Thursday, 12 December 2013

महाराणी पुतळाबाई सती की खून?

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


शिवरायांचा खून केल्यानंतर राजांचा अंत्यविधी घाई-घाईने उरकण्यात आला. राजांच्या
खूनानंतर एकही पत्नी सती गेली नाही. कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. पण पुढे पुतळाबाई सती
का गेल्या? त्यानंतर ब्राह्मणांचे प्रस्थ वाढले, आणि त्यांनी राजांच्या समाजसुधारणेला
कलंक लावण्यासाठी पुतळाबाइंनी सती जावे यासाठी देव-धर्म यांच्या गोंडस नावाखाली ब्राह्मणांनी
पुतळाबाईचा छळ केला. म्हणूनच पुतळाबाई राजांच्या अंत्यविधीनंतर ८५ दिवसांनी सती गेल्या.
म्हणजेच राजांनी केलेल्या क्रांतीला त्यांच्या घरातच काळीमा फासण्याचा ब्राह्मणांनी प्रयोग केला.
भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत. राजांनी
शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वत:च्या मातोश्री जिजाऊमाँसाहेब यांना सती
जाण्यास विरोध केला व या कू्रर परंपरेला तिलांजली दिली. अशा राजांच्या महाराजी पुतळाबाई सती
जाण्यामागची कारणमिमांसा स्पष्ट होणे अत्यंत महत्वाचे आहे, आणि पुतळाबाई राजांच्या खूनानंतर
८५ दिवसांनी सती गेलेल्या आहेत याचा अर्थ पुतळाबाइंना सती जाण्यास प्रवृत्त केले, यासाठी संस्कृती
हे हत्यार ब्राह्मणांनी वापरले. परंतु सती जाणे हा संस्कृतपणा नाही, तर अमानुषपणा आहे. हा उघडउघड
खून आहे. पतीनिधनानंतर सती जाण्याची अनिष्ट प्रथा रुढ झाली. पण पत्नीनिधनानंतर एकही पुरुष
सता गेला नाही. याचे कारण काय? पुरुषाला सौभाग्य सुवर्णालंकार नसतात. पण स्त्रियांना सौभाग्य
अलंकार असतात. पतीनिधनानंतर पत्नीने उंची वस्त्रे परिधान करुन सोन्याचे अलंकार अंगावर घालून
पतीच्या प्रेताबरोबर जावे व चितेजवळ गेल्यावर ब्राह्मण पुरोहित विधीवत पत्नीला चितेवर बसवत
असत. पण त्यापुर्वी सती जाणाèया स्त्रीचे सर्व अलंकार त्या ब्राह्मण पुरोहिताला देणे बंधनकारक असे
आणि नंतर चिता पेटवली जात असे. सती जाणारी स्त्री प्राण वाचविण्यासाठी तडफडत असे आणि
त्यानंतर चिता पेटवली जात असे. पण तिने बाहेर येवू नये यासाठी हातात लांबलांब काठ्या घेऊन तिला
ढकणारे पुरुष चितेभोवती उभे असत. तिच्या किंचाळण्याचा आवाज येऊ नये यासाठी कर्णकर्कश वाद्यांचा
आवाज केला जात असे व हे सर्व निर्दयकृत्य धर्म व संस्कृतीच्या नावाखाली केले जात असे. हे सर्व
कशासाठी? तर त्या स्त्रीच्या अंगावरचे सोने ब्राह्मणाला मिळावे, यासाठी ब्राह्मणांनी सतीप्रथा सुरु केली.
म्हणजे संपत्तीसाठी देवा-धर्माच्या नावाखाली राजरोस खून करण्याची अनिष्ट परंपरा ब्राह्मणांनी सुरु
केली. या प्रथेला पुतळाबाई बळी पडल्या. पुतळाबाईकडून सोने-संपत्ती मिळविण्यासाठी संस्कृतीच्या
नावाखाली पुतळाबाईचा ब्राह्मणांनी बळी घेतला. बहुजनस्त्रियाप्रमाणे ब्राह्मणस्त्रियादेखील बळी
पडलेल्या आहेत. वर्णव्यवस्थेत भारतातील कोणत्याही स्त्रियांना स्थान नव्हते. ब्राह्मण परकिय आहेत ते
फक्त पुरुषच भारतात आले. ब्राह्मणस्त्रिया बहुजनांच्या असल्यामुळे ब्राह्मणांनी त्यांच्या स्त्रियांचा
देखील छळ केला. म्हणूनच पुण्यातील विधवा ब्राह्मण मुलींना जोशी, देशपांडे, अभ्यंकरापेक्षा राष्टड्ढपिता
जोतिराव फुले आपले वाटले व त्या जोतिरावांच्या आश्रयाला आल्या.

शिवाजीराजांच्या जेष्ठ महाराणी सईबाई यांचे ५ सप्टें. १६५९ रोजी आजारपणात निधन झाले
होते. शिवाजीमहाराजांच्या खूनानांतर फक्त पुतळाबाई सती गेल्या. पुतळाबाईशिवाय कोणीही सती गेले
नाही. या प्रसंगी ब्राह्मणांनी दबावतंत्राचा वापर केला. या सर्व घटना ब्राह्मणांनी संभाजीराजे नसताना
केल्या. (मोठमोठ्या घराण्यात स्त्रियांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अनेक विधी करण्यास
ब्राह्मण प्रवृत्त करतात. पुरुषांच्या परस्पर स्त्रिया गुपचुप यज्ञ-याग, अभिषेक, सत्यनारायण करुन अमाप
धन देतात.) देवाधर्माच्या नावाखाली कु्रर वैदिकांनी पुतळाबाईसारख्या आदर्श महाराणीचा खून केला हे
मात्र निश्चित. पुतळाबाई २७ जून १६८० रोजी राजांच्या खूनानांतर ८५ दिवसांनी सती गेल्या, नव्हे तर
वैदिकांनी पैशासाठी पुतळाबाईचा खून केला. पुतळाबाईच्या समाधीवर जाणीवपूर्वक कुत्रा उभा
करण्यात आला आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment