Sunday 26 October 2014

"कविता सागर" दिवाळी अंकात "अपाविमं"चे लेख

जयसिंगपूर येथून ‘कविता सागर' हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. अनिल दुधाट पाटील हे या दिवाळी अंकाचे संपादक असून, डॉ. सुनिल पाटील हे प्रकाशक आहेत. मोठा वाचक वर्ग असलेल्या या दिवाळी अंकात अपाविमंवरील दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. अपाविमंच्या संस्थापिका आदरणीय अनिता पाटील यांचा ‘कुणबी मराठा एकच : तुकाराम गाथ्यातील पुरावे' हा लेख या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अपाविमंचे कार्यकारी संपादक राजा मइंद यांची ‘ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले' ही संपूर्ण लेखमाला कविता सागर दिवाळी अंकांत घेण्यात आली आहे. कविता सागर हा दिवाळी अंक अत्यंत दर्जेदार असून, वाचकांकडून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. कविता सागरच्या टिमला अपाविमंच्या मनापासून शुभेच्छा. 

'कविता सागर' हा दिवाळी अंक
कविता सागर हे केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणारे व जगभरात वाचक असलेले एकमेव नियतकालिक आहे; कवितासागरच्या या वेगळेपणाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी कवितासागरच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्काराने सन्मानित केले असून कविता सागर राबवीत असलेल्या उपक्रमांची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. 

कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवामार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला आहे.  मराठीत दरवर्षी एक हजारच्या आसपास दिवाळी अंकांच्या रूपाने दर्जेदार साहित्य तयार होत असतं. महाराष्ट्रातील मराठी साहित्य प्रेमींना याचा आस्वाद घेणे शक्य असते. पण महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशात राहणा-या मराठी बांधवांना ऑनलाइनच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य फारच कमी प्रमाणात पोहचते. कवितासागरमधील साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कवितासागर दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.
  
कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर गेल्या अनेक वर्षापासून ‘कवितासागर’ दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता, त्याचंबरोबर या पूर्वीही सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

2 comments:

  1. अतिशय सुंदर!

    ReplyDelete
  2. विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली दिवाळी अंक स्पर्धा 2014.
    दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

    या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 25 प्रकारामध्ये 25 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणा-या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळी ठसा उमटवणा-या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणा-या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.


    विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 25 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.


    दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.

    स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा.

    ReplyDelete