Wednesday, 21 March 2012

अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!



मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याची फारशी माहिती नसलेल्या लोकांनी काही तरी लिहायचे. लिहिणाèयाच्या सग्या सोयèयांनी आणि जातबांधवांनी वाहवा करायची. आणि माध्यमांनी त्यांना महान, लाडके वगैरे विशेषणे लावून मिरवायचे! मराठी साहित्य क्षेत्रातील हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे या हरमालवाल्याने या वास्तवाचा किती लाभ उठविला हे सांगायलाच नको. आपले अज्ञान कसे लपवावे एवढीही अक्कल या इसमाला नव्हती. आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर तर त्याच्या खोटेपणाला महानतेच झाकण बसविण्यात आले. बा. सी. मर्ढेकरांसारख्या जातीवंत कवीला बन आणि आमराई यातला फरक बरोब्बर माहिती होता. म्हणूनच मर्ढेकर एका कवितेत म्हणतात - 
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण  काय शिकवतोय हा लहान मुलांना ?  उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ?  द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला  तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

थापा खोट्या.. अन म्हणे शाब्दिक कोट्या !
हीच गोष्ट पूलच्या विनोदाचीही आहे. मराठी साहित्यात देखील अस्सल विनोदाची चवच माहिती नसल्यामुळे पु ल दिलेले निकृष्ट निरस आणि बाष्कळ  विनोदच "पुलकित विनोद" म्हणून गणले गेले . वास्तविक पु ल चे विनोदी साहित्य म्हणजे मराठी साहित्य सरितेच्या काठावर साचलेल्या डबक्यातील गुळगुळीत आणि लिबलिबीत शेवाळ आहे हें अनेक उदाहरणांनी सांगता येयील.  पु ल चे कोणतेही पुस्तक घ्या ; काय आहे त्यात ? विनोद ! कुठल्या दर्जाचा विनोद ? तर कट्ट्यावरचा...सवंग ,बाष्कळ ,बालिश , कृतक आणि तद्दन खोट्या अनुभवाचा कोटीबाज फुलोरा ! याला विनोदी साहित्य म्हणायचे तर महाविद्यालयांच्या स्नेहसम्मेलनात होणाऱ्या फिशपोन्ड्स मध्ये आणि कट्ट्यावरच्या गप्पात मारल्या जाणाऱ्या टोन्ट मध्ये याहून दर्जेदार विनोद निर्मिती होते असे म्हणावे लागेल . 

मराठी माणसाचा पाणउतारा करणारा पु. ल.
मला सांगा व्यक्ती आणि वल्ली या व्यक्ती चित्रणातील आणि बटाट्याच्या चाळीतील कोणते व्यक्ती चित्र खरे आहे ? तर एकही नाही ! मराठी माणूस किती गबाळा , वेंधळा , अव्यवहारी,बावळट, तिरसट ,आळशी ,आडणी ,असमाजशील, आहे हेच बिम्बविण्याचा प्रयत्न यातून दिसतो ; शिवाय तुम्हाला पुणेकर ,नागपूरकर किंवा मुंबईकर ह्वायचे का या भाषण वजा लेखातही त्या त्या भागातील मराठी माणसाची वैशिष्टे अधोरेखित करण्या पेक्षा प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग या महाभागाने केला आहे; मान्य आहे की मग विनोद कसा निर्माण होणार ? पण मग त्या करिता त्या भागातील माणसांची ,भाषेची ,परंपरांची खिल्ली उडवणे टवाळकी करणे याला पाणउतारा म्हणतात विनोद नव्हे !  

गुण गाईन कावडी....
पु ल चे गुण गाईन आवडी नावाचे एक प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रणाचे  एक पुस्तक आहे, हें पुस्तक म्हणजे
थापेबाजीचा कळस आहे. संबधित माणसांचे कधीही न घडलेले किस्से आणि लांगुलचालानाचा अतिरेक म्हणजे हें पुस्तक! वाटीभर दुधात चार वाट्या साखर ओतून वीट आणि झीट आणणारी खिरापत म्हणजे हें पुस्तक. खरे तर यात पु ल ने गुण गाईन आवडी म्हणत कावडीच वहिल्या आहेत . 
-रवींद्र तहकिक. 




4 comments:

  1. तुम्हाला विनोद समजतो का...??


    नाही तर विनोद समजून घ्यायचा क्लास लावा कुठे तरी

    आपन काय लिहिताय त्याचा तरी विचार करा ज़रा

    तुम्ही नका वांचू बटाट्याची चाळ
    पण आम्ही वाचनार आम्हाला आनंद मिळतो

    ReplyDelete
  2. गेली आंब्याच्या बनी
    म्हटली मैनेसवे गाणी
    (चाफा बोलेना)

    ReplyDelete
    Replies
    1. चाफेवाला बी. रघुनाथ काय, किंवा साहित्यातला भाई पु.ल. काय, दोघेही एकाच जातकुळीचे आहेत.दोघेही अडाणीच. ग्रामीण भागात एक आहे- "हागचा भाऊ पाद, अन् दोन्हीचा ऐकच नाद".

      Delete

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.