Showing posts with label साहित्यातील जातीयता. Show all posts
Showing posts with label साहित्यातील जातीयता. Show all posts

Thursday, 13 September 2012

फौजदारी गुन्ह्यातील आरोपीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवा !

      अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन आणि त्याचे अध्यक्षपद  म्हणजे  कुंभमेळा नव्हे की  जिथे  कुणीही ऐरा-गबाळा संधी-साधू -बैराग्याने  यावे आणि गांजा-अफूच्या धुंदीत नंगानाच करीत गंगेचे गटार करून आणि त्यात डुबक्या मारून आपली पापे धुवावीत !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक सन्मान्य परंपरा आहे , साधन शुचिता आणि नैतिकतेचा वारसा आहे. आजवर या व्यासपीठावर वाद  -विवाद घडलेच नाहीत असे नाही ,किंबहुना
साहित्य संमेलन आणि वाद हे जणू काही समीकरणच बनले आहे ; परंतु आजवरच्या वाद-विवादाना
किमान विचार -भूमिकांची पातळी होती . अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गटबाजी   होत नव्हती
असेही नाही परंतु हि गटबाजी   मराठवाडा -कोकण -विदर्भ -पश्चिम महाराष्ट्र अशी प्रादेशिक किंवा
दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्री साहित्य आणि तथाकथित मुळ साहित्य प्रवाह ( म्हणजेच सदाशिवपेठी
 साहित्य )   या पातळीवर होत असे आणि निवडणूक प्रक्रिया संपली की या वाद विवादाना
तिलांजलीही मिळत असे.
          यावेळच्या चिपळूण साहित्य सामेलनाच्या निमित्ताने मात्र ह.मो. मराठ्याच्या निमित्ताने
पुन्हा एकदा कोकणच्या भूमीत कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणारी जातीद्वेषाने पछाडलेली
परशुरामाची अवलाद अवतरली ( परशुरामाच्या कहाणी प्रमाणे याच्याही घरात याच्या बापाच्या रुपात
कुणा इंद्रा-बिन्द्रा (? ) ने प्रवेश केला होता किंवा काय याचा तपास घ्यावा लागेल; याला बहुजनाचा एवढा टोकाचा राग असण्याचे काय कारण असू शकते ?) असो !
         तर अश्या या ह (हरामखोर ) मो (मोकाट ) मराठ्याने चिपळूणला साहित्य संमेलन होत आहे म्हटल्यावर या परशुरामाच्या भूमीत कुणा  अब्राम्हनाचा सत्कार सन्मान झाला तर या भूमीचे पावित्र्य नष्ट होईल म्हणून स्वतः उमेदवारीच्या मुंडावळ्या बांधल्या आणि खांद्यावर जातीद्वेषाची
कुर्हाड घेवून ब्राम्हणांना आवाहन करणारी पत्रक बाजी सुरु केली ; त्याचे हे उद्योग गेल्या सात-आठ
वर्षापासून चालू होते म्हणे ! परंतु लिहिणारा आणि वाटणारा हा आणि वाचणारा त्याचा गोतावळा
म्हणून ते आजवर कुणाच्या नजरेत आले नाही .मात्र जेव्हा त्याने साहित्य सामेलनासाठी उमेदवारी
अर्ज भरला आणि आपले साहित्य कर्तुत्व (?) पाहता आपल्याला कुणी हिंग लाऊन देखील पुसणार
नाही हे याच्या लक्षात आले तेव्हा किमान ब्राम्हण मतदारांची का होयीना मते आपल्या पदरात
पडून नामुष्की टाळावी म्हणून या नतद्रष्ट भटाने एक पत्रक काढले. या पत्रकात आपण कसे ब्राम्हणाची बाजू घेवून सातत्याने लेखन कामाठी करीत आहोत आणि बहुजनातील लोक कसे आपल्या विरुद्ध शक्तीप्रदर्शन करतात याचे जेम्स लेन आणि भांडारकर प्रकरणाचा संदर्भ देऊन
"ब्राम्हण खतरेमे है !"असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाद्या लिंग पिसाटाने
घरातल्या घरात बाईचा हात धरण्याची पुतळ्यावर प्रक्टिस करावी आणि मग पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी
एखाद्या सजीव बाईचा हात पकडावा ( ती बाई चक्क पोलीस निघावी आणि  ढुंगणावर दंडुके पडावे  ) तसे मराठ्याचे झाले  !!
        सगळीकडून जेव्हा गदारोळ उठला , साहित्य वर्तुळात छी थू झाली आणि संभाजी ब्रिगेड ने पोलिसात केस  दाखल केली तेव्हा मराठ्याला वाटले मीडियात आपले लोक आहेत ते आपल्या मागे उभे राहतील. पण कसचे काय अन फाटक्यात
पाय; सगळ्यांनीच मराठ्याच्या xxx वर लाथा घालायला सुरुवात केली आणि मग काकुळतिला येऊन
मराठ्यांनी दिलगिरी व्यक्त केली ; परंतु एवढ्यावर भागणार नव्हतेच मराठ्याच्या व्हाईट कॉलरवर   अखेर
पोलिसांचा हात पडलाच. त्याला जातीय तेढ निर्माण करणारे पत्रक छापुन वाटल्या प्रकरणी  भा.द.वि. च्या ३२७ (९ ब ) कलम अंतर्गत अटक झाली. आणि न्यालयात उभे करण्यात आले . खरेतर इतकी नाचक्की झाल्या नंतर एखाद्याने लगेचच आपली उमेदवारी मागे घेतली असती; परंतु हा निर्लज्ज
न्यायमूर्ती समोरही ओशाळला नाही. १३००० हजार रुपये भरून त्याने जमानत घेतली .
   आर्थात त्याला या प्रकरणी फक्त जमानत मिळाली आहे. खटला आता सुरु होईल. तो फौजदारी
गुन्ह्यातील आरोपी आहे .अशा परीस्थित त्याला निवडणूक लढाऊ देणे साहित्य संमेलनाची अप्रतिष्ठा करणारे ठरेल
म्हणूनच साहित्य महामंडळाने मराठ्याची उमेदवारीं रद्द करून त्याला धडा शिकवला पाहिजे ; म्हणजे असे चुकीचे पायंडे पडणार्या वृत्तीना पायबंद बसेल .
       आणि आपल्या जमानत मिळाली आता काय ? या भ्रमात मराठ्याने राहू नये ; कारण समजा साहित्य महामंडळाने  तांत्रिक कारणे पुढे करून मराठ्याची उमेदवारी रद्द करण्यास असमर्थता
दाखवली तरी हा लुत भरलेला कुत्रा चिपळूण पर्यंत पोहोचणार नाही या साठी केवळ संभाजी ब्रीगेडच  नव्हे
केवळ ब्राम्हणेतर बहुजनच नव्हे तर मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर प्रेम असणार्या प्रत्येक मराठी माणसाने हातात प्रसंगी दंडुका घेण्याची तयारी ठेवली पाहिजे .


