Wednesday, 11 December 2013

शिवाजीराजांवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही
खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो
तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास)
भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहिला गेला.
अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार
मारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील
मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हा होता. त्याने राजांची अनेक गुपिते खानाला सांगितली.
प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.
राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांच्या कपाळावर तलवारीचा वार
केला. (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री
कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनी राजांच्या कपाळावर वार केला. राजांच्या संपूर्ण आयुष्यात
कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या
केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील
राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते काम कृष्णा कुलकर्णीने केले. कुलकर्णीला खात्री होती की
राजा आपणाला ठार मारणार नाही. कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. पण राजांनी
कपाळावर वार करणा-या दहशतवादाचे मूळ कृष्णा कुलकर्णीचे तुकडे-तुकडे केले. म्हणजे राजांनी
ग्रंथप्रामाण्य नाकारले. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णीने पहिला वार केला होता.
याप्रसंगी सिद्धी इब्राहिम हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे
जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? याचा विचार
वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला
प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांवर वार करणा-या कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी
केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

6 comments:

  1. अनिता पाटील विचार मंच मधील सर्वच लेख खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून मी कवितासागर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक चालवतो, कवितासागर च्या अंकाला जगभरातून वाचकवर्ग असून कवितासागर ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. पहिले व एकमेव आंतरराष्ट्रीय कविताविषयक नियतकालिक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकोर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकोर्ड कडून कवितासागरचा नुकताच सन्मान करण्यात आला असून, माझ्या नियतकालिकात जोशी - देशपांडे - कुलकर्णी दाखवा आणि १० रुपये बक्षीस मिळावा असे माझे आवाहन आहे, थोडक्यात माझ्या नियतकालिकात बडव्याना प्रवेश नाही. कदाचित बडव्यांच्या सहभागा शिवाय चालविण्यात येणारे हे एकमेव नियतकालिक असेल. तात्पर्य असे की अनिता पाटील विचार मंच वरील काही किंवा सर्वच लेख आम्ही संबंधित लेखकाच्या नावासह व अनिता पाटील विचार मंच वरून साभार असा स्पष्ट उल्लेख करून पुनर्प्रकाशित करू इच्छितो तरी कृपया आपण आमची विनंती मान्य करून आम्हांस तशी परवानगी द्यावी. या विषयाला अनुसरून आपणास जर काही सुचवायचे असल्यास आपले स्वागत आहे. आपल्या सहकार्य व प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

    डॉ सुनील पाटील,
    प्रकाशक,
    कविता सागर प्रकाशन,
    सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,
    जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
    मोबाईल - ९९७५८७३५६९, ०२३२२ २२५५००
    sunildadapatil@gmail.com

    ReplyDelete
  2. धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय हो

    ReplyDelete
  3. Very nice real history of chatrapati

    ReplyDelete