Thursday, 12 December 2013

शिवाजीराजांचा मृत्यू की खून?

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहूजी सोमनाथ थांबले नाहीत. नानाप्रकारे शिवरायांना
संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. त्या दरम्यान संभाजीराजे मोगलांकडून येवून पन्हाळा
येथे थांबले होते. हंबीरराव मोहितेही रायगडावर नव्हते. मोरोपंतांना त्र्यंबकेशरला पाठविले होते.
अण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी असणा-या पाचाडात थांबला होता. तर गडावर राहूजी सोमनाथ
हा ब्राह्मण अधिकारी होता. तोही या कटात सहभागी होता. राजांना कसल्याही परिस्थितीत ठार मारायचे
हा कट मोरोपंत, अण्णाजी दत्तो, राहूजी सोमनाथ यांनी केला. रायगडाची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली.
कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही, याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय
येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळापासून दूर थांबले होते. खून करणारा
पाठीमागे कोणताही पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेत असतो. या प्रसंगी राज्यातील अत्यंत
महत्वाची माणसे रायगडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळगडावर होते. संभाजीराजांना शिवाजीराजांनी
पन्हाळगडाच्या सुभेदारपदी नेमले होते. सेनापती हंबीरराव मोहिते तळबीड या ठिकाणी होते. तळबीड हे
पन्हाळगडापासून जवळ तर रायगडापासून २५० किलोमीटर आहे. शिवाजीराजांच्या कुटुंबातील सर्व
नातेवाईक पाचाडात होते. रायगडावर राहूजी सोमनाथ होता. तो कु्र, स्वार्थी, पाताळयंत्री होता. असा
स्पष्ट उल्लेख शिवभारतात आहे. (संदर्भ- वा.सी. बेंद्रे लिखित- श्री. छ. संभाजी महाराज) या प्रसंगी
सोयराबाईवर प्रचंड दबाव होता. पण त्या असहाय असल्यामुळे कसलाही प्रतिकार करु शकल्या नाहीत.
त्या वेळेस राजाराम फक्त दहा वर्षाचे होते.

३ एप्रिलचा दिवस उजाडला. राजांच्या भोवती ब्राह्मणांचे वलय होते. राहूजी सोमनाथने
गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडावरची कोणतीही बातमी फुटू नये याची दक्षता राहूजी सोमनाथने
घेतली होती. कदाचित शिवाजीराजांना या कटाचा सुगावा लागल्यामुळे शिवाजीराजांनी
आप्तस्वकियांना बोलावून घेण्यासाठी पत्रे  पाठविली. परंतू ती पत्रे कोणालाही मिळाली नाहीत. कारण
गडाची सर्व सुत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. त्यामुळेच गडावर ब्राह्मण मंत्र्यांनी शिवाजीराजांचा खून
करण्याचा कट रचला. याप्रसंगी शिवाजीरायांचे जेष्ठ पुत्र संभाजीराजांना ही बातमी समजणार नाही, याची
जबाबदारी घेण्यात आली. सरसेनापती आणि शिवरायांचे मेहुणे हंबीरराव मोहिते हे देखील
अंत्यविधीला उपस्थित नव्हते. जवळ कोणीही नातेवाईक नव्हते नातेवाईक नव्हते म्हणूनच
सोयराबाइंनी प्रतिकार केला नसावा. आणि हा खून सोयराबाइंनी केला अशी अफवा ब्राह्मणांनी उठविली.
सत्ता प्राप्तीसाठी हे कृत्य सोयराबाइंनी केले असावे अने अनेकांना वाटले. कारण राजारामाला लगेचच
सर्व ब्राह्मण मंत्र्यांनी सिंहासनावर बसविले. पण सोयराबाइंनी राजारामाला गादीवर बसविण्याचा
आग्रह केला नव्हता. राजाराम दहा वर्षाचे असल्यामुळे आपल्या तंत्राने राज्यकारभार करावा असे
नियोजन ब्राह्मण मंत्र्यांचे होते. शिवाजीराजांच्या खूनानंतर संभाजीराजांचा खून करायचा व नंतर लहान
राजारामचा खून करायचा व सर्व सत्ता ताब्यात घ्यायची असा कुटील डाव ब्राह्मण मंत्र्यांचा होता.
म्हणूनच ते संभाजीराजांना अटक करण्यासाठी गेले होते. पण हंबीरराव मोहिते यांच्या दूरदृष्टीमुळे हा
अनर्थ टळला. हंबीरराव मोहिते हे राजारामाचे सख्खे मामा होते. त्यामुळे ते आपणाला पूर्ण सहकार्य
करतील अशी आशा ब्राह्मणांना होती. पण हंबीररावांच्या स्वराज्यनिष्ठेमुळे दगाबाज ब्राह्मण मंत्र्यांनाच
अटक झाली.

