मराठी माणसाबद्दल कायम तुच्छता पूर्वक लिहिणाऱ्या आणि
त्यावर सवंग विनोद निर्मिती करून मराठी माणसाला हास्यास्पद
बनवणाऱ्या पु ल देशपांडे ने महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले संत श्रेष्ठ
तुकाराम महाराजांची देखील कुचेष्टा केली, त्यांना देखील हास्यास्पद
बनवले. परंतु बाजार बुणग्या पालखी वाहक खुशमस्कर्यानी
पु ल च्या या संत द्रोहाचे सुध्धा कौतुकाच केले
तुकारामांच्या नावे बोगस अभंग रचले
"विठ्ठल तो आला आला " नावाचे पु ल चे एक संगीत प्रधान
नाटक आहे. मुळात हें नाटक आहे की नाटिका ? हें कळायला
मार्ग नाही ! मला वाटते पु ल ला संगीत नाटक लिहायचे असावे
कारण या नाटकात स्वतः तुकारामाच नाही तर जो उठतो तो
गायकी करतो. अगदी तुकारामांच्या पत्नी सुध्धा !
बरे यात तुकारामाच्या मुळ अभंगाच्या जोडीला
या पादऱ्या पेंद्याच्या ( म्हणजे पु ल च्या ) बुळकांड्याही
वाचाव्या/पाहाव्या / एकाव्या लागतात ज्या तुकारामांच्या
व्यक्तित्वा समोर अतिशय बालिश /बाष्कळ / आणि वडाच्या झाडावर
उगवलेल्या बाडगुंळा सारख्या वाटतात .
तुकारामांच्या पत्नीचे चारित्र्यहनन
संत तुकारामांच्या पत्नी एक कजाग / खाष्ठ / भांडखोर / आणि
जवळ पास मानसिक संतुलन ढळलेली आडणी आणि आडमुठी
बाई होती तिच्या सांज सकाळच्या कटकटीना वैतागूनच
तुकोबा देव धर्माच्या मार्गी लागले असे तद्दन खोटे , तुकारामांच्या
पत्नीची बदनामी करणारे आणि तुकारामाच्या संतत्व भूमिकेला
खुजे पणा आणनारे प्रसंग या नाटकात आहेत.
तुकारामांच्या ताल्कार्यांची टिंगल टवाळी
या शिवाय तुकाराम महाराजांच्या सोबतीला जे चार -पाच भक्त
वारकरी -टाळकरी पात्र दाखवले आहेत त्यांची अवस्था तर आणखी
बिकट आहे. कुणाला घरातून हाकलून दिले आहे. कुणी सगळी संपत्ती
शान शोकात आणि तमाशात उडवल्या मुळे भणंग झाला आहे.
तर कुणी लष्करात शिपाई होता पण "लष्कराच्या भाकर्या
भाजण्या पेक्षा इथे टाळ वाजवणे अधिक फायद्याचे " असे
तो म्हणतो.कारण काय तर " इथे पोटोबा ही भरतो
आणि विठोबाही घडतो " प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या
शिष्याच्या तोंडी ही असी विचारसरणी दाखवण्या मागची
विकृती एखाद्या " देशपांड्याच्याच "सडक्या जातीद्वेशी डोक्यात
वळवळू शकते.
या नाटकात नको त्या ठिकाणी विनोदी मखलाशीचे
मेकुड काढून ते चार चौघात बोटावर खेळवत तोंडात
टाकण्याचा घाणेरडे पणा पु ल ने अनेक प्रसंगात
केला आहे . नको त्या ठिकाणी उंदरा सारखी
शब्दांची उलटसुलट खुड बुड ( कोट्या) करून
केवळ रसभंगच नव्हे प्रसंगाचे गांभीर्य जाऊन
तुकारामाचा अपमान झाला आहे. तुकोबांचे
शिष्य म्हणजे तर पु ल ळा नाटकातील विनोदी
पात्रांना वाव वाटले की काय कुणास ठावूक ?
ते अगदी गाथा पाण्यात बुडवतानाही "पुलकित
विनोद करतात "
मंबाजीचा रुबाब
खलनायक मंबाजी ( जो ब्राम्हण आहे ) तो मात्र
रुबाबदार आणि प्रभावी व तिखट चमकदार
संवाद बोलताना दाखवला आहे. मंबाजी आणि तुकोबा
जेव्हा एकमेका समोर येतात आणि " तुक्या तू लोकांना वेदांचा
चुकीचा अर्थ सांगतो ; तुझी ती थोतांडी बाडे डोहात बुडवली
पाहिजेत " असे म्हणतो. तेंव्हा तुकोबा उत्तरादाखल एक
अवाक्षरही बोलत नाहीत . निमूट पणे गाथा घेवून इंद्रायणीच्या
डोहाकडे चालू लागतात असा पराभूत प्रसंग दाखवला आहे.
वास्तवात तुकारामांनी या वेळी आपली बाजू समर्थ पणे मांडून
नंतर स्वतः गाथेचे विसर्जन केले होते.
पु. ल. देशपांडे शेवटी जातीवरच गेला
ही अशी जाणीवपूर्वक व्यक्तित्व हानी करण्या साठी देखील
एखादा "देशपांडेच " जल्माला यावा लागतो. तुकारामांच्या आणि महाराष्ट्राच्या
दुर्दैवाने तो जल्माला आला आणि आपल्या सर्वांचा "गुळाचा गणपती " करून
गेला. निदान आता तरी या विदुषकाला खांद्यावरून उतरावा हेच आवाहन
करून पु ल ची चिरफाड थांबवतो
-रवींद्र तहकिक.
हे लेख अवश्य वाचा :
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.