हे लेख अवश्य वाचा :

Wednesday, 21 March 2012

अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!



मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याची फारशी माहिती नसलेल्या लोकांनी काही तरी लिहायचे. लिहिणाèयाच्या सग्या सोयèयांनी आणि जातबांधवांनी वाहवा करायची. आणि माध्यमांनी त्यांना महान, लाडके वगैरे विशेषणे लावून मिरवायचे! मराठी साहित्य क्षेत्रातील हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे या हरमालवाल्याने या वास्तवाचा किती लाभ उठविला हे सांगायलाच नको. आपले अज्ञान कसे लपवावे एवढीही अक्कल या इसमाला नव्हती. आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर तर त्याच्या खोटेपणाला महानतेच झाकण बसविण्यात आले. बा. सी. मर्ढेकरांसारख्या जातीवंत कवीला बन आणि आमराई यातला फरक बरोब्बर माहिती होता. म्हणूनच मर्ढेकर एका कवितेत म्हणतात - 
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण  काय शिकवतोय हा लहान मुलांना ?  उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ?  द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला  तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

थापा खोट्या.. अन म्हणे शाब्दिक कोट्या !
हीच गोष्ट पूलच्या विनोदाचीही आहे. मराठी साहित्यात देखील अस्सल विनोदाची चवच माहिती नसल्यामुळे पु ल दिलेले निकृष्ट निरस आणि बाष्कळ  विनोदच "पुलकित विनोद" म्हणून गणले गेले . वास्तविक पु ल चे विनोदी साहित्य म्हणजे मराठी साहित्य सरितेच्या काठावर साचलेल्या डबक्यातील गुळगुळीत आणि लिबलिबीत शेवाळ आहे हें अनेक उदाहरणांनी सांगता येयील.  पु ल चे कोणतेही पुस्तक घ्या ; काय आहे त्यात ? विनोद ! कुठल्या दर्जाचा विनोद ? तर कट्ट्यावरचा...सवंग ,बाष्कळ ,बालिश , कृतक आणि तद्दन खोट्या अनुभवाचा कोटीबाज फुलोरा ! याला विनोदी साहित्य म्हणायचे तर महाविद्यालयांच्या स्नेहसम्मेलनात होणाऱ्या फिशपोन्ड्स मध्ये आणि कट्ट्यावरच्या गप्पात मारल्या जाणाऱ्या टोन्ट मध्ये याहून दर्जेदार विनोद निर्मिती होते असे म्हणावे लागेल . 

मराठी माणसाचा पाणउतारा करणारा पु. ल.
मला सांगा व्यक्ती आणि वल्ली या व्यक्ती चित्रणातील आणि बटाट्याच्या चाळीतील कोणते व्यक्ती चित्र खरे आहे ? तर एकही नाही ! मराठी माणूस किती गबाळा , वेंधळा , अव्यवहारी,बावळट, तिरसट ,आळशी ,आडणी ,असमाजशील, आहे हेच बिम्बविण्याचा प्रयत्न यातून दिसतो ; शिवाय तुम्हाला पुणेकर ,नागपूरकर किंवा मुंबईकर ह्वायचे का या भाषण वजा लेखातही त्या त्या भागातील मराठी माणसाची वैशिष्टे अधोरेखित करण्या पेक्षा प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग या महाभागाने केला आहे; मान्य आहे की मग विनोद कसा निर्माण होणार ? पण मग त्या करिता त्या भागातील माणसांची ,भाषेची ,परंपरांची खिल्ली उडवणे टवाळकी करणे याला पाणउतारा म्हणतात विनोद नव्हे !  

गुण गाईन कावडी....
पु ल चे गुण गाईन आवडी नावाचे एक प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रणाचे  एक पुस्तक आहे, हें पुस्तक म्हणजे
थापेबाजीचा कळस आहे. संबधित माणसांचे कधीही न घडलेले किस्से आणि लांगुलचालानाचा अतिरेक म्हणजे हें पुस्तक! वाटीभर दुधात चार वाट्या साखर ओतून वीट आणि झीट आणणारी खिरापत म्हणजे हें पुस्तक. खरे तर यात पु ल ने गुण गाईन आवडी म्हणत कावडीच वहिल्या आहेत . 
-रवींद्र तहकिक. 




Saturday, 17 March 2012

मार्च महिन्यातील कडू-गोड प्रतिक्रिया


भावांनो आणि बहिणींनो,
माझ्या लेखांमुळे जातीवादी लोकांचा तीव्र जळफळाट होत आहे. खरे बोलल्यास सख्ख्या आईला राग येतो, अशी म्हण मराठीत उगाच नाही. जातीयवादी लोक मला नाऊमेद करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करीत असतात. माझ्या लेखांवर वाईट साईट खोट्या प्रतिक्रिया टाकणे हा एक उद्योग ही मंडळी न थकता करीत असतात.  माझी भूमिका अत्यंत स्वच्छ आहे. मी माझ्यावरील टीकाही कधी लपवित नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील प्रतिक्रिया वाचकांसाठी येथे देत आहे. कोण खरे आणि कोण खोटे हे सूज्ञ वाचकांनीच ठरवावे.
...............................................................



atharva - are tichya shidoritil shivya samplya bahutek. maze tila dilele sadetod uttar vach - http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Anakhi ek lekh pan lihila ahe to pan vach.
Arey Anita kuthe Geli? evdha gaja waja karat aali hoti accidet wagaire jhaala mhanun. fakt ek 40000 aani kusumaagrajanwar lekh lihun gayab? adhi tar roj lihit hoti.te dadahari hee disat naahit
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
janeman AnitaraNI - ajun ek post takala ahe mazhya blog var. ashi lapu nakos ga. lapachapi khelayache vay ka tuze? http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post_04.html
and you are back - I have responded to your gibberish on kusumagraj at http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Grow up young lady and get a life!
@विनायक शिंदे:- हिंदुगर्जना tumhi kon ahat,tumcha vay kay,kay karta hyatla mala kahi mahit nahi..pan tumhi hya blog var je kahi lihilay te atyanta yogya kelay..tyabaddal dhanyavaad!! hya anita patil sarkhya atyanta nich ani hin vicharyanchya kidyanna hya deshat kahihi sthan nahi...tyanchya sudaivane n aplya durdaivane tya ek stri ahet..so mala tya deserve kartat tase yogya shabda vaparta yet nahit :(. manakis vikruti n manasik aajar asleli hi bai ekhadya doctor kade jaun treatment karun ghenya aivaji ithe kay kartey?hicha ardhavat dnyan n hiche ardhavat guru itar brahmanetar samajachi dishabhul kartayet!! hya asha lokanna khara tar chabkache fatke marun tadipaar kele pahije!! kay layki tari ahe ka hyanchi sant dnyaneshwar, sant tukaram, shri kusumagraj, shyamchi aai, shree shivaji maharaj asha thor vyaktinbaddal lihaychi?? hyancha vay kay akkal ti kay n lihitat kay? sarkar pan asha lokanna kasa thevun gheta samjat nahi..hech jar koni ambedkarabaddal or fule baddal lihila tar?tasa tar ji ghatana lihili geli hoti ti suddha barichshi england parliament chya ghatanevarun copy keleli hoti..mag he bara chalta hya bai la..(bail la)
ani tumhi Shree Sant Dnyaneshwaranni asa mhatla vagaire ithe sangtay!! te tar brahman hote..n tumhi tar tyanna sant manatch nahit naa? tumchya mate brahman tar nich jaat ahe.ek kay te tharva naa!!asa aplabuddhi aslyasarkha kay lihitay?
Sann hyanni mhatle te ekdam yogya!! sant shiromani hi padvi fakt ekalach milte. tukaramanna hi padvi milaleli hoti..kay tyanche afat kartutva asel..pan ti kadhun jagadguru mhanaycha murkhapana kashala kartay?tumcha jar evdha sagla gadha(?) abhyas ahe, tar mag he evdha kasa nahi kalala tumhala?

तहकीक साहेब धन्यवाद


वि. वा. शिरवाडकर यांचा महानपणाचा बुरखा फाडल्यामुळे जातीयवाद्यांचा महाराष्ट्रभर जळफळाट सुरू आहे. मात्र, त्याचबरोबर काही सूज्ञ लोक जात, पंथ आणि धर्माचे भेद विसरून माझ्या सत्य लेखनाला पाठींबाही देत आहेत. रवीन्द्र तहकीक यांनी माझ्या लेखाला असाच  पाठींबा व्यक्त केला आहे. तहकीक साहेबांचे आधी आभार मानते. तहकीक साहेबांनी मला पाठविलेला मेल पुढे देत आहे. 
...............................................................

अनिता ओठांची मोहर खोलून
अन बोटांची भाषा बोलून ( ब्लॉग वरचे लेखन म्हणजे
एका अर्थाने अंगुली निर्देशच नाही का ) तू
नेट वरचा मूक मुक्तसंवाद पुन्हा सुरु केलास या बद्दल
प्रथम तुझे जाहीर अभिनंदन आणि स्वागत.
आज तू प्रदीर्घ विश्रांती नंतर एक चांगलाच धष्ट-पुष्ट
बकरा सोलून उलटा टांगला आहेस.
मराठीच्या कुरणात विनाअटकाव चरून पोसलेल्या
या मस्तवाल बोकडाला लोक वनराज समजायला
लागले होते. परंतु ज्याला लोक आयाळ समजतात
ती आयाळ नसून बोकडाला वेळीच खाटकाच्या खोडावर
न घेतल्या मुळे निबर होऊन फुटलेली दाढी आहे हें
तू दाखऊन दिलेस . त्याचे कवित्व आणि नाटककार असणे
देखील नैसर्गिक प्रतिभेचा अविष्कार  नसून अनाहूत आणि
अनावश्यक वाढलेले अजागळ ( काही बकऱ्याच्या हनुवटी खाली
लोंबणारे मांसल गळ किंवा गळू ; अजा ( बकरा ) गळ ( मांसल गळ /गळू )
आहेत हें सांगण्याचे तू धाडस केले.
मराठी साहित्यात असे अनेक मस्तवाल बकरे होऊन गेले ज्यांना असे
सोलून उलटे टांगणे गरजेचे आहे . त्याची सुरुवात तू एका महत्वाच्या
बकऱ्या पासून केली आहे. दिवाभीत घुबडा सारखा दिवसा घरात कोंडून घेवून
आणि रात्री अपरात्री  डोंगर माथ्यावर बसून विदेशी दारू आणि साहित्य रिचवत 
मराठी साहित्याच्या नावाखाली  चकण्याचा कचरा माथी मारणाऱ्या
या नशाबाज बकऱ्याला आज तू चांगलेच उघडे पाडले.
आनंद झाला . आता त्या पुल्याचाही एकदाचा निकाल लाऊन टाक .
 - रवीन्द्र तहकीक

Sunday, 26 February 2012

कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या !



पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली ।
चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली ।।
पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिन्ग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणाèया अशा अनेक चंचल नारी मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे पान घेऊन मिरवत आहेत. या चंचलांमुळे मातीतले अस्सल साहित्यिक उपेक्षेच्या गर्तेत खितपत पडले आहेत. 
अशा चंचलापैकी एक नाव आहे कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांना महान नाटककार, महाकवी, कथाकार, कादंबरीकार अशी झाडून सगळी सर्वोच्च बिरुदे लावली जातात. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नावे जनस्थान पुरस्कारही दिला जातो. त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे थोडे म्हणून की काय,  कुसुमाग्रजांना देवत्व बहाल करून पावित्र्याच्या मखरात बसविण्यात आले आहसे. या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक झालाय की, त्यांच्या साहित्याची खरी समीक्षा करणे हे मराठी सारस्वताच्या दरबारातले सर्वांत मोठे पाप होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारची समीक्षा न होता, एका व्यक्तीला अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे उदाहरण जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात सापडणार नाही. तथापि, बुद्धी शाबूत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे वागून चालत नसते. योग्य समीक्षा करूनच माणसाची महत्ता ठरायला हवी. कुसुमाग्रज या नियमाला अपवाद ठरू शकत नाहीत. त्यामुळेच मी कुसुमाग्रजांच्या महानपणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. तेव्हा या माणसाच्या महानपणाची सारीच वस्त्रे उसणी असल्याचे दिसून आले. ही उसनी वस्त्रे बाजूला सारून खरे कुसुमाग्रज महाराष्ट्राला कळायला हवेत.  उद्या २७ फेब्रुवारी रोजी    कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी  वर्षाचा  शेवट होत आहे. या मूहुर्तावर त्यांची यथायोग्य समीक्षा करण्यासाठी मी  बसले आहे. या लेखामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावणार आहेत. तथापि, सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी हितसंबंधी संधीसाधूंचा वाईटपण कोणाला तरी घ्यावा लागणार आहे. 
माझी ही अल्पशब्दांतील प्रस्तावना वाचून कुसुमाग्रजांसाठी बोलबच्चनगिरी करणाèया मुखंडांना धक्का बसला असेल. तथापि, अनिता पाटील पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे या बोलबच्चनांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे पावित्र्याच्या मखरात बसविलेली +श्यामची आई+ कशी जातीयवादी आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. आज नंबर आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. (विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेसाठी कुसमाग्रज हे नाव वापरीत तसेच नाटके व इतर लेखनासाठी वि. वा. शिरवाडकर हे नाव वापरीत.)
कुसुमाग्रजांच्या बोगसपणाचे बिन्ग फोडण्यासाठी त्यांची महत्ता कोणत्या कलाकृतींच्या आणि निकषांच्या आधारे ठरविली गेली, हे आपण आधी पाहू. कुसुमाग्रजांची सर्वश्रेष्ठ कलाकृती कोणती? नि:संशय नटसम्राट. नटसम्राट ही मराठीतील अजरामर कलाकृती असल्याची टिमकी वाजवली जाते. त्यासाठी कुसुमाग्रजांना नाट्य लेखन क्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी त्यांचे भाविक भक्त लावतात. परंतु नटसम्राट हे नाटक स्वतंत्र अनुभवांवर उभे नाही. ते शेक्सपिअरच्या किंग लिअर या नाटकाचे रूपांतर आहे. शिरवाडकरांनी qकग लिअर मराठी पेहरावात उभे केले एवढेच त्यांचे कर्तत्व.  किंग लिअरच्या जागी त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर उभा केला. तथापि, अप्पासाहेब बेलवकर भाषा बोलतो ती  किंग लिअरचीच. मूळ कथेत अनेक फेरबदल नटसम्राटमध्ये करण्यात आले आहेत. तसेच शेक्सपिअरच्या इतरही अनेक नाटकांमधून संवादांची उचल शिरवाडकरांनी केली आहे. अप्पासाहेब बेलवलकरांचा ‘जगावं की मरावं हा एकच सवालङ्क हा अत्यंत प्रसिद्ध संवाद शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकातून अगदी जशाच्या तसा उचलला आहे. शेक्सपिअरच्या +To be, or not to be, that is the question+ या संवादाचे हे शब्दश: भाषांतर आहे. 

