यामुळे तर अर्थविश्वाची अधिकच गोची झाली असणार. माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधानांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे. असे सांगताना नरेंद्र मोदी यांचा पुळका असलेल्या उद्योग क्षेत्रालाही त्यांनी सुनावले. घोडय़ावरून येणारा कोणी एखादा आपल्या सर्व समस्या सोडवेल असा तुमचा ग्रह असेल तर तसे होणारे नाही, असे या ज्यु. गांधी यांना वाटते. मत म्हणून त्याचा आदर करण्यास कोणाचाच प्रत्यवाय असणार नाही. परंतु मुद्दा असा की काय केल्याने काय होणार नाही याचे पुरेसे भान आता अनेकांना आलेले आहे. प्रश्न आहे तो काय केल्याने काय होईल आणि ते कसे करता येईल हे उपाय सांगण्याचा. तो उपाय मात्र काही त्यांनी या वेळी सांगितला नाही. विकास सर्वसमावेशक, सर्वाना बरोबर घेऊन जाणारा हवा असाही सल्ला राहुल गांधी यांनी उपस्थितांना दिला. हे कसे करायचे याचेही दोनचार पर्याय त्यांनी सुचवले असते तर अधिक चांगले झाले असते. कारण आकाशातील दूरसंचार लहरी असो वा पाताळातील कोळसा. कोणत्याच क्षेत्राबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने विकासाचा गाडा आपल्याकडे बराच काळ अडलेला आहे. अशा वेळी सर्वसमावेशक विकास कसा करायचा याच्या मार्गदर्शनाचीही नितांत गरज होती. वेगवेगळय़ा समस्यांवरील उपायांसाठी सर्वाशी चर्चा करायला हवी, असेही मत त्यांनी मांडले. योग्यच आहे ते. परंतु सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षाने या संदर्भात विरोधकांना किती वेळा आणि कोणत्या प्रश्नावर चर्चेचे निमंत्रण दिले हेही कळावयास हवे. आर्थिक क्षेत्राबाबत भारत हा हत्ती नाही तर मधमाश्यांचे पोळे आहे, असा दृष्टान्त राहुल गांधी यांनी दिला. ते मान्य केले तर हे मधाचे पोळे कशाला चिकटलेले आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी काय आहे हे समजून घेण्याचीही आवश्यकता आहे. आणि पुन्हा या पोळय़ाची राणीमाशी कोण, हा प्रश्नदेखील उरतोच. तो अर्थातच राहुल गांधी यांनी आपल्यावर सोडला आहे. 
वास्तविक उद्योग जगत असो वा देश. आज गरज आहे ती समस्या काय आहेत येथपर्यंतच मर्यादित न राहता त्यावर मार्ग काय हे सांगणाऱ्यांची. राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या याबाबत. परंतु आतापर्यंत सातत्याने राहुल गांधी त्याबाबत कमी पडताना दिसतात. देशाला पुढे न्यायची त्यांची खरोखरच इच्छा असेल तर त्यांनी स्वत: अथवा पक्षाकडून ठोस काही कृती करून दाखवावी. अन्यथा हे ह.भ.प. राहुलबाबा यांचे आणखी एक प्रवचन ठरेल.


लोकसत्तेच्या बहुजन विरोधी कारवाया येथे वाचा :

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान
वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे...