Saturday, 21 April 2012

अखेर मराठी भाषा संस्कृताच्या गुलामगिरीतून मुक्त होणार



मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासकांची समिती नेमली आहे. प्रा.हरी नरके हे तिचे समन्वयक आहेत. या समितीने कठोर अभ्यास करून मराठीला संस्कृत भाषेच्या जोखडातून मुक्त केले आहे. मराठी ही संस्कृती भाषेपासून जन्मलेली भाषा असल्याचे संस्कृताभिमानी ब्राह्मणांनी आजवर प्रचलित ठेवले होते. मराठीचे सर्व व्याकरण संस्कृतवरच बेतलेले आहे. त्यामुळे ते मराठी भाषिक विद्याथ्र्यांनाच काय विद्वानांनाही कळत नाही. संस्कृतच्या जोखडामुळे शालेय अभ्यासक्रमांत इंग्रजी, पाठोपाठ मराठी भाषा अप्रिय विषय ठरली आहे. वस्तुत: वारकरी संतांनी मराठीला कधीही संस्कृतची कन्या मानले नाही. ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा आणि त्यांच्या सर्व भावंडांचा आतोनात छळ केला. संत एकनाथांनी तर संस्कृताभिमान्या स्पष्टच सांगितले होते की, संस्कृतवाणी देवे केली ।। मराठी काय चोरापासून आली ।।

सर्वच वारकरी संत आणि महानुभाव पंथाचे विद्वानांनी मराठीत ग्रंथ रचना केल्या. स्वातंत्र्यानंतर मात्र, सरकारच्या अडाणीपणामुळे हितसंबंधी ब्राह्मणांनी फायदा घेतला आणि मराठीला संस्कृतपासून जन्मलेली भाषा म्हणून गुलाम बनिवण्यात आले. ही गुलामी संपणार, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. 

अमृतातेही पैजा जिंकणायारया  मायमराठीला प्रतिष्ठेचा ‘अभिजात भारतीय भाषेचा'  दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मराठी संस्कृतोद्?भव भाषा नसून, किमान दोन हजार वर्षांपासून ती मराठी मुलखाची लोकभाषा आहे, असा अभिजात मराठी भाषा समितीच्या सदस्यांचा तर्क साहित्य अकादमीच्या उच्चाधिकारयांनी तत्त्वतः मान्य केला. याबाबतचा अंतिम प्रस्ताव दिल्लीला पाठविण्याची सूचना अकादमीने शुक्रवार दि. २० एप्रिल २०१२ रोजी केली आहे. 

दिल्लीच्या पातळीवरील हालचाली पाहता मायमराठीला भारतातील केवळ पाचवी ‘अभिजातङ्क भाषा, हा गौरव मिळणे नजरेच्या टप्प्यात आले आहे. तो प्राप्त होण्यासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी ही माहिती अधिकृतरित्या जारी केली आहे. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास तमीळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत यापाठोपाठ अभिजात भाषेचा दर्जा मिळविणारी मराठी ही पाचवी भाषा ठरेल. अभिजात भाषांच्या विकासासाठी केंद्रातर्फे दर वर्षी ५०० कोटींचा निधी दिला जातो.  प्रा. हरी नरके म्हणाले, की मल्याळी भाषेचा प्रस्ताव सरकारने नुकताच फेटाळला. तो पूर्वानुभव लक्षात घेऊन मराठीचा प्रस्ताव काटेकोरपणे तयार होत आहे. प्रा. नरके आणि राज्याचे सांस्कृतिक सचिव विजय नहाटा यांनी साहित्य अकादमीचे सचिव अग्रहार कृष्णमूर्ती २० एप्रिल रोजी चर्चा केली. केंद्र सरकारला अंतिम शिफारस करण्याचे सर्वाधिकार फक्त साहित्य अकादमीला आहेत, ही बाब येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

अनिता पाटील

Wednesday, 18 April 2012

सेना-मनसेचे मराठी प्रेम


डोळ्यात केर - कानात फुंकर !  ( भाग १ )

आज महाराष्ट्रात  सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला प्रभावी विरोध करु
शकेल असा विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार
सलग तीनवेळा सत्तेत आले. याचा अर्थ ते खूप लोकप्रिय आहे किंवा जनहिताची
कामे करत आहे असे समजण्याचे आजीबात कारण नाही. उलट सलग तीनवेळा
सत्ता हाती आल्याने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या मध्ये
सत्तेची गुर्मी, उध्दटपणा आणि बेमुरवतपणा स्पष्ट दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या
गोमेलाही असंख्य पाय फुटले आहेत. पण तरीही महाराष्ट्रातील जनता
(विशेषतः  ग्रामीण भागातील ) पुन्हा पुन्हा आघाडी वरच विश्वास टाकताना
दिसते. याचा अर्थ ती मूर्ख बेअक्कल बावळट आणि मुकी बहिरी आंधळी
आहे असे आजीबात नाही. परंतु मग आपले आणि महाराष्ट्राचे भवितव्य
कुणाच्या हातात सोपवायचे ? शिवसेना...भा,ज.पा. किंवा म न से च्या ?
म्हणजे एखाद्या जनावरा समोर दावणीला मरायचे की खाटकाच्या खोडावर ?
असा पर्याय ठेवला  तर तो जो निर्णय घेयील तोच निर्णय या बाबतीत
महाराष्ट्रातील जनता घेत आहे. दगडा पेक्षा वीट मऊ या न्यायाने  शहाण्याचे चाकर
होणे परवडले परंतु मूर्खाचे धनी होणे महागात पडेल हें सत्य महाराष्ट्रातील
जनता चांगल्या प्रकारे जाणते

संधी दिली होती

महाराष्ट्रातील जनतेला जेव्हा काँग्रेस सरकार गृहीत धरून
राज्य करु लागली तेंव्हा (१९९५ ) महाराष्ट्रातील जनतेने
सेना-भाजप च्या हाती सत्ता सोपवली होती. बाळासाहेब ठाकरे यांची
प्रभावी भाषणे,वाजपेयी यांची प्रतिमा (?) आणि जनतेच्या मनातील
बदलाची इच्छा या मुळे सेना भाजपा युती ची सत्ता आली. परंतु
लवकरच जनतेचा भ्रमनिरास झाला. सेना भाजप चे मंत्री -मुख्यमंत्री 
जनतेचे प्रश्न सोडवण्या पेक्षा  बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन
या दोन रिमोट कंट्रोल च्या तालावर नाचण्या पलीकडे काहीही करु
शकले नाही. मुळात या मंडळीना मुंबई बाहेर देखील महाराष्ट्र आहे .
त्या जनतेच्या आधारावरच सत्ता मिळते आणि टिकते याची जाण
आणि जाणीवच नव्हती. शिवाय आजवर जे मुंबई महापालिकेत
प्रत्येक कामाच्या टेंडरचे विशिष्ट कमिशन मातोश्रीवर पोहचवण्याची
जी सिष्टीम होती ती जशीच्या तशी मंत्रालयात आली. परिणामी
भ्रष्टाचाराला अतिशय बाजारू स्वरूप आले.
जो एनरोन  प्रकल्प शिवसेनेच्या "ढाण्या वाघाने अरबी समुद्रात बुडवला 
तोच प्रकल्प पुन्हा मातोश्रीच्या मागच्या दाराने आत आला आणि
ढाण्या वाघाने त्याची मलई मांजरी सारखी चाटली हें ही मराठी जनतेने
उघड्या डोळ्याने पहिले. खोपकर सारखा सच्चा कार्यकर्ता गैंगष्टर सारखा
भररस्त्यात मारला जातो..वरतून पुन्हा गद्दारांचा खोपकर करु अशी
भाषा केली जाते. रमेश किणी सारखा सामान्य चाकरमानी एका फ्ल्याट
च्या व्यवहारा साठी जीवानिशी मारला जातो हें सुद्धा महाराष्ट्रातील
जनतेने पहिले. जी शिवसेना ८० % समाज कारण आणि २० % राजकारणाची
भाषा करीत होती त्याच शिवसेनेच्या हातात सत्ता सोपवल्या नंतर
सुरेश जैन- धूत सारखे व्यापारी गोळा झाले हें ही जनतेने पहिले.
काँग्रेस निदान लोण्याचा गोळा काढून घेवून ताक तरी जनतेच्या हाती
देतात, हें बोके मात्र लोणी मटकाऊन ताकाने आंघोळ करतात.
म्हणून  जनता या प्रकाराला वैतागली आणि जनतेने सेना-भाजप
युतीला झिडकारले.  आता विरोधी पक्ष म्हणूनही सत्ताधारी सरकारवर
अंकुश ठेवण्यात युतीचे पक्ष आणि नेते अयशस्वी ठरत आहेत,
आणि या अवनितीला केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पोकळ
मराठी प्रेमाचे नाटकी राजकारण जबाबदार आहे.

-रवींद्र तहकीक

मन(मानेल त)से !


मराठीच्या घोशातून ,
बिल्डर्सच्या  खिश्यातून
सोन्याचे अंडे हवे
रोज एक उश्यातून
दुधवाले-टैक्सीवाले
भागाव साले भैया
सुभाष घई मात्र सहज
होतो यांचा सैया
पंत तिकडे कोहिनूर इकडे
भानगड नेमकी आहे काय
न भेटता न बोलता
समेट होतात कसे काय ?
ठाकरी भाषा ठाकरी भाषा
किती कराल बोभाटा
एक दिवस नक्कीच पडेल
खोट्याच्या कपाळी गोटा


-रवींद्र तहकिक



गड(बड)करी

वात्रटिका





हा चोर तो चोर , 
मी नाही त्यातला...
कोळश्याचा घोटाळा,
कुठे कोणी वाचला ?

सगळे म्हणतात मिष्टर क्लीन
अन तुम्ही म्हंता गड(बड)करी
राम काढला तोंडातला
बगलेत तरी राहू द्या सुरी


-रवींद्र तहकिक

Monday, 16 April 2012

गडकरींचा ‘कोळसे'वाला

झारखंडमध्ये १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि नितीन गडकरी.
एका कार्यक्रमात संचेती यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात
आला होता, तेव्हाचे हे छायाचित्र आहे. नवभारत टाईम्सने ते नुकतेच प्रसिद्ध केले आहे.


आरएसएसच्या शाखेत नितीन गडकरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने आपले मोहरे म्हणून ज्यांना ज्यांना राजकारणात पुढे केले आहे, त्या सगळ्यांचा संबंध एनकेन प्रकारे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराशी कसा काय येतो? आरएसएसचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपात कोणीही सत्तेच्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. आरएसएसची मर्जी ज्याच्यावर खप्पा होते, त्याचा लालकृष्ण अडवाणी होतो. भाजपाशासित राज्यांतील बहुतांश मुख्यमंत्री आरएसएसचा आशीर्वाद घेऊनच पदावर चढले आहेत. आरएसएसचे सत्तेतील मोहरे म्हणून हे लोक वावरतात. आरएसएसचे सत्तेतील हे मोहरे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सतत का घेरलेले असतात, हा या देशातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गांनी पैसा उभा करू शकणाèयांना किन्वा किमान भ्रष्टाचाèयांना अभय देऊ शकणाèयांना आपला मोहरा म्हणून राजकारणात पाठवायचे, असे काहीसे आरएसएसचे धोरण दिसते. 

नागपूरकरांच्या प्रश्नाला उत्तर द्या

आरएसएसचा आणखी एक मोठा मोहरा म्हणजे भाजपाध्यक्ष नितीन गडकरी.  परीट घडीचे पांढरे स्वच्छ कपडे घालून गडकरी मिस्टर क्लिन म्हणून राजकारणात मिरवत असतात. तथापि, त्यांच्या कपड्यांनाही झारखंडमधील कोळशाचा काळा रंग लागला आहे. गडकरी यांचे मित्र अजय संचेती यांनी झारखंडमध्ये १ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा घडवून आणला आहे. कॅगच्या अहवालातच ही माहिती समोर आली आहे. आरएसएसचा आणखी एक मोहरा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रमण qसग यांच्यावरही कॅगच्या रिपोर्टची गाज कोसळली आहे. रमनसिंग सरकारनेच झारखंडमधला कोळसा घोटाळ्याचे नेतृत्व केले, असा स्पष्ट ठपका कॅगने ठेवला आहे. सोमरवार दि. ९ एप्रिल २०१२ रोजी कॅगचा हा अहवाल सभागृहात ठेवण्यात आला. गडकरीच्या मित्राने १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला. या कोळशाने गडकरींचेही हात काळे झाले आहेत का? महाराष्ट्रातील विशेषत: नागपूरच्या लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे. गडकरी नागपूरचे आहेत. आरएसएसचे मुख्यालयही नागपुरातच आहे. दोघांपैकी कोणी तरी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करायला हवा.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह नितीन गडकरी

येडुरप्पा आणि मोदी

कर्नाटकात बी. एस. येडुरप्पा हे संघाचा मोहरा म्हणून वावरतात. त्यांच्या एवढे भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण भरतखंडात कोणावरही झालेले नाहीत. कर्नाटकातील लोखंडाच्या खाणीतून रेड्डी बंधूंनी अब्जावधी रुपये बेकायदेशीररित्या काढले. रेड्डी बंधूंना येडुरप्पा मुख्यमंत्री असतानाच मुक्तहस्त मिळाला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरएसएसचा सर्वांत मोठा मोहरा आहेत. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने त्यांना भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून टाकले आहे. मोदी सरकारवर कॅगने गंभीर स्वरूपाचे ताशेरे आपल्या ताज्या अहवालात ओढले आहेत. गुजरातमधील ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांच्या कत्तीचे पाप मोदी सरकारच्या माथ्यावर आहे ते वेगळेच. ‘राजधर्माचे पालन कराङ्क असा इशारा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना दिला होता. याचा विसर पांचजन्यला पडला आहे. 

मीडिया संघाला धार्जिण

या प्रकरणी सर्वाधिक आश्चर्यकारक भूमिका देशातील मीडियाने घेतल्याचे दिसून आले. १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि त्यांचे घनिष्ठ मित्र नागपूरकर गडकरी यांच्याबाबत मीडिया चकार शब्द काढायला तयार नाही. भारतीय वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल चालविणारा वर्ग आरएसएससाठी काम करतो, हे सिद्ध करायला दुसरा पुरावा कोणता हवा. 
अजय संचेती यांनी १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला, त्यासंबंधी दैनिक भास्करच्या वेबसाईटवरील बातमीची ही लिन्क - 
http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-coal-scam-cag-reports-involvement-of-gadkaris-close-aide-3091587.html


गडकरींना आरएसएसने का निवडले याचे विश्लेषण आऊटलूक साप्ताहिकाने केले आहे. त्याची लिन्क -
http://www.outlookindia.com/article.aspx?277753

अनिता पाटील

Monday, 9 April 2012

सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?


सदाशिवराव भाऊ


पानिपतावरील सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ मेलेच नाही, असे मानणाराही एक गट आहे. हरियाणात भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. स्वत:ला सदाशिवराव भाऊ म्हणविणारा एक व्यक्ती पुण्यातही त्याकाळी आला होता. विशेष म्हणजे भाऊंच्या पत्नीनेही हेच भाऊ आहेत, असे म्हटले होते. तथापि, नानासाहेब पेशव्यांनी ते मान्य केले नाही. या व्यक्तीला घाशिराम कोतवालाच्या हस्ते देहदंड ठोठावण्यात आला. भाऊंचे काय झाले, हा प्रश्न इतिहासकारांना अजूनही छळतोच आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. त्यानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या वेळी मी हरियाणात गेले होते. तेथे मी भाऊंचे काय झाले, याबाबत लोकांत काय आख्यायिका आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक वेगळीच आख्यायिका तेव्हा माझ्या हाती आली. या विषयी लिहिण्याचा किती तरी दिवसांचा मानस होता. परंतु, या ना त्या कारणाने शक्य होत नव्हते. शेवटी विशेष वेळ काढून हा लेख आज लिहिला. तो ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे. 

आधी भाऊ आणि पानिपत युद्धाची थोडीशी पाश्र्वभूमी पाहू या. सदाशिवराव भाऊ यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. पहिला बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा हे भाऊंचे वडील. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. रखमाबाईचा बाळंतपणातील आजाराने मृत्यू झाला. तसेच भाऊ सुमारे १० वर्षांचे असताना चिमाजी अप्पांचाही मृत्यू झाला. आजी राधाबाई यांनी भाऊंचा पुढे सांभाळ केला. भाऊ प्रारंभी नागपूरच्या भोसल्यांच्या सेवेत होते. नंतर ते नानासाहेब पेशव्यांचे दिवाण बनले. पानिपतावर मराठा सैन्याचे नेतृत्व करण्यास भाऊ असमर्थ होते, असे अनेक इतिहासकार मानतात. तथापि, मला हे पटत नाही. भाऊंनी मराठा साम्राज्याची उत्तम सेवा केली. १७४६ मध्ये भाऊंनी कर्नाटकात मुलुखगिरी केली. त्यांनी उदगीर घेऊन निजामाची कंबर तोडली. अलाऊद्दीन खिलजीने दौलताबादचा देवगिरी किल्ला घेतल्यानंतर मराठ्यांना तो कधीच परत घेता आला नव्हता. सदाशिव भाऊने देवगिरी जिंकून  इतिहास घडविला. तेच भाऊ पानपतावर यश मिळवू शकले नाही. त्याला अनेक कारणे होती. 

तिस-या पानिपत युद्धाची पाश्र्वभूमी

अहमदशाह अब्दाली
अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. मराठ्यांनी मोगलांशी अहमदिया करार केलेला होता. या करारानुसार दिल्लीला संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. या काळात मराठा साम्राज्य यशाच्या शिखरावर होते. दिल्ली परीसरातील काही भाग वगळता बहुतांश भारतावर मराठ्यांचा ताबा होता. मराठ्यांच्या नजरा आता वायव्येकडे वळल्या होत्या. मराठ्यांना वेळीच रोखले पाहिजे हे ओळखून अफगाणिस्तानचा शाह अहमदशाह दुर्राणी (यालाच अब्दाली म्हणतात) दिल्लीवर चालून आला. त्याने पंजाब घेतले. दत्ताजी qशदे तेव्हा उत्तरेत होते. यमुनेच्या बुरारी घाटावर झालेल्या लढाईत दत्ताजी शिन्दे मारले गेले. या दोन्ही बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. अब्दालीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सदाशिव भाऊंवर सोपविण्यात आली. त्यासाठी भाऊंना उदगीरच्या लढाईतून परत बोलावून घेण्यात आले. मोठा लवाजमा घेऊन भाऊंनी दिल्लीला कूच केली. 

उत्तरेतील हिंदू  म्हणविणारे राजे अब्दालीला मिळाले

अब्दाली मुत्सद्देगिरीच्या बाबतीत मराठ्यांच्या पुढे होता. त्याने उत्तरेतील सर्व नवाब आणि राजांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. काही जण अलिप्त राहिले, तर काही जण थेट अब्दालीच्या बाजूने लढले. जोधपूरचा राणा बिजय qसग आणि अंबरचा कछवाह राजा माधोqसग हे अलिप्त राहिले. रोहिल्यांचा प्रमुख नजीबुद्दौला आधीचाच अब्दालीसोबत होता. अवधचा नवाब शुजाऊद्दौला इस्लामच्या नावावर त्यांना जाऊन मिळाला. भरतपूरचा जाट राजा सुरजमल जाट, राजपूत आणि शीखांची मदत मिळावी म्हणून सदाशिव भाऊंनी प्रयत्न केले. तथापि, त्यात त्यांना यश आले नाही. उत्तरेतील राजपूत, जाट, शीख यापैकी कोणालाच मराठ्यांचा वाढता प्रभाव नको होता. अकबराच्या काळापासून दिल्लीच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजपूत दुय्यम स्थानावर फेकले गेले होते. त्यांची जागा मराठ्यांनी घेतली होती. मराठे राजपुतान्यात उतरून राजपुतांकडूनही खंडण्या वसूल करीत असत. त्यामुळे राजपुतांनी अब्दालीला मदत केली. हीच स्थिती जाट आणि शीखांचीही होती. मराठे आपल्यावर हल्ला करून आपली राज्ये ताब्यात घेतील, अशी भीती त्यांना वाटे. मल्हारराव होळकरांची मदतही भाऊंना वेळेत मिळू शकली नाही. 

भाऊंच्या चुका

उत्तरेतून मदत मिळाली नाही, तरी मराठे पानिपताची लढाई सहज qजकले असते. परंत तसे झाले नाही. भाऊंच्या काही चुका त्याला कारणीभूत होत्या. या लढाईत भाऊंनी मराठ्यांचे प्रसिद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र बाजूला ठेवले. तसेच भाऊंनी बिगरसैनिक लवाजमा सोबत घेतला होता. कुटुंब कबिलाही होताच. मराठा सैन्याबद्दल त्याकाळी महाराष्ट्रात इतका विश्वास होता की, मराठे हरतील असा विचारसुद्धा कोणी करीत नसे. त्यामुळे लोक बिनधास्तपणे सैन्यासोबत जात. उत्तरेत जाऊन तीर्थ यात्रा करीत. मुलुख पाहत qहडत. भाऊंच्या सैन्यासोबतही असे लोक होते. त्यांची संख्या प्रचंड होती. न. र. फाटक यांनी या लव्याजम्याला बाजारबुणगे म्हटले आहे. मराठा सैन्याची अध्र्यापेक्षा जास्त रसद या बाजारबुणग्यांनीच फस्त केली. भाऊंच्या सैन्याला पानपतावर उपासमारीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र खूप दूर होता. उपासमारीने मरणे qकवा लढणे हे दोनच पर्याय भाऊंसमोर होते. त्यांनी लढण्याचा पर्याय निवडला. त्या आधी बाजारबुणग्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत पाठविण्यासाठी मराठा सैन्याची बरीच शक्ती खर्च झाली. 

असे लढले मराठे 

भाऊंच्यासोबत जनकोजी शिन्दे आणि इब्राहीम खान गारदी होते. १४ जानेवारी १७६१ रोजी लढाईला तोंड फुटले. दुपारपर्यंत मराठे वरचढ होते. अब्दालीची ४५ हजारांची फौज पाठीला पाय लावून पळाली. दुपार ढळल्यानंतर सूर्य मराठ्यांच्या तोंडावर आला. तसेच अब्दालीने स्वत:च्या संरक्षणासाठी राखीव ठेवलेले सैन्य अचानक मैदान उतरविले. अब्दालीने हा शेवटचा डाव खेळला होता. तो फसला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. परंतु, त्याचे नशीब चांगले होते. यश मिळत आहे, असे पाहून मराठे जल्लोषाच्या तयारीत असतानाच अब्दालीच्या ५०० वेगवान घोडेस्वारांनी विद्यूत वेगाने हल्ला चढविला. मराठ्यांची दाणादाण उडाली. 



जानव्या चा फास देऊन भाऊंना मारले 

पानिपतावरील भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ युद्धात मेलेच नाही, असे मानणारे लोक हरियाणात आहेत. हरियाणातच भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. हरियाणाच्या दौèयात मी अशा आख्यायिकांच्या शोधात होते. योगायोग पाहा एक वेगळीच आख्यायिका माझ्या हाती आली. ही आख्यायिका अशी : अचानक उडलेल्या या हलकल्लोळात भाऊ गडबडले. त्यांनी स्वत:ला युद्धाच्या गर्दीत झोकून दिले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अब्दालीच्या एका घोडेस्वार तुकडीने भाऊंना अलगद उचलले. भाऊंना घेऊन ही तुकडी युद्धाच्या गर्दीपासून बाजूला झाली. मराठ्यांचा सेनापती पकडला म्हणून आपणास इनाम मिळेल, असे या तुकडीला वाटले. अशी बक्षिसी देण्याची त्याकाळी रीत होती. युद्ध संपल्यानंतर सायंकाळी भाऊंना अब्दालीच्या राहुटीत नेण्यात आले. अब्दालीसमोर भाऊंचे वर्तन सेनापतीला साजेसेच होते. दत्ताजी qशदे यांनी ज्या बाणेदारपणाने ‘बचेंगे तो और भी लडेंगेङ्क असे उद्गार काढले, तोच बाणा भाऊंनीही दाखविला. मला मुजरा केल्यास तुला जीवदान देतो, असे अब्दालीने भाऊंना सांगितले. त्यावर भाऊ उद्गारले : ‘तू मला मुजरा केल्यास, आमच्या छत्रपतींच्या दरबारात मी तुझा सन्मान घडवून आणतो.ङ्क भाऊंच्या उदगाराने अब्दाली संतापला. त्याचे शीर कलम करण्याचा आदेश त्याने सैनिकांना दिला. यावेळी भाऊंनी झटापट केली. त्यात त्यांच्या गळ्यातील जानवे खाली पडले. ते घेण्यासाठी भाऊ धडपडू लागले. तेव्हा अब्दालीने विचारले : ‘ हा धागा कशाचा आहे.ङ्क त्यावर भाऊ म्हणाले : ‘ही माझ्या धर्माची निशाणी आहे.ङ्क अब्दाली हसला. त्याने जमिनीवर लोळणारे जानवे उचलले. याच धाग्याने याचा मृत्यू होऊ दे, असा आदेश त्याने सैनिकांना दिला. सैनिकांनी भाऊंचे जानवे भाऊंच्या गळ्याभोवती आवळले आणि त्यांचा जीव घेतला. 

भाऊंची धीन्ड

अब्दालीचे बहुतांश सैन्य खलास झाले होते. अगदी थोडेसे लोक उरले होते. युद्ध qजकूनही त्याला काहीच उपयोग नव्हता. कारण ज्या सैन्याच्या बळावर त्याने अफगाण साम्राज्य उभे केले होते. ते सर्व नामशेष झाले होते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. संतापला. त्याने मेलेल्या भाऊंचे शिर कलम करून धीन्ड काढण्याचे आदेश दिले. भाऊंचे शीर कापण्यात आले. ज्या जानव्याने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, त्यालाच त्यांचे शिर बांधून एका भाल्याला लटकावण्यात आले. सर्व शिबिरभर फिरवून नंतर ते मृतदेहांच्या ढिगाèयांत फेकून देण्यात आले. तिसèया दिवशी भाऊंचा बिनमुंडक्याचा मृतदेह देहांच्या ढिगाèयात सापडला. चौथ्या दिवशी मुंडके सापडले. 

अफगाणी साम्राज्याचा खातमा

पानितपत युद्धाने नुसती अब्दालीचीच नव्हे, तर अफगाणी साम्राज्याची कंबर मोडली. अब्दालीचे साम्राज्य हे अफगाणचे शेवटचे साम्राज्य ठरले. पानिपतचे युद्ध qजकल्यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून येण्याऐवजी परत निघून गेला. कारण त्याच्याजवळ पुढे लढायला सैन्यच उरले नव्हते. पानिपत युद्धाची मध्यपूर्वेतील आक्रमक टोळ्यांनी प्रचंड धसका घेतला. त्यानंतर वायव्येच्या बाजूने भारतावर एकही आक्रमण झाले नाही. सुमारे पावणे दोनशे वर्षांनतर इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारत ताब्यात घेतला. 

अनिता पाटील 


Sunday, 1 April 2012

हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा


दिवेआगर येथील सोन्याचा गणपती चोरीला गेल्यावर शिवसेनेने जे ब्राह्मणी चाळे केले, ते पाहिल्यावर असे ठामपणे म्हणता येते की, इकडची दुनिया तिकडे झाली तरी आपण सुधारायचे नाही, असा ठाम निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना स्वत:ला हिन्दुत्वादी संघटना म्हणते. हिन्दुत्ववाद नावाची कोणतीही गोष्ट या भूतलावर अस्तित्वात नाही. हिन्दुत्वाच्या नावावर जे काही चालू असते तो केवळ ब्राह्मणवाद असतो, असा माझा ठाम सिद्धांत आहे. अनेक लेखांतून मी तो मांडला आहे. मी हिन्दुत्ववादाला ब्राह्मणवाद म्हणते तेव्हा लोक मला जातीयवादी म्हणतात. तथापि, माझे म्हणणे सिद्ध करणारे वर्तन शिवसेना, तसेच संघप्रणित संघटना वारंवार करीत असतात. स्वत:च हिन्दुत्वाचा बुरखा फाडून आपला केसाळ काळा ब्राह्मणवादी चेहरा दाखवित असतात. दिवेआगर गणपती चोरी प्रकरणातही हेच घडले. शिवसेने आणि भाजपाने आपला हिन्दुत्वाचा बुरखा बाजूला सारून ब्राह्मणवादाचा केसाळ, काळा चेहरा जगाला दाखविला.  