शेक्सपिअरच्या लेखनीतून उतरलेला हा मूळचा 
संपूर्ण संवाद वाचकांसाठी खाली देत आहे :


To be, or not to be, that is the question:
Whether 'tis Nobler in the mind to suffer
The Slings and Arrows of outrageous Fortune,
Or to take Arms against a Sea of troubles,
And by opposing end them: to die, to sleep
No more; and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand Natural shocks
That Flesh is heir to? 'Tis a consummation
Devoutly to be wished. To die to sleep,
To sleep, perchance to Dream; Ay, there's the rub,
For in that sleep of death, what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil,
Must give us pause. There's the respect
That makes Calamity of so long life:
For who would bear the Whips and Scorns of time,
The Oppressor's wrong, the proud man's Contumely, [poor]
The pangs of despised Love, the Law’s delay, [disprized]
The insolence of Office, and the Spurns
That patient merit of the unworthy takes,
When he himself might his Quietus make
With a bare Bodkin? Who would Fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered Country, from whose bourn
No Traveller returns, Puzzles the will,
And makes us rather bear those ills we have,
Than fly to others that we know not of.
Thus Conscience does make Cowards of us all,
And thus the Native hue of Resolution
Is sicklied o'er, with the pale cast of Thought,
And enterprises of great pitch and moment, [pith]
With this regard their Currents turn awry, [away]
And lose the name of Action. Soft you now,
The fair Ophelia? Nymph, in thy Orisons
Be all my sins remembered.

वरील संवाद हॅम्लेटच्या तिसèया अंकातील पहिल्या दृश्याचा पहिलाच संवाद आहे. हॅम्लेट आपल्या मनातले भाव या संवादातून व्यक्त करतो. तिसèया अंकातले हे दृश्य +ननसी सीन+ म्हणून ओळखले जाते. शिरवाडकर महाशयांनी या संवादाचे शब्दश: भाषांतर करून आपल्या नाटकात घेतले.
प्रतिभावंत नव्हे उचल्या!
भाषांतर करण्यात काय आले आहे कौतुक?  ही शुद्ध उचलेगिरी आहे. मराठीच्या वाङ्मय व्यवहारात दुहेरी उचलेगिरी चालते.एखाद्याने शेक्सपिअर qकवा अन्य पाश्चात्य लोकांच्या कलाकृती जशाच्या तशा उचलून प्रसिद्ध करायच्या आणि जातीय प्रसारमाध्यमांनी ही उचलेगिरी उचलून धरायची! उचलेगिरीलाच प्रतिभा ठरवून उदो उदो करायचा. शिरवाडकरांचे हेच झाले आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांतून उचलेल्या कलाकृतींना असेच उचलून धरण्यात आले. तथापि, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असते. आज ते आले. वि. वा. शिरवाडकर ही व्यक्ती नाटककार या नाात्याने प्रतिवंत नव्हतीच. ती होती केवळ एक उचल्या! कटू असले तरी हेच सत्य आहे. 
शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या नाटकाचे राजमुकूट या नावाने रूपांतर केले. ऑथेल्ले त्यांचे रुपांतर ऑथेल्लो या नावानेच प्रसिद्ध आहे. ही सगळी नाटके मराठीत गाजली. याचे कारण मूळच्या शेक्सपिअरच्या संहिताच मजबूत आहेत. 
इंग्रजी शिकल्याचा असाही गैरफायदा
वि. वा. शिरवाडकर शाळेत असताना शिरवाडकर नाशकात त्यांच्या मामांकडे राहत. मामांना शेक्सपिअरच्या नाटकांचा नाद होता. त्यांच्याकडे शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह होता. ही नाटके शिरवाडकरांच्या हाती पडली. इंग्रजीत शिक्षण झाले असल्यामुळे त्यांना ही नाटके वाचणे शक्य झाले. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यातल्या त्यात इंग्रजी जाणणारे तर विरळाच. +वासरांत लंगडी गाय शहाणी+ अशी एक म्हण मराठीत आहे. आजूबाजूला सगळीच वासरे असतील, तर लंगडी असली तरी गाय भाव खाणारच. कुसुमाग्रजांच्या काळातील साहित्यिक मंडळींत इंग्रजी जाणणारे असे जवळपास कोणी नव्हतेच. त्याचा फायदा कुसुमाग्रजांना झाला. इंग्रजी जाणारे कुसुमाग्रज भाव खाऊन गेले. कारण वासरांच्या गर्दीत ते एकटेच गाय होते. 
येथे युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की, भाषांतरे qकवा रूपांतरे साहित्यक्षेत्रासाठी आवश्यकच असतात. त्यामुळे शिरवाडकरांना अगदीच क्षुल्लक ठरविणे चूक आहे. हा युक्तिवाद योग्य वाटत असला तरी, तो चूक आहे. भाषांतरे, रूपांतरे आवश्यक असली तरी त्यांच्या बळावर कोणाला महान ठरविता येऊ शकत नाही. महत्ता ही अस्सल कलाकृतींच्या आधारावरच ठरत असते. इतकेच काय या कलाकृतींमधील प्रतिमा आणि प्रतिकेची देशीच असतात. टॉलस्टॉय हा आधुनिक जगातील सर्वोच्च पातळीवरील महाकवी म्हणून नावाजिला जातो. त्याची +युद्ध आणि शांती+ ही ३०० पात्रे असलेली कादंबरी महाकाव्य समजली जाते. ती रशियन युद्धावर अधारित आहे. त्यातील सर्व पात्र अस्सल रशियन आहेत. कलाकृती साकारताना त्याने अस्सल रशियन पेहराव सोडला नाही. जगातील दुसरे महाकाव्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या +द मदर+ या कादंबरीचे नाव घेतले जाते. ही कादंबरीही अस्सल रशियन आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा इतिहास गॉर्कीने या कादंबरीत मांडला आहे. एर्नेस्ट हेqमग्वे, चार्लस् डिकन्स, डोस्टायवस्की, खलिल जिब्रान आणखी काही नावे वानगीदाखल येथे देते. हे सर्व लेखक महान या बिरुदाचे मानकरी ठरले ते केवळ त्यांच्या अस्सल कलाकृतींमुळे. रूपांतरीत कलाकृतींमुळे नव्हे. अलिकडचे अनेक मोठे qहदी सिनेमावाले इंग्रजी सिनेमांतून कल्पना आणि दृश्ये जशीच्या तशी उचलतात. हे लोक निर्माते म्हणून मोठे असतीलही परंतु महान ठरत नाहीत. पथेर पांचाली सारखे अस्सल बंगाली सिनेमे देणारे सत्यजित राय हेच महान ठरतात. ऑस्करवाल्यांनाही भारतात येऊन त्यांचा गौरव करावा लागतो. मराठीत मात्र उचल्यांनाच महत्ता देण्याचा अजब प्रकार घडत आला आहे. 
खरया महान लेखकांना समोर आणा
मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही.  मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल. 

