Sunday, 16 June 2013

ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच

सार्वभौम राजा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला. महाराष्ट्रातील ब्राह्मण वगळता सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी राजांच्या राज्याभिषेकाचे स्वागत केले. महाराष्ट्राची छाती अभिमानाने भरून आली. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकास विरोध का केला? वास्तविक भोसल्यांनी फार पूर्वीपासून ब्राह्मणांचा योग्य तो सन्मान केला होता. शहाजी राजांच्या पदरी असलेले बहुतांश कारभारी (कारकुनी सांभाळणारे नोकर) ब्राह्मण होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार भोसल्यांनीच केला. घृष्णेश्वराच्य पुजा-विधीसाठी ब्राह्मणांना वृत्त्या सुरू केल्या. स्वत: शिवरायांच्या पदरी असलेले कारभारीही ब्राह्मणच होते. तरीही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध का केला.

याची प्रश्नाचे एक उत्तर असे आहे की, ब्राह्मणांना स्वराज्यच नको होते. हा देश परकीय राजवटींच्या अंमलाखाली राहावा, अशी ब्राह्मणांची इच्छा होती. त्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो की, एतद्देशियांच्या राजवटीऐवजी परकीय राजवट भारतात राहावी, असे ब्राह्मणांना का वाटत होते? त्याची एक प्रमुख कारण आहे. ते म्हणजे मत्सर.

ब्राह्मण मत्सरी का बनले? 
शिवरायांच्या आधी सुमारे ४०० वर्षे महाराष्ट्रात मुस्लिम राजवट होती. एतद्देशीय ब्राह्मणांना मुस्लिम सुलतानांनी कारकुनीची कामे दिली. तर एतद्देशीय लढावू जातींना शिपायांची. म्हणजे एका परीने मुस्लिम राजवटी एतद्देशियांच्या बळावरच टिकून होत्या. ब्राह्मण सुलतानांचा राज्य कारभार सांभाळत होते, तर मराठे आणि इतर लढावू जाती त्यांच्यासाठी लढत होते. अशा प्रकारे ब्राह्मण आणि मराठे दोघेही नोकर होते. त्यांची कामे फक्त वेगळी होती. ब्राहण लेखणनया चालवायचे तर मराठे तलवारी. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याची चळवळ सुरू करताच चित्र थोडेसे बदलले. मराठे स्वत: राज्यकर्ते बनले. ब्राह्मण मात्र आहे त्या भूमिकेत म्हणजेच नोकराच्या भूमिकेत राहिले. स्वराज्यात ब्राह्मणांचा मालक मात्र बदलला होता. मराठे हे त्यांचे आता नवे मालक झाले होते. आपल्या बरोबरीने सुलतान आणि बादशाहांचे नोकर असलेले मराठे एकदम आपले मालक बनत असलेले पाहून ब्राह्मणांच्या पोटात मत्सराचे मळमळू लागले. त्यातून मग महाराजांच्या विरोधात ब्राह्मणांनी कारवाया सुरू केल्या. सर्वपरिचित उदाहरण येथे घेऊ या. कोंढणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे किल्लेदार दादोजी कोंडदेव होते. जोपर्यंत कोंडदेव किल्लेदार होते, तोपर्यंत त्यांनी कोंढाणा शिवरायांना मिळू दिला नव्हता. संजय सोनवणी यांनी कोंडदेवांविषयी केलेल्या लिखाणात हा विषय विस्ताराने लिहिला आहे. कोंडदेवांस शिवरायांपेक्षा आदिलशाहा मालक म्हणून अधिक प्रिय होता, हेच यावरून दिसले. 

शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ब्राह्मणांचा हा मत्सर एकदम उफाळून आला. त्यातून त्यांनी राज्याभिषेकाला विरोध सुरू केला. महाराजांना राज्याभिषेक करण्याचेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नाकारले. शेवटी महाराजांना गागाभट्टाला काशीहून आणून राज्याभिषेक करून घ्यावा लागला.

येथे एक गोष्ट ब्राह्मण विसरले. भारतात मुस्लिम राजवट येण्याआधी येथे एतद्देशीय राजवटी होत्या. या राजवटीत ब्राह्मण हे नोकरच होते. आपली मूळ भूमिका कायम आहे, हे त्या काळच्या ब्राह्मणांनी लक्षात घेतले असते, तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध करण्याची गरज वाटली नसती. 

3 comments:

  1. Maratha people also in front to keep brahminism alive. Why they just blame brahmins?

    ReplyDelete
  2. मराठा लोक देखील सदैव ब्राह्मनत्व जिवंत ठेवायला पुढे असतात. फक्त ब्राह्मनांवरच ठपका का ठेवावा?
    बराबर ना?

    ReplyDelete
  3. आपण जो आरोप कराताय तो कोणत्या पुराव्या नुसार कराताय ते नाही सांगिताल तुम्ही

    ऐसा कोणता पुरावा तुमच्या पहान्यात आला आहे सांगा ज़रा

    आणि राहिला राज्याभिषेकाला विरोध करायचा प्रश्न तर
    जावळी चे मोरे काय किंवा आदिलशाहीत मुजरे करणारे घोरपडे घाटगे पांढरे खराटे निंबाळकर अशी किती यादि देऊ तुम्हाला
    ह्यालोकानि काय महाराजाना पायघड्या घातल्या होत्या का..??

    आणि कोढ़ाना ताब्यात न देणारा दादोजी कोंडदेव दिसतो मग रायरेश्वरचा कृष्णजी बांदल काय ब्राम्हण होते का

    यादवांची सत्ता गेल्या नंतर पुढचे जवळपास 350 वर्ष महाराष्ट्रा मधे कधीच राज्याभिषेक झाला नव्हता म्हणून राज्याभिषेकाचे विधि इथल्या बामनाना माहीत असण्याचा प्रश्नच येत नव्हता
    म्हणून काशी वरुण गागाभट्टान बोलावन्यात आल असू शकत का नाही..??

    आयुष्यभर निंबालकरानी काय केल ते पण लक्षात घ्या की का एकट्या दादोजी कोंडदेव ला बडवत राहणार

    आणि राजे झाले ते एकटे शिवाजी महाराज बाकी मराठे नाही राजे झाले बाकीचे मराठे आणि ब्राम्हण हे राजांचे सेवकच राहिले आहेत हे लक्षात घ्या

    एक दादोजी एक कुष्णजी एक रामदास स्वामी पकडूंन बसला आहात

    मराठयांची यादि ह्या पेक्षा खुप मोठी आहे

    बामनांच्या फ़क्त लेखान्या चालल्या पण मराठ्यांच्या तर तलवारि पण चाळल्या आहेत आपापसात

    जिजाऊ साहेबांचे 2 भाऊ कसे शहाजी राजानी संपवले ते सुद्धा सांगा जरा लोकांना

    लखुजि जाधवांचा निजामाच्या भर दरबारात खून होत असताना हे शुर आणि पराक्रमी सरदार काय करत होते..??

    आम्हा मराठ्यांना आता आमच्या पण चुका लक्षात आल्या आहेत
    आणि
    मी तर माझ्या नावाच्या माघे देशमुख ही पदवी लावन पण बंद केल आहे

    ReplyDelete