Monday 19 March 2012

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !




नव्या पिढीतील अभ्यासक, विचारवंत श्री. रवींद्र तहकीक यांनी महाराष्ट्राचे कथित लाडके व्यक्तिमत्व पू. ल. देशपांडे यांचे मोठेपणाचे पितळ उघडे पाडणारा जबरदस्त लेख लिहिला आहे. तो वाचक भावा-बहिणींसाठी येथे देत आहे.
....................................................................

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड वल्ली



मराठीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि समीक्षक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की ‘ मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व हा जगात कोठेही न आढळणारा अजब प्रकार पहायला मिळतो. लेखक किंवा कवी लोकप्रिय ( खरेतर वाचक प्रिय ) असू शकतो तो पर्यंत सर्व काही ठीक असते परंतु एकदा का तो लाडका बनला की मग तो नाही ती थेरं करायला आणि सर्वाना गृहीत धरायला सुरुवात करतो.

मला वाटते ; नव्हे खात्रीच आहे की नेमाडेंचे वरील वाक्य केवळ आणि केवळ पु. ल. देशपांडे या आणि याच लेखन कामाठ्याला  लागू होते . लोक त्यांना मराठीतले महान आणि अभिजात (? ) विनोदी लेखक वैगैरे मानतात. आमच्या कडे दुध घालणारा गवळी देखील त्याच्या म्हशीला कतरिना कैफ म्हणतो. आणि भावात २ रुपये जास्तीचे मागतो.  कोजागिरीच्या आयटम मिल्क चे वेगळे !


साहित्यातला दहशतवादी 
असो सांगायचा मुद्दा हा की पु ल देशपांडे हा ‘व्यक्ती‘ साहित्याचा हरमाल विकणारा एक पोटार्थी ‘वल्ली‘ माणूस होता इतकेच ! त्याला काहीच वज्र्य नव्हते. शिरवाडकर तरी किमान मनाची नाहीतरी जनाची लाज बाळगून
नाटक आणि कविता या पलीकडे रेकले नाहीत ; परंतु या कावळ्याने बारा पिंपळा खालचा एकही मुंजा ‘रंगवल्या'  शिवाय सोडला नाही. अगदी कुणाच्या दहाव्याच्या पिंडाला सुध्धा हें लाडकं व्यक्तिमत्व  ‘शिवल्या शिवाय त्या मृतात्म्याला स्वर्गात जागा मिळणार नाही असं दहशतीचं वातावरण मराठी साहित्य वर्तुळात बनलं होतं .


सगळी मडकी उष्टी करणारा बोका 
यानं काय केलं नाही म्हणून विचारा ? विनोदी (?) लेखन केलं,
व्यक्तीचीत्रणं लिहिलीङ्क, नाटकं लिहिली, कविता लिहिल्या , आकाशवाणीवर
बातम्या आणि निवेदनं केली , एकपात्री नाटकाचे प्रयोग केले , गाणी लिहिली,
सिनेमाच्या कथा -पटकथा लिहिल्या , सिनेमात काम ही केली, प्रवास वर्णन लिहिली ,
मेळ्यात -नाटकात कामं केली ; गायन केलं , संगीत दिलं , ठीक ठिकाणी पेड पाहुणा
म्हणून हिंडला , पेपर मध्ये वार्ताहर /संपादक म्हणून ही कामं केली , समीक्षा लिहिली .......मराठी साहित्य संगीत आणि नाटक सिनेमातील असं एकही मडकं या लबाड  बोक्याने तोंड घालून उष्टे करायचे बाकी ठेवलेले नाही.