Saturday, 15 October 2011

पुढील ५० वर्षे केवळ बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!


ब्राह्मण लेखकांना ५० वर्षे मिळाले अघोषित आरक्षण

ज्ञानपीठ पुरस्कार केवळ ब्राह्मणांनाच का मिळतात? असा प्रश्न करणारा माझा लेख ब्लॉगवर आहे. गीता असे नाव लावणारया कुण्या व्यक्तीने त्यावर मखलाशी करताना म्हटले की, ''अनिताबाई, मग हा पुरस्कार बहुजनांसाठी आरक्षित करून टाका.'' पितळ उघडे पडल्यामुळे निर्माण झालेला जळफळाट या व्यक्तीच्या वाक्यातून दिसून येतो. मात्र, या व्यक्तीचे म्हणणे वेगळ्या अर्थाने विचारात घेण्यासारखे आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांमध्ये ब्राह्मणांना गेली ४०-५० वर्षे अघोषित आरक्षण होते. १९६५ साली ज्ञानपीठ पुरस्कारांना सुरूवात झाली. आजपर्र्यत ४८ लेखकांना हा पुरस्कार दिला गेला. उर्दू साहित्यातील काही मोजके मुस्लिम लेखक वगळता उरलेले सर्व नसले तरी बहुतांश  लेखक ब्राह्मण आहेत. ज्ञानपीठाच्या वेबसाईटवर कोणीही ही यादी पाहू शकतो. वाचकांच्या सोयीसाठी मी ही यादी लेखाच्या शेवटी देत आहे. कृपया पाहावी. कोणाला त्यात बहुजन लेखकाचे नाव सापडल्यास मला अवश्य कळवावे. मी माझ्या लेखात दुरुस्ती करून घेईन.
आरक्षण नको पुरस्कार द्या
भावांनो-बहिणींनो, गेल्या ५० वर्षांत केवळ ब्राह्मण लेखकांचीच या पुरस्कारांसाठी निवड केली गेली, हा अन्याय नव्हे का? गीता नावाच्या व्यक्तीने बहुजनांना आरक्षण देण्याचे वक्तव्य उपरोधाने केले आहे. परंतु त्याचा खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांत बहुजनांना आरक्षण नाही दिले तरी चालेल. परंतु पुढची ५० वर्षे आता एकाही ब्राह्मण लेखकाला हा पुरस्कार मिळू नये, अशी मागणी करणे अयोग्य ठरणार नाही. कारण गेली ५० वर्षे ब्राह्मणी लॉबीने हे पुरस्कार लाटले आहेत. आता पुढची ५० वर्षे बहुजन समाजातील लेखकांना ते मिळू द्या. किमान मराठीत तरी या पुढे किमान तीन बहुजन लेखकांना ज्ञानपीठ मिळायला हवे. बहुजन लेखकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण लेखकांचा विचार व्हायला हरकत नाही.

.....................................................................................
ज्ञानपीठ पुरस्कारप्रात्त लेखकांची यादी. मराठीतील ज्या तीन ब्राह्मणांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांची नावे ठळक टाईपात दिली आहेत. 


Laureates Awarded, so far,by the Jnanpith Award

1. G. Sankara Kurup (1965) Malayalam
2. T.S. Bandyopadhyaya (1966) Bangla
3. Uma Shankar Joshi (1967) Gujarati
4. K.V. Puttappa (1967) Kannada
5. Sumitranandan Pant (1968) Hindi
6. Firaq Gorakhpuri (1969) Urdu
7. V. Satyanarayana (1970) Telugu
8. Bishnu Dey (1971) Bangla
9. Ramdhari Singh `Dinkar' (1972) Hindi
10. D.R. Bendre (1973) Kannada,
11. Gopinath Mohanty (1973) Oriya
12. V.S. Khandekar (1974) Marathi 
13. P.V. Akilandam (1975) Tamil
14. Ashapurna Devi (1976) Bangla
15. K.S. Karanth (1977) Kannada
16. S.H.V. Ajneya (1978) Hindi
17. B.K. Bhattacharya (1979) Assamese
18. S.K. Pottekkatt (1980) Malayalam,
19. Amrita Pritam (1981) Punjabi
20. Mahadevi Varma (1982) Hindi
21. Masti V. Iyengar (1983) Kannada
22. Thakazhi S. Pillai (1984) Malayalam
23. Pannalal Patel (1985) Gujarati
24. Satchidanand Rautroy (1986) Oriya
25. V.V.S. 'Kusumagraj' (1987) Marathi 
26. C. Narayana Reddy (1988) Telugu
27. Qurratulain Hyder (1989) Urdu
28. V.K. Gokak (1990) Kannada
29. Subhash Mukhopadhyaya (1991) Bangla
30. Naresh Mehta (1992) Hindi
31. Sitakant Mahapatra (1993) Oriya
32. U.R. Anantha Murthy (1994) Kannada
33. M.T. Vasudevan Nair (1995) Malayalam
34. Mahasveta Devi (1996) Bangla
35. Ali Sardar Jafri (1997) Urdu
36. Girish Karnad (1998) Kannada
37. Nirmal Verma (1999) Hindi
38. Gurdial Singh (1999) Punjabi
39. Indira Goswami (2000) Assamese
40. Rajendra Shah (2001) Gujarati
41. D. Jayakanthan (2002) Tamil
42. Vinda Karandikar (2003) Marathi
43. Rahman Rahi (2004) Kashmiri
44. Kunwar Narain (2005) Hindi
45. Satyavrat Shastri (2006) Sanskrit
46. Ravindra Kelekar (2006) Konkani
47. O. N. V. Kurup (2007) Malayalam
48. Akhlaq Khan Shahryar (2008) Urdu




Tuesday, 27 September 2011

ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?


