Tuesday, 22 July 2014

दोन बायकांचा दादला भारतरत्न!

संपत्तीच्या वादातून समोर आले भीमसेन जोशींच्या दोन बायकांचे रहस्य

-राजा मइंद, कार्यकारी संपादक अपाविमं.

भारतरत्न या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात आलेले शास्त्रीय गायक पं. भीमसेन जोशी यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीला मुले-बाळे झाल्यानंतर त्यांनी दुसरी बायको केली. दोघींनाही नांदवले. दोन बायकांचा दादला ही आपली ओळख जगासमोर येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी त्यांनी जीवंत असताना घेतली होती. एरवी सगळ्या जगाची धुणी धुणाèया मीडियाने ही बाब दाबूनच ठेवली होती. मात्र, भीमसेन जोशी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही सवतींच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला आणि त्यातून ही माहिती हळूच जगासमोर आली. दोन बायका अन् फजिती ऐका, ही म्हण भीमसेन जोशी यांच्या बाबती मृत्यूनंतर अशा पद्धतीने खरी झाली.

भीमसेन जोशी यांनी 1944 मध्ये सुनंदा कट्टी यांच्याशी लग्न केले. सुनंदा जोशी या भीमसेन जोशी यांच्या नातेवाईकांच्या कन्या होत्या. सुनंदाकडून जोशी यांना 4 मुले झाली. यात राघवेंद्र (67), ऊषा (66) सुमनगला (63) आणि आनंद (52) अशी त्यांची नावे आहेत. 1951 मध्ये जोशी यांचा वत्सला मधोळकर यांच्याशी विवाह झाला. वत्सला या भीमसेन जोशी यांच्या कन्नड नाटक 'भाग्यश्री'मध्ये त्यांची सहनायिका होत्या. वत्सला यांच्याकडून भीमसेन जोशी यांना तीन मुले झाली. जयंत (62, पेंटर), शुभदा (56, गायिका) आणि श्रीनिवास (47, आईआईटी-दिल्लीतून इंजिनीअर झाले, आणि सध्या गायक आहेत) अशी त्यांची नावे आहेत. भीमसेन जोशी यांनी आपल्या पहिली पत्नी सुनंदा यांना घटस्फोट दिला नव्हता. ते त्यांना आर्थिक मदत करत राहिले. सुनंदा पुण्याच्या सदाशीवपेठमध्ये वेगळे राहत होत्या.

भीमसेन यांची जवळपास 10 कोटींची संपत्ती आहे, ज्यामध्ये जवळपास 20 संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचा समावेश आहे. या संपत्तीचा हा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पंडीत भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांची 3 मुले यांनी मागील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. पुणे कोर्टाच्या निर्णयात पंडीत जोशी यांच्या पुण्यात असलेला बंगला 'कलाश्री' आणि इतर 2 फ्लॅटमध्ये या तिघांनाही कोण्या तिसर्‍या व्यक्तीला अधिकार देण्यास मनाई करण्यात आली होती.

पंडीत जोशी यांच्या पहिल्या पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय देण्यात आला. राघवेंद्र यांनी जानेवारी 2011 मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर 22 सप्टेंबर 2008 या तारखेला बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले होते.

जोशी यांनी दुसरे लग्न केले तेव्हा हिंदू लग्न कायदा 1956 अजून बनवण्यात आला नव्हता. तसेच जोशी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. याबदल्यात जोशी यांनी वत्सला आणि त्यांच्या मुलांना पुण्यातील बंगला, फ्लॅट आणि पुढील 50 वर्षांपर्यंत संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचे हक्क दिले होते. तर पहिली पत्नी सुनंदा आणि त्यांच्या चार मुलांच्या नावावर 20 लाख रुपयांची बँकेतील रक्कम केली होती. पंडीतजी आपल्या दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांच्या मुलांसोबत 'कलाश्री'मध्ये राहत होते. वत्सला स्वतःसुध्दा शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे निधन 2005 मध्ये झाले होते. त्यांच्या निधनानंतर जोशी यांनी आपला बंगला कलाश्रीचे मालकी हक्क मुलगी सुभदा आणि मुलगा जयंत याच्या पत्नीकडे सोपवले होते. त्याच बरोबर इतर दोन फ्लॅट आपला मुलगा श्रीनिवास आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केले होते.

अशी आहे भीमसेन जोशी यांची संपत्ती
मृत्यूपत्रानुसार, पं. भीमसेन जोशी यांची एकूण संपत्ती 10 कोटींच्या जवळपास आहे. ज्यामध्ये संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टी उत्पन्नाचाही समावेश आहे. जोशी यांच्या संपत्तीमध्ये 5 कोटी रुपयांचा बंगला आणि 4 फ्लॅटचा समावेश आहे.

3 comments:

  1. "कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांसारख्या प्रात:स्मरणीय महापुरुषांची बदनामी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहायची वेळ येईल" २५ सप्टेंबर,२०११. आपणच एकेकाळी यांना प्रात:स्मरणीय म्हणायचा. की वैचारिक लढाई झेपत नाही म्हणुन सरसकट जातियवादी टिका करु लागलात
    -विराट देशमुख

    ReplyDelete
  2. कसकाय अश्या लोकांना भारत रत्न मिळतो आश्चर्यच आहे

    ReplyDelete
  3. *भारत रत्न* पुरस्कार त्यांना त्यांच्या कले साठी मिळाले आहे .आयुष्यभर कले ची साधना केल्या वर त्यांनी जी हिमालयाची उंची गाठली आहे त्या साठी.

    त्यांच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करावयाचा कुणालाही अधिकार नाही

    ReplyDelete