-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.
"तुका सप्तशती" या ग्रंथालाच "वैकुंठ गाथा" असेही नाव आहे. या ग्रंथातच ते नमूद आहे. ग्रंथाचा कर्ता आधूत कोळी नामक कवी आहे. आधूत हा तुकोबांवर घालण्यात आलेल्या मारेक-यांचा म्होरक्या होता. आधूत हा शब्द अवधूतचा अपभ्रंश असावा, असे दिसते. आधूतने आपली कहाणी या ग्रंथात थोडक्यात कथन केली आहे. मारेकरी तुकोबांना मारायला गेले खरे; पण समाधी अवस्थेत असलेल्या तुकोबांच्या चेह-यावरील तेज पाहून ते घाबरले. त्यांच्या हातातील तरवारी आणि पलिते गळून पडले. तुकोबांना मारण्याऐवजी त्यांना मनोभावे वंदन करून मारेकरी परतले. नंतर आधूतला तुकोबांचा अनुग्रह झाला. त्याला अचानक काव्यस्फुर्ती झाली. त्याचे फलित म्हणजे हा ग्रंथ होय. स्वत: मारेक-यांपैकीच एकाने हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे त्याचे ऐतिहासिक मोल प्रचंड मोठे आहे. "अपाविमं"चा संशोधक संघ त्यावर काम करीत आहे. हा ग्रंथ जेवढा उपलब्ध आहे, तेवढ्या स्वरूपात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या ग्रंथाची भाषाही अद्वितीय आहे. यातील अनेक शब्द त्या काळातील बोलीभाषेतून उचलले आहेत, असे दिसते. त्यामुळे त्यांचा अर्थ लावणे हे जिकिरीचे काम आहे. मारेक-यांसाठी "वधियंते" असा शब्द त्यात वापरण्यात आला आहे. वधियंते हे अनेकवचनी रूप असून मूळ एकवचनी शब्द वधियंता असा आहे, असे दिसते. या ग्रंथात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीच्या दिवशीचा घटनाक्रम आठ ते दहा ओव्यांत आला आहे. हा घटनाक्रम असा :
तुकोबांना ठार मारण्यासाठी पाच मारेक-यांना उक्ते देण्यात आले होते. आधूत कोळी हा या पाचांचा म्होरक्या होता. उक्ते देणारे लोक वधियंत्यांना म्हणजेच मारेक-यांना घेऊन तुकोबांचे वास्तव्य असलेल्या भंडारा डोंगरावर जातात. वधियंत्याच्या हातात पेटते पलिते आणि नंग्या तलवारी असतात. तुकोबांच्या जवळ आल्यानंतर वधियंत्यांचा म्होरक्या आधूत हा वधियंत्यांना इशारा करतो. वधियंते पुढे सरसावतात. पण, समाधी अवस्थेतील तुकोबांच्या चेह-यावरील प्रचंड तेज पाहून ते घाबरतात. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटतो. त्यांच्या हातातील पेलिते आणि तलवारी गळून पडतात. घाबरलेले वधियंते तुकोबांना विनम्रपणे वंदन करतात. तलवारी आणि पलिते तेथेच सोडून वधियंते निघून जातात. मारेकरी घालणारे टोळके मग पुढे होते. पलिते आणि तलवारी उचलून हे लोक तुकोबांवर वार करतात. तुकोबांना ठार मारून ते पळून जातात. या मारेक-यांना ग्रंथकत्र्याने वोखटे अशी उपाधी वापरली आहे. वोखटे म्हणजे ओंगळ, अमंगळ, वाईट.
तुकोबांची हत्या झाल्यानंतरच्या क्षणाचे भयकारी चित्र ग्रंथकत्र्याने उभे केले आहे. आधूत लिहितो की, तुकोबांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण धरणी डळमळली, पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करणारा शेष नारायणही मनात भयकंपित झाला. आकाशात अग्निकल्लोळ होऊन अनेक तारे कोसळले. अवघ्या काही क्षणांत हा सर्व प्रकार घडून आला.
वैकुंठ गाथा या ग्रंथातील तुकोबारायांच्या हत्येशी संबंधित मूळ ओव्या पाहा (वाचकांच्या सोयीसाठी ओव्यांना क्रमांक देण्यात आले आहेत.) :
तव तो कोलियांचा धुरी । पांचाशी इशारा करी ।
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
पुढे जाले वधियंते । परी आंगा कांपाचे भरिते ।
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
स्वामी समाधीशी तपोनिधी । तेज पसरले चहुविधी ।
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
सावध बाघण आवटे । उचलिती तरवार दिवटे ।
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
डळमळिली धरणी । शेष भय कंपिला मनी ।
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।
ओव्यांतील कठीण शब्दांचे अर्थ :
कोलियांचा - कोळ्यांचा.