ज्यावेळेस महाराजांचा मृत्यू झाला, तेव्हा राजांचे वय फक्त ५० वर्षांचे होते. राजांना कोणताही
असाध्य रोग नव्हता किंवा ते प्रदीर्घ आजारी नव्हते. राजांची प्रकृती निरोगी होती. असा स्पष्ट उल्लेख
‘कॉस्मा दी गार्डा' हा परकीय इतिहासकार करतो. वयाच्या ५०व्या वर्षी राजांना नैसर्गिक मृत्यू येणे
कदापिही शक्य नाही.

राजांचे समाजपरिवर्तनाचे कार्य, रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध, ३ एप्रिलचे
गडावरील संशयास्पद वातावरण, महाराजांनी पाठविलेले पण न मिळालेले पत्र, राजांचा घाई-घाईने
उरकून घेतलेला अंत्यविधी, ही बातमी कोणालाही समजणार नाही याची अण्णाजी दत्तो, राहूजी
सोमनाथ, मोरोपंत यांनी घेतलेली दक्षता. पराक्रमी, विव्दान, चारित्र्यसंपन्न आणि जेष्ठ पुत्र
संभाजीराजांऐवजी १० वर्षाच्या कनिष्ठ पुत्र राजारामाला गादीवर बसविण्यामागची ब्राह्मण मंत्र्यांची
भूमिका आणि संभाजीराजांचे सांत्वन करण्याऐवजी त्यांना अटक करण्यास गेलेले अण्णाजी दत्तो,
मोरोपंत या सर्वच बाबींमुळे शिवाजीराजांचा ब्राह्मण मंत्र्यांनी खून केला हे सिद्ध होते.
संभाजीराजांना अटक (ठार) करण्यास निघालेल्या मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत या मंत्र्यांना
वाटेतच हंबीरराव मोहित्यांनी अटक केली. संभाजीराजे रायगडावर गेले. त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.
याप्रसंगी सोयराबाइंने शिवरायांना विष दिले अशी अफवा होती. याची जाणीव कदाचित सोयराबाइंना
सुरुवातीला नसावी, परंतु सोयराबाई निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा आहे.


संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात की, ‘‘सोयेयराबाई स्फटिकासारखी निर्मळ मनाची आहे". याचा अर्थ सोयराबाई निर्दोष तर होत्याच, पण संभाजीराजांना सोयराबाई आदरस्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच
सोयराबाईला संभाजीराजांविरुद्ध भडकाविण्याचा प्रयत्न केला होता. (संदर्भ-छ. संभाजी-२२१
वा.सी.बेंद्रे) सोयराबाई-संभाजी मातापुत्रांचे संबंध खुप प्रेमळ होते. संभाजीराजांनी धाकट्या राजाराम
या भावाला जिवापाड जपले. संभाजीराजांनीच राजारामाची नंतर तीन लग्ने करुन दिली. (ताराबाई-
मोहिते, राजसबाई-गाडगे, आंबिकाबाई-खानविलकर) याचा अर्थ संभाजी आणि सोयराबाई
यांच्यामध्ये सत्तेसाठी कसलाही संघर्ष नव्हता. त्यांना सत्ताभिलाषा नव्हती. त्यामुळे सोयराबाइंनी
शिवाजीराजांना विष दिलेले नाही. सोयराबाई खून कटात अजिबात नाहीत. याचा सरळ अर्थ राजांचा
खून प्रल्हाद निराजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो या ब्राह्मण मंत्र्यांनी केला आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
हे सर्व मंत्री खून कटाचे सुत्रधार आहेत. प्रत्यक्ष खुनाची अंमलबजावणी मात्र राहूजी सोमनाथ यांनी
केली.

आता आपण शिवाजीराजांच्या मृत्त्यूबद्दल देशी आणि परदेशी साधनांचा वापर करु. पुढील
संदर्भ साधनांची चिकित्सा करण्यापुर्वी त्या साधनांचा काळ व कर्ता याचाही विचार करणे अत्यंत
महत्वाचे आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण असल्यामुळे बèयाच सत्य शोधण्यास
अडचणी येतात. तरीदेखील अपराधीपणाची जाणीव संदर्भ साधनात प्रकर्षाने जाणवल्यामुळे राजांच्या
खूनाचे महाकोडे सुटण्यास मोठी मदत झाली आहे. सुरुवातीला आपण अमराठी संदर्भ साधनांचा विचार
करु.
  •  इंग्रजांचे पत्र- ‘‘शिवाजीमहाराजांचा मृत्यू रक्तातिसाराने झाला".
  •  पारशी कागदपत्र (मासिरे आलमगिरी-साकीमुस्तेदखान)- ‘‘ शिवाजी हे घोड्यावरुन उतरले त्यांना अतिउष्मेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला."
  •  भिमसेन सक्सेना (औरंगजेबाचा अधिकारी)- ‘‘शिवाजीराजे आजारी पडले काही दिवसाच्या आजारानंतर ते मृत्यू पावले."
  •  खाफिखान (मोगलसाम्राज्याचा इतिहास)- ‘‘शिवाजीराजांनी जालन्यावर स्वारी केली याचवर्षी ते आजारी पडून ते मृत्यू पावले."
  •  निकोलाओ मनुची (असे होते मोगल)- ‘‘ शिवाजीराजे नेहमी मोहिमेवर फिरत, या दगदगीने थकून आणि रक्ताच्या उलट्या होऊन त्यांना मरण आले"
  •  दाघ रजिस्टर (डच कागदपत्र)- ‘‘शिवाजीराजांच्या दुसèया बायकोने राजांवर विष प्रयोग केला असावा." (दाघ रजिस्टर- १६८०. पृष्ठ ७२४.२९, संदर्भ-परकियांच्या दृष्टी.)
वरील सर्व संदर्भ साधने बातम्या किंवा अफवा ऐकूनच राजांच्या मृत्यूबद्दल लिहितात.
वरील साधनांच्या लेखकांपैकी कोणीही रायगडावर किंवा आसपास नव्हता. त्यामुळे वरील
साधनांच्या लेखकांची साधने संदिग्ध, अविश्वसनीय आहेत. शिवाजीराजांनी राजारामाचा
विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाईशी लावून दिला.
त्यानंतर अठरा दिवसांनीच शिवाजीराजांचा खून झाला. १८ दिवसात राजे आजारी पडणे
आणि आजार विकोपाला जाणे कदापिही शक्य नाही. वरील साधनांपैकी आलमगिरीकार
मुस्तेदखान, मनुची आणि इंग्रज हे राजांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला,
असे सांगतात. पण रक्ताच्या उलट्या का झाल्या? हे त्यांना माहीत नाही. विष दिल्यानेच उलट्या
झाल्या. भिमसेन सक्सेना आणि खाफीखान हे "राजे आजारी पडून मृतू पावले" असे सांगतात. पण आजारी
का पडले? हे त्यांना माहित नाही. आजारी का होते? हे देखील त्यांना खात्रीलायक माहिती
नाही. दाघ रजिस्टरमध्ये मात्र विष प्रयोगाचा उल्लेख आहे. परंतु त्यांनीही अफवेवर विश्वास
ठेवलेला असल्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांनीच राजांना विष प्रयोगाने ठार मारले त्याऐवजी राजांच्या
पत्नीचा उल्लेख केलेला आहे. सोयराबाइंची अफवा होती. पण ब्राह्मण मंत्र्यांनीच राजांना विष
प्रयोगाने ठार मारले. हे दाघ रजिस्टर निसंदिग्धपणे सिद्ध करते.