वि. स. खांडेकर
मराठीच्या वाङ्मयीन इतिहासात तीन जणांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेखकाची एकूण लेखन कारकिर्द लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो. तथापि, त्या लेखकाची सर्वोच्च कलाकृती गृहीत धरण्याची प्रथा आहे. मराठीत पहिला पुरस्कार मिळाला १९७४ साली वि. स. खांडेकर यांना. त्यासाठी ययाती ही त्यांची कादंबरीसाठी सर्वोच्च म्हणून गृहीत धरली गेली. १९८७ साली दुसरया ज्ञानपीठाचे मानकरी ठरले वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी त्यांची निवड झाली. तिसरे ज्ञानपीठ २००३ साली विंदा करंदीकर यांना मिळाले. त्यांचा अष्टपदी हा काव्यसंग्रह त्यासाठी गृहीत धरण्यात आला. मराठीतले हे तिन्ही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक जातीने ब्राह्मण आहेत. तिघांच्याही आडनावात शेवटी ‘कर'  आहे. ब्राह्मणांशिवाय इतर कोणत्याही लेखकाला ज्ञानपीठ द्यायचे नाही, असेच एक अघोषित सूत्र या पाठीमागे दिसून येते.
तिन्ही कलाकृती आधारित 
वि. वा. शिरवाडकर
यातील आणखी एक गंमत अशी की, या तिन्ही लेखकांची ज्ञानपीठ प्राप्त पुस्तके आधारित आहेत. महाभारत आणि इतर अनेक पुराणांत असलेल्या राजा ययातीच्या कथानकावर खांडेकरांची ययाती ही कादंबरी  बेतली आहे. ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा त्रिकोणी स्त्रिपुरूष संबंधांचे मूळ कथानक कादंबरीत जसेच्या तसे बेतले आहे. मूळ कथानकाच्या चौकटीला खांडेकरांनी काल्पनिक प्रसंगांत बसविले. ही जी काही काल्पनिक प्रसंगांची निर्मिती आहे, तेवढीच काय ती खांडेकरांची प्रतिभा. शिरवाडकरांच्या नटसम्राटाची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. नटसम्राट ही एक शोकांतिका आहे. शोकांतिकामध्ये कथानकातील नायकाचा कारुण्यपुर्ण, शोकात्म अंत होत असतो .  जागतिक वाङ्मयात शोकांतिकांचे दोन प्रकार पडतात. ग्रीक शोकांतिका आणि शेक्स्पिअरच्या शोकांतिका. ग्रीक शोकांतिकांमध्ये नायक दैवाधीन असतो. त्याचे स्वत:चे प्राक्तन (नशीब) त्याला शोकांतिकेकडे घेऊन जाते. इडिपस रेक्स हे ग्रीक शोकांतिकेचे सर्वोच्च उदाहरण होय. पु. ल. देशपांडे यांनी इडिपस रेक्सचे राजा औदिपस या नावाने भाषांतर केले आहे. शेक्स्पिअरने शोकांतिकांचा नवा प्रकार निर्माण केला. त्याच्या नाटकातील नायकाचा शोकात्म अंत होतो, पण त्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक शेक्स्पीअरच्या शोकांतिकेत मोडते. एकच प्यालातील सुधाकराला आपल्या ज्ञानाचा एवढा ताठा असतो की, तो थोडासाही अवमान सहन करू शकत नाही. त्यातून तो दारूच्या आहारी जाऊन शेवटी बचनाग हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करतो.
विंदा करंदिकर
शिरवाडकरांचे  नटसम्राट समजून घेण्यासाठी ही थोडीसी पाश्र्वभूमी सांगितली. नटसम्राट हे नाटक दोन्ही प्रकारच्या शोकांतिकांचा अर्क काढून शिरवाडकरांनी लिहिले. त्याचे कथानक ग्रीक शोकांतिकेच्या अंगाने जाते. तर भाषाशैली शेक्स्पीअरच्या अंगाने जाते. म्हातारी माणसे पोटच्या लेकरांनाच कशी नकोशी होतात, असे कथानक या नाटकात आहे. अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र. त्याचा नाटकाच्या शेवटी करुण अंत होतो.
विंदा  करंदीकरांच्या अष्टपदीचेही तसेच. या काव्याची प्रेरणा ही मूळ संस्कृतातून घेण्यात आली आहे.
अस्सल कलाकृतींवर अन्याय
नामदेव ढसाळ
अशा प्रकारे आधारित कलाकृतींना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन मराठीतील अस्सल कलाकृतींवर घोर अन्याय करण्यात आला आहे. साहित्यक्षेत्रातील ब्राह्मणी जातीवाद हेच एकमेव कारण यामागे आहे. मराठीत अनेक लेखक असे आहेत की, त्यांची प्रत्येक कलाकृती ज्ञानपीठ पुरस्काराच्या तोडीची आहे. अगदी मोजकी उदाहरणे येथे देते - माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे, बलुतं- दया पवार, नामदेव ढसाळ - गोलपीठा. उपरा- लक्ष्मण माने, उचल्या- लक्ष्मण गायकवाड,  झुलवा - उत्तम बंडू तुपे, तराळ-अंतराळ - शंकरराव खरात, वळीव - शंकर पाटील, खळाळ - आनंद यादव, पाचोळा - रा. रं. बोराडे, धग - उद्धव ज. शेळके, कोसला - भालचंद्र नेमाडे. ई. ई. ही यादी खूप मोठी होऊ शकेल;
भालचंद्र नेमाडे 
परंतु विस्तारभयास्तव अगदी मोजकी उदाहरणे मी येथे दिली आहेत.
प्र. ई. यांचे एकच पुस्तक हजार ज्ञानपीठाच्या तोडीचे
आमच्या औरंगाबादचे प्र. ई. सोनकांबळे यांना तर त्यांच्या ‘आठवणींचे पक्षीङ्क या एकाच कलाकृतीसाठी हजार ज्ञानपीठे मिळायला हवी होती. नारायण सुर्वे, ढसाळ, दया पवार आणि नेमाडेंबद्दलही माझे हेच मत आहे. परंतु यापैकी कोणालाही ज्ञानपीठ मिळू शकले नाही. कारण हे लोक जातीने ब्राह्मण नव्हते. याच कलाकृती ब्राह्मणांच्या नावे असत्या तर मराठी साहित्यात क्षेत्रात त्यांना मानाच्या पालख्या मिळाल्या असत्या.
सावंत, देसाइंवरही अन्याय
शिवाजी सावंत 
आणखी एक मुद्दा येथे नमूद करावासा वाटतो की, आधारित कलाकृतींसाठीच पुरस्कार द्यायचा असे ठरविले गेले असेल, तर शिवाजी सावंतांना मृत्यूंजयसाठी ज्ञानपीठ मिळायलाच हवे होते. मराठीतील आधारित कलाकृतींत मृत्यूंजय ही सर्वांत श्रेष्ठ कलाकृती आहे. रणजीत देसाई यांनाही श्रीमान योगी हा पुरस्कार मिळायला हवा होता. दुर्दैवाने ते ब्राह्मण नव्हते, म्हणून ते ज्ञानपीठापासून वंचित राहिले.
....................................................................................................

ता. क. 
भावांनो, आणि बहिणींनो,
रा. रं. बोराडे. 
या माझ्या लेखावरून फेसबुकच्या व्यासपीठावर घणाघाती चर्चा झाली. ब्राह्मणवाद्यांना हा लेख भयंकर झोंबला. ‘खांडेकर-शिरवाडकर-करंदीकर या त्रिमूर्तीला ज्ञानपीठ मिळाले ते केवळ त्यांच्या गुणवत्तेमुळे' असा युक्तीवाद त्यांनी केला. मी त्यांना एकच सवाल होता - नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, उत्तम बंडू तुपे, शंकरराव खरात, शंकर पाटील, आनंद यादव, रा. रं. बोराडे, उद्धव ज. शेळके, भालचंद्र नेमाडे, प्र. ई. सोनकांबळे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई यांच्यात गुणवत्ता नाही काय? त्यावर ब्राह्मणवाद्यांनी सारवासारक केली.
या देशात फक्त ब्राह्मण राहतात काय?
१२० कोटींचा देश आहे. या देशात केवळ ब्राह्मणच राहतात, असे नव्हे. इतरही जाती-जमाती आहेत. सर्वांना न्याय मिळायला हवा. बहुजन, दलित, आदिवासी यांना न्याय्य हक्कही नाकारण्यात आले आहेत. नाकारण्यात येत आहेत. जेव्हा जेव्हा न्यायाची मागणी केली गेली, तेव्हा तेव्हा ‘गुणवत्तेङ्कचा मुद्दा ब्राह्मणांकडून पुढे करण्यात येतो. ब्राह्मण सोडून इतर कोणातही गुणवत्ता नाही, असा युक्तीवाद केला जातो.
यालाच तर ब्राह्मणवाद म्हणतात.


अनिता पाटील, औरंगाबाद. 
......................................................................................

Tuesday, 6 September 2011

अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?

श्यामची आई शेवटी ब्राह्मणच निघाली!