धुरी - प्रमुख, म्होरक्या.
पांचाशी - पाच जणांना.
तरवार - तलवार
झडकरी - लवकर.
वधियंते - मारेकरी. ठार मारण्यासाठी आलेले लोक.
आंगा - अंगाला.
कांपाचे भरिते - थरकापाचे भरते
हातीयेचे - हातातील.
पलिते - दिवट्या, मशाली.
चहुविधी - चहुकडे
दिवटे - पलिते. मशाली.
देखत खेवो - देखता क्षणी
ओव्यांचा क्रमश: अर्थ :
तेव्हा तो कोळ्यांचा म्होरक्या पाचांना इशारा करतो. तलवारीने लवकर घाव घाला असे त्यांना सांगतो. ।।१।।
मारेकरी पुढे झाले, परंतु त्यांच्या अंगाला कापरे भरले. हातातील तलवारी आणि पलिते गळून पडले. ।।२।।
तपोनिधी असलेले स्वामी (तुकोबाराय) समाधीत होते. त्यांचे तेज चहुकडे पसरले होते. मारेक-यांनी आधी चरणांना वंदन केले आणि मग ते निघून गेले. ।।३।।
तेव्हा सावध असलेले बाघण आवटे तलवारी आणि दिवट्या उचलतात. हे अमंगळ लोक तुकोबांवर घाव घालतात. मग वेगवेगळे होऊन पळून जातात. ।।४।।
(त्यानंतर) धरणी डळमळित होते. शेष मनात भयकंपित होतो. आकाशात अग्निकल्लोळ होतो. (तारे कोसळतात.) ही सर्व चिन्हे पाहता पाहता घडून येतात. ।।५।।
अर्थ न लागलेले शब्द
या ओव्यांतील बाघण आणि आवटे या दोन शब्दांचे अर्थ नीट लागत नाहीत. बाघण हा शब्द मूळचा ब्राह्मण असावा. ग्रंथाचे हस्तलिखित प्रत तयार करताना चुकून ह्मचा घ झाला असावा. qकवा हेतूत:ही असे केले गेले असावे. बाघण या शब्दाच्या अचूक अर्थ निदानासाठी आम्ही अनेक पर्याय तपासून पाहिले. हा शब्द बावन्न असावा, अशी एक शक्यता वाटते. ती गृहीत धरल्यास मारणारे लोक एकूण ५२ जण होते, असा अर्थ काढता येतो. तिसरी एक शक्यता अशी की, बाघण हाच मूळ शब्द असावा. ते मारेकèयांपैकी कोणाचे आडनाव असावे. आवटे या शब्दाचा काहीच उलगडा होत नाही. तुकोबांना मारणारे हे लोक आवटे आडनावाचे असावेत, अशी एक शक्यता असू शकते. पण त्याबाबत ठोस काहीच सांगता येत नाही.
संबंधित लेख
तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २
संबंधित लेख
तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २
या विषयावर मुक्त चर्चा करण्यास अपाविमंचे संपादक मंडळ तयार आहे. वाचकांनी आपली मते अवश्य नोंदवावी.
ReplyDeletemi ichchuk aahe
Deleteमुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री. बी. जी. कोळसे पाटील यांचे तुकारामांच्या हत्येसंदर्भातील सेलू येथे भरलेल्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगीचे विचार :
ReplyDelete"तुकाराम महाराजांचे तुकडे-तुकडे करून त्यांना मारण्यात आले. परंतु लोकांना सांगण्यात आले की, ते सदेह पुष्पक विमानाने स्वर्गाला गेले, अन आजही आपण या भाकड कथांवर विश्वास ठेवतो."
सौजन्य : संजय सोनवणी ब्लॉग
सोनवणी भाऊ आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने,किती आत्मियतेने पाहिले असते.तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते.तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते.त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता.तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता.त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती.अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते.परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
ReplyDeleteइतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले.संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले.तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले(तु.संतसांगाती-मंबाजी)’.’मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती.अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’(तु.सं.सां.-बहिना)कचेश्वर ब्रम्हे यांना,निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही.(तु.सं.सां.-कचेश्वर).तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले,याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो.आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली,दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही,या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही.आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला.तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर.तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली.विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली.(सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव,नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता.त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती.(सं.तु.प्रु.११२).श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर,तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नसून प्रत्यक्ष खूनच झाला आहे यात शंका नाही.
विशाल चव्हाण
सौजन्य : संजय सोनवणी ब्लॉग
संत तुकाराम यांचा खून का झाला?
ReplyDelete१. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते.
२. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.
३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.
४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बंद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.
५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.
६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.
७. धर्मशास्त्रानुसार मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला.
संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते....
लावूनि कोलित | माझा करितील घात || १ ||
ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||
पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने || ३ ||
तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ ||
जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ ||
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१
जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे || ५४९.१
मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१
-विश्वनाथ सांगलीकर
संत तुकारामांनी वीस वर्षात भल्याभल्यांना जेरीस आणले, त्यांच्या तोंडचे पाणी पळविले, त्यांना पळता भुई थोडी केली. वैदिक पंडित, श्रोत्रिय, याज्ञिक, योगी, गुरु इ. नानाविध नावांनी व रूपांनी वावरणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात भोंदुगिरी करणाऱ्या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. अशा लोकांवर शब्दांचे कठोर हल्ले करून त्यांनी त्यांना घायाळ केले. गरीब लोकांना छळणाऱ्या टवाळ लोकांचे थोबाड फोडण्याची भाषा केली. मग्रूर आणि मस्तवाल लोकांना आव्हान दिले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रात अत्यंत प्रस्थापित व सामर्थ्यशाली असलेल्या, पण अनीतीने वागणाऱ्या व दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्या खळांची सिंहासने त्यांनी गदगदा हलवली. धर्माच्या नावावर अधर्म करणाऱ्या सर्वांवर शब्दांचे आसूड सपासप ओढले. हे करताना अन्यायी व ढोंगी लोकांचे पद, प्रतिष्ठा वा समाजातील स्थान यांची पर्वा केली नाही. दुखावल्या गेलेल्या या लोकांचा खुनशीपणा वा घातकता यांची फिकीर केली नाही. त्यांनी हा जो संघर्ष केला, तो काही एखाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर केला नाही. समाजात इकडे तिकडे चोहीकडे अन्यायाचे ठेकेदार लोकांना फसवत होते, छळत होते. त्यांच्या मोठ्या संख्येची पर्वा न करता तुकाराम त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी किती लोकांचे वैर ओढवून घेतले, याला सीमा नाही. हजारो वर्षांच्या परंपरेचे बळ ज्यांना लाभले होते, अशा लोकांचे अगदी कडवे शत्रुत्व त्यांनी जाणीव पूर्वक स्वीकारले. खरेतर त्यांनी आपल्या उरावर स्वतःच्या हातांनी धगधगते निखारे ओढून घेतले. एक विध्वंसक ज्वालामुखी स्वतःच्या अंगावर खुचून घेतला. धर्माच्या ठेकेदारांना हे विचार आवडणारे नव्हते, परवडणारे नव्हते आणि याचीच परिणीती तुकारामांच्या हत्येत झाली, यात अजिबात शंका असण्याचे कारण नाही.
ReplyDeleteअक्षय घोटेकर
This comment has been removed by the author.
ReplyDeleteविषमतावादी वैदिक-ब्राम्हणी धर्मव्यवस्थेविरोधात लढा पुकारणारा जगतगुरु योद्धा संत तुकाराम !
ReplyDeleteजगतगुरु विद्रोही तुकाराम महाराजांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यातून विषमतावादी वैदिक व्यवस्था नेस्तनाबूत झाली. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या विद्रोही कीर्तनावर मंबाजी व सालोमालो या वैदिकांच्या छावणीने बंदी घातली. तुकाराम महाराजांची अभंग गाथा देहू येथील इंद्रायणी नदीत बुडविण्यात आली. कारण की तुकाराम महाराजांनी वैदिक धर्माविरुद्ध एक मोठा वारकरी संघर्ष चालविला होता. संत नामदेवापासून ही वारकरी प्रेरणा तुकाराम महाराजांना मिळाली होती. विठ्ठल हे वारकरी समतावादी चळवळीचे प्रतिक होते. देहू हे वारकरी चळवळीचे केंद्र होते. तुकाराम महाराजांच्या प्रभावाने अनेक लोकं त्यांचे शिष्य झाले होते. तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून वैदिक-ब्राम्हण हतबल झाले होते. विषमतावादी वैदिक धर्माच्या शोषणाविरोधात अभंगाच्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रबोधन करणे हे वारकरी धर्माचे लक्ष्य होते. त्यासाठी तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस वैदिक धर्माविरुद्ध युद्ध पुकारले. यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी हे आंदोलन पुकारले. म्हणूनच त्यांच्यावर वैदिक-ब्राम्हणांनी दोनदा शारीरिक हल्ले केले. व तिसऱ्यांदा धुळवडीच्या दिवशी इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर सदेह इंद्रायणीत गाडले. घातपातातून ही हत्या घडविण्यात आली. व संशय येऊ नये म्हणून देहू गावात वैकुंठगमनाची अफवा पसरविण्यात आली. तुकाराम महाराजांनी चालविलेली वारकरी चळवळ ही भक्तीची चळवळ नव्हती. तर ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला लढा होता. म्हणूनच त्यांना वयाच्या ४२ व्या वर्षी घातपाताने मारण्यात आले. तुकाराम महाराज म्हणायचे मी चमत्कार करीत नाही, मी चमत्कार जाणीत नाही, व चमत्कार करणारा भोंदू असतो. जे तुकाराम महाराज चमत्काराला नाकारतात. त्यांच्याच गाथेत चमत्कार कुणी घुसडले.