आता आपण मराठी-संस्कृत संदर्भ साधनांचा अभ्यास करु-
या साधनामध्ये समकालीन, उत्तरकालीन साधने असे प्रकार आहेत. सुरुवातीला आपण
उत्तरकालीन साधनांची चिकित्सा करु.
  •  ९१ कलमी बखर- ‘‘राजांना नवज्वराची व्यथा झाली आणि राजे स्वामीस कैलासवास झाला."
  •  शिवदिग्विजय- ‘‘सोयराबाईकडून राजांना विषप्रयोग झाला"
  •  चिटणीस बखर- ही बखर सोयराबाईवरच आरोप ठेवते
  •  शिवभारत- (अपुर्ण काव्य)
  •  जेधे शकावली- "चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवारी (३ एप्रिल१६८०) दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवाजीराजांचे निधन झाले. हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत पेशवे अण्णाजीपंत आणि प्रल्हादपंतांना कैद करुन पन्हाळगडावर संभाजीराजांकडे नेले."
  •  शिवापुर शकावली- "चैत्र पौर्णिमेस शिवाजी राजे समाप्त झाले."
 चिटणीस बखर व शिवदिग्विजय १८१८ सालची असल्यामुळे समकालीन नाही. पण
सोयराबाइंनी विषप्रयोग केला हा उल्लेख आहे. याचा अर्थ राहूजी सोमनाथाने
विषप्रयोग केला होता. ब्राह्मण मंत्र्यांनी राजांचा विषप्रयोगाने खून केला. पण सर्वत्र
सोयराबाईने खून केला अशी अफवा पसरवली. म्हणूनच सोयराबाईने विषप्रयोग केला
असे देशी व परदेशी लेखकांनी लिहिले. त्यांच्यापर्यंत अफवा पसरली होती. खरी
घटना पोहोचली नव्हती.

शिवभारतकार कवींद्र परमानंदचे अकाली निधन झाल्यामुळे कारतलबखानाचे
उमरखिंडीतील युद्ध येथपर्यंतचाच उल्लेख आहे.
जेधे शकावली - ही शकावली म्हणजे दैनंदिनी असल्यामुळे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे
फक्त निधन झाले एवढाच उल्लेख जेधेशकावलीत आहे. पण त्यानंतर लगेच हंबिरराव
मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी व प्रल्हाद यांना कैद केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी
खून केला म्हणूनच त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. म्हणजेच जेधे
शकावलीसुद्धा मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हाद व राहूजी सोमनाथ यांनी खून केला असे
सिद्ध करते.

 आता शेवटचे व अत्यंत महत्वाचे साधन म्हणजे सभासद बखर.
या बखरीचा कर्ता कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजांच्या कारभारात स्वत: भाग घेतला होता.
त्यामुळे त्या बखरीतील अतिरंजित व श्रद्धाळू भाग वजा केला तर बरीचशी वस्तुनिष्ठता आहे. सभासद
मृत्यूबद्दल पुढीलप्रमाणे वर्णन करतात :

‘मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली. राजा पुण्यश्लोक काल-ज्ञान जाणे. विचार
पाहता आयुष्याची मर्यादा झाली हे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते. त्यामध्ये सभ्य
लोक बोलावून आणले. बोलिले की तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यूलोकच आहे. यामागे किती
उत्पन्न झाले किती गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरुप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण
श्रींचे स्मरण करितो म्हणोन अवघियांस बाहेर बैसवले. आणि राजियांनी श्री भागिरथीचे उदक आणून
स्नान केले. भस्म धारण करुन रुद्राक्ष धारण केले. आणि योगाभ्यास करुन आत्मा ब्रह्मांडांस नेऊन
दशव्दारे फोडून प्राणप्रयाण केले. शालिवाहन शके १६०२ रौद्रमान संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, शनिवार
दोन प्रहरी काळ रायगडी झाला. त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले. आणि राजे विमानी बसून
कैलासास गेले. हे जड शरीर मृत्यूलोकी त्याग केला. राजाचे देहावसन त्या दिवशी पृथ्वीकंप जहाला.
गगनी धुमकेतू उदेला उल्कापात आकाशाहून आला. रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली. अष्टदिशा दिगदाह
होऊन गेला. श्रीशंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले. पाण्यातील मच्छ बाहेर पडून अमासवाणी
उदक झाले. ऐसी अरिष्टे झाली. मग राजेयांचे कलेवर चंदनकाष्टेवर व बेलकाष्टे आणून दग्ध केले. स्त्रिया
राज्यपालख्या कारकून हूजरी सर्व लोकांनी सांगितले की, धाकटा पुत्र राजाराम क्रिया करावी. सर्वांनी खेद
केला राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तरकार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडिल पुत्र
संभाजीराजे वेळेस नाहीत. याजकरिता धाकट्याने क्रिया केली असे राजांचे चरित्र आख्यान उत्पन्न
काळापासून देहावसानापर्यंत जाहले."

