Showing posts with label प्रश्न पत्रिका. Show all posts
Showing posts with label प्रश्न पत्रिका. Show all posts

Wednesday, 23 January 2013

नव्या प्रश्न पत्रिका

‘भारताचा धार्मिक इतिहास' या नावाचा नवीन अभ्यासक्रम
विद्यापीठांत सुरू झाल्यास त्याच्या प्रश्न पत्रिका अशा असतील.
(आदर्श उत्तरे प्रश्न पत्रिकेसोबतच दिली आहेत. )


पेपर पहिला- धार्मिक संघर्ष : प्राचीन काळ
(संदर्भ ग्रंथ - रामायण/महाभारत/श्रीमद्भागवत/मत्स्यपुराण/ब्रह्मपुराण इ.)

प्रश्न १ - विश्वासामित्राला यज्ञपूजेचा अधिकार कोणी नाकारला?
उत्तर - वशिष्ठ नावाच्या ब्राह्मणाने.

प्रश्न २ - बहुजनांचा महाप्रतापी बळी राजाला कपटाने पाताळात कोणी दाबले?
उत्तर - वामन नावाच्या ब्राह्मणाने.

प्रश्न ३ - भगवान श्रीरामाची पत्नी सीता हिचे अपहरण करणारा कोण होता?
उत्तर - रावण नावाचा दशग्रंथी ब्राह्मण.

प्रश्न ४ - स्वत:च्या आईचा खून करणारा भरतखंडातील पहिला महापापी कोण?
उत्तर - परशुराम नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ५ - परशुरामाला अर्धा ब्राह्मण का म्हटले जाते?
उत्तर - कारण त्याचा पिता ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती.

प्रश्न ६ - रात्रीच्या अंधारात पांडव सेनेची कपटाने कत्तल करणारा कोण होता?
उत्तर - अश्वत्थामा नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ७ - झोपलेल्या पांडव सेनेची कत्तल करण्याच्या कामी अश्वत्थामा यास मदत करणारा कोण होता?
उत्तर - कृपाचार्य नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ८ - पत्नीचा कोणताही दोष नसताना तिला शिळा करणारा कोण होता?
उत्तर - गौतम नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ९ - गरीब ब्राह्मण मित्राला मदत करणा-या महाभारतातील महापुरुषाचे नाव सांगा.
उत्तर - श्रीकृष्ण.

प्रश्न १० - श्रीकृष्ण कोण होता?
उत्तर - यादवकुळातील क्षत्रिय.



 मालेतील इतर लेख
पेपर पहिला - ब्रह्मदेवाचा इतिहास
पेपर दुसरा - धार्मिक संघर्ष : प्राचीन काळ