.......................................................................................................
तुकोबारायांची हत्या करण्यात आली?
ReplyDeleteतुकोबारायांची हत्या करण्यात आली, असे खूप विचारवंतांची म्हणणे आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी अमरावतीचे सुदाम सावरकर यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे एक प्रचंड संदर्भ-ग्रंथ असून सावरकरांनी हे एक फार मोठे काम केले आहे. पां. बा. कवडे यांनीही असेच मत मांडले आहे.
कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही".
ते आणखी म्हणतात," मानवी हिताच्या वैऱ्यांनी कट करून त्यांना इंद्रायणी नदीतील डोहात ढकलून देणे शक्य आहे. अशा संधीची ते वाट पहात असतील. कारण त्या दिवशी सबंध गाव शिमग्याच्या सणामुळे बेभान झालेले. परस्परांच्या अंगावर धूळ, राख, चिखल, पाणी वगैरे टाकून थट्टा मस्करीचा रूढीहक्क बजावण्यात दंग. कोण कोणाकडे लक्ष्य देतो? शिवाय, करंजाईचे बेट हे गावापासून दोन फर्लांग लांब! गावातील धामधूम सोडून इतक्या दूरवर आपले दुष्ट कृत्य पाहण्यास कोणास सवड होणार? कदाचित झाली व पाहिलेच तर शिमग्यातील थट्टा मस्करीच्या रूढीखाली हे दुष्ट कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता येईल. कारण, या दिवशी अंगावर घाण उडविणे, अगर पाणी टाकणे अथवा चिखलात किंवा पाण्यात ढकलणे हे हक्काचेच! शिवाय, असे करण्यात त्या दिवशी लहान मोठा भेद आडवा येत नसतो".
स. कृ. जोशी यांनी तुकारामांवरील चरित्रात्मक लघुकथेमध्ये तुकारामांच्या हत्येची शक्यता पुढीलप्रमाणे मांडली आहे," इतक्यात गावचा मांग भिवा धावत-पळत आला. तो सांगत होता की,' सालो मालोचे नि मंबाजीचे कपडे रक्ताने डागाळलेले त्याने पाहिले. तुकोबांना घेऊन ते जंगलात गेले होते. ते त्यांचा खून करून ही दुक्कल आली असावी".
वरील विवेचन तुकोबारायांची हत्या झाली असावी, असेच सुचित करते.
वेदांत देशपांडे
संत तुकारामांच्या हत्येला जात जबाबदार ?
ReplyDeleteतुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे.गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत.ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?.जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे.मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक,केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे.शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला.त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन.श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल".हा माणुस सामाजिक विषमता,वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला,असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!.तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
अक्षय पोळ
१. तुकारामांची हत्या अपेक्षितही आणि अटळही; यांनी वैर ओढावून घेतले, कोणतीही तडजोड केली नाही.
ReplyDelete२. तुकारामांचा छळ काय दाखवितो?
३. छळाला धर्मग्रंथांचा पाठींबा होता!
४.धुळवडीच्या दिवशी तुकारामांची धुळवड केली.
५. मृत्यू नंतरच्या घटना काय दर्शवितात?
६. दुसऱ्याच दिवशी जिजाईने ब्राह्मणांना घरदार दान दिले की त्यांना हाकलून दिले ?
७. कायमच्या माहेरी का गेल्या ?
८. कान्होबा कायमचे गाव सोडून का गेले?
९. इस्टेट कोणाच्या ताब्यात गेली?
१०.मुलेही पंचवीस वर्षे फिरकली नाहीत
११.आजही तीच धर्मशास्त्रे आपल्या नैतिकतेचा आधार मानायची?
१२. विचारांची कत्तल हि शारीरिक हत्येपेक्षाही भीषण
१३.क्षमतेइतके फुलू न देणे हीही हत्याच
१४.अभंग बुडविणे हीही एक हत्याच
१५.विकृतीकरण ही आणखी एक हत्या
१६.तुकारामांच्या नावावर इतरांचे लेखन, जाणीवपूर्वक प्रक्षेप
१७.प्रक्षेपांच्या विरोधात आठ अभंग
१८.दिशाभूल करणारा अन्वयार्थ लावणे हीही हत्याच
१९.छळणारा दुराभिमानीही शुद्धच?
...................................................................................................
The day of murder
ReplyDeleteAnd on one such day taking advantage of the situation when villagers were
busy in activities of hassles of *Dhulvad* (second day of Holi) and
inebriated, a group of rowdy Brahmins entered the town sprinkling colors,
beating drums, making loud noise and surrounded Tukaram. As a part of fun of
Holi, this was ignored by all. But the women got suspicious. There was hue
and cry. But the sound of drums subdued all and caused confusion. Brahmins,
Rameshswar Bhat, Salomalo Bhat and others dragged Tukaram to the banks of
Indrayani River and killed him there. They tied a stone to his body and
threw it in the running water, thus making the dead body untraceable. The
date was 9th March 1649.
Shivaji's activities
That time, Shivaji was nineteen years of age. He was stationed in Rajgad.
His father Shahaji was under detention under custody of Adil Shaha. Shivaji
was yet to be fully well known to the masses. The fort of Purandar was under
siege of Fatekhan, a Sardar of Adil Shah. He had won back some area of the *
Swaraj*. The town Dehu of Tukaram Maharaj was under the area of fort of
Kondana. Adil Shah had a suspicion that Tukaram is guiding Shivaji, and
hence he was against Tukaram. In January 1647, by the order of Dadoji
Konddev, the literature of Tukaram was drowned in the river Indrayani and
Tukaram was excommunicated by the Brahmins.
Those were the days of festival of Holi, and the Day of Dhulwad. King
Shahaji was in prison. Shivaji was under siege of fort Purandar. All the
warriors like Veer Baji Pasalkar, Baji Jethe, Godami Jagtap, Shivimkar,
Yesaji and all others were busy in fighting the siege. Jijau, mother of
Shivaji was on Rajgad, busy in affairs of administration and justice. This
was the opportunity, the Brahmins sought, and a radical terrorist group of
Brahmins murdered Tukaram. This is the history.
When Tukaram was murdered, Shivaji himself had not become stable fully. He
was not crowned as Chatrapati. He had just started somehow assembling the *
Mavales*, and building *Swaraj*. Strong enemies like Moghul and Adil Shahi
was in opposition. Therefore, Tukaram was murdered in spite of presence of
Shivaji. There is nothing to wonder or be surprised about it. His murder is
the truth.
Appeal to the masses
During recent years, John Kennedy the President of USA was murdered. Two
Prime Ministers of India, Indira Gandhi and Rajiv Gandhi were murdered by
cruel extremists. In history, Bahidrath, the grandson of Emperor Ashok, was
murdered by his own Brahmin commander. When the Kings and Prime Ministers
under heavy security can be murdered, how easy it is to murder an unarmed
saint. This was shown by Nathuram Godse by murdering M. Gandhi. Godse also
was a Brahmin. Gandhi was Father of Nation. That Gandhi would be murdered
was known to Morarji Desai. Godse killed Gandhi under guidance of Sawarkar.
The same Sawarkar is now being taught in the schools as a national hero and
has reached the premises of Loksabha.
Therefore, the Marathas, the Varkaris, the devotees of Tukaram, the *
kirtankars*, all are appealed not to be emotional. Tukaram Maharaj, who
himself denied the existence of *vaikuntha*, how can he go to *Vaikuntha*?
The Brahmin society is taking advantage of our ignorance to conceal their
brutal cruelty.
'Do not believe only because it is said by many; use your own judgment what
is true and what is untrue'. This is what Tukaram Maharaj preached. That
preaching should be accepted. After death of Tukaram, his wife Jijai went to
her parents. Later Sambhaji helped them. Narayan Maharaj started *Palkhi *to
Pandharpur. Brahmins stopped singing the *aarati* of Tukaram in the
Dnyanoba's *vari*. Crores of us Varkaris we are tolerating this. Even then
we are being asked how it is possible for Brahmins to murder Tukaram during
rule of Shivaji. This is called '*bhaitad panaa*' (stupidity) of Marathas.
..........................................................................................
Hello Anita Mam,
ReplyDeleteCould you please give interview online on my YouTube Channel.
Regards,
Pratik Mistri.