Monday, 30 June 2014

मराठा आरक्षण आणि मराठी वृत्तपत्रांचे ब्राह्मणवादी संपादक

मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयास क्रिमिलेअर मर्यादा लागू राहणार आहे. मोजक्या वृत्तपत्रांचा अपवाद वगळता मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील माध्यमे बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात पूर्वीपासूनच काम करीत आली आहेत. त्यामुळे आरक्षणाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हतीच. मराठी वृत्तपत्रे नुसती मराठ्यांच्याच विरोधात काम करीत असतात असे नव्हे, संपूर्ण बहुजन समाजाच्याच विरोधात ती काम करीत असतात.

काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश मराठी वृत्तपत्रांचे संपादक ब्राह्मण आहेत. बहुजन समाजातील काही संपादक मंडळी आहेत, पण या मंडळींवर ब्राह्मणवादी विचारांचा एवढा पगडा आहे की, बहुजनवादी भूमिका घेणे त्यांना हीनपणाचे वाटते. काही ठिकाणी ब्राह्मण लॉबीच्या दबावामुळे बहुजन संपादक रोखठोक भूमिका घेऊ शकत नाहीत. कारणे काहीही असली तरी, मराठी वृत्तपत्रे बहुजनविरोधी विचारच नित्यनेमाने प्रसवत असतात. बहुजन समाजाने यावरून योग्य तो बोध घ्यायला हवा. बहुजनांनी स्वत:च्या विचारधारा जपणारी पूर्णत: व्यावसायिक वृत्तपत्रे काढण्याची वेळ आली आहे. 

अपाविमंच्या वाचकांना माध्यमांतील बहुजन विरोधाची कल्पना यावी, यासाठी मराठा आरक्षणाविषयी सर्व मोठ्या मराठी दैनिकांत प्रसिद्ध झालेले विखारी लिखाण एकत्रितरित्या येथे देत आहोत. 

भाग १ - अग्रलेख
महाराष्ट्र टाईम्सचा अग्रलेख : संधी की, मलमपट्टी?
लोकसत्ताचा अग्रलेख : मराठा, मुसलमान मेळवावा
तरुण भारतचा अग्रलेख : रक्षणासाठी आरक्षण!
सकाळचा अग्रलेख : आरक्षणाचे राजकारण
दै. दिव्य मराठीचा अग्रलेख : आरक्षणाची नामुष्की
लोकमतचा अग्रलेख : पवार झाले ‘मेटे’करी
पुढारीचा अग्रलेख : आरक्षण नव्हे प्रोत्साहन

भाग २ - लेख

भाग 3 - "अपाविमं"चे लेख

No comments:

Post a Comment