सेना आमदारांच्या डोक्यावर ब्राह्मणी टोप्या

दिवेआगर गणपती मूर्तीची चोरी झाल्यानंतर शिवसेना-भाजपाने  विधानसभेत थयथयाट केला. युतीचे आमदार ब्राह्मणी टोप्या घालून सभागृहात गेले. या टोप्या घालून सेनेचे आमदार विधानभवन परिसरात मिरवत असल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रांनीही ब्राह्मणी टोप्या घातलेल्या आमदारांची छायाचित्रे छापली. गोल टोप्यांनी शिवसेनेचा काळा-केसाळ ब्राह्मणी चेहरा जगाला दाखविला. शिवसेनेच्या आमदारांच्या डोक्यावरील एकजात ब्राह्मणी टोप्यांनी शिवसेनेचे मुळचे  खलनायकी रूप आणखी लखलखून उठले होते. बहुजन समाजाला या ना त्या कारणाने लुटणारे पुजारी, पुरोहितादि ब्राह्मण या गोल टोप्या घालून वावरत असतात. ब्राह्मणवाद्यांचे गोलमाल झाकले जावे, यासाठी या टोप्यांचा आकार बहुधा गोल ठेवलेला असावा. 

आम्ही ब्राह्मणवाद्यांच्या हिताचे काम करतो!

याच गोलमाल टोप्या शिवसेना आमदारांना का घालाव्याशा वाटल्या? शिवसेनेचा नेहमीचा भगवा फेटा त्यांनी का घातला नाही? आम्ही ब्राह्मणांच्या हितासाठी काम करतो, असा संदेश शिवसेना नेत्यांना महाराष्ट्रात पाठवायचा होता, म्हणून भगवे फेटे न घालता ते शोषणाचे प्रतिक असलेल्या बदनाम ब्राह्मणी टोप्या घालून सभागृहात आले. या आमदारांनी सभागृहातच महाआरती केली. महाआरतीच्या नावाखाली शिवसेनेने सभागृहात तमाशाच उभा केला. त्यामुळे १४ सेना-भाजपा  आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. माझे तर मत असे आहे की, सेनेच्या सर्वच आमदारांना निलंबित केले असते, तरी सेनेच्या पापाचे क्षाळण झाले नसते. 

अरेरे, क्षुद्र राजकीय लाभासाठी देव्हा-यातले देव रस्त्यावर उतरवले

शिवसेनेचे ब्राह्मणाळलेले हे आमदार नुसत्याच ब्राहणी टोप्या घालून आले नव्हते. त्यांनी सोबत एक गणतीची मूर्तीही आणली होती. गणतीला देव मानता ना? मग त्याच्या मूर्तीची जागा देव्हाèयात असायला हवी. क्षुद्र राजकीय लाभासाठी शिवसेने आपले देव्हा-यातले देव रस्त्यावर उतरविले. याला काय म्हणावे? देव्हा-यातील देवाचा वापर आपल्या क्षुद्र राजकीय लाभासाठी करणे पाप आहे, हे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरपंजरी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांना कोणी तरी सूज्ञाने सांगायला हवे. अर्थात शिवसेनेत असा सूज्ञ तूर्त तरी कोणी दिसत नाही. त्यामुळे त्यांचे हे क्षुद्र ब्राह्मणी ब्राहणी चाळे चालूच राहतील, यात शंकाच नाही. 

अनिता पाटील, पुणे.

.................................................................................................................


शिवसेनेचा ब्राह्मणवादी चेहरा दाखविणारे हे पाहा आणखी काही फोटो