वि. वा. शिरवाडकर यांचा महानपणाचा बुरखा फाडल्यामुळे जातीयवाद्यांचा महाराष्ट्रभर जळफळाट सुरू आहे. मात्र, त्याचबरोबर काही सूज्ञ लोक जात, पंथ आणि धर्माचे भेद विसरून माझ्या सत्य लेखनाला पाठींबाही देत आहेत. रवीन्द्र तहकीक यांनी माझ्या लेखाला असाच पाठींबा व्यक्त केला आहे. तहकीक साहेबांचे आधी आभार मानते. तहकीक साहेबांनी मला पाठविलेला मेल पुढे देत आहे.
...............................................................
अनिता ओठांची मोहर खोलून
अन बोटांची भाषा बोलून ( ब्लॉग वरचे लेखन म्हणजे
एका अर्थाने अंगुली निर्देशच नाही का ) तू
नेट वरचा मूक मुक्तसंवाद पुन्हा सुरु केलास या बद्दल
प्रथम तुझे जाहीर अभिनंदन आणि स्वागत.
आज तू प्रदीर्घ विश्रांती नंतर एक चांगलाच धष्ट-पुष्ट
बकरा सोलून उलटा टांगला आहेस.
मराठीच्या कुरणात विनाअटकाव चरून पोसलेल्या
या मस्तवाल बोकडाला लोक वनराज समजायला
लागले होते. परंतु ज्याला लोक आयाळ समजतात
ती आयाळ नसून बोकडाला वेळीच खाटकाच्या खोडावर
न घेतल्या मुळे निबर होऊन फुटलेली दाढी आहे हें
तू दाखऊन दिलेस . त्याचे कवित्व आणि नाटककार असणे
देखील नैसर्गिक प्रतिभेचा अविष्कार नसून अनाहूत आणि
अनावश्यक वाढलेले अजागळ ( काही बकऱ्याच्या हनुवटी खाली
लोंबणारे मांसल गळ किंवा गळू ; अजा ( बकरा ) गळ ( मांसल गळ /गळू )
आहेत हें सांगण्याचे तू धाडस केले.
मराठी साहित्यात असे अनेक मस्तवाल बकरे होऊन गेले ज्यांना असे
सोलून उलटे टांगणे गरजेचे आहे . त्याची सुरुवात तू एका महत्वाच्या
बकऱ्या पासून केली आहे. दिवाभीत घुबडा सारखा दिवसा घरात कोंडून घेवून
आणि रात्री अपरात्री डोंगर माथ्यावर बसून विदेशी दारू आणि साहित्य रिचवत
मराठी साहित्याच्या नावाखाली चकण्या चा कचरा माथी मारणाऱ्या
या नशाबाज बकऱ्याला आज तू चांगलेच उघडे पाडले.
आनंद झाला . आता त्या पुल्याचाही एकदाचा निकाल लाऊन टाक .
- रवीन्द्र तहकीक
No comments:
Post a Comment