जिंजी येथे राजारामासोबत असताना सभासदांनी बखर लिहिली. सभासद हे राजारामांच्या
पदरी आल्यामुळे सोयराबाईवर जो आळ आलेला होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तसेच
सभासद हे स्वत: ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी सत्यकथन करण्याचे टाळलेले आहे. सभासद हे देवभोळे
असल्यामुळे प्रस्तुत चरित्रात अनेक ठिकाणी अतिरंजित आणि चमत्कारिक वर्णन सभासदांनी केलेले
आहे. अपराधीपणाची भावना प्रखर झाली की, अतिरंजित स्पष्टीकरण केले जाते. अपराधीपणाची केलेले जाते उदा. संत तुकारामांचा खून ब्राह्मणांनी केला हे लपविण्यासाठी ब्राह्मणांनी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे लिहून ठेवले. अगदी तसाच प्रकार राजांच्याबाबत घडलेला आहे.

सभासदांनी केलेल्या वर्णनाचे आपण आता स्पष्टीकरण करु.
शिवाजीराजांना ज्वर झाला, असे सभासद सांगतात. ज्वर झाला असताना राजांनी योगाभ्यास केला, हे
कदापि शक्य नाही. राजांनी आयुष्यात कधीही योगसाधना केलेली नाही. मग ३ एप्रिल १६८० या
दिवशीच राजांनी आत्मा ब्रह्मांडास लावणे व दशव्दारे फोडून प्राणत्याग करणे असे धादांत खोटे लिहिणे.
म्हणजेच राजांचा खून झाला हे सिद्ध होते. योग साधनेने शारिरीक व मानसिक संतुलन राहते. याबाबत
दुमत नाही, पण योगसाधनेने मृत्यू, अमरत्व, सिद्धी मिळते या भाकड कथा आहेत. शिवाजीराजे काही
गाभा-यात बसून किंवा अरण्यात बसून योगसाधना करणारे भोंदू महाराज नव्हते. कुटुंब स्वराज्य, समाज
वा-यावर सोडून आत्मा ब्रह्मांडाला लावण्याचे देशद्रोही उद्योग महाराजांनी केले नाहीत. हातात तलवार
घेऊन स्वराज्य निर्मिती या नियोजनासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला आणि सर्वात
महत्वाचे म्हणजे योग साधना म्हणजे फक्त एका दिवसात साध्य होणारी साधना नव्हे. सभासद म्हणतात
की, राजांनी सर्व सभ्य जनांना बाहेर बसण्यास सांगितले. याचा अर्थ खून झाला. त्याप्रसंगी राजांजवळ
एकही सभ्य किंवा जवळचा नातेवाईक नव्हता. महाराणी सोयराबाई राणीमहालातच होत्या.
शिवाजीराजांचे घर म्हणजे १० बाय १० ची खोली नव्हे. शिपाई, अधिकारी, मंत्री, सरदार आणि महाराणी
यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये आणि निवासस्थानाचीही व्यवस्था रायगडावर आहे. (जिज्ञासूंनी रायगड
अवश्य पहावा) सोयराबाई स्फटिकाप्रमाणे स्वच्छ मनाच्या आहेत. असा अभिप्राय संभाजीराजांनी
शिवाजीमहाराजांच्या खूनानंतर ५ महिन्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ सोयराबाई निर्दोष म्हणजेच
सभ्य आहेत आणि सभासद म्हणतात त्याप्रमाणे सोयराबाई (खून झाला त्याप्रसंगी) सभ्य असल्यामुळे
राजांजवळ नव्हत्या. इतर सर्व नातेवाईक खाली पाचाडात होते. या संधीचा फायदा घेऊनच अण्णाजी
दत्तो, मोरोपंत यांनी राहूजी सोमनाथ मार्फत राजांना विष देऊन खून केला. खूनाबाबत संशय येऊ नये
यासाठी वेगवेगळ्या अफवा उठविल्या.