हा तर बहुश्रुत रेडाच 
कुणी याला बहुश्रुत बहुआयामी अष्टावधानी वैगेरे म्हणेल ; ( म्हणोत बिचारे ) या नियमाने रेड्याला देखील बहुश्रुत म्हणता येयील ; कारण तो देखील  भातशेतीत कुळव ओढतो .  पूर्वी पखालिनी पाणी वाहत असे , शिवारभर  चरून शेण मात्र मालकाला  देतो , म्हशीनी वंश वृद्धी करावी आणि वरतून पुन्हा दुधही द्यावे या साठी
महत्वपूर्ण योगदान देतो, दसर्याला टकरी खेळतो ....आणि शिवाय त्याच्या पाठीवरून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा  हात फिरून त्याच्या मुखी वेद प्रगटल्याचा दाखला आहेच !

साहित्य नव्हे निव्वळ 'खोगीर भरती'!
थोडक्यात पु लं ची साहित्य कामाठी म्हणजे एक ना धड भारा भर चिंध्या अशी होती ; निव्वळ खोगीर भरती ;
भारत ,भारतीय माणूस ,मराठी माणूस या बद्दल कायम ओशाळवाणे आणि टिंगल टवळी वजा लेखन करण्यात या रेड्क्याने आपली हयात घातली; शाब्दिक कोट्या आणि व्यक्तिमत्वातील व्यंगांचे प्रदर्शन करणाऱ्या या महाभागाने त्याने घातलेल्या अनेक उकिरड्याच्या ढिगात एक तरी सामाजिक संदेश दिला आहेका ?
हें तपासून पहा; केवळ हसवणूक ( खरे तर फसवणूक ) करणारा एक पोटार्थी विदुषक सर्कशीतील सगळ्या कसरती थोड्या थोड्या ( त्या ही विनोदी पद्धतीने ) करून शकतो म्हणून तो थेट लाडका कसा काय होऊ शकतो ? हां भोळ्या भाबड्या मराठी रसिकांना  बाष्कळ बालिश विनोदाचा रतीब घालून ‘ ते राज हंसाचे पोहणे
आहे ‘ हा गोड गैरसमज पसरवन्या एवढा तो लबाड होता हें मात्र नक्की !
-रवींद्र तहकीक 

6 comments:

  1. कोणाही जीवाचा न घडो मत्सर..

    ReplyDelete
  2. कोणाही जीवाचा न घडो मत्सर..

    ReplyDelete
  3. कोणाही जीवाचा न घडो मत्सर.. मग तुमचे पुल विषयीचे लिखाण काय सांगते..
    Devadatta Rajadhyaksha said I didn't see any logical reasoning in the conclusions in the article.

    You may not like someone's work, but why attribute malafide intentions to them?

    How exactly was P L sly (लबाड)? Did anyone accuse him of hoodwinking/ cheating them during his lifetime?

    How was he पोटार्थी? Because he worked with Doordarshan apart from his literary/ theater career? But then most Marathi authors have continued working in academic/ media circles.

    <> हरी तात्या वाचले आहे का?

    <> Please do read the details at: http://www.puladeshpande.net/sjaniv.php

    Obviously, I have never seen Pu La in person, and all the above information is in public domain. If any of this is factually incorrect, please try and refute with specific details and not merely emotive statements.
    सामाजिक जाणीव
    www.puladeshpande.net
    Tribute to the king of Marathi Hearts ! a versatile personality ! P.L.Deshpande !

    ReplyDelete
  4. माझ्या कमेंट काय खुपतात का लेखकाना

    मग माझ्या कमेंट का नाही पब्लिश करत आपण

    का आपण खरच महानगरपालिकेत उंदीर मारन्याच्या विभागात कारकुन आहात

    ReplyDelete
  5. atishay dukh watle blog vachun...jagat koni kaay karayche he tharavnare aapan sabha lok kon?

    ReplyDelete
  6. नव्या पिढीतील अभ्यासक,विचारवंत(!)श्री. रवींद्र तहकीक(आपण कोण आहात?)
    मुळात ते पू.ल. नसून पु.ल. असं आहे. त्यामुळे तुमची विद्वत्ता शीर्षक वाचून कळाली.
    तुम्ही वरील कमेंट्सना रिप्लाय दिला नाही. त्यामुळे फार काही लिहून माझा वेळ वाया घालवत नाही...

    ReplyDelete