साने गुरुजींची ‘श्यामची आई'  म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली चित्रपट बनविला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून ‘श्यामची आई' चा उदो उदो गेली पाऊणशे वर्षे केला जात आहे. मराठीतील १० लोकप्रिय पुस्तकांची यादी काढायचे ठरले, तर ‘श्यामची आई'  शिवाय ती पूर्ण होऊ शकणार नाही. पुस्तकाचे लेखक असलेल्या साने गुरुजींकडे महाराष्ट्र एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरूजींनी आमरण उपोषण केले होते. १ मे १९४७ रोजी ते उपोषणाला बसले आणि १० मे १९४७ रोजी विठ्ठल मंदिराची कवाडे दलितांसाठी खुली झाली. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले तेव्हा ‘एका पांडुरंगाने दुसया पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले' अशी प्र्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. पांडुरंगाला जातीभेदाच्या जोखडातून मुक्त करणारे साने गुरुजी स्वत: मात्र ब्राह्मण्याच्या, भेदाभावाच्या जोखडातून मुक्त होऊ शकले नाही. माझे हे विधान अनेकांने धाडसाचे वाटेल; परंतु दुर्दैवाने ते खरे आहे.
देवाला सारी प्रिय
या कादंबरीचा नायक श्याम वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत आहे, अशी या कादंबरीची संकल्पना आहे. ४६ रात्रींत ही कहाणी संपते. एका रात्री श्याम आपल्या सवंगड्यांना आपली आई जातीभेदाला कसा थारा देत नव्हती, याची कहाणी सांगतो. या प्रकरणाचे नाव आहे ‘देवाला सारी प्रिय'. गावकुसाबाहेरील एक म्हातारी महारीण रानातून सरपणाची मोळी आणते. मोळीला कादंबरीत गोयला असे म्हटले आहे. ओझे झाल्यामुळे ती गावकुसाजवळ मोळी टेकते. मोळीची रचना अशी असते की, कोणी तरी मदत केल्याशिवाय ती डोक्यावर उचलून घेता येत नाही. संध्याकाळ झालेली असते आणि म्हाताया महारणीला मोळी उचलून द्यायला कोणीही तयार नसते. महारणीला कोण शिवणार? याचवेळी श्यामची आई देवदर्शन करून घरी परतत असते. तेव्हा ही म्हातारी तिच्या नजरेस पडते. घरी आल्यानंतर आई श्यामला मोळी उचलून देण्यासाठी पिटाळते. श्याम मोळी उचलून देतो. 
श्याम घरी परततो तेव्हा आई म्हणते - ‘‘ श्याम ! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात... देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या देहात आहे, महाराच्याही आहे... श्याम देवाला सारी प्रिय आहेत... कारण सारी त्याचीच. देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात...''  ही कहाणी सांगितल्यानंतर श्याम आपल्या मित्रांना म्हणतो, ‘‘ मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भाव पुरून टाकू या'' 
‘देवाला सारी प्रिय'  या धड्यातील हा सारांश वाचल्यानंतर कोणाच्याही मुखातून सहजोद्गार निघतील- धन्य तो श्याम आणि धन्य त्याची आई. पण वस्तुस्थिती तशी नाही. या धड्यातील काळा भाग मी या सारांशातून मुद्दाम वगळला आहे. श्यामच्या आईच्या संस्कारांचे स्तोम माजविताना हितसंबंधी लोक हा भाग असाच मुद्दाम वगळत असतात. त्यांची चलाखी कळावी यासाठी मी हे केले. 
मनुवादी श्यामची आई!
आता पाहा या धड्याची काळी बाजू. याच धड्यातील काही उतारे पुढे देत आहे. ते काळजीपूर्वक वाचा. मग आपण त्याचे विश्लेषण करू या!
१. आई म्हणाली,  ‘‘श्याम बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरील गोयला खाली पडला आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला अंघोळ घालीन जा.'' 
‘‘आई! लोकांनी बघितले तर लोक मला हसतील. मला मारायला येतील. खरेच जाऊ?''  असे मी विचारले.
‘‘लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे....'' , असे आई म्हणाली.
२. या संवादानंतर श्याम बाळदादाच्या घरापुढे जातो. महारणीला मोळी उचलून देतो. तेव्हा शेजार-पाजारचे ब्राह्मण त्याच्या अंगावर धावून येतात. त्याविषयी कादंबरीतील हा संवाद पाहा - 
दुसरे ग्रहस्थही बाहेर आले आणि ‘‘श्याम ! अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी !''  असे ते बोलू लागले. 
मी त्यांना म्हटले, ‘‘मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही... मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी आहे हे मला माहीत आहे.'' 
3. म्हातारीला मोळी उचलून देऊन श्याम घरी येतो. मग आई त्याला म्हणते- ‘‘त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन. पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही (फाटी म्हणजे सरपण) सरली आहेत.'' 
‘‘ए गोयलेवाली! अग इकडे ये'' , मी तिला हाक मारली.
... आईने तिला विचारले, म्हाताये, आजारी का ग आहेस?... दुपारचा भात उरलेला आहे. देऊ का तुला?'' , आईने विचारले.
‘‘द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे आई दुनियेत कोणी नाही बघा'' , दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. 
‘‘वांयच पाणी घाला दादा'' , ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले....
4. म्हातारी निघून गेल्यावर काय होते. ते आता पाहू-
‘‘ चल श्याम, तू अंघोळ कर''  आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसया दगडावर बसलो. मग स्वत:च्या हाताने पाणी घेऊन मी अंघोळ केली. अंघोळ करून मी घरात गेलो...
विश्लेषण
देवाला सारी प्रिय या धड्यातील असे हे 4 प्रसंग मी वर दिले आहेत. त्यातून काय दिसते?
१. पहिल्या प्रसंगात आई श्यामला म्हणते की, महारणीला मोळी उचलून दिल्यानंतर लोक काही म्हणाले तर त्यांना सांग की मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे. आईच्या वाक्यावरून आपला असा समज होतो की, आई लोकांची समजूत काढण्यासाठी अंघोळ करणार असल्याचे सांगायला सांगत आहे. पण ते खरे नसते.
२. दुसया प्रसंगात श्याम म्हणतो, स्नानात शुद्धी आहे. ‘स्नानात शुद्धी आहे''  हे आईने त्याला सांगितलेले नसते. याचाच अर्थ. महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध होतो, असे त्याला आधीच माहिती असते. शिवल्यानंतर अंघोळ न करता घरात गेल्यास घर बाटते, हे संस्कार त्याच्यावर आईनेच केलेले असतात. हे तिसया प्रसंगातून स्पष्ट होते.
३. तिसया प्रसंगात आई श्यामला अंगणाच्या शेवटच्या कोपयात केळीजवळ अंघोळ घालते. त्याला न शिवता त्याच्या अंगावर ‘दुरून' पाणी घालते. अंघोळ केल्यानंतरच श्याम घरात येतो.
४. आई मंदिरातून परत येत असताना ताटकळलेली म्हातारी तिला दिसते. ती स्वत:च का मोळी उचलून देत नाही?  घरी येऊन श्यामला का पाठवते?
५. श्यामला मोळी उचलून देण्यासाठी आई पाठवते त्यामागे नुसती म्हातारीला मदत करणे हा हेतू नसतो. घरातले सरपण सरले आहे, अनायासे म्हातारी आलीच आहे तर तिच्याकडून ते घ्यावे, असा धोरणी कावेबाजपणा आई दाखवते.
६. श्याम म्हातारीला घरी बोलावतो तेव्हा तो म्हणतो ‘‘ए गोयलेवाली, अग इकडे ये'' . अहो आजी आमच्या घरी या, असेही तो म्हणू शकला असता. पण तो तिचा उल्लेख एकेरी करतो. महारा-मांगांना काय अहो जाहो म्हणायचे? हा संस्कार त्याच्यावर आधीच झालेला आहे. तो आईनेच केला असणार. गोयलेवालीच्या जागी एखादी ब्राह्मण म्हातारी असती, तर श्याम असेच एकेरी बोलला असता का? 
७. म्हातारी घरी आल्यानंतर आई तिला शिळा भात देऊन पुण्य कमावते. येथेही आईचा धोरणी कावेबाजपणा दिसून येतो. नाही तरी संध्याकाळी हा भात कपिला गायीला नाही तर वाघ्या कुत्र्यालाच द्यावा लागला असता.
८. शिळा भात खाऊन झाल्यानंतर म्हातारी श्यामला पाणी मागते. तेव्हा श्याम ‘दुरून'  तिच्या ओंजळीवर पाणी ओततो. 
९. महारणीला स्पर्श होणार नाही याची काळजी आई घेते. तसाच श्यामही घेतो. तिला स्पर्श करू नकोस, असे आई श्यामला या संपूर्ण प्रकरणात कोठेही सांगत नाही. 'या' लोकांना ब्राह्मणांनी स्पर्श करायचा नसतो, हे त्याला आधीच माहीती असते. अस्पृश्यतेचा हा संस्कारही त्याच्यावर आईकडून झाला असणार हे उघड आहे.
१०. घरात विनासायास सरपण आले. श्यामची अंघोळ झाली. कोणत्याही प्रकारची शिवाशिव न होता, हे सगळे पार पडले. त्यामुळे आई खुष होते. शेवटी ती श्यामला ‘‘देवाला कशी सारी प्रिय आहेत''  या विषयावर छान प्रवचन देते. पण अस्पृश्यता हे पाप आहे, असे आई कोठेही म्हणत नाही.
अस्पृश्यतेचे संस्कार मुलांना देणार का?
हे आहे साने गुरूजींचे संस्काराचे आणि मातृत्वाचे महन्मंगल स्तोत्र!  हे प्रकरण ‘देवाला सारी प्रिय' याच शीर्षकाखाली शालेय अभ्यासक्रमात गेली कित्येक दशके राहत आले आहे. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन अंघोळ करावी, हा संस्कार मुलांना देण्यासाठी  हा धडा नित्यनेमाने अभ्यासक्रमात घालण्यात येत आहे का? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण करणारा श्याम हाच का? असे काही प्रश्न येथे अनुत्तरीत राहतात.
-अनिता पाटील, औरंगाबाद.
............................................................................................................................................................
श्यामची आई या पुस्तकातील अस्पृश्यतेची ब्राह्मणी चलाखीने छुपी पाठराखण करणाया पृष्ठांची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावीत.                                       
..............................................................................................................................................................


-अनिता पाटील, औरंगाबाद.