शिवाजीराजे विमानात बसून कैलासास गेले असे सभासद म्हणतात, आणि लगेचच पुढील
परिच्छेदात राजांच्या प्रेताचे दहन राजारामाने केले असे लिहितात. विमानात बसून कैलासास गेल्यानंतर
पुन्हा अंत्यविधी करण्याची गरजच काय? म्हणूनच ब्राह्मणांनी बहुजन समाजाला कसलाही संशय
येऊ नये यासाठी फार पुर्वी जडदेह, सुक्ष्मदेह, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक या कल्पना निर्माण केल्या.
राजे विमानात बसून गेले असे सभासदाशिवाय कोणीही सांगत नाही, याचा अर्थ तुकाराम
महाराजाप्रमाणेच राजांचा खून करुन विमानाची कथा त्यांच्या चरित्रात घुसडण्यात आली. परिवर्तनाचे
काम करणाèया बहुजन समाजातील महापुरुषांना अशाप्रकारे संपविण्यात आलेले आहे. अशा प्रकारे
राहूजी सोमनाथने राजांचा खून केला. राजांचा खून झाला नसता तर जगात राजांनी स्वातंत्र्य, समता,
बंधूभाव प्रस्थापित केली असती. अशा विश्ववंद्य राजांचा खून करुन ब्राह्मणांनी केवळ शिवाजीराजांचेच
नव्हे तर संपूर्ण जगाचे नुकसान केलेले आहे.

निनाद बेडेकरसारखे लोक आजही पसरवित आहेत अफवा 
शिवरायांच्या खूनामुळे रायगडावर पूर्णत: तणावाचे आणि भितीचे वातावरण होते. ही बातमी
फुटणार नाही याची पुर्ण दक्षता ब्राह्मणांनी घेतली होती. राजांचा खून झाल्याची बातमी समजली असती
तर देशात एकही ब्राह्मण त्याही काळात बहुजन समाजाने जिवंत ठेवला नसता, पण त्यांनी जनतेची
दिशाभूल केली. राजांचा मृत्यू गुडघी रोगामुळे झाला, अशी अफवा पसरवली. हीच बातमी सर्वदूर
पोहचली. पण मित्रहो, जगाच्या इतिहासात पुर्वी आणि आजदेखील गुडघीरोग कोणालाही झाल्याचे
उदाहरण सापडलेले नाही. म्हणजेच ब्राह्मण डावपेच बदलतात, उद्देश बदलत नाहीत. राजांचा खून
सोयराबाइंनी केला असाही प्रचार ब्राह्मणांनी सुरु केला. राजांचा मृत्यु अँथ्रॅक्सने झाला असाही
अपप्रचार आजदेखील निनाद बेडेकरसारखे राजांचे शत्रू करतात (इंडियन एक्सप्रेस नोव्हें.२००१)
म्हणजेच राजांचा खून करणारे खरे आरोपी निर्दोष सुटावेत यासाठी ब्राह्मणांनी अनेक अफवा पसरविल्या
व आजदेखील पसरवत आहेत.जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत, यासाठी लक्ष वेधून जनतेची
दिशाभूल करणे व आपण कसे निरपराध आहोत याचा आव आणण्यासाठी ब्राह्मणी प्रचार आजदेखील
वेगवेगळ्या वावड्या उडवत आहेत.


संभाजीराजांना ठार मारण्याचा ब्राह्मणांनी चार वेळा प्रयत्न
राजांचा खून केल्याबरोबरच राजारामाला ब्राह्मणांनी सिंहासनावर
बसविले, कारण राजाराम लहान होते, राजारामाला नामधारी राजा करायचे आणि राज्यकारभाराची सर्व
सुत्रे हाती घ्यावयाची आणि लवकरच राजारामचाही काटा काढायचा असा डाव या मंत्र्यांचा होता. तर
संभाजी हुशार, चाणाक्ष, पराक्रमी, धाडसी होते. म्हणून संभाजीराजांना अटक करण्यासाठी  मोरोपंत, अण्णाजी दत्तो  पन्हाळगडाकडे निघाले. वाटेतच हंबीरराव मोहिते यांनी त्यांना अटक केली, आणि
संभाजीराजांचा रायगडावर अभिषेक केला. संभाजीराजे गादीवर येताच संभाजीराजांना ठार मारण्याचा
ब्राह्मणांनी चार वेळा प्रयत्न केला, पण तीन वेळा संभाजीराजांनी त्यांना माफ केले होते. चौथ्या वेळेस
संभाजीराजांनी सर्व ब्राह्मण मंत्र्यांना ठार मारले, आणि शिवरायांच्या खूनाचा बदला घेतला.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment